व्हॅलंटाईन डे - गिफ्ट कोणती घ्याल?

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
12 Feb 2009 - 11:19 am
गाभा: 

व्हॅलंटाईन डे आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या प्रेयसी/ प्रियकरासाठी भेटवस्तू घेतल्या असतील (इथे नवरा/ बायको या नात्यालाही प्रेयसी/ प्रियकर या असंभव नात्याने गौरविले आहे!!!). ज्यांनी भेटवस्तू अगोदरच घेतल्या असतील त्यांच्या आत्म्याला तो आकाशातला प्रभू (विप्र नव्हे!!) क्षमा करो.........

पण ज्यांनी अजून भेटवस्तू घेतल्या नसतील (यात बहुतेक पुरूषमंडळी येतात!!!!!) त्यांच्या उपयोगासाठी हे मार्गदर्शन आम्ही देत आहोत.........

आपापल्या प्रेयसीसाठी या व्हॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट घ्यावी? (प्रियकरासाठी काय गिफ्ट घ्यावी याचं मार्गदर्शन मिपावरल्या अनेक समर्थ भगिनी करतीलच!!! त्यामुळे तो विषय आम्ही त्यांच्यावर सोपवत आहोत!!!!!)

तर मित्रांनो आपल्या प्रेयसी/ बायको/ दिलकी धडनक/ माल/ सामान/ टपोरी इत्यादी असलेल्या पोरीसाठी (इथे पोरगी हा शब्द भलत्याच व्यापक अर्थाने वापरला आहे!!!!) भेटवस्तू घेतांना खालील गोष्टी लक्षात घ्या..........

१. नुसतं ग्रीटींग कार्ड द्यायचा बावळटपणा कधीही करु नका. नाही म्हणजे तुम्हाला हवं तर ग्रीटींगकार्ड द्या पण त्या खेरीज वेगळ्या गिफ्टची अपेक्षा असते हे ध्यानात घ्या....

२. तिला कविता/ लेख/ कथा वगैरे देऊ नका. पहिल्या वर्षी ही भेट कदाचित चालेल कारण तेंव्हा सगळंच रोमँटिक असतं. पण दुसर्‍या वर्षापासुन हे द्याल तर, "मला माहिती होतं तू अस्साच कंजूष आहेस ते!!!! लेख/ कविता/ कथाच द्यायची होती तर मिपाशीच संसार करायचा होतास!!!" हे ऐकावं लागेल......

३. व्हॅलेंटाईन डे ची भेटवस्तू म्हणून मिक्सर, कुकर, ज्युसर, टोस्टर इत्यादी एकही गृहोपयोगी वस्तू खरेदी करू नका. यात स्त्रिया आपला सर्वात मोठा अपमान समजतात. "ह्या मेल्याला मी म्हणजे काय स्वयंपाकघरात राबणारी मोलकरीण वाटले?" अशी प्रतिक्रिया येईल!!! तेंव्हा आपल्याला जरी या गोष्टी कितीही उपयुक्त वाटल्या तरी त्यांच्याजवळ फिरकूही नका....

४. आपल्या प्रियतमेला कपडे घेऊ नका. आपल्या प्रियतमेला आवडतील असे कपडे घेणारा पुरूष अजून तरी जन्माला आलेला नाही. आपले पूर्वज फार हुशार होते कारण ते वल्कलं वापरायचे! आपण अतिशहाणे झालो आणि कपड्यांचा स्वीकार केला. आता भोगा त्याची फळं!!!! आपण कितीही काळजीपूर्वक कपडे निवडले तरी ते एकतर योग्य कापडाचे नसतात, किंवा त्यांचा साईझ/ रंग/ टेक्श्चर बरोबर नसतं किंवा आपल्याला लेटेस्ट फॅशन म्हणजे काय ते अजिबात माहिती नसते!!!! आणि तुम्ही जर सांगितलंत की "बाई गं, त्या दुकानातल्या बाईनेच हा डेस काढून दिलाय तरिही कॉमेंट येणारच, "हो! तिला काय कळतंय? तिने गोडगोड बोलून गंडवलं तुला!! आणि तू पाघळलास!!!!" तेंव्हा या विषाची परीक्षा घेउच नका!!!!!

५.अत्तरं, इसेन्शियल ऑईल्स, बाथसेंन्टस मुळीच घेऊ नका!! कारण ते जरी कितीही महाग आणि दुर्मिळ असले तरी, "मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते!!!! तुला दुसरं काही सुचतच नाही का रे?" हा प्रश्न येणार......

६. फुलं/ गुलाबं: हंऽऽऽ!!!! आपापल्या जबाबदारीवर घेऊन बघायला हरकत नाही!!! तुमची प्रेयसी कोण आहे यावर सगळं अवलंबून आहे. जर नव्याची नवलाई असेल तर खपूनही जाईल!!!! मला मात्र २१ डॉलरचा लालभडक गुलाबाचा गुच्छ घेऊन गेल्यावर, "काय हे! जरा तरी डोकं चालव!! या २१ डॉलरमध्ये किती पापलेटं आली असती माहितीये!!!" असा एका सिकेपीकाकूकडून एकदा अहेर मिळाला होता.....

७. चॉकलेटः आपली प्रेयसी जर अगदीच पाप्याचं पितर असेल तर चॉकलेटं चालतील. पण तिला जर का आपण अंगाने भरलेलो आहोत (प्रत्यक्षात असूदे वा नसूदे, तिचं परसेप्शन महत्वाचं!!!) असा संशय असेल तर तुम्ही मेलांत!!!! पुढला महिनाभर तरी दुसर्‍या खोलीत झोपायची तयारी ठेवा.....

