युएफओ पाहीली आहे का कुणी, युएफओ?

त्रास's picture
त्रास in काथ्याकूट
14 Feb 2009 - 8:42 am
गाभा: 

आज पर्यंत एकाही मराठी माणसाने युएफओ पाहीली असल्याचा क्लेम केल्याचे आठवत नाही. हे युएफओवाले मराठी लोकांना टाळतात असे वाटू लागले आहे.

एक पुस्तक लिहीले होते (निरंजन घाटे ह्यांनी?- आठवत नाही) की माणुस परग्रहवासीच आहे व त्याच्या पृथ्वीवारीच्या खाणाखूणा इतरत्र पसरल्या आहेत. त्यातील एकही खूण भारतातील (पुण्याजवळची तर नव्ह्तीच) नव्ह्ती. त्यामुळे अशा ठिकाणांना भेटी देउन खात्री करावी तर ते लाखो कवड्या मोजल्याशिवाय करणे शक्यच नाही.

का येत नाही युएफओ आपल्याकडे?

प्रतिक्रिया

सर्किट's picture

14 Feb 2009 - 8:47 am | सर्किट (not verified)

एक पुस्तक लिहीले होते (निरंजन घाटे ह्यांनी?- आठवत नाही) की माणुस परग्रहवासीच आहे

माझ्या आठवणीप्रमाणे "पृथ्वीवर माणूस उपराच" असे ह्या पुस्तकाचे नाव आहे, आणि हे सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी लिहिलेले आहे.

-- सर्किट

त्रास's picture

14 Feb 2009 - 8:50 am | त्रास

र्राईट्टे

महेंद्र's picture

14 Feb 2009 - 8:56 am | महेंद्र

मी पाहिली !!

काल रात्री स्वप्नामधे...

आंबोळी's picture

18 Feb 2009 - 3:31 pm | आंबोळी

हि माहिती रंजक आहे.
आणि ही तु नळी वरची क्लिप पण.

आंबोळी

विनायक पाचलग's picture

14 Feb 2009 - 10:57 am | विनायक पाचलग

होय म्या वाचले आहे जबर्‍या आहे
आणि तुमचा मुद्दा बी लय योग्य आहे
छानसे वाचलेले

विनायक पाचलग

प्रियाली's picture

15 Feb 2009 - 1:40 am | प्रियाली

माझ्या आठवणीप्रमाणे "पृथ्वीवर माणूस उपराच" असे ह्या पुस्तकाचे नाव आहे, आणि हे सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी लिहिलेले आहे.

हम्म! बरोबर. माझ्या आठवणीप्रमाणे हे एक महाबंडल पुस्तक असून शालेय विद्यार्थ्यांना फ्यांटसी वाचन म्हणून वाचण्याइतपतच ठिक आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2009 - 4:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हम्म! बरोबर. माझ्या आठवणीप्रमाणे हे एक महाबंडल पुस्तक असून शालेय विद्यार्थ्यांना फ्यांटसी वाचन म्हणून वाचण्याइतपतच ठिक आहे.
प्रियालीच्या पुस्तकाबद्दलच्या उपरोल्लेखित मताशी अगदी १००% सहमत.

अवांतर माहिती: याच वर्षी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणार्‍या डार्विनच्या जन्माला २०० वर्ष आणि 'ओरिजिन ऑफ स्पिसिज' या पुस्तकाला १५० वर्ष होत आहेत.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मुळ मुद्दा सोडुन भलताच वाद उफाळलाय.. थोडे विषयांतर झाले आहे असे नाहि का वाटत?

अवलिया's picture

15 Feb 2009 - 6:53 pm | अवलिया

माझ्या आठवणीप्रमाणे हे एक महाबंडल पुस्तक असून शालेय विद्यार्थ्यांना फ्यांटसी वाचन म्हणून वाचण्याइतपतच ठिक आहे.

