माणूस आहे! शेवटी चुका करणारच...पण कधीकधी काही चुकांनंतर स्वतःवरच फार चिडचिड होते. हा धागा अशाच चुकून बघितलेल्या चित्रपटांविषयी....
अशा वेळेस खर तर फक्त त्या चित्रपटाची चिरफाड समीक्षा लिहावी इतका उत्साह नसतो किंवा तितकी त्या चित्रपटाची लायकीही नसते, पण तरीही 'भडास' कुठेतरी काढावशी वातते, हा धागा खास त्याच्यासाठी!!
तर सुरुवात माझ्यापासून - मी Delhi-6 पाहिला (सांगितल ना, चुकलं माझं!), लागला त्याच्या दुसर्याच दिवशी. तेव्हा परीक्षण वगैरे काही वाचले नव्हते, पण प्रमोज ठीक वाटले, आणि राकेश ओमप्रकाश मेहरा (पुढच्या वेळेस रा. ओ. मे. हं!) म्हनजे अक्स, रंग दे बसंती वाला. तर तो एवढा धोकादायक (म्हणजे त्या चोप्रा, जोहर, बडजात्या इ. इ. सारखा) वाटला नव्हता. पण हाय रे दैवा!!! फार, म्हणजे फारच भिकार शिनेमा बणविला की वो!
नुसता छळ आहे - ती सोनम कपूर, मख्ख आहे - दिसायलाही आणि अभिनयातही, त्या पेक्षा ती दिव्या दत्ता १०० पटीने बरी. शिवाय सोनम कपूरचा रोलही थिल्लर/पोरकट आहे. आणि अभिषेक...जाऊ दे! कुठे त्रास घ्या... त्याला तसेही काला बंदर बनवले आहे. (कोण रे तो उच्चभ्रू 'apt choice' म्हणाला?). नुसतीच कॅरॅक्टरची भरमार -- पण कुठलेच नीट डेव्हलप होत नाही.
असो! तर रा. ओ. मे. साहेब म्हणतात की - "हम सबके अंदर एक काला बंदर होता है!", बरं! ठीक आहे, मग त्याचं काय??? वैताग आहे नुसता...फार वास्तववादी वगैरे नसले तर हरकत नाही, पण थोडे सेन्सिबल असावेत ना? काहितरी तारतम्य? की ते त्या 'काला बंदर' ने नेले? अचानक त्या लोकांचे मनपरिवर्तन वगैरे होते....आणि साक्षात्त्कार होतो - "हम सबके अंदर एक काला बंदर होता है!" (तोच, जो रा. ओ. मे. सांगतो आहे चॅनेलवर ओरडून)!
गाण्यांचे म्हणाल तर - मसककली, मटक.....कहितरी...काहितरी....बम को मटक (रामा शिवा गोविंदा!!! ) ...परत कहितरी...काहितरी....मसककली असे एक गाणे गाजते आहे म्हणे, मला काही आवडले नाही. आणि ऐकायचेच असेल तर रेडीओ वर ऐका, पैसे वाया घालवू नका! प्लीज!
[[अवांतर - रहमान चे म्युजिक कितीही चांगले असले तरी हिंदी गाण्यांचे शब्द तो बहुतेक वेळा कुठेही तोडतो (अपवाद लगान सारखे काही). साथियां मधे गाण्याचे शब्द पहिल्या वेळीस ऐकतांना बरेच लक्षातच आले नाही, माझ्या बाबतीत असे सहसा होत नाही! ]]
त्यातल्या त्यात दिव्या दत्ता, ऋषी कपूरने काम बर केलंय. अतुल कुलकर्णी, ओम पुरी आणि पवन मल्होत्राला वाया घालावले आहे. पण ऋषी कपूरचा रोल जरा खटकतोच. म्हणजे त्याचे ते अभिषेकला सांगणे की खर तर मी तुझ्या आईवर मरत होतो; हे जरा subtle आणि implicitly (योग्य मराठी शब्द नाही सापडत आहे. सूचकपणे असे म्हणता येईल) घेता आले नसते का? (त्या मानाने यश चोप्राने लम्हे मधे दीपक मल्होत्रा श्रीदेवीला अनिल कपूर च्या तिच्याबद्द्लच्या प्रेमाविषयी सांगतो तो प्रसंग फार प्रगल्भपणे घेतल होत. तो दीपक मल्होत्राला झेपला नाही ते सोडा!) ते अभिषेकने तरूण वयात शांतपणे घेणे पण जरा खटकतेच. कदाचित अभिषेक फार 'ब्रॉड-माईंडेड' दाखवायचा असावा. ह्या 'ब्रॉड-माईंडेड' लोकांचे माईंड कुठे आणि कसे ब्रॉड होईल ते काही सांगता येत नाही बुवा...सो डोंट माईंड हां!
