लघूकथा लेखन आव्हान

विकास's picture
विकास in काथ्याकूट
19 Feb 2009 - 9:30 pm
गाभा: 

मिपावर आत्ता चाललेल्या एकंदरीत चर्चा पहाता हा एक नवीन धागा विरंगुळा म्हणून चालू करावासा वाटला :-)

शिर्षका प्रमाणे लघुकथालेखनाचे आव्हान आहे, स्पर्धा नाही. म्हणजे थोडक्यात "लिहूनच दाखवा" असे म्हणले असले तरी स्पर्धा नसल्याने व्हर्च्युअल बक्षिस पण नाही ह्याची खात्री बाळगा.

तर आव्हान असे: पाच वाक्यांचे लघुकथा लेखन करा आणि सहावे वाक्य हे खालील पैकी एक असावे:

हेच मला भारतातील आवडत नाही
अथवा
म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे.

बाकी पाच वाक्यात शब्द मर्यादा नाही....

प्रतिक्रिया

सागर's picture

20 Feb 2009 - 1:03 pm | सागर

एकदा एका जंगलातून वाघाच्या पाऊलखुणांच्या मागावर जात असताना अचानक कोकीळेची तान ऐकून इकडे तिकडे पाहताना समोरच्या सरोवरात जलक्रिडा करणार्‍या अप्सरेकडे राजाचे लक्ष जाताच त्याने ठरवले की ह्याच सुंदरीच्या चरणी आपले जीवन अर्पून तिच्याबरोबर केलेल्या सुखाच्या संसाराने आपल्या कुटुंबाचा वृक्ष फुलवता आला तर प्रयत्न करुयात असे ठरवून तो तिच्याजवळ जाऊन त्या सुंदर अप्सरेला म्हणाला की हे सुंदरी तू खूप सुंदर असून माझे चित्त हरपून टाकण्यास कारणीभूत झाल्या कारणाने माझी तुजवर प्रीती जडल्यामुळे तू माझे प्रेम स्विकारावे अशी माझी इच्छा असून माझ्या मुलांची आई जर तू झालीस तर मी तुझा खूप ॠणी तर होईनच पण त्याचबरोबर स्वर्गात मिळणार्‍या सुखापेक्षा जास्त सुख तुला माझ्याकडून मिळेल यासाठी मी अगोदरच एक सांगू इच्छितो की मी या अमरावती नगरीचा तरुण राजा असून मी अविवाहित असल्याकारणाने योग्य वधूच्या शोधात यश न मिळाल्याने जंगलात शिकार करण्यासाठी आलो असताना मी तुला पाहिले आणि तुझ्या सौंदर्याने मज घायाळ करुन तुझा दास होण्याचीच आता माझी इच्छा असल्यामुळे हे सुंदरी तू माझी हो अशी तुला विनंती करण्यासाठी मी येथे आलो आहे , असे सांगून राजा तिच्या आरस्पानी सौंदर्याचे डोळ्यांनी निरिक्षण करत असताना अप्सरेने ओळखले की राजा आपल्या सौंदर्यावर पूर्ण लुब्ध झाला असल्यामुळे आता आपला हेतू साधता येईन असे ठरवून तिने राजाला सांगितले की हे राजन मी तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी आणि तुला संसारसुख देण्यासाठी तत्पर आणि तयार आहे यात तू शंका बाळगावी असे काहीही नसल्याकारणाने माझ्या २ अटी मी सांगत्ये त्यांची पूर्तता झाली की लगेच मी तुझ्याशी लग्न करुन तुझ्या संसाराचा सुखी वृक्ष फुलवेन हे माझे वचन समजून त्यासाठी तू मला सुवर्णपर्वतावरचा सोनेरी पक्षी आणि त्या पक्षाच्या गळ्यातील लाल माणिक आणून दे म्हणजे मी तुझी इच्छा पूर्ण करेन आणि... पुरे पुरे आता मी तुझ्याकडे तेव्हाच येईन जेव्हा माझ्याकडे सुवर्णपर्वतावरचा सोनेरी पक्षी आणि त्याच्या गळ्यातील लाल माणिक घेऊन मी तुझ्या गळ्यात त्याचा हार करुन घालेन तेव्हाच मला तू वरमाला घालशीन याची मला कल्पना असल्याने मी निघतो आता" असे म्हणून राजा सुवर्णपर्वतावर एकटा तर गेलाच पण अप्सरेच्या अटीप्रमाणे दोन्ही गोष्टी खूप पराक्रम करुन घेऊन येत असताना मनात राजा म्हणाला आपण उत्साहाच्या भरात त्या सुंदर अप्सरेचे नावही विचारले नाही तर आता तिच्या आठवणींना काय नाव देऊ असा विचार करतो न करतो तोच ती अप्सरा उडत येताना दिसताच राजाने हर्षोल्ल्हासित होऊन अप्सरेला नाव विचारायचे ठरवले होते तोच अप्सरा म्हणाली राजन चिंता नसावी ही तिलोत्तमा अप्सरा आता फक्त तुमचीच झाली असल्याने आता त्वरीत आपण राज्याकडे प्रस्थान करुन आपल्या प्रजेला ही आनंदाची बातमी देऊन मोठा सण साजरा करुयात