८. दागिने: ही त्यातल्यातात सेफ भेट!!. त्यातही सोन्याचे दागिने निवडू नका!!! त्यांचा कस, घाट, तास बगैरे भानगडी समजून घेण्याची पुरूषांची बौद्धिक पात्रताच नाहिये. त्यापेक्षा खड्याचे दागिने घ्या. सेफ बेट!! बायकांनी आपण कितीही स्मार्ट आहोत असं दाखवलं तरी खड्यांमध्ये श्रेष्ठ्-कनिष्ट ठरवण्याची अक्कल देवाने त्यांच्यात घातलेलीच नाहिये!!!! तेंव्हा दागिने जर खर्‍या खड्यांचे असतील तर तुम्ही सुटलांत!!!! त्यातही पहिल्याच वर्षी एकदम महागाईतले खडे घेऊ नका!!!! पुढल्या वर्षी मग काय बोंबा मारणार? तेंव्हा पोवळं, मोती, नील, पाचू, माणिक असं चढत्या भाजणीने हिर्‍यापर्यंत पोहोचा!!! हिरे हे शक्यतो पहिलं मूल जन्माला आल्याच्यावर्षी!!! जेंव्हा तिला असं वाटत असतं की आपल्या नवर्‍याचं आपल्यावरचं प्रेम आता एकाएकी संपलं, त्या वर्षी!!!! मग एकदा मूल मोठं होऊ लागलं की मग व्हॅलेंटाईन डे ची चिंता करू नका, ते मूल तुमच्या दोघांच्या प्रेमाचं कांडण करणारच आहे......

काय मंडळी, तुमच काय मत?

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

12 Feb 2009 - 11:26 am | सखाराम_गटणे™

प्रेयसी कशी आहे त्यावर भेटवस्तु अवलंबुन आहे. थोडे फार रुसवे फुगवे चालणारच.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2009 - 11:50 am | पिवळा डांबिस

थोडे फार रुसवे फुगवे चालणारच.
तुम्ही सध्या फक्त तुमची ती गाजरं संपवा....
एकदा "कुर्यात शुभमंगलं" झालं ना कि मग पुन्हा इथे येऊन तुमचे अनुभव लिहा....
बायकांच्या रुसव्या-फुगव्याला तुम्ही "थोडेफार" म्हणताय म्हणजेच तुम्हाला याचा अनुभव नाहिये!!!!!
अनुभवी,
पिडां

विनायक प्रभू's picture

12 Feb 2009 - 11:57 am | विनायक प्रभू

असु दे, असु दे.
एकदा मिक्सरची वारी झाल्याशिवाय नाय कळायचे हो पिडा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Feb 2009 - 11:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे नंतर कळतं/कळेल का?

अनुभवी लोकांनीच मतप्रदर्शन करावे अशी आगाऊ आणि उद्धट विनंती! ;-)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

विनायक प्रभू's picture

12 Feb 2009 - 12:01 pm | विनायक प्रभू

कॅश द्यायची प्रश्न मिटतो. त्याना हवे ते घ्यायला स्वातंत्र्य. उगाच आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडुन परत बोलणी खावी कशाला?

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2009 - 12:15 pm | पिवळा डांबिस

कॅश?
भलतेच धाडसी बुवा तुम्ही!!!!
"कॅश द्यायला मला काय ** समजलास?" असे ऐकावे लागले तर हो?
नको रे बुवा, ह्या समुपदेशक लोकांना ते ठीक आहे, आपल्याला उगाच (खरोखरचा!) जोडा खावा लागायचा!!!!!
मित्रांनो, या मास्तरापासुन जरा सांभाळूनच हो!!!!!
:)

विनायक प्रभू's picture

12 Feb 2009 - 12:21 pm | विनायक प्रभू

एकदम वॅलीड पॉइंट. न झेपणारी मोहीम हातात घेउ नये.

सर्किट's picture

12 Feb 2009 - 12:22 pm | सर्किट (not verified)

सहा टक्के रेट आहे सध्या. कुठल्याही ब्लूचिप पेक्षा जास्त ! आहात कुठे ?

-- सर्किट

विंजिनेर's picture

12 Feb 2009 - 1:40 pm | विंजिनेर

गिफ्ट प्रेयसी ला द्यायचे आहे. शेअर बाजारतल्या एजंट मित्राला नाही.
बायकांच्या मते ट्रेझरी बॉण्ड्स आणि रोख रक्कम एकाच (रूक्ष/भावनाशून्य)विभागात येतात.
त्यातल्या त्यात फुले+दागिने+ फक्त तिच्या साठी/भोवती घालवलेली एखादी संध्याकाळ हे सर्वात बेष्ट आहे

(बायकोचा वाढदिवस एकदा(च !) विसरल्यामुळे कोट्यावधी शिव्या खाल्लेला) विंजिनेर

दशानन's picture

12 Feb 2009 - 7:01 pm | दशानन

सहमत.

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

दशानन's picture

13 Feb 2009 - 7:29 am | दशानन

>>>एकदा मिक्सरची वारी झाल्याशिवाय नाय कळायचे हो पिडा.

=))

=))

=))

देवा साष्टांग नमस्कार.

भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी !

पण आता बाय-बाय =))

रेवती's picture

12 Feb 2009 - 6:52 pm | रेवती

सखारामा,
तू आधी लग्न कर बाबा!
तुझं लग्न झालं की बर्‍याच जणांना हायसं वाटणारे.
तुला रुसव्याफुगव्यतलं काही कळत नाही म्हणजे कित्ती सुखी माणूस आहेस.
नाही रे एवढं सुखी बघवत लोकांना!;)
(प्रतिसाद ह. घे पण लग्न करायचं मनावर घे.)

रेवती

योगी९००'s picture

12 Feb 2009 - 11:28 am | योगी९००

व्हॅलेंटाईन डे लाच माझ्या लाडक्या लेकीचा वाढदिवस आहे. तिच्यासाठी काय भेटवस्तू घेऊ?

खादाडमाऊ

महेश हतोळकर's picture

12 Feb 2009 - 11:28 am | महेश हतोळकर

पण थोडं उशीराच आलं. आता आम्ही शेवटच्या मुद्याच्या शेवटच्या भाकीताचा अनुभव घेत आहोत!

मदनबाण's picture

12 Feb 2009 - 11:39 am | मदनबाण

*

मदनबाण's picture

12 Feb 2009 - 11:39 am | मदनबाण

आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव मधे दिसेल त्या दिवशी !!! :)

मदनबाण.....

देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2009 - 11:46 am | पिवळा डांबिस

अहो मदनबाण,
तुमचे वेडेवाकडे फोटो छापू नका हो!!!!
ते आम्हालाही बघावे लागतात!!!!
:))

मदनबाण's picture

12 Feb 2009 - 11:53 am | मदनबाण

नाही हो काका शुभ्रा आणि तिला दिलेल खास गिफ्टच तुम्हाला तिथं,, त्या दिवशी दिसले !!! :)

मदनबाण.....

देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2009 - 11:57 am | पिवळा डांबिस

मला वाटलं कि तुम्हीपण त्या टारूसारखे काय (दंडातल्या!!) बेटकुळ्या वगैरे दाखवणारे तुमचे बनियनमधले फोटू टाकताय की काय!!!!!
:))

आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव मधे दिसेल त्या दिवशी !!!
छ्या... पूर्वी सारखे फोटो, व्हिडीयो आता खव मधे लावता येत नाही, शिवाय खरड आली ते सुद्धा कळत नाही. मी तर खरडवही वापरणे जवळपास बंदच केले आहे.
काही उपाय ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Feb 2009 - 11:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बायकांनी आपण कितीही स्मार्ट आहोत असं दाखवलं तरी खड्यांमध्ये श्रेष्ठ्-कनिष्ट ठरवण्याची अक्कल देवाने त्यांच्यात घातलेलीच नाहिये!

म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का? ;-)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2009 - 11:53 am | पिवळा डांबिस

म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का?
मग यात त्या सुस्वरूप (?) बायका स्मार्ट की ते दगड जास्त स्मार्ट?
:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Feb 2009 - 11:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का?
मग यात त्या सुस्वरूप (?) बायका स्मार्ट की ते दगड जास्त स्मार्ट?

अर्थातच दगड! "बायकांना दगडांची पारख नसतेच ना?" तुमच्या याच म्हणण्याला मी अनुमोदन देत आहे! ;-)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

पिवळा डांबिस's picture

12 Feb 2009 - 12:00 pm | पिवळा डांबिस

इथे काकूने मला एक टप्पल मारल्यामुळे माझा हा प्रतिसाद काढुन टाकण्यात आलेला आहे......
:)

रेवती's picture

12 Feb 2009 - 6:54 pm | रेवती

मस्तच गं अदिती!

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Feb 2009 - 7:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताई, मग या वेळेचा व्हॅलंटाईन एकदम "ब्रिटीश" पद्धतीने का, का एकदम "धूमधडाक्यात"? ;-)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

रेवती's picture

12 Feb 2009 - 7:21 pm | रेवती

बघूयात.
हवी ती वस्तू (गरजेप्रमाणे) नेहमीच मागितल्याबरोबर मिळत असते...... म्हणजे मीच विकत घेऊन येते, मग आता वेगळं असं काय करायचं?
तसं सहा वर्षांपूर्वी नवर्‍यानं भरपूर बर्फात ड्राइव्ह करत मला न्यू जर्सीला चाट खायला नेलं होतं ते आठवतं.

रेवती

विनायक प्रभू's picture

12 Feb 2009 - 11:47 am | विनायक प्रभू

डांबिसा

नीधप's picture

12 Feb 2009 - 12:21 pm | नीधप

>>२. तिला कविता/ लेख/ कथा वगैरे देऊ नका. <<
आम्हाला भेटून १२ वर्षे आणि लग्न होउन ६ वर्षे झालीत तरी मला नवर्‍याने लेख किंवा कविता माझ्यासाठी लिहिलेली दिली तर प्रचंड आनंद होईल. खरंच.
>>४. आपल्या प्रियतमेला कपडे घेऊ नका. आपल्या प्रियतमेला आवडतील असे कपडे घेणारा पुरूष अजून तरी जन्माला आलेला नाही. <<
माझ्या नवर्‍याचा कपड्यातला चॉईस हल्ली सुधारलाय आणि मी एखादा कपडा महाग म्हणून आवडला तरी ठेवून दिल्यावर तोच माझ्या मागे लागतो घे घे म्हणून तेव्हा अजिबातच हरकत नाही कपडा घेण्यात.
>>५.अत्तरं, इसेन्शियल ऑईल्स, बाथसेंन्टस मुळीच घेऊ नका!! कारण ते जरी कितीही महाग आणि दुर्मिळ असले तरी, "मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते!!!! तुला दुसरं काही सुचतच नाही का रे?" हा प्रश्न येणार....<<
हा प्रश्न अजिबात येणार नाही.. ही भेट आवडेल.. अगदी मनातल्या गोष्टीसकट... :)

श्या पिडाकाका अगदीच चुकलात.. युजिए के नामपे बट्टा!!! :)

असो..
मलातरी एकतर्फी भेटीची आयड्या आवडत नाही. तेव्हा मी पण नवर्‍यासाठी काहीतरी घेणार..
एनी सजेशन्स?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

गंधमादन's picture

12 Feb 2009 - 12:25 pm | गंधमादन

>>एनी सजेशन्स?

गोड बोला एक दिवस .. पुरे होईल बिचार्‍याला तेवढेच.

(हि सजेशन सर्व बायकांना बरका .. व्यक्तिगत घेउ नका)

प्रभाकर पेठकर's picture

12 Feb 2009 - 12:33 pm | प्रभाकर पेठकर

मलातरी एकतर्फी भेटीची आयड्या आवडत नाही. तेव्हा मी पण नवर्‍यासाठी काहीतरी घेणार..
काही विकत घेऊन देण्यापेक्षा, मनापासुनच्या प्रेमाचे चार शब्द जास्त मोलाचे होतात.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

नीधप's picture

12 Feb 2009 - 1:07 pm | नीधप

समस्त स्त्रीवर्ग कधीही प्रेमाने बोलत नाही वागत नाही असा तुमचा गैरसमज आहे की मी वागत नाही असा गैरसमज आहे?
काही असला तरी तो गैरसमजच बरंका..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रभाकर पेठकर's picture

12 Feb 2009 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर

गैरसमज होतो आहे. मी फक्त 'प्रेमाच्या शब्दांची' महती विशद करून सांगितली आहे. व्यक्तिगत आरोप केलेला नाही.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

एक's picture

13 Feb 2009 - 11:46 am | एक

"..हा प्रश्न अजिबात येणार नाही.. ही भेट आवडेल.. अगदी मनातल्या गोष्टीसकट".."

अहो असं जर आमच्या बायकोने धाडसीपणे बोलून दाखवलं ना तर "ती भेट" सगळ्यात झकास वाटेल..

