"मैफिल"

पेशवे बाजीराव तिसरे's picture
पेशवे बाजीराव तिसरे in जे न देखे रवी...
21 Jan 2008 - 3:51 pm

हे तिचेच काव्य सारे
ही तीचीच कविता
मांडतो मैफिलीत आठवणींच्या
मीच वक्ता मीच श्रोता

होते माझेच स्वप्न खोटे
कुणाचा राग कशास धरावा
गाळुनी असहाय आसवे चार
मैफिलीचा बेरंग कशास करावा

येणार नाही ती हे ज्ञात असुनी
वाट तिची पाहण्यास्तव जगतो
रात्री चिंब भिजलेल्या पापण्या
जगासमोर दिवसा कोरड्याच ठेवतो

ओंजळीत साठऊनी थेंब थेंब तिला
तिच्याच आठवणीत चिंब भिजतो
अर्घ्य देऊनी प्रत्येक श्वासाचे
मैफिल आयुष्याची रंगवतो

कविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 Oct 2010 - 1:52 pm | अवलिया

मस्त मैफिल !

sneharani's picture

16 Oct 2010 - 1:56 pm | sneharani

मस्त!

परिकथेतील राजकुमार's picture

16 Oct 2010 - 2:07 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त कविता.

विंदांच्या 'सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी' ची आठवण झाली.