तर असा सगळाच वैताग आहे. ह्यापेक्षा वाईट सिनेमे फार कमी असतात. मला एक अविनाश वाधवान आणी शिखा स्वरूपचा आठवतोय, पण नाव विसरलो (तो तुम्ही खात्रीने बघितला नसेल, बघितला असल्यास मी तुमच्या दु:खात सामिल आहे). अजून पाहिला नसेल तर अवश्य टाळा. तिकीट काढले असेल तर विकून मिसळ खा, भेलपुरी खा, आईस्क्रीम खा किंवा.... काहिही खा/प्या; मजा करा! विकतचा त्रास कशाला? पुन्हा म्हणू नका की 'दोस्त होके बताया कायकू नही रे'! काय? ;)
तुमचीही नुकतीच (किंवा आधी) अशे काही टुकार सिनेमे पाहण्याची चूक झाली असल्यास इथे नक्की लिहा. तेवढेच मंदीच्या दिवसात आपल्या मि.पा. मित्रांचे पैसे वाचवल्याचे समाधान, नाही का?
प्रतिक्रिया
27 Feb 2009 - 5:07 pm | आनंदयात्री
>>मसककली, मटक.....कहितरी...काहितरी....बम को मटक...परत कहितरी...काहितरी....मसककली असे एक गाणे गाजते आहे म्हणे
=)) =)) =))
मस्त रे मनीष.
27 Feb 2009 - 5:11 pm | दशानन
=))
पण गाणे खरोखर सुंदर आहे... त्याचा अर्थ खुप छान आहे... :)
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
27 Feb 2009 - 5:19 pm | अवलिया
=))
--अवलिया
27 Feb 2009 - 5:16 pm | मनिष
काही दुरुस्त्या राहिल्या होत्या, त्या आता केल्या आहे!
27 Feb 2009 - 5:10 pm | अनिल हटेला
तुझ्या दःखात मी ही सहभागी आहे !
मी मात्र फुकट मध्ये पाह्यलाये ,ऑनलाइन ! ;-)
असो !! परीक्षण लै भारी !!
शॉर्टकट मध्ये लॉंगकट // =))
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
27 Feb 2009 - 5:16 pm | मेघना भुस्कुटे
हाहाहा! बिच्चारा!
मी अजून काहीच पाहिलं नैये. देल्ही सिक्सपण नाही नि लक बाय चान्सपण नाही. वाचले ब्वा!
27 Feb 2009 - 5:26 pm | बिपिन कार्यकर्ते
मागच्या आठवड्यात देल्ही-६ बघायचा प्रसंग गुदरणार होता... पण तिकिटं संपल्याने वाचलो. (हे आत्ता कळतंय).
बिपिन कार्यकर्ते
27 Feb 2009 - 7:08 pm | मनिष
'लक बाय चान्स' बरा असावा! निदाने जे ऐकले आहे त्यावरुन तरी वाटतेय. शिवाय कोंकणा सेन आणि फरहान दोघेही आवडतात, पण पहायचा 'चान्स' नाही आला अजून 'लकीली'. ;)
27 Feb 2009 - 6:53 pm | मुक्तसुनीत
आम्ही एरवी सुद्धा "दिल्ली-६" थेट्रात जाऊन हा पाहिला नसता. (गेल्या कित्येक महिन्यात थेट्रात जाऊन पाहिलेला एकमेव सिनेमा म्हणजे स्लमडॉग.) आता सुटकाच झाली म्हणायची :-) अशाच प्रकारे कोलबर रावानी "गझनी"मधून सोडवले होते ! मिपाकरांचे उपकार आहेत :-)
27 Feb 2009 - 7:04 pm | मनिष
दुसरा पर्याय बिल्लू होता....शाहरुख सहनच होत नाही, तशीच प्रियांका आणि लारा दत्ता पण. म्हणून इथे गेलो, तर....आता वाटते ' बिल्लू...' चालला असता! :(
27 Feb 2009 - 7:05 pm | शितल
=))
परिक्षण मस्तच.