प्रत्येकवेळी "मनकवड्याचा रोल" करून आणि ड्रायव्हरसीट वर बसण्याचा आम्हालापण कंटाळा येतो. एखाद्या लाँग ड्राईव्ह वर बायकोने ड्रायव्हींग करण्याचापण उत्साह आणि उत्सुकता दाखवावी. आमच्यालेखी ती खरी मौल्यवान भेट, बाकिच्या मटेरियल गिफ्ट्स ईंमटेरियल ;)

मी तर एक लाल रिबीन मलाच गुंडाळून प्रेझेंट करणार आहे. नाहीतरी प्रत्येक गिफ्ट "चीप गिफ्ट" म्हणून हिणवलं जातच यावेळी थोडे पैसेतरी वाचतील. :)

शिप्रा's picture

13 Feb 2009 - 11:58 am | शिप्रा

>>मी तर एक लाल रिबीन मलाच गुंडाळून प्रेझेंट करणार आहे. नाहीतरी प्रत्येक गिफ्ट "चीप गिफ्ट" म्हणून हिणवलं जातच
: D यावेळेस पण तेच एकायची तयारी ठेवा..

एक's picture

13 Feb 2009 - 12:07 pm | एक

म्हणूनच लिहिलं ना..की यावेळी पैसेतरी वाचवतो :)

नीधप's picture

16 Feb 2009 - 11:32 am | नीधप

>>अहो असं जर आमच्या बायकोने धाडसीपणे बोलून दाखवलं ना तर "ती भेट" सगळ्यात झकास वाटेल..<<
दोघांच्यात सुसंवाद असेल तर हे घडणं काही अवघड नाही. आणि सुसंवाद ही दोघांची जबाबदारी आहे.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक प्रभू's picture

12 Feb 2009 - 12:42 pm | विनायक प्रभू

मोजुन चारच बर का? पुढच्या चार साठी एक वर्ष वाट बघायला लावायची. वाईट सवय लावायची नाही.

प्रभाकर पेठकर's picture

12 Feb 2009 - 12:45 pm | प्रभाकर पेठकर

क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा.....

प्रभाकर पेठकर's picture

12 Feb 2009 - 1:01 pm | प्रभाकर पेठकर

'व्यक्त' किंवा 'अव्यक्त'.... प्रेम असणे ही भावनाच सुखकर असते. 'अव्यक्त' प्रेमाला 'व्यक्त' करण्याच्या धडपडीत 'भेटवस्तू' च्या कुबड्या वापराव्या लागल्या तर व्यक्त प्रेमालाही 'गौणत्त्व' प्राप्त होते.
'भेटवस्तू' देऊच नये असे मी म्हणत नाही. पण 'व्हॅलेंटाइन डे' सारखा वर्षातला एखादा दिवस निवडून तो 'साजरा' करावयाच्या मानसिक बंधनातून आपण एखादी 'भेटवस्तू' खरेदी करतो तेंव्हा प्रेमभावनेपेक्षा त्या दिवसाला, भेटवस्तूला आपण अकारण जास्त महत्त्व देत आहोत असे मला वाटते.
'भेटवस्तू' कधीही द्या.
'ए हा बघ तुझ्या साठी शर्ट आणलाय.'
'तुझं अक्षर सुंदर आहे, हे घे पेन माझ्याकडून तुला भेट'
'हा बघ तुझ्या साठी गजरा आणलाय. मला माहिती आहे तू गजरा घालत नाहीस. पण घे, आवडला म्हणून घेतला, नुसता वास घेतलास तरी चालेल.'
'अरे, ही बघ तुला आवडतात म्हणून भजी आणली आहेत.'
'आज काही काम करू नकोस. आज मस्त पैकी नाटक पाहू आणि कुठेतरी झकासपैकी पावभाजी खाऊ.'
ह्या सर्व 'भेटवस्तू' प्रेम व्यक्त करतात. त्यांना 'व्हेलेंटाइन डे' चा मुहूर्त लागत नाही.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Feb 2009 - 1:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"आज उशीर खरंच झाला कारण मी तुला कोणता केक आवडेल यावर विचार करत होते", असं म्हणता म्हणता गाजराचा केक त्याच्या हातात दिल्यावर त्याच्या चेहेर्‍यावरचा आनंद बघण्यासाठी मी (आणि तोपण) वर्षातल्या चार दिवसांची, दिवाळीची वाट बघत बसत नाही. (चार दिवस: व्हॅलंटाईन डे, लग्नाचा, त्याचा आणि माझा वाढदिवस)

काका, तुमच्याशी १००% सहमत. आनंद साजरा करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मुहूर्ताची वाट बघायची कशाला?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

नीधप's picture

12 Feb 2009 - 1:10 pm | नीधप

पण हे तर असतंच.. चालूच असतं असं.
एखाद्या दिवशी खास अधोरेखित करून साजरं करायचं म्हणलं तर कुठे बिघडलं?

तसं तर पाडव्यालाच का ओवाळायचं? रक्षाबंधनालाच का राखी बांधायची? गुरूपौर्णिमेलाच का गुरूंना स्मरायचं/ पुजायचं?
असंही म्हणता येईल ना?
पण त्या त्या भावनेचे प्रतिक म्हणून तो तो एक दिवस आहे. इतकंच

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

प्रभाकर पेठकर's picture

12 Feb 2009 - 1:31 pm | प्रभाकर पेठकर

पाडव्यालाच का ओवाळायचं? रक्षाबंधनालाच का राखी बांधायची? गुरूपौर्णिमेलाच का गुरूंना स्मरायचं/ पुजायचं?

अगदी हेच माझे मत आहे.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

पक्या's picture

13 Feb 2009 - 1:24 am | पक्या

पेठकर काका ,
तुम्ही म्हणताय ते खर्‍या नात्यात वर्षभर चालूच असते. नीधप ने म्हटल्याप्रमणे मुद्दाम अधोरेखित करून एखादा दिवस साजरा केला तर काय बिघडलं ? तेवढीच मौज मजा , आनंद , प्रेम व्यक्त करण्याची अजून एक संधी मिळते. अव्यक्त प्रेम ही काही वेळेस व्यक्त करण्याची गरज असते. आणि ते भेटवस्तू देउन व्यक्त केले तर छानच वाटते. आणि भेटवस्तू म्हणजे नेहमी महागडीच वस्तू घेतली पाहिजे असे क।ही नसते. तुम्ही वर उल्लेख केलेले आहेतच...गजरा, आवडीची डिश वगैरे . आणि त्यातूनही वर्षाकाठी कधीतरी एखाद्या डे चे निमित्त साधून विश लिस्ट वरची घेतली महागडी भेटवस्तू तर काय बिघडते त्यात?

प्रभाकर पेठकर's picture

13 Feb 2009 - 3:24 pm | प्रभाकर पेठकर

पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना....!