शाळेतील बरेचसे विषय हे फँटसी म्हणुनच असतात.. जसे इतिहास, इत्यादी इत्यादी

--अवलिया

प्रियाली's picture

15 Feb 2009 - 9:16 pm | प्रियाली

शाळेतील बरेचसे विषय हे फँटसी म्हणुनच असतात.. जसे इतिहास, इत्यादी इत्यादी

व्हय व्हय! माझेपण असेच मत आहे. ;)

अशाच पुस्तकांवर आम्ही लहानाचे मोठे झालो. निरंजन भागवत, जयंत नारळीकर, भा. रा. भागवत, ज्युल व्हर्न यांच्या पुस्तकांचे अनुवाद, विज्ञानयुग, इत्यादि म्हणजे आमचे जीव की प्राण. या सर्वाला बंडल म्हणणे जरा कसेतरीच वाटले. ११वी नंतर जेव्हा इंग्रजी साहित्य वाचन सुरू झाले तेव्हा देखिल अशा गोष्टी वाचण्याचे वय निघुन गेलेय असे वाटले नाही. अगदी हॅरी पॉटर देखिल तेवढ्याच समरसतेने वाचला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2009 - 7:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपणांस निरंजन घाटे म्हणायचं आहे का? घाट्यांचं एखाद-दुसरंच पुस्तक वाचलं असेल आणि ते व्यवस्थित लिहितात (लिहायचे?) असं माझं तेव्हाचं मत होतं. 'पृथ्वीवर माणूस उपराच' हे पुस्तक (शाळेत असतानाच) वाचताना हसून मुरकुंडी वळली होती; आम्ही पोरं-टोरं तेव्हा त्या पुस्तकाला 'पृथ्वीवर माणूस उपडाच' म्हणायचो.

अवांतरः विक्रमसिंघे आणि नारळीकरांचे काही पेपर्स / संशोधनाचे निष्कर्ष (जीवसृष्टी बाहेरून आली, बर्ड फ्लू (का कोणतातरी रोग) अंतराळामधून उंच डोंगरांद्वारे जमिनीवर आला इ.) वाचले की अजूनही तेवढंच हसायला येतं. पण त्याहीपेक्षा जास्त आदर नारळीकरांच्या गणिती डोक्याला आणि शिकवण्याच्या हातोटीबद्दल आहे.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

त्रास's picture

15 Feb 2009 - 7:43 pm | त्रास

तुम्ही लैच मोठ्या सायंटीस्ट दिसताय राव.

अवलिया's picture

15 Feb 2009 - 9:41 pm | अवलिया

अवो तरास भौ...
खरं तर तुमीच लै मोठे शायटिंस्ट बगा...
अवो आमी नाय वळखल अजुन पण तुमी कसं वळखल अदितीबै शायंटिस्ट म्हनुन?
वा... लैच हुशार पण त्रास भौ तुमी

--अवलिया

मी फक्त माणूस पृथ्वीवर उपराचबद्दल माझे मत दिले. ते नेहमीच कायम असेल. इतर लेखकांचे मी नावही घेतलेले नाही याची नोंद घ्यावी.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2009 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार

मैने देख्या है ना ! म्हंजी प्रत्यक्ष नही देख्या पण खरडवही देख्या है उसका !
युएफओ का खरडवही

अरे मजनु थोडा का आम्हा भेटला असतास तु
एकही आसु खरोखर गाळला नसतास तु
एक नाही लाख लैला मिळवील्या असत्या आम्ही
मिळविल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही..
आमचे राज्य

दशानन's picture

16 Feb 2009 - 6:46 pm | दशानन

+१ +१ +१ = +३

वाह क्या बात है !

परा मला पण त्या खव चा दुवा देना ;)

**************************
वाटते बदडावे ईतके की..... कंटाळा तुला यावा ...
भांड्ता भांड्ता तुझ्या तोंडाला फेस यावा

कवटी's picture

16 Feb 2009 - 9:02 pm | कवटी

नाडकर्णीनी ते पुस्तक एरिक वॅन डॅनिकेन च्या पुस्तकांवर अधारीत लिहिले आहे. अर्थातच त्यात सगळी तिकडची उदाहरणे आहेत. एरिकबाबा तुमच्या पुण्याच्या गोष्टी कशाला करेल? त्यामुळे नाडकर्णींच्या पुस्तकातसुद्धा इकडच्या गोष्टी नाहीत.

कवटी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Feb 2009 - 8:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डिजीटल सिनेमावालं युएफओ मुव्हीजतर संजय गायकवाड या मराठी माणसाचंच आहे ना?
रात्री जेवण टाळून एक क्वाटर मारा, पाहिजे तेवढ्या उडत्या तबकड्या दिसतील. ;-)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

दशानन's picture

14 Feb 2009 - 8:59 am | दशानन

>>रात्री जेवण टाळून एक क्वाटर मारा, पाहिजे तेवढ्या उडत्या तबकड्या दिसतील

=))

मी पण पाहीले आहे ;)

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

त्रास's picture

14 Feb 2009 - 10:55 am | त्रास

"रात्री जेवण टाळून एक क्वाटर मारा,..."