27 Feb 2009 - 9:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लै भारी राव ... =))
पिच्चर टुकार असला तर प्रचंड विनोदी परीक्षणं वाचायला मिळतात, हा मिपावरचा अनुभव ...
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
28 Feb 2009 - 1:45 pm | सहज
पिक्चर जितका टुकार तितके हमखास उच्च परीक्षण वाचायला मिळते मिपावर :-)
27 Feb 2009 - 9:46 pm | रेवती
बरं झालं बुवा सांगितलत ते!
माझाही असाच समज झाला असता की रा. ओं. मे. म्हणजे ठीके, पण बरं झालं तुम्ही सांगितलत.
तुमचीही नुकतीच (किंवा आधी) अशे काही टुकार सिनेमे पाहण्याची चूक झाली असल्यास इथे नक्की लिहा.
होणार होती चूक. आपल्यामुळे बचावलो आम्ही!
तसाही तो अभिषेक नाहीच आवडत.... अगदी अमिताभचा मुलगा म्हणूनही नाही आवडत!
(गेल्या काही दिवसात अमिताभही आवडत नाही.)
रेवती
27 Feb 2009 - 9:57 pm | अमोल खरे
रेवती ताईंशी शब्दशः सहमत. बच्चनांचा अभिषेक त्याच त्याच ऍक्शन करतो जसे चेहरा वेडावाकडा हलवणे, खांदे व मान उडवत, आणी हात हलवत नाचायचा प्रयत्न करणे, केसांतून हात फिरवत बत्तिशी दाखवत हसणे ...ई,ई.
फक्त "गुरू" मधील त्याचा अभिनय मला आवडला.
हे सर्व असुन बरयाच मुलींना तो बरा वाटतो. ( म्हणजे आवडतो.) ........हे लॉजिक नाही कळत मला.
27 Feb 2009 - 10:28 pm | मनिष
अंमळ विचित्रच दिसताय तुम्ही! मुलींच्या वागण्यात म्हणे लॉजिक शोधताहेत! ;) अविवाहित दिसताय!!! :D
कुठलं रे ते गाणं? हां....बडे नासमझ हो ये क्या चाहते हो! बडे नासमझ हो...
- (समझदार, गेला बाजार निदान समझ-खिडकी) मनिष
27 Feb 2009 - 10:52 pm | ऍडीजोशी (not verified)
मुलींच्या वागण्यात म्हणे लॉजिक शोधताहेत! =)) =)) =)) =)) =)) =))
27 Feb 2009 - 11:43 pm | सखाराम_गटणे™
>>अंमळ विचित्रच दिसताय तुम्ही! मुलींच्या वागण्यात म्हणे लॉजिक शोधताहेत! Wink अविवाहित दिसताय!!! Big Grin
ठो, जबरा.
वारलो, मेलो, सगळे संपले
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
28 Feb 2009 - 1:01 pm | अमोल खरे
बरोब्बर आहे. मी आजपासून मुलींच्या वागण्यात लॉजिक शोधणार नाही हे मी माननीय छोटा डॉन, माननीय ऍडी जोशी व माननीय धमाल मुलगा यांच्या नरड्याची.....आय मीन गळ्याची शपथ घेउन सांगतो......
27 Feb 2009 - 9:51 pm | प्राजु
मनिष..
फार फार दया आली तुझी. काय अवस्था झाली असेल तुझी चित्रपट पहाताना.. कल्पना करू शकते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Feb 2009 - 11:25 pm | अनामिक
एकाच चित्रपटात
१. देशाकडे बघायचा विदेशात वाढलेल्या देश्याचा दृष्टीकोण
२. धर्म (रामलीला) आणि श्रद्धा
३. दोन भावांमधील भांडण
४. हिंदु -मुस्लीम वाद (त्याआधी दोघांमधे असलेली मैत्री)
५. घरच्यांच्या दबावाखाली होणारं मुलीचं लग्न
६. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर
७. अस्पृश्यता एक समस्या
८. आणि आपल्यात लपलेलं माकड
ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्यावर चित्रपटाला कचर्याची टोपली मिळाली तर त्यात नवल ते काय? अतिशय भंगार चित्रपट... आम्ही फुकटातच पाहीला, पण तुम्ही फुकटात दाखवला तरी बघु नका!