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

ब्रिटिश's picture

12 Feb 2009 - 1:27 pm | ब्रिटिश

दादुस लय ऊशीर जाला रं.

मना आटवतय १४ फेबुरवारीला माज्या आयटमला मीनी रेशनच्या लायनीत प्रपोज केल्ता. आनी होकार आल्यावर पाच लीटर राकेल गिफ्ट मदी दिल्ला वता.

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

विसोबा खेचर's picture

12 Feb 2009 - 1:31 pm | विसोबा खेचर

संपलो...!

आपला,
(ब्रिटिशचा जबरदस्त फ्यॅन!) तात्या. :)

विनायक प्रभू's picture

12 Feb 2009 - 1:34 pm | विनायक प्रभू

च्यामारी. अख्खा धडा एका वाक्यात उडवतो हा बाल्या.

शंकरराव's picture

12 Feb 2009 - 3:49 pm | शंकरराव

जबरदस्त =)) =))

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Feb 2009 - 3:53 pm | ब्रिटिश टिंग्या

दादुस तु ग्रेट हाय!

रेवती's picture

12 Feb 2009 - 7:00 pm | रेवती

अतिषय ग्रेट प्रतिसाद!
खूप खूप भारी!

रेवती

नाटक्या's picture

12 Feb 2009 - 9:24 pm | नाटक्या

दादुस,

लय बेस्ट गिफ्ट दिलास बग. पन फुढे राकील झेवून केलास काय तुज्या आयटम ने ते पन लिव ना?

ब्रिटिश's picture

13 Feb 2009 - 11:08 am | ब्रिटिश

जल्ला आसल ते राकेल. पन सांगायच आस कं नंतर पिडा काकुसनं सांगतलेल्या सगल्या भेटी दील्ल्या, पन पाच लीटर राकेल फुकट मील्ल्यावर जेवडा आनंद तिला झाल्ता तेवडा आनंद परत कदीच बगीतला नाय.

मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

श्रीयुत संतोष जोशी's picture

13 Feb 2009 - 1:30 pm | श्रीयुत संतोष जोशी

जबरदस्त ; लै भारी म्हंजे लैच भारी

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सायली पानसे's picture

12 Feb 2009 - 1:33 pm | सायली पानसे

प्रेम असतच ना.... पण एखाद्या दिवशी तुम्हि म्हणता तस एक दिवस खास अधोरेखित करुन साजरा केला तर काहिच बिघडत नाही. भावना व्य़क्त करणे महत्वाचे मग त्या रोज करा किंवा मुहर्त पाहुन... डज नॉट मेक अ डिफरन्स.

विसोबा खेचर's picture

12 Feb 2009 - 1:52 pm | विसोबा खेचर

व्हॅलेन्टाईन डे च्या संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत सिंगल माल्ट स्कॉच पिईन आणि मजा करीन! :)

अजून काय भेटवस्तु देणार? आमच्यासोबत सुखदु:खाच्या गोष्टी करत घालवलेली एक संध्याकाळ, हीच त्या बाईकरता अनमोल असेल! ;)

आपला,
(बाई-बाटलीतला) तात्या.

.... पतिने आपल्या पत्नीस थोडासा (स्वतः चा मोबाईल आणि लॅपटॉप जवळ नाही किंवा बंद आहे असा) वेळ भेट म्हणून द्यायची कल्पना कशी वाटते ?

रेवती's picture

12 Feb 2009 - 7:01 pm | रेवती

हि अपेक्षा जरा जास्त आहे असं वाटत नाही का?;)

रेवती

Dhananjay Borgaonkar's picture

12 Feb 2009 - 3:03 pm | Dhananjay Borgaonkar

पत्निस किती वेळ द्यायचा हे त्या पत्निच्या स्वभावावर अवलम्बुन आहे, अस मी नाहि अनुभवी लोक म्हनतात.

सूहास's picture

12 Feb 2009 - 3:30 pm | सूहास (not verified)

मी तिला सोडुन देण्याचा निर्णय घेतला आहे...तिला मोकळीक(space) हवी...घे आता हवी तेव्हढी...काय पिडाकाका,ही काय पिडा मागे लागली नेमकी १४ फेबच्या आधी...

सुहास..

सूहास's picture

12 Feb 2009 - 3:30 pm | सूहास (not verified)

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

प्रकाश घाटपांडे's picture

12 Feb 2009 - 3:46 pm | प्रकाश घाटपांडे


आता भोगा त्याची फळं!!!! आपण कितीही काळजीपूर्वक कपडे निवडले तरी ते एकतर योग्य कापडाचे नसतात, किंवा त्यांचा साईझ/ रंग/ टेक्श्चर बरोबर नसतं किंवा आपल्याला लेटेस्ट फॅशन म्हणजे काय ते अजिबात माहिती नसते!!!!


काय हाय कि आमच क्वाश्चुम लोकान्ला आवडत नाय तव्हा काय बी झाल तरी कापड घेनार नाय. आन बाकी काय घेन परवडनार नाय?
प्रकाश घाटपांडे

रेवती's picture

12 Feb 2009 - 6:48 pm | रेवती

किती मजेशीर लिहिलयत पिडाकाका!
मनातल्यामनात खुदुखुदू हसत होते मी!
धन्य झाले तुमचे सल्ले वाचून! :)

रेवती

शितल's picture

12 Feb 2009 - 7:00 pm | शितल

पिडाकाका,
तुम्ही धन्य आहात :)
ज्यांना ज्यांना व्हॅलेंटाईनला त्याच्या साथीला जे काही गिफ्ट द्यायचे असेल त्या बरोबर पिडा का़कांच्या ह्या लेखाची एक प्रिन्ट ही द्यावी .:)

प्राजु's picture

12 Feb 2009 - 7:33 pm | प्राजु

लेख आवडला काका.
ब्रिटीश.... यू रॉक!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

12 Feb 2009 - 9:02 pm | लिखाळ

मस्त लेख... (उपयोगी लेख :) )

पण अनेकदा पुरुषाला काय भेट द्यावी याचा निर्णय स्त्रीया घेतात आणि स्त्रीला काय भेट द्यावी हे त्याच पुरुषाला सुचवतात. भारी आहे...
-- लिखाळ.

