निठारी हत्याकांड

महेंद्र's picture
महेंद्र in काथ्याकूट
13 Feb 2009 - 3:43 pm
गाभा: 

आत्ताच बातमी वाचली. निठारी हत्याकांडाचे आरोपी कोळी आणि पांढेर ह्या दोघांनाही स्पेशल कोर्टाने देहदंडाची शिक्षा सुनावली.
ही केस सुरु झाली 29 Dec. 2006.
ह्या केस मधे (भारताच्या) आपल्या दृष्टीने जरा लवकर न्याय दिला गेला.नाहीतर नेहेमी प्रमाणे कमित कमी १० वर्ष सेशन कोर्ट, नंतर १० वर्ष हाय कोर्ट नंतर पुढ्ची २० वर्ष सुप्रिम कोर्ट अशा चक्रव्युहात अडकली असती.
अर्थात आपले षंढ सरकार कोर्टाने शिक्षा देउन पण त्या दोघांना टांगायला ( फाशी द्यायला) चाल ढकल करतिल.
पुनः पुन्हा तीच नावे लिहित नाही. पण ही फाशी जर लवकर दिल्या गेली जावी एवढीच इच्छा...
दोन प्रश्न्...
स्पेशल कोर्टाच्या सजेवर अपिल होतं कां?? की ही फायनल सजा?
अशाच प्रकारे इतर हाय प्रोफाइल प्रकरणे निकालात काढण्यात काय हरकत आहे?
कसाबची केस पण अशिच लवकर संपवुन त्याला पण टांगावं...
तुमचं मत काय आहे?

प्रतिक्रिया

श्रीयुत संतोष जोशी's picture

14 Feb 2009 - 12:38 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
"कसाबची केस पण अशिच लवकर संपवुन त्याला पण टांगावं...
"
१००% बरोबर आहे.
पण निठारी च्या केसमधे तो अजूनही अलाहाबाद च्या उच्च न्यायालयात अपील करू शकतो.
पण आपल्या ह्या घारेणड्या सिस्टीम ला आपण काही करू शकत नाही याचा संताप येतो.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

ज्याक ऑफ ऑल's picture

16 Feb 2009 - 5:21 pm | ज्याक ऑफ ऑल

काही स्पर्धा (उर्फ रियालीटी शो) मध्ये जो एस एम एस वरून निकाल लावण्याचा प्रकार होतो ना .... तो अशा विधायक कारणांसाठी व्ह्यायला पाहीजे असं मत आहे ....

फाशी द्यावी का नाही .... हो किंवा नाही ... आणि निकाल लावून टाकावा सरळ ....
काही अपील नाही अन काही नाही ....
म्हंजे ना .... गुन्हेगारांसमोर असं उदा:. व्हावं ... की पुढे गुन्हा करायच्या अधी १० वेळेस विचार करायला पाहीजे असल्या लोकांनी ... टेरेरीस्ट साठी पण हाच न्याय लावावा ....
तर्र टर्र्या ...