२६ जानेवारी २००८. प्रजासत्ताक दिनी कॅप्टन सुनील चौधरी यांना सेना पदक (शौर्य) देण्यात आले.आसामच्या तिनसुखीया जिल्ह्यातील उल्फा दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी गाजविलेल्या मर्दुमकीचा सन्मान सेना पदक देऊन करण्यात आला.
दुसर्याच दिवशी म्हणजे दि. २७ जानेवारी २००८ रोजी गुप्तचरांकडून पक्की खबर मिळाली की रंगगढ नावाच्या खेड्यात ७-८ उल्फा दहशतवादी एका घरात लपून बसले आहेत. कॅप्टन चौधरी लगेचच आपल्या सहकार्यांबरोबर त्या खेड्याकडे रवाना झाले. ज्या घरामधे दहशतवादी लपले होते त्या घराभोवती वेढा घालायला त्यांनी सुरूवात केली.
दहशतवाद्यांना याची कुणकुण लागताच ते अंदाधुंद गोळीबार करत घराबाहेर पडले आणि जवळच्या दाट झाडीत लपण्यासाठी पळू लागले. कॅप्टन सुनील चौधरी यांनी तत्काळ गोळीबार करत त्यांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. त्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले. दुसर्याला जखमी केले. त्या जखमी दहशतवाद्याने झाडलेली एक गोळी कॅप्टन चौधरी यांच्या छातीत घुसली. तशाही स्थितीत तिसर्या दहशतवाद्याला ते सामोरे गेले. दोघांनी एकमेकावर प्रचंड गोळीबार केला. कमालीचे शौर्य दाखवत कॅप्टन चौधरींनी तिसर्या दहशतवाद्याला सुद्धा कंठस्नान घातले. पण समोरासमोर झालेल्या धुमश्चक्रीत कॅप्टन सुनील चौधरी जबर जखमी झालेले होते.
अतुलनीय शौर्य दाखवून कॅप्टन सुनील चौधरी यांनी देशासाठी आपले प्राण वेचले. त्यांना मरणोत्तर किर्ती चक्र देण्यात आले.
स्व.कॅप्टन सुनील चौधरी यांच्या वडिलांना वाटलं की आपल्या मुलाचा अधिक सन्मान करता आला असता का? त्यांनी सेना अधिकार्यांना एक पत्र पाठवलं. आणि माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली. त्यावर सेनेकडून त्यांना लेखी कळवलं गेलं की तुम्ही भारतीय आहात हे आधी सिद्ध करा. तुमचं राष्ट्रीयत्व सिद्ध करा.
कॅप्टन सुनील चौधरींचे वडील सेनेत लेफ्टनंट कर्नल आहेत. ते अजूनही सेवेत आहेत. भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल या हुद्द्यावर असलेल्या, देशासाठी प्राण वेचलेल्या एका हुतात्म्याच्या वडिलांना सांगितलं जातंय की माहिती हवी असेल तर आधी राष्ट्रीयत्व सिद्ध करा म्हणून.....
या संदर्भातील व्हिडिओ इथे पहा.
ही नोकरशाही म्हणा, बाबूगीरी म्हणा, कारकुनी फराटा म्हणा, की लाल फितीचा कारभार , तुमच्याकडे असे काही अनुभव असतील,तर कृपया लिहा.
प्रतिक्रिया
23 Feb 2009 - 4:51 pm | परिकथेतील राजकुमार
स्व.कॅप्टन सुनील चौधरी यांच्या वडिलांना वाटलं की आपल्या मुलाचा अधिक सन्मान करता आला असता का?