चतुरंग's picture

12 Feb 2009 - 9:38 pm | चतुरंग

एकदम जबरन धागा सुरु केलात! एकेक सल्ले अगदी अनुभवातून उतरलेले दिसले!! :) ह. ह. पु.वा.! =))

६. फुलं/ गुलाबं: हंऽऽऽ!!!! आपापल्या जबाबदारीवर घेऊन बघायला हरकत नाही!!! तुमची प्रेयसी कोण आहे यावर सगळं अवलंबून आहे. जर नव्याची नवलाई असेल तर खपूनही जाईल!!!! मला मात्र २१ डॉलरचा लालभडक गुलाबाचा गुच्छ घेऊन गेल्यावर, "काय हे! जरा तरी डोकं चालव!! या २१ डॉलरमध्ये किती पापलेटं आली असती माहितीये!!!" असा एका सिकेपीकाकूकडून एकदा अहेर मिळाला होता.....

अगदी अगदी! असाच फर्स्टहँड अनुभव आमचाही आहे. एका वॅलेंटाईनला गुलाबाचा गुच्छ आणायचा नुसता प्रस्ताव मांडल्याक्षणी "कशाला हवेत ते एवढे अकरा डॉलर्सचे गुलाब? काहीतरीच तुझं!" अशा शाब्दिक गुच्छाने सत्कार झालेला माझ्या कोवळ्या मनात अजूनही रुतून बसलाय! ;)

बाकी बायका ह्या बाबतीत बर्‍याचवेळा दशरथाने कैकयीला दिलेल्या तिसर्‍या वराप्रमाणे वागतात. म्हणजे संवाद असा
"ए १४ फेब्रु आलाय."
काहीच न कळल्यासारखं "मग?"
"अगं असं काय वॅलेंटाईन! काय घ्यायचं?"
"हं. बघू. आत्ता नकोय मला काही. पण विचारलंस हे काय कमी आहे?" (हे दुसरं वाक्य म्हणायलाच हवं का? पण नाही त्याशिवाय त्या बायका कसल्या.)
"बघ मी विचारलं नाही म्हणतेस आणि विचारलं की घेत नाहीस."
"नंतर बघू मी सांगेन".
आणि नंतर कोणत्यातरी मोक्याच्या क्षणी एकदम ती मागणी पुढे येते त्यावेळी आपण अडचणीत असलो की मग "बघ मी म्हटलं नव्हतं नंतर मागेन म्हणून आणि तू आता ते घ्यायचं नाही म्हणतोयस!" आपण एकदम गपगार!

चतुरंग

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 1:24 am | चित्रादेव

वॅलेटाइन डे ही पाश्चात्य संस्कृती आहे. छे! हे अश्यानेच आपल्या भारतीय संस्कृतीचे दिवाळे निघतेय. काय गरज आहे असले कॉपी करायची आँ? ह्या असल्या शिं** उचलून घ्यायच्या सवयीनेच देश बोकाळलाय... :)

रोज पत्नीशी गोड बोलत जा. तिच्या मनासारखे वागा/द्या. मग काय सगळे दिवस वॅलेनटाइन असेल. (असे सर्व काकवा सांगतात, मी नाही म्हणत).

बरे, इथे काय तुम्हाला काय आवडेल द्यायला / घ्यायला / करायला ह्या पर्सनल गोष्टींची चर्चा करण्यासाठी बीबी आहे का? ;)

पक्या's picture

13 Feb 2009 - 1:48 am | पक्या

>>वॅलेटाइन डे ही पाश्चात्य संस्कृती आहे. छे! हे अश्यानेच आपल्या भारतीय संस्कृतीचे दिवाळे निघतेय.

अहो देवकाकू , तुम्ही ३१ डिसेंबर साजरा करत असालच ना. तो पण आपला नववर्षदिन नाहिये. साजरा केला नाही तरी हॅपी न्यू ईयर अशी विश देतच असाल ना. मग तेव्हा नाही निघत का आपल्या भारतीय संस्कृतीचे दिवाळे?
आणि वॅलेटाइन डे साजरा केला म्हणजे काय आपण आपले इतर सणवार , आपली संस्कृती विसरतो की काय? ;)

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 1:35 am | चित्रादेव

अहो पक्या काका, पचकलात नीट न वाचता? ते स्माइली दिसत नाही का? ;)

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2009 - 1:53 am | पिवळा डांबिस

माफ करा पण,
मलाही तुमची प्रतिक्रिया हा विनोद आहे, उपहास आहे की निषेध आहे हे नीटसं समजलं नव्हतं....
नुसत्या स्मायली टाकल्या म्हणजे शब्दांचा परिणाम कमी होत नाही....

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 2:06 am | चित्रादेव

पिवळा डँबीस,
पहीले म्हणजे इथे नुसते शब्दातून अर्थ व्यतीत(काढले जातात) होतात. ना ओळख ना देख ना आवाजाच टोन व्यतीत होत नाही. तेव्हा सगळेच कठीण असते आणि प्रत्येक जण शब्दाचा काय अर्थ लावतो किंवा लावू शकतो हे सांगणे कठीणच आहे जरी स्माईली वापरल्या तरी. पण स्माईलींचा आतापर्यन्त जसा वापर केला गेलाय त्यावरून तर हाच अर्थ लावण्यात आला की लिहिलेले वाक्य हे कसे घ्यायचे आणि बहुधा त्याच साठी हे इमोट आयकन आहेत ना की ह्याचा टोन कसा आहे. बरोबर ना?
कोणाला दुखवायचा हेतू न्हवता पण पक्या ह्यांनी जुन्या/ नवीन चा मुद्दा काढून नंतर स्माईली टकल्या आहेतच ना मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा?

तेव्हा मी तरी इथे ही चर्चा थांबवते. मूळ मुद्द्यावर वळलेले बरे.

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2009 - 2:13 am | पिवळा डांबिस

मी पक्या यांच्या प्रतिसादाविषयी काही म्हणत नाहिये...
मला तुमच्या मूळ प्रतिक्रियेतील पहिला आणि शेवटचा परिच्छेद हा विनोद, उपहास आणि निषेध यापैकी काय आहे ते विचारायचं होतं....
कृपया सांगाल का?