मला नाही बुवा असल्या गोष्टीत ३_१४ व्यस्त राहता येत

अवलिया's picture

14 Feb 2009 - 1:04 pm | अवलिया

युएफओ म्हणजे काय?

--अवलिया

विनायक प्रभू's picture

14 Feb 2009 - 2:45 pm | विनायक प्रभू

यु.=अनइंटरप्टेड
एफ्=फ्लाइंग
ओ=ऑफर
सुज्ञास सांगणे नलगे

अवलिया's picture

14 Feb 2009 - 2:49 pm | अवलिया

अच्छा! मी मधल्या एफ चा वेगळाच अर्थ समजत होतो.

--अवलिया

दशानन's picture

14 Feb 2009 - 2:50 pm | दशानन

मी पण तोच अर्थ घेतला होता =))

तोच असावा.

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

विनायक प्रभू's picture

14 Feb 2009 - 2:51 pm | विनायक प्रभू

तोच आहे.
पण काय करणार. पाध्ये ना वाईट वाटले असते ना.

अवलिया's picture

14 Feb 2009 - 2:53 pm | अवलिया

अरे हो!!!
गेल्या काही दिवसांत मला त्यांचे विस्मरणच झाले होते... होते असे आता वय झाले ना!
येईलच की आता वीस पंचवीस वर्षात पन्नाशी!!

--अवलिया

दशानन's picture

14 Feb 2009 - 2:54 pm | दशानन

टेंगुळ गेला वाटतं =))

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

ऍडीजोशी's picture

14 Feb 2009 - 2:35 pm | ऍडीजोशी (not verified)

मला दिसते, पण त्यासाठी माझं विमान हवेत असायला लागतं

मुक्ता's picture

14 Feb 2009 - 8:00 pm | मुक्ता

"पृथ्वीवर माणूस उपराच" असे ह्या पुस्तकाचे नाव आहे, आणि हे सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी लिहिलेले आहे.

वाचा अतिशय चांगल पुस्तक आहे...

../मुक्ता

हरकाम्या's picture

15 Feb 2009 - 12:15 am | हरकाम्या

मी तर हे प्रथमच एकतोय सध्या क्वाटर मारल्याशिवायही दिस्तात पण त्या मोजता येत नाहीत त्याचे काय
तर क्वाटर मारल्यावर त्या मोजण्यासाथि काही उपाय आहे का ?

शशिकांत ओक's picture

15 Feb 2009 - 6:33 pm | शशिकांत ओक

मराठी माणसांना युएफओ का दिसत नाहीत, फक्त अमेरिकेतच का दिसतात, शिवाय हा भानामतीचा प्रकार तर नाही, मरणानुभव व युएफओ आदि विषयी 'य़ुफो अर्थात पाश्चात्यांची आधुनिक पुराणकथा' या विषयावर प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे यांच्या 'विज्ञान आणि चमत्कार' या ग्रंथातील य़ुफो संकल्पनेबद्दलचा तपशीलवार उल्लेख (पान ४३१ -४५०) मिपाच्या वाचकांना नवा प्रकाश टाकेल.
शशिकांत

अवलिया's picture

15 Feb 2009 - 6:51 pm | अवलिया

तुमच्याकडे परग्रहावरच्या लोकांच्या पण नाड्या आहेत का हो?
असतील, तर मी येतो पहायला...
काही दिवसांपुर्वीच मी ओरायन वरुन इथे आलो आहे... पुढील महिन्यात परत जाणार आहे.

--अवलिया

त्रास's picture

15 Feb 2009 - 7:43 pm | त्रास

कूल आहे पुस्तक...वाचतो आहे.

