Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 02/12/2009 - 11:19
  • Log in or register to post comments
  • 38420 views

प्रतिक्रिया

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 02/12/2009 - 11:26

Permalink

प्रेयसी

प्रेयसी कशी आहे त्यावर भेटवस्तु अवलंबुन आहे. थोडे फार रुसवे फुगवे चालणारच.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 02/12/2009 - 11:50

In reply to प्रेयसी by सखाराम_गटणे™

Permalink

हो क्का?

थोडे फार रुसवे फुगवे चालणारच. तुम्ही सध्या फक्त तुमची ती गाजरं संपवा.... एकदा "कुर्यात शुभमंगलं" झालं ना कि मग पुन्हा इथे येऊन तुमचे अनुभव लिहा.... बायकांच्या रुसव्या-फुगव्याला तुम्ही "थोडेफार" म्हणताय म्हणजेच तुम्हाला याचा अनुभव नाहिये!!!!! अनुभवी, पिडां
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/12/2009 - 11:57

In reply to हो क्का? by पिवळा डांबिस

Permalink

मिक्सर

असु दे, असु दे. एकदा मिक्सरची वारी झाल्याशिवाय नाय कळायचे हो पिडा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/12/2009 - 11:58

In reply to मिक्सर by विनायक प्रभू

Permalink

म्हणजे

म्हणजे नंतर कळतं/कळेल का? अनुभवी लोकांनीच मतप्रदर्शन करावे अशी आगाऊ आणि उद्धट विनंती! ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/12/2009 - 12:01

In reply to म्हणजे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

कॅश

कॅश द्यायची प्रश्न मिटतो. त्याना हवे ते घ्यायला स्वातंत्र्य. उगाच आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडुन परत बोलणी खावी कशाला?
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 02/12/2009 - 12:15

In reply to कॅश by विनायक प्रभू

Permalink

अरे बापरे!!!

कॅश? भलतेच धाडसी बुवा तुम्ही!!!! "कॅश द्यायला मला काय ** समजलास?" असे ऐकावे लागले तर हो? नको रे बुवा, ह्या समुपदेशक लोकांना ते ठीक आहे, आपल्याला उगाच (खरोखरचा!) जोडा खावा लागायचा!!!!! मित्रांनो, या मास्तरापासुन जरा सांभाळूनच हो!!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/12/2009 - 12:21

In reply to अरे बापरे!!! by पिवळा डांबिस

Permalink

वॅलीड

एकदम वॅलीड पॉइंट. न झेपणारी मोहीम हातात घेउ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 02/12/2009 - 12:22

In reply to वॅलीड by विनायक प्रभू

Permalink

ट्रेझरी बॉण्ड्स

सहा टक्के रेट आहे सध्या. कुठल्याही ब्लूचिप पेक्षा जास्त ! आहात कुठे ? -- सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by विंजिनेर on गुरुवार, 02/12/2009 - 13:40

In reply to ट्रेझरी बॉण्ड्स by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

सर्किट राव

गिफ्ट प्रेयसी ला द्यायचे आहे. शेअर बाजारतल्या एजंट मित्राला नाही. बायकांच्या मते ट्रेझरी बॉण्ड्स आणि रोख रक्कम एकाच (रूक्ष/भावनाशून्य)विभागात येतात. त्यातल्या त्यात फुले+दागिने+ फक्त तिच्या साठी/भोवती घालवलेली एखादी संध्याकाळ हे सर्वात बेष्ट आहे (बायकोचा वाढदिवस एकदा(च !) विसरल्यामुळे कोट्यावधी शिव्या खाल्लेला) विंजिनेर
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 02/12/2009 - 19:01

In reply to सर्किट राव by विंजिनेर

Permalink

+१

सहमत. ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 02/13/2009 - 07:29

In reply to मिक्सर by विनायक प्रभू

Permalink

>>>एकदा

>>>एकदा मिक्सरची वारी झाल्याशिवाय नाय कळायचे हो पिडा. =)) =)) =)) देवा साष्टांग नमस्कार. भिरभिर फिरलो उन्हातानात मी ! चकरा मारल्या अनंत मी ! तुला पाहण्यासाठी... यमालाही थोपवलं मी ! पण आता बाय-बाय =))
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 02/12/2009 - 18:52

In reply to प्रेयसी by सखाराम_गटणे™

Permalink

सखारामा, तू

सखारामा, तू आधी लग्न कर बाबा! तुझं लग्न झालं की बर्‍याच जणांना हायसं वाटणारे. तुला रुसव्याफुगव्यतलं काही कळत नाही म्हणजे कित्ती सुखी माणूस आहेस. नाही रे एवढं सुखी बघवत लोकांना!;) (प्रतिसाद ह. घे पण लग्न करायचं मनावर घे.) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by योगी९०० on गुरुवार, 02/12/2009 - 11:28

Permalink

मला सांगा..