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 2:31 am | चित्रादेव

आता इथे हे समजावून सांगावे लागतेय.. असो.
माझ्या स्माईली टाकून जर तुम्हाला समजले नसेल आणि नुकत्याच दिलेल्या पोस्टचे स्पष्टीकरण कळले नसेल तर लिहिते.
सर्वात पहील्या प्रतीसादातील पहीले वाक्य हे निव्वळ विनोदाने लिहिलेय. अशीच एक प्रतीक्रीया एकली होती एका व्यक्तीकडून ह्याच विषयावर म्हणून गमतीत लिहिले.
शेवटचे वाक्य हे असेच जरासे उपहासाने लिहिले.. कारण कितपत खाजगी गोष्टी इथे लिहू शकतो आणि हे विचारायचे कारण तसा इथेच 'मनातील गोष्ट वगैरे' उल्लेख वाचला म्हणून. बाकी काही दर्शवायचे न्हवते.
आता तुम्ही पण दोन प्रश्णांची उत्तरं द्याल का? कारण तुम्ही माझे पोस्ट हे जाणून / समजावून घेण्यामागे काय हेतू आहे? तुम्ही एवढे अट्टाहास करताहेत की माझ्या पोस्टचा अर्थ जाणून घेण्यात म्हणून मला ही हा एक प्रश्ण आहे पडला आणि दुसरा प्रश्ण हा आहे के ह्या लेखावर फक्त सीरीयसच टीपणी (कमेंटस)अपेक्षीत आहे का?

मीच कंटाळले इथे उत्तर देवून.. काय एक साधेसे वाक्य लिहिले स्माईली टाकून नी त्याचा काथ्याकूट चाललाय.... :(
(अरे बापरे, पुन्हा मी स्माइली टाकली. आता पुन्हा प्रश्ण येणार का कोणाकडून की ह्याचा अर्थ काय? स्माइलीने शब्दांचे परीणाम बदलले/बदलले नाहीत).

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2009 - 2:43 am | पिवळा डांबिस

सर्वात पहील्या प्रतीसादातील पहीले वाक्य हे निव्वळ विनोदाने लिहिलेय. अशीच एक प्रतीक्रीया एकली होती एका व्यक्तीकडून ह्याच विषयावर म्हणून गमतीत लिहिले.
शेवटचे वाक्य हे असेच जरासे उपहासाने लिहिले.. कारण कितपत खाजगी गोष्टी इथे लिहू शकतो आणि हे विचारायचे कारण तसा इथेच 'मनातील गोष्ट वगैरे' उल्लेख वाचला म्हणून. बाकी काही दर्शवायचे न्हवते.
ओके. स्पष्टीकरणाबद्दल आभार.

आता तुम्ही पण दोन प्रश्णांची उत्तरं द्याल का?
जरूर!

कारण तुम्ही माझे पोस्ट हे जाणून / समजावून घेण्यामागे काय हेतू आहे?
कारण माझ्याच मूळ लिखाणावर हा धागा सुरु झाला आहे. बाकीचे पोस्ट समजले. तुमचा समजला नाही. आपल्या लिखाणावर जर कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली तर ती 'काय' केली हे जाणून घ्यावेसे वाटले. म्हणजे पुढील लिखाणात मला सुधारणा करता येईल हा उद्देश!

दुसरा प्रश्ण हा आहे के ह्या लेखावर फक्त सीरीयसच टीपणी (कमेंटस)अपेक्षीत आहे का?
मुळीच नाही!
इथे कोणत्याही प्रतिक्रियेचं, मग ती सिरियस, विनोदी, अनुकूल, प्रतिकूल कशीही असो, स्वागतच आहे...
फक्त लोकांना व्यवस्थित समजली जाणं महत्वाचं, नाही का?

असो. माझं शंकानिरसन तुम्ही केलंत त्याबद्दल आभार.
होपफुली तुमच्या दोन प्रश्नांना मी दिलेली उत्तरंही समाधानकारक असावीत.

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 2:48 am | चित्रादेव

अच्छा! आवडला हो तुमचा हेतू नी ओवरऑल अप्रोच प्रतीक्रीया जाणून घ्यायचा. असो.
आता गाडी मुद्द्याकडे (मूल लिखाणाकडे) वळायला हरकत नाही. :)

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2009 - 3:05 am | पिवळा डांबिस

जरूर!

पक्या's picture

13 Feb 2009 - 1:47 am | पक्या

नविन सभासद सदस्यत्व घेऊन १-२ दिवस किंवा काही तासच झाले नसतील तरी लगेच भांडण्याच्या मूड मध्ये का येतात 'देव' जाणे? ;) (ह्.घ्या. हं)

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 1:52 am | चित्रादेव

हो तेच ना, इथे नवीन जुन्याचा संबध कशाला लावता हो? पण काय आहे ना तुमच्यासारखी जुनी सभासद लोकं, आधी नवीन आहे का सभासद बघून उगीच असे कारण नसताना त्या सभासदाची पोस्ट नीट पणे न वाचता खवचट पणे लिहितो तेव्हा होते असे. असो. तुम्ही पण हलकेच घ्या... :)
(तुम्ही पण कधी काळी नवीन होतात ना...)

सुक्या's picture

13 Feb 2009 - 2:54 am | सुक्या

दागिने: ही त्यातल्यातात सेफ भेट!!. ????

अहो पिडाकाका .. असल्या भेटीनं आमचं 'सेफ' डिपौझिट अन'सेफ' होत हो!
मागच्या वेळी आम्ही डोक्यावर दगड ठेउन खिसा मोकळा करुन एक लेटेस्ट डिझाईन घेतलं होतं. आता ते जुनं झालं आहे असा कालच किचन मधुन आवाज आला.
आता काय पुन्हा डोक्यावर दगड ठेवावा लागणार :S

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

चित्रादेव's picture

13 Feb 2009 - 2:59 am | चित्रादेव

मला तर वाटते की ललनांना भेटवस्तूबरोबर एकदम सुंदर ठीकाणी बीच / आयलंड वर दिवस घालवणे सगळ्यात मस्त. :)

धमाल मुलगा's picture

13 Feb 2009 - 5:57 pm | धमाल मुलगा

मोठ्या कठीण प्रश्नाला क्यालिफोर्नियापीठासनाधीश श्री.श्री.श्री. पिवळा डांबिसाचार्य १००८ ह्यांनी वाचा फोडली आहे. ह्या गहन प्रश्नावरील त्यांनी सुचवलेले उपायही केवळा अप्रतिम आहेतच. :)

ह्यॅ: काय तिच्याआयला, आपल्याला गंभीर वगैरे होणं जमतच नाहीय्ये :( मरुदे, आपलं माणसासारखंच बोलतो.

