ते पण एक वय असतं

ashwin joshi's picture
ashwin joshi in जे न देखे रवी...
20 Feb 2009 - 8:32 am

ते पण एक वय असतं
दिवसभ पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत एम.एस.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

कविता

प्रतिक्रिया

शंकरराव's picture

20 Feb 2009 - 2:47 pm | शंकरराव

टंकवल का केल कॉपी पेष्ट ?
ह्या धाग्यावर आहेना तेच http://www.misalpav.com/node/6108

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Feb 2009 - 10:11 pm | llपुण्याचे पेशवेll

संकरराव, कौपी पेष्ट केले असते तर इंग्रजी लिपीत आले नसते का? इथे मराठी लिपीत आले आहे म्हणजे परत टंकवले असणार.
कविता छान हो. :)

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

शंकरराव's picture

21 Feb 2009 - 3:55 am | शंकरराव

अहो पेशवेपंत, ह्या जोश्याच्या मागच्या धाग्यावर मराठी लिपीत जे अम्ही टंकवून दिले होते तेच परत कॉपी पेष्ट करुन ह्याने नवीन धागा सुरू केला
गैरसमज नसावा :-) ईथे शेवटी बघा http://www.misalpav.com/node/6108

चन्द्रशेखर गोखले's picture

21 Feb 2009 - 7:47 am | चन्द्रशेखर गोखले

असो, पण एकंदरीत कविता छानच आहे.