अतुल कुललर्णी, सुप्रिया पाठक अगदी वाया घालवलेत.
-अनामिक
27 Feb 2009 - 11:56 pm | मनिष
रामलीला विसरलोच की!!! तो एक वेगळाच छळ आहे.....मला राहून रहून नरम-गरम मधला शत्रु्घ्न सिन्हाचा रामलीलेचा प्रसंग आठवत होता...तो फारच बहारदार आहे आणि इथे त्याचा अगदी उबग येतो. ह्या रा. ओ. मे. ला सद्यसिथितीत जुने संदर्भ शोधायचे काय खूळ आहे काय माहीत...रंग दे बसंतीतही हे होते (पण ते पटण्यासारखे होते), इथे ती रामलीला सारखी त्रास देते. तसे अतुल कुलकर्णी-दिव्या दत्ता आणि तो अस्पृष्यतेचा शेवटचा प्रसंग छान हाताळलाय...संयतपणे आणि subtly! पण तेवढाच..बाकी निव्वळ डोकेदुखी!
बाकी दिल्ली इतके मोठे शहर...त्याचे इतर आधुनिक संदर्भ तो काहीच दखवत नाही...सगळा सिनेमा एका छोट्या गावात होतो आहे असे वाटते. (दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का?). अनमिक, तुमचे बरोबर आहे - एक ना धड भाराभर चिंध्या ही म्हण ह्याच चित्रपटासाठी बनवली असावी!
27 Feb 2009 - 11:49 pm | सुक्या
Delhi-6 हा खुप चांगला सिनेमा आहे. मनीषरावांच्या परीक्षणावर जाउ नका .. मी सांगतो एकदातरी पहावा असा हा सिनेमा आहे.
खोटे वाटत असेल तर एकदा पाहुन खात्री करा.
खुद के साथ बाता: च्यायला .. आमच्या डोक्याचं खोबरं झालं. बाकीच्यांचं पण होउदे. हा हा हा . . >:)
(सिनेमाप्रेमी) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
27 Feb 2009 - 11:51 pm | यशोधरा
दिल्ली ६- भंकस! मीही पाहण्याची चूक केली! ऑनलाईन, म्हणजे निदान पैसे तरी वाचले!
लक बाय चान्स - मला आवडला. फरहान, कोंकणा यांची कामे छान झाली आहेत.
बिल्लू -बघायचा चान्स नाही! एकाच वेळी शाहरुख आणि लाराला कोण सहन करेल??
28 Feb 2009 - 12:26 am | सुक्या
बघा बघा .. एकदा तरी बघा .. मी परवाच बघीतला. काय पण एक एक ध्यान आहे त्यात. तो बिल्लु, सावकार आणी सगळ्यात भारी गाणे. डोळ्याचे पारणे फिटते बघा. फक्त बघताना आपले डोळे फोडु नका. चित्रपट पाहताना स्वतः चे केसही उपटु नका. (मी उपटलेत. :()
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
28 Feb 2009 - 12:09 am | भडकमकर मास्तर
या चित्रपटावर लिहावे असे वाटत होतेच..
मनिषने आधीच मस्त लिहिले त्यामुळे आता शॉर्टमध्ये...
दिल्लि ६ म्हणजे एकूणच गोंधळ वाटला...
माझ्या दोन मित्रांना बरा वाटला म्हणून मी पाहिला... मला कळायला फार वेळ लागला...
नुसती व्यक्तिरेखांची भरताड वाटली...( ऋषी कपूर काम खास करतो पण तो नसता तर सिनेमाला काय बुवा फरक पडला असता?)
"काय बुवा म्हणायचंय या राकेशबाबाला?" असे वाट्ले.... "सबके अंदर एक काला बंदर होता है|" हे वाक्य कळाले.... पण त्यासाठी इतका मोठा सिनेमा पहायचा?
... सोनमचे प्रोमोजमधले काही क्लोजअप फार सुरेख होते म्हणून त्यांची लव्ह स्टोरी बरी असेल असा ( उगीचच ) समज करून घेतला आणि पस्तावलो....