अरे ज्यांच्या शौर्याबद्दल आणी मातृभुमीसाठी त्यांनी केलेल्या असीम बलीदानाबद्दल खुद्द स्वर्गात देव देवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत असतील, त्या शुरवीर हुतात्म्यांसाठी ह्या नादान नालायक आणी हिजड्या सरकार कडुन कौतुकाची अपेक्षा कशासाठी? ह्या नालायकांनी दिलेल्या पुरस्कारानी उलट त्या पवित्र आत्म्यांच्या बलीदानाची किंमत कमी होईल, आत्मा तडफडेल त्यांच्या ह्या बायल्या आणी भ्रष्टाचारी राजकारण्यांनकडुन स्वतःचे कौतुक करुन घेताना !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
23 Feb 2009 - 4:54 pm | दशानन
हेच म्हणतो
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
23 Feb 2009 - 4:59 pm | वेताळ
देशप्रेमी व देशासाठी बलिदान करणार्यांकडुन जर हे राष्ट्रियत्वाचा दाखला मागत असतील तर ह्याना लाथा घालुन हाकलले पाहिजे.
वेताळ
23 Feb 2009 - 11:48 pm | संदीप चित्रे
+ १
24 Feb 2009 - 12:08 am | चतुरंग
नागरिक असण्याचा मला अभिमान आहे,पण त्याच्या वडिलांना, जे अजूनही सेनेत सेवेत आहेत, असले पत्र पाठवणारे लोक ज्या देशात आहेत त्या देशाचा नागरिक म्हणून आज शरमेने माझी मान खाली झुकली!
ह्या नीच लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जास्तीतजास्त कडक शासन व्हायला हवे!! X(
शहीद सुनील, मला माफ कर असेही मी म्हणू शकत नाहीये!! :(
(विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती काय वेगळी असेल??)
चतुरंग
24 Feb 2009 - 10:27 am | सायली पानसे
सहमत आहे.
असच काहिसे शहिद कॅप्टन संदीप याच्या वडिलांच्या बाबतित झाले नाहि का? केरळ च्या मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागली तेंव्हा बरे वाटले.
24 Feb 2009 - 3:18 am | शितल
ही बातमी वाचुन इतका त्रागा झाला आहे ज्यांच्यावर ओढावली असेल त्यांच्या मनाला काय वाटले असेल, विचार केला तरी संताप होतो नुसता. X(
ज्यांनी कोणी "तुमचं राष्ट्रीयत्व सिद्ध करा "हा आदेश काढला असेल त्यांना फक्त दहशवाद्यांच्या पुढे एकदा सोडले पाहिजे.
24 Feb 2009 - 5:07 am | सुक्या
हे असले लोक भारतात आहेत ह्याची मला लाज वाटते. पैशापायी कागदोपत्री म्रुत दाखवलेल्या लोकांना 'तुम्ही जिवंत आहात याचा पुरावा काय' असे विचारणार्या कारकुंड्याचा कथा मी ऐकल्या आहेत. परंतु एका शहिदाच्या कुटुंबीयांना 'तुम्ही भारतीय आहात हे सिध्द करा' असे सांगणार्या नालायकाला 'तु तुझ्या बापाचाच मुलगा आहे हे अगोदर सिध्द कर' असे सांगावे वाटते. देशासाठी सर्वोच्च बलिदान केलेल्या हुतात्म्याच्या कुटंबीयावर हे पाहण्याची वेळ यावी ह्यासारखे दुर्दैव ते कोणते.
अशा बातम्या वाचल्या की मला लाज वाटते.
(लज्जित) सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
13 Feb 2011 - 9:32 am | गांधीवादी
२६/११ हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप चे काका मोहनन यांनी गुरुवारी दि. ३ फेब रोजी दिल्लीत कसाबला फाशी देण्यास विलंब होत असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
मेजर उन्नीकृष्णन यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यादृष्टीने केंद्र वा राज्य सरकारकडून पावले उचलली जात नसल्याने ते संतप्त झाले होते. आपला संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी संसदेसमोर विजय चौकात स्वतःला पेटवून घेतले. त्यात ते 95 टक्के भाजले होते. गंभीर भाजल्यामुळे शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले.
http://www.esakal.com/esakal/20110206/5178963974011383449.htm
तसेच भारत आता हळुहळु अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश म्हणुन अस्तित्वास येऊ पहात आहे.