दुबई कट्टा.

सायली पानसे's picture
सायली पानसे in जनातलं, मनातलं
18 Feb 2009 - 12:35 pm

नमस्कार मंडळी

दुबई कट्ट्या ची माहिती...

शेवटी हो नाहि करता करता आमचा मुहुर्त लागला आहे कट्टा करायचा.
येत्या शुक्रवारी २० तारखेला आम्हि जमायचे ठरवले आहे. बिपिन दा, मी , वल्लरी , गौरी, अभिषेक आहोतच.... कुंदन भाउ अ़जुन विचारात आहेत... बघु अजुन कोण कोण येतय ते...
नंतर सविस्तर कट्टा रीपोर्ट देण्याचि जवाबदारी बिपिन दा ची आहे....
अजुन कोण असेल ह्या भागातले तर जरुर संपर्क करा आणि सहभागी व्हा. मला किंवा वल्लरीला खरड टाका.

मौजमजा

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

18 Feb 2009 - 12:42 pm | धमाल मुलगा

कट्ट्याला हार्दिक शुभेच्च्छा :)
मस्त खा-प्या, दंगा धुडगुस घाला! मजा करा...

त्या कुंदनशेठला काहीही करुन बोलवा अन् त्याच्या लेकीला एकदातरी 'अग्गोऽऽबाई' पोझ मारायला सांगाच सांगा :) सगळ्या दुनियेतला गोडवा झक मारतो तिच्या त्या 'अग्गोऽऽबाई'पुढे! :)

बिपीनदा, कट्ट्याच्या वृत्तांताचं खोबार करु नकोस बरं का ;)

पुन्हा एकदा कट्ट्याला शुभेच्छा :)


----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

निखिलराव's picture

18 Feb 2009 - 12:43 pm | निखिलराव

दुबई कट्ट्याला शुभेच्छा........

वल्लरी's picture

18 Feb 2009 - 12:45 pm | वल्लरी

बिपीनदा, कट्ट्याच्या वृत्तांताचं खोबार करु नकोस बरं का
हा... हा... =))
क्रमशः.... दुबई कट्टा वॄत्तांत भाग ७

---वल्लरी

परिकथेतील राजकुमार's picture

18 Feb 2009 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार

चुचु अका पर्नल बाईंना पण बोलवा, त्या फुटाण्याचे गुलाबजाम फार छान बनवतात !
अवांतर :- हि वैयक्तीक टिका नसुन त्यांच्या परवानगीनेच हे वाक्य लिहित आहे ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

आनंदयात्री's picture

18 Feb 2009 - 12:50 pm | आनंदयात्री

कोण काय काय आणनार आहे ? कोण पाककौशल्य दाखवणार ?

>>अजुन कोण असेल ह्या भागातले तर जरुर संपर्क करा आणि सहभागी व्हा. मला किंवा वल्लरीला खरड टाका.

तिकिटं पाठवा की वाईच ... जमलं तर एखादं साहित्यसंमेलन पण करुन टाकु छोटेखानी !!

वल्लरी's picture

18 Feb 2009 - 12:54 pm | वल्लरी

कोण काय काय आणनार आहे ? कोण पाककौशल्य दाखवणार ?
ते सिक्रेट आहे ...कट्टा वॄत्तांतात....ढॅण्ट्ढॅ... असे म्हणुन टाकणार आहे... ;)
---वल्लरी

धमाल मुलगा's picture

18 Feb 2009 - 1:06 pm | धमाल मुलगा

>>कोण काय काय आणनार आहे ? कोण पाककौशल्य दाखवणार ?
लय लय महत्वाचा प्रश्न :) आधी पोटोबा मग विठोबा!

>>तिकिटं पाठवा की वाईच ... जमलं तर एखादं साहित्यसंमेलन पण करुन टाकु छोटेखानी !!
सहमत! माझंही नाव घ्या यादीत. हवंतर आम्ही तुमच्या "अरब-विश्व मराठी साहित्यसंमेलनाची" मराठीतील संस्थळ निर्माण करण्याची जबाबदारी घेतो. (नीलकांता, ऐकतोयस ना बाबा? तुझ्या भरवश्यावर बोलतोय मी हे ;) )
सोबत काही हौशी नाट्यसंस्थांमधले कलाकार आणतो. मस्तपैकी साहित्यसंमेलन विथ ऍक्टर्स म्हणजे यु नोऽ मज्जाच :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

आनंदयात्री's picture

18 Feb 2009 - 1:54 pm | आनंदयात्री

>>सहमत! माझंही नाव घ्या यादीत. हवंतर आम्ही तुमच्या "अरब-विश्व मराठी साहित्यसंमेलनाची" मराठीतील संस्थळ निर्माण करण्याची जबाबदारी घेतो. (नीलकांता, ऐकतोयस ना बाबा? तुझ्या भरवश्यावर बोलतोय मी हे Wink )

=)) =)) =)) =))

बाकी सध्या ते स्थळ अरबीत आहे का ? अन बिपिन देवकुळ्यानी कधी फोन टाकला होता.
बाकी तुझी ऐश आहे बेट्या आता .. दिनारमधे पैशे कमवल्यावर या पुण्याच्या गरीब आंद्याला विसरु नकोस म्हणजे झाले.
बाकी ते लेटर ऑफ क्रेडिटचे बघ बरका .. नायतर फसवायचे तुला अरब लेकाचे !!