हेच ते फोटो बरं श्याम..
पण तिची व्यक्तिरेखा लै उथळ...तिला म्हणे इंडियन आय्डोल व्हायचे असते म्हणून ती (घराच्या गच्चीवरती घसा स्वच्छ करत खालच्या गच्चीवरच्या नायकावर कधीकधी चुळा टाकण्याखेरीज) कमी कापडं घालून दिल्ली शहरातून मटकण्याखेरीज एका उच्छ्रुंखल छायाचित्रकाराबरोबर मुंबईला पळून जायची स्वप्ने पाहत असते....." काय तर म्हणे मुझे कुछ बनके दिखाना है\"
गाण्यांचा जाम कंटाळा आला... मसक्कली जरा बरे वाटले.. पण अर्थाचे काय?...
बाकी इथून तिथून सारखी रामलीला सुरू होताना पहायची म्हणजे डोक्यास शॉट झाला...त्यात ती लहान पोरे रामलीलेतून जीप फिरवतात आणि लोकांना वाटते की काला बंदर आया....... आणि काला बंदरवरून हिंदु मुस्लिम दंगलसदृश परिस्थिती काय, कायच्या काय...!!! दिल्लीतले लोक इतके का हे आहेत?
... माझाच गोंधळ चाललाय की मी काहीतरी मिस तर नाही केले ? नाही, पाहता पाहता जाम झोप येत होती हे मान्यच करावं लागेल..मग झोपलो की झोपलो नाही? झोपलो तर किती वेळ झोपलो? रा ओ मे इतका वाईट सिनेमा कसा बनवेल? असे काही प्रश्न पडून माथे फिरवून घेतले...
यापेक्षा बिल्लु बरा आणि रबने बना दी जोडी तर दहा पट बरा... म्हणजे बघा...
मेरे अंदरवाले एक काले बंदरने मुझे काट्या था इस्लिये मैने यह फिल्म देखी...
आप खुद एक बार देखके खुदको एंटरटेन करो|
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
28 Feb 2009 - 12:37 am | रेवती
माझी आज्जी जर का आज असती तर तिने आधी या पोरीला पकडून तिच्या केसांचा घट्ट अंबाडा बांधून दिला असता.
(कुणाच्याही) डोळ्यांवर आलेले केस तिला अजिबात सहन होत नसत.
रेवती
28 Feb 2009 - 11:04 am | घाशीराम कोतवाल १.२
माझी आज्जी जर का आज असती तर तिने आधी या पोरीला पकडून तिच्या केसांचा घट्ट अंबाडा बांधून दिला असता.
(कुणाच्याही) डोळ्यांवर आलेले केस तिला अजिबात सहन होत नसत.
=)) =)) =)) =)) =)) =))
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
28 Feb 2009 - 1:51 pm | यशोधरा
=))
28 Feb 2009 - 12:14 am | मनिष
असेच वाटते!!! मी पण बहुतेक थोडा वेळ पेंगलो होतो....आणि अगणित जांभया दिल्या! (|:
इतर चुकांविषयी लिहा की रे लोक्स!! (१२ वाजून गेलेत...मराठी दिन संपला आता!)
28 Feb 2009 - 12:32 am | विसोबा खेचर
मनिषराव, मस्त परिक्षण बर्र का! :)
तात्या.
28 Feb 2009 - 3:09 am | अनमिका
पैसे वाया गेले :(
भिकार चित्रपट....
28 Feb 2009 - 11:24 am | अविनाशकुलकर्णी
मनिषराव...झकास.लई हसु आल.....मार्मिक च्या "शुध्द निषाद" चि आठवण आलि..
=)) :)) :)) :)) :)) :))
28 Feb 2009 - 1:10 pm | विनायक प्रभू
आयला 'काला बंदर' बद्दल मिपावर गेले ६ महीने सांगुन राहीलो आहे की राव. पैसे देउन बघितला. अरेरे
28 Feb 2009 - 1:14 pm | दशानन
:W
:$
B)
1 Mar 2009 - 10:05 am | मनिष
मास्तर, कधी आणि कुठे सांगितले? चूक झाली आमची - कुठे लिहिले होते तुम्ही? क्रिप्टीक मेसेज होता का - त्यामुळे अंमळ ध्यानात आला नसेल ह्या पामराच्या! :(