शशिकांत ओक's picture

8 May 2009 - 12:47 pm | शशिकांत ओक

त्रास जी, आपला पुर्वीचा अभिप्राय वाचला. आत्तापर्यंत आपले विज्ञान आणि चमत्कार हे पुस्तक वाचून झाले असेल. प्रतिक्रियेच्या अपेक्षेत,
शशिकांत

नरेन's picture

16 Feb 2009 - 4:31 pm | नरेन

फार वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता क्लोज एन्काउटर ऑफ थर्ड काईण्ड त्या मधे हाच विशय होता

झेल्या's picture

16 Feb 2009 - 6:40 pm | झेल्या

आम्ही लहानपणी इतरांसारखे कागदाचे विमान बनवून उडवत नसू, तर कागदाच्या यु एफ ओ बनवून उडवत असू....
कोणाची यु एफ ओ जोरात उडते अशी स्पर्धा लागे.

>>का येत नाही युएफओ आपल्याकडे?

अहो, रेल्वे स्टेशन असल्याशिवाय रेल्वे येईल का? बस स्टँड असल्याशिवाय बस येईल का? विमानतळ असल्याशिवाय विमान येईल का?

बाकी तुम्ही समजलाच असाल.. :)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

त्रास's picture

16 Feb 2009 - 6:48 pm | त्रास

"अहो, रेल्वे स्टेशन असल्याशिवाय रेल्वे येईल का? बस स्टँड असल्याशिवाय बस येईल का? विमानतळ असल्याशिवाय विमान येईल का?"

३५ प्रतिसादानंतर आत्ताशी कुठे मला उत्तर गवसलं. तुमचे मानावे तेव्हढे आभार थोडेच आहेत. <:P

सुक्या's picture

16 Feb 2009 - 11:18 pm | सुक्या

झेल्याभो,

त्ये बस साठी बसस्टँड असतय, इमानासाटी इमानतळ अस्तय, रेल्वे साटी ठेसन असतय त्ये युएफओ साठी काय बांधावं हो?
आमच्या गावच्या पुढार्‍याचं लय वजन हाय ममईत, गावासाठी त्येनं रिक्षास्टँड मंजुर करुन आनलं बगा.
मोप पडीक जिमीन हाय गावात. बांधु आपण त्ये युएफओ उतरायसाठी कायतरी.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

सुक्या's picture

16 Feb 2009 - 11:07 pm | सुक्या

बातम्याच्या नावखाली कायपण खपवत्यात.
बाकी हिमेश ला एलियन घेउन गेले आणि हिमेश तिथ गायला लागल्यावर एलियन काय करतील?

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

केळ्या's picture

18 Feb 2009 - 8:55 am | केळ्या

ज्यांना अश्या गोष्टींत खराखुरा रस असेल,त्यांनी अशोक कारखानीस यांचे गूढगाथा नावाचे पुस्तक जरूर वाचावे.
ज्यांना नुस्तीच भंकस करायची आहे,त्यांनी मुळीच वाचू नये.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 8:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणीतरी तो उघडा टॅग, अपूर्ण एच.टी.एम.एल.कोड पूर्ण करा रे ... का हे सगळं अरबी झालंय? का कुणी दुबईच्या 'कट्टा'रपंथी लोकांनी कट केला आहे?

अदिती

शिवापा's picture

22 Feb 2009 - 8:16 pm | शिवापा

अमेरीकेतल्या माध्यमांना ८० आणि ९० च्या दशकात टि. व्हि च्यानल्स मधे प्रचंड भूछत्रिकरण झाल्यानंतर ताज्या व सनसनाटि बातम्या कुठून आणायाच्या हा प्रश्न पडायला लागल्यावर असे निरनिराळे प्रकार व्हायला लागले होते. ज्याप्रमाणे आपल्याकडे लग्नसराईचा सि़जन संपल्यावर प्रिंटीग प्रेसवाल्याला कामं नसायाची आणि मग वेगवेगळ्या देवाची १००० पत्रके छापण्याचे कागद आपल्या हातात यायचे हा त्यातलाच प्रकार. आता हा youtube वर गेलाय. तसे साउथ ईडिंयात क्रॉप सर्कल्स दिसले आहेत पण आता त्याचीहि मजा नाहि येत :( ईथे त्या प्रींटर लोकांसारखी काहि मंडळी आहेत. आपणाकडे यु एफ ओ नाहित पण आपण बनवु शकतो. आणि मि. पा चा पसारा एव्हढा सर्वदुर आहे की आपण निदान एक लाख लोकांची तरी मजा घेउ शकतो. (ह. घ्या.) पण मेन इन ब्लेक वाल्या संस्थेला हे आवडनार्‍ नाहि त्यामुळे तुर्तास रद्द!