सायली पानसे's picture

18 Feb 2009 - 2:06 pm | सायली पानसे

उत्तम कल्पना
तिकिटे -बिपिन दा
जेवण - सायली
गोडधोड - वल्लरी

आसा बेसीक प्लान आहे...
त्यामुळे त्या व्यक्ती कडे माहिती साठी संपर्क करणे.

आनंदयात्री's picture

18 Feb 2009 - 2:08 pm | आनंदयात्री

>>तिकिटे -बिपिन दा

बिपिनदाने लॉगाउट मारले वाटते.

कुंदन's picture

18 Feb 2009 - 2:12 pm | कुंदन

खजिनदार : कुंदन

टिप : वर्गणी आगाउ जमा करावी.

सायली पानसे's picture

18 Feb 2009 - 2:28 pm | सायली पानसे

हे कधी ठरले?

प्रकाश घाटपांडे's picture

18 Feb 2009 - 2:07 pm | प्रकाश घाटपांडे

. दिनारमधे पैशे कमवल्यावर या पुण्याच्या गरीब आंद्याला विसरु नकोस म्हणजे झाले.

खी खी खी आमाला बी ईसरु नको भौ . आमी बी गरीबच है.

प्रकाश घाटपांडे

चंबा मुतनाळ's picture

18 Feb 2009 - 2:21 pm | चंबा मुतनाळ

अरे, त्या कासकराला अध्यक्षपद द्या ना, मग सगळ्यांच्या तिकिटांची पण सोय होईल!!

- चंबा

छोटा डॉन's picture

18 Feb 2009 - 3:36 pm | छोटा डॉन

>>अन बिपिन देवकुळ्यानी कधी फोन टाकला होता.
????
मालक, त्यांचे नाव "बिपीन देवखुळे" आहे, कमीत कमी नाव तरी बरोबर घ्या ...

मागच्या निवडणुकीत आम्हीच बॅनर लावले होते, उंटावर कर्णे ताणुन अख्ख्या वाळवंटात प्रचार कम प्रहार केला होता ...

>> .. दिनारमधे पैशे कमवल्यावर या पुण्याच्या गरीब आंद्याला विसरु नकोस म्हणजे झाले.
+१, असेच म्हणतो

------
डॉन्या देवखुळे
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

कुंदन's picture

18 Feb 2009 - 4:16 pm | कुंदन

>>मागच्या निवडणुकीत आम्हीच बॅनर लावले होते

हे बरोबर लिहिलेत ,पण बॅनर छपाई आमच्याकडुन उधारीवर करुन घेतलीत ते नाही लिहिले.
ती उधारी चुकवा आधी , आणि मग बोला.

शितल's picture

18 Feb 2009 - 6:46 pm | शितल

=))
=))
धम्या, आंद्या,
नीलाकांत तुमचे विसर्जन करेल.

सायली पानसे's picture

18 Feb 2009 - 12:56 pm | सायली पानसे

धन्यवाद मंडळी...
पर्नल येणार आहे....बिपिन दा म्हणाला...
बाकि आत कट्टा रेपोर्ट बिपिन दा लिहिल तसा नाहि का?
जेवणाचा म्हणाल तर ते मी बनवणार आहे.... मेनु अजुन ठरतो आहे.....
काहि सुचावाल तर वेलकम....

परिकथेतील राजकुमार's picture

18 Feb 2009 - 1:04 pm | परिकथेतील राजकुमार

>>पर्नल येणार आहे....बिपिन दा म्हणाला...
मस्तच म्हणजे आता तुम्हा सगळ्यांच्या टेंगळाचे फोटु पण बघायला मिळणार तर !

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

टारझन's picture

18 Feb 2009 - 2:22 pm | टारझन

पर्णल तै ... खादाडी म्हणून ढिगभर फोटू घेऊन येणार आहेत म्हणे :)

सायली पानसे's picture

18 Feb 2009 - 12:56 pm | सायली पानसे

धन्यवाद मंडळी...
पर्नल येणार आहे....बिपिन दा म्हणाला...
बाकि आत कट्टा रेपोर्ट बिपिन दा लिहिल तसा नाहि का?
जेवणाचा म्हणाल तर ते मी बनवणार आहे.... मेनु अजुन ठरतो आहे.....
काहि सुचावाल तर वेलकम....