राजा नगरात येताच प्रजेला नवीन आणि सुंदर राणी तिलोत्तमेच्या रुपाने मिळाल्यावर प्रजाजन खुश झाले होतेच पण राजाही सातव्या अस्मानात होता असे तिलोत्तमेला वाटत असल्याचे राजा मनोमन जाणून असल्याकारणाने त्याने लगेच तिलोत्तमेला पट्टराणी आणि तिच्या पोटी होणार्‍या अपत्याला राज्याचा वारस घोषित केल्याबरोबर प्रजाजन आनंदाने नाचू लागल्याचे पाहून तिलोत्तमा लाजून महालात पळाल्यामुळे राजाचा नाईलाज होऊन तोही आत महालात गेला

पाच वर्षात राजाला तिलोत्तमेने वचन दिल्याप्रमाणे राजकुमार रत्नसेन आणि राजकुमारी सोनलता ही दोन अपत्ये तर दिलीच पण सोनेरी पक्षी आणि लाल माणिक रत्न यांच्या अनुषंगाने त्यांची नावेही तशीच ठेवली

आता सोनेरी पक्षी आणि माणिक यांचे रहस्य काय हे जाणून घेण्यात वाचकांना सगळ्यात भारी इंटरेस्ट असल्यकारणाने मी वाचकांना एकच सांगू इच्छितो की असल्या ५ वाक्यांची लघुकथा मी कितीही लांबवू शकलो असतो पण स्वतःचे डोके या कामी खर्च करण्यापेक्षा मला वाचणार्‍या तुम्हा सगळ्यांच्या वेळेची किंमत असल्याकारणाने माझी ५ वाक्यांची कथा इथेच थांबवतो व एकच निदर्शनास आणून देतो की बुद्धिमत्ता आपण कुठेही खर्च करतो.........

हेच मला भारतातील आवडत नाही

(लघुकथाकार ) सागर :)
(मी एक ओळ वाचवली .... हा हा हा)

अनिल हटेला's picture

20 Feb 2009 - 2:41 pm | अनिल हटेला

वरीलप्रमाणे .

सहमत आहे ..

असेच म्हणतो ...

बुद्धिमत्ता आपण कुठेही खर्च करतो....

हेच मला भारतातील आवडत नाही.....

=)) =))

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विकास's picture

22 Feb 2009 - 10:09 pm | विकास

आपली लघुकथा एकदम मस्त आहे आणि शेवट काय होणार याची उत्सुकता एकदम छान ताणलीत ;)

निष्कर्षाशी सहमत. यात नुसते "भारतीय" नसून निवासी/अनिवासी दोन्ही येतात असे १००% समजतो...

सागर's picture

23 Feb 2009 - 3:24 pm | सागर

१००% सहमत विकासराव :))

यात नुसते "भारतीय" नसून निवासी/अनिवासी दोन्ही येतात असे १००% समजतो...

सुचेल तसं's picture

20 Feb 2009 - 2:33 pm | सुचेल तसं

च्यायला आम्ही इथे भारतात मोठ्या मेहनतीने २ ओळींचे कौल, काथ्याकूट टाकतो. त्याची शेकडोंनी वाचने होतात. पाच-पन्नास प्रतिक्रिया पण येतात. आम्हाला वाटायला लागतं की आता आम्ही मिपाचे लोकप्रिय सदस्य होणार. हे स्वप्न रंगवत आम्ही झोपी जातो आणि हे साले एनआरआय संपादक तिकडे परदेशात बसून त्यांच्या दिवसा आमचा कौल/काथ्याकूट उडवून टाकतात. म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे.