अहो, ही गिफ्ट घेणं म्हणजे काय डोक्याला शॉट्ट असतो राव. पण गेल्या वर्षापासून आम्ही डोकं लढवलंय(!) शॉपींगच्या वेबसाईट्सवर जायचं, त्या मार्केटिंगवाल्या लोकांचं डोकं लय भारी चालतं, त्यांनी मस्त विचार करुन नव्या नव्या गिफ्ट्स शोधलेल्या असतात त्यातलंच खिशाला जे झेपेल ते उचलायचं आणि मस्त गिफ्ट पॅक करुन, एखादं झक्कास ग्रिटींग कार्ड जोडून तिच्या नावावर कुरियर करायला सांगायचं...हां, हे करताना आधी आठवडाभर "काही गिफ्ट नाही आणि काही नाही, आजिबात हे प्रकार मी करणार नाही" असली बडबड करुन गाफील ठेवायला मात्र विसरायचं नाही. :)

गेल्या वर्षी मला एक मस्त गिफ्ट सापडलेलं:
एक गळ्यात घालायची साखळी+उघडता येण्याजोगं पेंडंट्+एक शिंपला!
गडबडलात ना वाचुन? अहो हीच त्या मार्केटिंगवाल्यांची शक्कल :) त्याशिंपल्यात एक मोती बंद करुन ठेवलेला होता. शिंपला उघडायचा, त्यातला मोती काढायचा, पेंडंटमध्ये ठेवायचा आणि ते पेंडंट साखळीत ओऊन तिच्या गळ्यात घालायचं :) बेष्ट आहे की नाही ही आयडीयाची कल्पना?

**ह्या वर्षी काय देणार ते आम्ही नाही सांगणार! गम्मत आहे एक!!!!! ;)

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

पिवळा डांबिस's picture

13 Feb 2009 - 10:33 pm | पिवळा डांबिस

मस्त गिफ्ट पॅक करुन, एखादं झक्कास ग्रिटींग कार्ड जोडून तिच्या नावावर कुरियर करायला सांगायचं...

वर इतक्या लोकांनी कायकाय गिफ्ट द्यायच्या ते सांगितलं...
पण स्वतःच्याच बायकोला गिफ्ट "कुरियर" करणारा हा पहिलाच बहाद्दर!!!!!
लेका, तू पाठवलेलं एखादं मस्त गिफ्ट बघून बायको इतकी आनंदित होईल की त्या आनंदाच्या भरात कदाचित त्या कुरियरवाल्याचाच मुका घेईल!!!!
सांभाळ रे बाबा!!!
:)

धमाल मुलगा's picture

16 Feb 2009 - 11:24 am | धमाल मुलगा

=)) येकदम डांबिस प्रतिक्रिया!!!!!!!!

अहो पण काका, ते कुरियर मी आणि ती ज्यावेळी घरी असु त्याच वेळी मिळेल अश्या पध्दतीने घरपोच करायच्या सुचना देतो मी. म्हणजे ती संध्याकाळपर्यंत रागारागाने फणफण करत बसते आणि आलेलं पार्सल उघडुन पाहिलं की एकदम 'सरप्राऽऽईझ्झ्झ' :)
मग काय, एकदम 'आनंदी आनंद गडे...' ;)

हाय का ना मी एकदम हुशार?

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

श्रीरंग_जोशी's picture

3 Feb 2014 - 10:55 pm | श्रीरंग_जोशी

व्हलेंटाईन डे जवळ येतोय म्हणून हा लेख वर आणतोय.

होऊ दे भेटवस्तूंवर खर्च :-).

सस्नेह's picture

4 Feb 2014 - 8:06 am | सस्नेह

या २१ डॉलरमध्ये किती पापलेटं आली असती माहितीये!!!" असा एका सिकेपीकाकूकडून एकदा अहेर मिळाला होता.....

पिडांकाका, कोणत्या सिकेपीकाकूंना व्हॅलेंटाईन गिफ्ट दिली होतीत ..?

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2014 - 11:55 am | पिवळा डांबिस

जी आता मिसेस पिवळी डांबिसीण आहे, तिला....
:)

कालच वर्सोली बीचवर जावून आलो, नवरा म्हणाला हेच व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे(14,15 फेबचे सगळीकडे बूकिंग फुल्ल होते).पण त्यादिवसाठी पण काहीतरी गिफ्ट हवेच ना? स

उपाशी बोका's picture

5 Feb 2014 - 9:38 am | उपाशी बोका

पण त्यादिवसाठी पण काहीतरी गिफ्ट हवेच ना?

मग व्हॅलेंटाईनच्या दिवशीपण वर्सोली बीचवर जावून या. ;)

काकांचा सल्ला हे सदर मिपावर फार आधीपासून सुरु आहे म्हणा की!

बॅटमॅन's picture

6 Feb 2014 - 11:12 am | बॅटमॅन

वाचनखूण साठवलेली आहे ;)

प्रसाद गोडबोले's picture

9 Feb 2014 - 1:13 am | प्रसाद गोडबोले

१) गर्लफ्रेंडला फोन करुन विचारा तिला वॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट हवय
२) फ्लिपकार्ट ओपन करा , ते गिफ्ट करेदी करा , गर्लफ्रेंडचा पत्ता वगैरे डीटेल्स द्या
३) पेमेन्ट ऑप्शन्स मधे "कॅश ऑन डिल्हीवरी " सिलेक्ट करा .

:D

दिव्यश्री's picture

12 Feb 2014 - 2:44 am | दिव्यश्री

एक whatsapp वर आलेला मेसेज इथे देत आहे.:) आम्ही( मी आणि आमचं प्यांटवालं) डेज साजरे करत नाही.
On this Valentines day take resolution to save the Nature ,Plants & Trees "Avoid Roses Use Diamonds" Lets pass this to all husband... ;) :D

Gift काही पण चालेल अगदी ऐक गुलाबाच फुल सुधा चालेल .
महत्वाचं आहे तुमचं त्या व्यक्ती वर स्वार्थी प्रेम आसू नये .
आणि पाहिलं स्वतःच्या मनाला विचार काय अपेक्षा ठेवून आपण प्रेमाचा बाजार मांडतोय .
जेवढ्या अपेक्षा आणि स्वार्थ मोठा तेवढीच मोठी गिफ्ट घेणारे आणि देणारे दोघांना हवी आस्ते ,बघा तुम्ही कशात bastay

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Feb 2019 - 6:01 pm | माम्लेदारचा पन्खा

आता मज्जा येणार काका !