पर्नल नेने मराठे's picture

18 Feb 2009 - 1:12 pm | पर्नल नेने मराठे

मी नाही जा [-( सग्ले मला ओरदतात इक्दे............
चुचु

कुंदन's picture

18 Feb 2009 - 1:14 pm | कुंदन

गुलाबजाम फेकुन मार त्याला....

नितिन थत्ते's picture

18 Feb 2009 - 1:21 pm | नितिन थत्ते

शिळ्या भाताच्या चकल्या ठेवा.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

शितल's picture

18 Feb 2009 - 6:51 pm | शितल

काही ही खावा पण जेवुन झाल्यावर बिपीनदा ला करमणुकीचे कार्यक्रम दाखवा नाही तर तो लगेच पोट भरले झोपतो असे आम्हाला अप्रकाशित विश्वसनिय सुत्राकडुन कळाले आहे.
हो ना रे कुंदन. ;)

ऍडीजोशी's picture

18 Feb 2009 - 12:57 pm | ऍडीजोशी (not verified)

दुबई कट्ट्याला शुभेच्छा म्हणून बँगलोर कट्ट्याचे संस्थापक श्री श्री डाण बाबा बंगलोरी ह्यांनी १०,००० दिराम द्यायचे कबूल केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

छोटा डॉन's picture

18 Feb 2009 - 1:13 pm | छोटा डॉन

पहिल्या वहिल्या दुबई कट्ट्याला बेंगलोर मिपा मित्रमंडळातर्फे शुभेच्छा ...
( ते सदिच्छा भेटीचे १०००० दिरहॅम ऍडीकडुन घेऊन जावेत, अशा छोट्या छोट्या कामासाठी मला त्रास देऊन माझा "उच्च" वेळ वाया नका घालवु. )

बर्‍याच दिवसापासुन बिका म्हणत होते "कट्टा करु, कट्टा करु" , शेवटी वैतागुन ते बेंगलोरला येऊन एक मिनीकट्टा करुन गेले.
कुंदनशेठ दररोज त्यांना फोन करुन "आज पनीर बटर मसाला केला, काल बिर्याणी केली होती, उद्या भजी+बटाटेवडे बेत आहे" असे सांगुन बिकांवर "इमोशनल अत्याचार" करत होते अशा बातम्या आहेत. बिका आपले बिचारे "मॅगी अथवा ब्रेडबरोबर कांदाटोमेटोची बॅचलर भाजी" बनवुन चरफडत होते.
असो.

आता कुंदनशेठला लावा कामाला, शिवाय वर धम्या म्हणतो तसे "आग्गो ऽऽऽऽ बाय " चा एक शीन झालाच पाहिजे ...!

कट्ट्याला शुभेच्छा ...!

काय मदत लागली तर सांगा, आमचा बिझीनेश आख्ख्या जगात पसरला आहे, दुबईत जरा जास्तच, बरेच पंटर लोक आहेत तिकडे ...!

काय "सेव्हन स्टार हॉटेल" बुक करु देत का ?
का लिमोझीन पाठवु हिंडा फिरायला ?

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सायली पानसे's picture

18 Feb 2009 - 1:29 pm | सायली पानसे

७ स्टार नको बा
आम्हाला पचत नाहि ते जेवण त्यापेक्शा ति रोड साईड लॉरी वरचि मिसळ किंवा पावभाजी बरी .
बिपिन दा ने सांगितलय कि रस्सम आणि भात कर .... बाकिचे हाणतिल मला.
कुंदन शेठ लय भाव खाताहेत.... आधि त्यांना येउदे मग कामाच्या गोष्टी....तुच सांगुन बघ त्याला....

सायली पानसे's picture

18 Feb 2009 - 12:58 pm | सायली पानसे

वा वा माझा अकौंट नंबर देऊ का?

नितिन थत्ते's picture

18 Feb 2009 - 1:07 pm | नितिन थत्ते

बिपिनभौची मजा आहे. दर महिन्याला गेट टुगेदर. दर महिन्याला वृत्तांत. दर महिन्याला फोटु ....... ;)

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

फक्त_ मोक्श's picture

18 Feb 2009 - 1:44 pm | फक्त_ मोक्श

दुबई कट्ट्याला शुभेच्छा........ <:P

विसोबा खेचर's picture

18 Feb 2009 - 3:49 pm | विसोबा खेचर

मिसळपाव मस्तकी धरावा
अवघा हलकल्लोळ करावा..!

मिपा कट्ट्याच्या बातम्या वाचल्या की मिपाधर्माचा जगभर प्रसार आणि प्रचार करण्याकरता आमचे अवतारकार्य आता संपत आलेले आहे असे आम्ही मानतो..! :)

कट्ट्याकरता हार्दिक शुभेच्छा! बिपिनभावजींच्या वृत्तांताची वाट पाहात आहे...