[टीपः खालील चार ओळी हे सिग्नेचर आहे)
तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर

आनंदयात्री's picture

20 Feb 2009 - 2:38 pm | आनंदयात्री

=))

[टीपः ही स्पर्धेची एंट्री नाही]

अश्विनि३३७९'s picture

20 Feb 2009 - 2:49 pm | अश्विनि३३७९

झकास !!

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2009 - 4:37 pm | परिकथेतील राजकुमार

मेरे पास गाडी है बंगला है पैसा है ! तुम्हारे पास क्या है ?

मेरे पास माँ है ! (एक्सचेंज ऑफर है क्या?)

आता अमिताभला चुक ही म्हणत नाहित आणी शशी कपुरचे कौतुक पण करत नाहित, हेच मला भारतातील आवडत नाही आणी एन आर आय हे सुद्धा एकेकाळचे भारतीय म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

शेखर's picture

20 Feb 2009 - 4:50 pm | शेखर

अट खालील प्रमाणे आहे.
सहावे वाक्य हे खालील पैकी एक असावे:
हेच मला भारतातील आवडत नाही
अथवा
म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे.

तुमच्या लघुकथेत दोन्ही वाक्ये आहेत. त्या मुळे शुन्य मार्क ;)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2009 - 4:52 pm | परिकथेतील राजकुमार

>>तुमच्या लघुकथेत दोन्ही वाक्ये आहेत. त्या मुळे शुन्य मार्क
पण आम्ही ही कथा मार्कांसाठी लिहिलीच नाहिये हो !
समझदार को इशारा काफी है ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विसोबा खेचर's picture

20 Feb 2009 - 5:03 pm | विसोबा खेचर

धागा मजेशीर आहे! :)

चालू द्या, आम्ही वाचतो आहोत..

आपला,
(निवासी भारतीय लघुकथा वाचक) तात्या.

एका दिवसात फक्त तीनच लघु कथा?

आव्हान कोणाला पेलवलेले दिसत नाही....
हे आव्हान आहे आवाहन नाही याची कृपया नोंद घ्यावी.... :)

लेखक मंडळी ... करा हो सुरु.. लघुकथा लिहायला तरी कंटाळा करु नका...
प्रतिक्रिया व खरडवही कशी जोमाने लिहिता?
तशाच उत्साहाने लघुकथा लिहा.. फक्त ६ ओळीतर लिहायच्या आहेत..... :)

सागर

मोनालिसा१३'s picture

21 Feb 2009 - 5:04 pm | मोनालिसा१३

एक होता राजा आणि एक होती राणी.
सुरु झाली त्यांची कहाणी
कहाणीच कहाणी
सांस्-बहूची कहाणी
एकता कपूरची कहाणी
हेच मला भारतातील आवडत नाही. :D

सागर's picture

22 Feb 2009 - 11:23 am | सागर

एकता कपूरची कहाणी
हेच मला भारतातील आवडत नाही.

एकता कपूरच्या कहाण्यांमधे स्टार नायिकेची २-३ लग्ने.... १-२ अबॉर्शन्स ..... २-३ घटस्फोट यापेक्षा काही जर समाजप्रबोधनपर दाखवले तर जास्त चांगले वाटेल.... अशा घटनांतून समाजमनावर काय संस्कार होणार? पण तिला टी.आर.पी. शिवाय काही दिसत नाही.... आणि आपण भारतातले सुज्ञ लोक ह्याच सिरियल्स आवडीने बघतो... हेच मलाही भारतातील आवडत नाही

सागर

सखाराम_गटणे™'s picture

22 Feb 2009 - 4:06 pm | सखाराम_गटणे™

कसोटी मध्ये प्रेरणाची अनुराग आणि बजाज बरोबर आलटुन पालटुन लग्न होत. असे २००३-२००४ मध्ये होते. आता पण बहुतेक तसे आहे म्हणतात.

त्या तिघांना कटांळा कसा येत नाही, काय माहीत???

