'वीज बचत' आणि 'सुरक्षा'

लक्ष्मणसुत's picture
लक्ष्मणसुत in जनातलं, मनातलं
25 Feb 2009 - 7:29 pm

'वीज बचत' आणि 'सुरक्षा'- आज अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. भारनियमनावरचे विडंबन वाचले आणि लिहावेसे वाटले. आपल्या घरात, कार्यालयात आणि इतर ठिकाणी विजेचा वापर करताना योग्य प्रकारे काळजी घेतली तर आपणांस वीज कंपनीवर ताशेरे ओढायची वेळ येणार नाही. साधारणपणे शंभर चौरस फुटांच्या खोलीत १४ ते १८ वॅट क्षमतेचा दिवा (सी.एफ.एल.) पुरतो. तर संडास/ बाथरूम मध्ये ५ वॅटचा सी.एफ.एल भरपूर प्रकाश देतो. 'शीतकपाटांची' (फ्रीज) तापमानकळ नेहमी लघुत्तमवर ठेवली तरी चालते. तसेच सर्वजण हॉलमध्ये आणि बेडरूम वकिचनचे दिवे पंखे चालू अशी परिस्थिती असते. या सर्व बाबींचा विचार करायलाच पाहिजे. तसेच योग्य प्रकारच्या वायर्स आणि आय.एस.आय. उपकरणे वापरावीत म्हणजे जिवीत व वित्त हानी होणार नाही. पुढील लेखात आणखी चर्चा करू.

तंत्रविचार

प्रतिक्रिया

शंकरराव's picture

26 Feb 2009 - 4:13 pm | शंकरराव

माहिती उअपयोगी आहे पण नवीन नाही .
अजुन वाचायला आवडेल पूढील लेख टाका लवकर.

शंकरराव
एखाद्याचे देवत्व मान्य करणे हे स्वतःच्या चूका दिसण्या ईतके अवघड काम आहे, चूका दिसल्या की स्वतःला त्रास होतो.
त्यात अजून स्वतःचे "पिल्लू" सोडून पळणे ही तर अजूनच मजेशीर गोष्ट. असो ;-)

विनायक प्रभू's picture

26 Feb 2009 - 7:41 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो

मराठी_माणूस's picture

26 Feb 2009 - 4:30 pm | मराठी_माणूस

इथे एका वसाहतीत , कोणत्याही कार्यक्रमा च्या दीवशी दीवसभर प्रचंड मोठ्या आवाजात गाणी लावतात . धार्मीक समारंभ असला तर काही विचारु नका . ही उघड उघड आवाजाचे प्रदुषण वाढवणारी वीजेची नासाडी कशी टाळता येईल. बाकी व्यक्तीगत स्वरुपात उपरोक्त काळजी घेतोच.

नितिन थत्ते's picture

26 Feb 2009 - 10:28 pm | नितिन थत्ते

मोठ्या आवाजात गाणी लावल्याने फार वीज खर्च होत नाही. सिस्टीमवर ५००० वॅट (पी एम पी ओ) असे लिहिले असले तरी खरोखरीचा आवाज आणि वीज खर्च (आर एम एस) १०० वॅट देखील नसतो. (इलेक्ट्रॉनिक विंजिनेरांनी चुकले असले तर सांगावे)

आवाजाचे प्रदूषण मात्र होते ते टाळायलाच हवे.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मराठी_माणूस's picture

27 Feb 2009 - 8:20 am | मराठी_माणूस

सोबत लाईट्चा झगझगाट ही असतोच जो सगळे झोपल्यावर सुध्दा सकाळ पर्यंत चालु असतो

नितिन थत्ते's picture

27 Feb 2009 - 6:02 pm | नितिन थत्ते

लाईट्च्या झगझगाटात मात्र फार वीज खर्च होते.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)