श्री संत तात्याबा महाराज आता सुखाने समाधी घेतील..! :)

आपला,
(मिसळपाव धर्मसंस्थापक) तात्या.

आनंदयात्री's picture

18 Feb 2009 - 3:54 pm | आनंदयात्री

मिसळधर्माचे क्यालेंडर्स, वह्या, पेन, तात्यांबाचरित्र, तात्याबा आरत्या, गंडे दोरे ताईत इत्यादी इत्यादी वस्तु उत्पादनाचे अन घाउक विक्रीचे कंत्राट आम्हास मिळावे अशी या निमिताने आम्ही संत तात्यांबांना विनंती करतो.
(कागदावर लिहुन द्या तेवढे- नंतर साले उगाच आम्हाला पण तात्याबा म्हटले होते असे म्हणत वाटेकरी नको यायला)

:D

नितिन थत्ते's picture

18 Feb 2009 - 5:46 pm | नितिन थत्ते

तात्या ते कंत्राट तुला कशाला देतील.
या सर्व गोष्टींचे उत्पादन तात्या सोताच करतील.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

सगळे कॅलेंडर्स, पेन आणि इतर घाऊक वस्तूंवर अनुष्कावहिनी, सिंडी आजी आणि टिस्का काकू च दिसतील. म्हणजे कट्ट्याचा बट्ट्याबोळ.

कट्ट्याला माझ्या शुभेच्छा! मस्त खादाडी करा. बिपिनदा ला, त्याची ती कांदा टॉमेटॉची भाजी करायला लावा. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 9:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कट्ट्याला शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट जर बिपीन काही खायला बनवणार असेल तर! ;-)

ते घाऊक प्रमाणात वस्तू बनवून विकण्यावरून का कोण जाणे महेश मांजरेकरचा 'प्राण जाये पर शान न जाये' आणि त्यातली सतीमाता आठवली.

अदिती

योगी९००'s picture

18 Feb 2009 - 6:28 pm | योगी९००

तात्यामहाराज..लवकर (एकटेच) समाधी घ्या..

आणि अनुष्काची काळजी करू नका. आम्ही आहोत.

खादाडमाऊ

नितिन थत्ते's picture

18 Feb 2009 - 6:37 pm | नितिन थत्ते

का त्या तात्यांच्या जिवावर उठलाय? मग मिपा कोण चालवणार?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

घाटावरचे भट's picture

18 Feb 2009 - 6:43 pm | घाटावरचे भट

कट्ट्याला शुभेच्छा!!

शुभान्गी's picture

18 Feb 2009 - 9:30 pm | शुभान्गी

कोणी कॅनडा कट्टा करणार का?

प्रभाकर पेठकर's picture

18 Feb 2009 - 10:11 pm | प्रभाकर पेठकर

मागे आलो होतो दुबईला तेंव्हा नाही जमवले भेटायचे. आणि आता मारे कट्टे भरवताहेत. दुबईत अचानक रोझेच सुरू करतो थांबा.
असो.

दुबई कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा.
एप्रिल महिना अखेर मस्कतला येतो आहे. कदाचीत शारजा-दुबई वारीही घडेल. पुन्हा गेल्यावेळ सारखा अवसान घात करू नका. आपण एक उन्हाळी कट्टा जमवू.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

वल्लरी's picture

18 Feb 2009 - 10:47 pm | वल्लरी

एप्रिल महिना अखेर मस्कतला येतो आहे. कदाचीत शारजा-दुबई वारीही घडेल. पुन्हा गेल्यावेळ सारखा अवसान घात करू नका. आपण एक उन्हाळी कट्टा जमवू.
जरुर काका...पण ह्या वेळेला आम्हालाही कळ्वा आल्याचे...
म्हण्जे मागच्या वेळेसारखा घात व्हायचा नाही ... :)

---वल्लरी

प्रभाकर पेठकर's picture

18 Feb 2009 - 10:52 pm | प्रभाकर पेठकर

संपर्क क्रमांक व्यनी करून ठेवा. मी आल्यावर मिपावर व्यनी टाकेनच. धन्यवाद.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

कुंदन's picture

19 Feb 2009 - 12:52 pm | कुंदन

तेंव्हा तुम्ही फारच धावता दौरा केल्ता काका.
जरा सवड काढुन २-४ दिवस मुक्कामाच्या तयारीने या की.....

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2009 - 4:06 pm | प्रभाकर पेठकर

इन्शॉल्लाह...!

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Feb 2009 - 4:00 pm | ब्रिटिश टिंग्या

कट्ट्याच्या!

सवड असल्यास दुरध्वनीने हजेरी लावीन :)