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2009 - 7:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला तर काय बा गोष्ट लिहिता येत नाही, की सांगता येत नाही, म्हणून मी निबंध लिहिणार. पण मला या येणारनाय (एन.आर.आय. म्हणजे अनिवासी भारतीय हो) आणि इथलेच स्वयंघोषित भारतीय यांच्या वादात तेल ओतायला अंमळ मजा वाटते. वाद वाढला की आपण झोपून जायचं कारण तेव्हा भारतात रात्र होते, हेच मला भारतातील आवडत नाही. सकाळी उठून मिपा उघडावं तर या धाग्यावर येणारनाय लोकांकडून ताव भरभरून प्रतिसाद आणि प्रति-प्रतिसाद, म्हणजे आलेल्या प्रतिसादांना उत्तरं, आलेली असतात. ती वाचण्यात कामाचा अर्धा एक तास फुकट जातो, वर मिपावरची पानं उलटण्याचा त्रास होतो तो वेगळाच! म्हणून मला ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा राग आहे.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विकास's picture

22 Feb 2009 - 10:23 pm | विकास

>>>वर मिपावरची पानं उलटण्याचा त्रास होतो तो वेगळाच!
हे बाकी एकदम बरोब्बर! त्यामुळे मला कोणाचा राग येतो म्हणू? ;) मिपामालकांचा, कारण त्यांचे डिझाइन आहे म्हणून का मिपासभासदांचा कारण ही मर्यादा समजून देखील १००च्या वर प्रतिक्रीया देत राहतात म्हणून :-)

मालकांचा राग येतो असे मानले तर मग म्हणू शकेन की असे चांगले "विधायक" सल्ले ऐकले जात नाहीत आणि हेच मला भारतातील आवडत नाही

पण जर मिपासदस्यांचा राग येतो असे म्हणले तर असले "विधायक स"ल्ले देणारे बर्‍याचदा एनआरआय असणार म्हणूनच मला लांबून सले देणार्‍या ह्या एन आर आय लोकांच्या शहाणपणाचा पण राग आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Feb 2009 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासराव, अगदी प्रतिक्रियेच्या विषयापासूनच हसायलाच सुरुवात झाली! :-D

(अवांतरेतरः हा प्रतिसाद हा लघुकथेच्या स्पर्धेसाठीचा प्रवेश-प्रतिसाद नाही. वरची सागरची गोष्ट फार्फार आवडली.)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विनायक पाचलग's picture

23 Feb 2009 - 10:23 am | विनायक पाचलग

कधीकधी मिपावर आम्ही का पडीक असतो ते आमचे आम्हाला समजत नाही.पण संगणकासमोरुन पाय काढवत नाही.लोकानी आम्हाला फाट्यावर मारले म्हणुन मिपा सोडायला जमत नाही .आणि कितिही ठरवले तरी फुटकळ धाग्यांवर प्रतिक्रिया देणे थांबवता येत नाही.आणि तरीही आमच्या लेखाला कधीही २० च्या वर प्रतिक्रिया मिळत नाहीत हेच मला भारतातील आवडत नाही.
-(मिपाप्रेमी स्पर्धक )विनायक

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

विकास's picture

25 Feb 2009 - 2:14 am | विकास

कोणी एक भारतीय मुंबईवर वास्तवस्पर्शी भेदक कथा लिहीणार. त्यावर कोणा ब्रिटीशाला (येथील सदस्य नाही) त्यावर बॉलीवूड स्टाईलचा (तद्दन फिल्मि) हॉलीवूड मधे चित्रपट काढावासा वाटणार. त्यात भारतीय कविता लिहीणार, संगित देणार आणि ध्वनीमिश्रण देखील करणार. त्या तिघांना ते हॉलीवूडवाले चढाओढीच्या स्पर्धा चाचणीनंतर त्यांच्या अकादमीचे ऑस्कर का असेच काहीसे बक्षिस देणार. आणि आमचे भारतीय उगाचच म्हणणार की, "ही तर भारतीयांना घातलेली भिक आहे म्हणून..."

हेच मला भारतातील आवडत नाही ;)

सुनील's picture

25 Feb 2009 - 8:41 am | सुनील

सर्वोत्कृष्ठ लघुकथा!!!!

जबरा!!!!

(भारतीय संगीतकार आणि तंत्रज्ञांनी एका परदेशी चित्रपटासाठी काम करून ऑस्कर मिळवले असे मानणारा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मैत्र's picture

25 Feb 2009 - 12:05 pm | मैत्र

बेश्ट लघुकथा!!