व्हॅलेंटाईन डे लाच माझ्या लाडक्या लेकीचा वाढदिवस आहे. तिच्यासाठी काय भेटवस्तू घेऊ? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on गुरुवार, 02/12/2009 - 11:28

Permalink

मोलाचं मार्गदर्शन

पण थोडं उशीराच आलं. आता आम्ही शेवटच्या मुद्याच्या शेवटच्या भाकीताचा अनुभव घेत आहोत!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/12/2009 - 11:39

Permalink

*

*
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/12/2009 - 11:39

Permalink

इस्पेशल गिफ्ट

आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव मधे दिसेल त्या दिवशी !!! :) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 02/12/2009 - 11:46

In reply to इस्पेशल गिफ्ट by मदनबाण

Permalink

अरे देवा!

अहो मदनबाण, तुमचे वेडेवाकडे फोटो छापू नका हो!!!! ते आम्हालाही बघावे लागतात!!!! :))
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/12/2009 - 11:53

In reply to अरे देवा! by पिवळा डांबिस

Permalink

:)

नाही हो काका शुभ्रा आणि तिला दिलेल खास गिफ्टच तुम्हाला तिथं,, त्या दिवशी दिसले !!! :) मदनबाण..... देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 02/12/2009 - 11:57

In reply to :) by मदनबाण

Permalink

मग ठीक आहे...

मला वाटलं कि तुम्हीपण त्या टारूसारखे काय (दंडातल्या!!) बेटकुळ्या वगैरे दाखवणारे तुमचे बनियनमधले फोटू टाकताय की काय!!!!! :))
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 02/04/2014 - 12:34

In reply to इस्पेशल गिफ्ट by मदनबाण

Permalink

आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव

आमचं इस्पेशल गिफ्ट आमच्या खव मधे दिसेल त्या दिवशी !!! छ्या... पूर्वी सारखे फोटो, व्हिडीयो आता खव मधे लावता येत नाही, शिवाय खरड आली ते सुद्धा कळत नाही. मी तर खरडवही वापरणे जवळपास बंदच केले आहे. काही उपाय ?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/12/2009 - 11:46

Permalink

बायकांनी

बायकांनी आपण कितीही स्मार्ट आहोत असं दाखवलं तरी खड्यांमध्ये श्रेष्ठ्-कनिष्ट ठरवण्याची अक्कल देवाने त्यांच्यात घातलेलीच नाहिये! म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का? ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 02/12/2009 - 11:53

In reply to बायकांनी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

:)

म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का? मग यात त्या सुस्वरूप (?) बायका स्मार्ट की ते दगड जास्त स्मार्ट? :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/12/2009 - 11:56

In reply to :) by पिवळा डांबिस

Permalink

म्हणूनच

म्हणूनच बर्‍याच दगडांचीही सुस्वरुप मुलींशी लग्नं होतात का? मग यात त्या सुस्वरूप (?) बायका स्मार्ट की ते दगड जास्त स्मार्ट? अर्थातच दगड! "बायकांना दगडांची पारख नसतेच ना?" तुमच्या याच म्हणण्याला मी अनुमोदन देत आहे! ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 02/12/2009 - 12:00

In reply to म्हणूनच by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

प्र. क. टा. आ.

इथे काकूने मला एक टप्पल मारल्यामुळे माझा हा प्रतिसाद काढुन टाकण्यात आलेला आहे...... :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 02/12/2009 - 18:54

In reply to बायकांनी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मस्तच गं

मस्तच गं अदिती! रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/12/2009 - 19:09

In reply to मस्तच गं by रेवती

Permalink

रेवतीताई,

रेवतीताई, मग या वेळेचा व्हॅलंटाईन एकदम "ब्रिटीश" पद्धतीने का, का एकदम "धूमधडाक्यात"? ;-) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 02/12/2009 - 19:21

In reply to रेवतीताई, by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

बघूयात. हवी

बघूयात. हवी ती वस्तू (गरजेप्रमाणे) नेहमीच मागितल्याबरोबर मिळत असते...... म्हणजे मीच विकत घेऊन येते, मग आता वेगळं असं काय करायचं? तसं सहा वर्षांपूर्वी नवर्‍यानं भरपूर बर्फात ड्राइव्ह करत मला न्यू जर्सीला चाट खायला नेलं होतं ते आठवतं. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/12/2009 - 11:47

Permalink

अर

डांबिसा
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 02/12/2009 - 12:21

Permalink

असहमत हो!

>>२. तिला कविता/ लेख/ कथा वगैरे देऊ नका. << आम्हाला भेटून १२ वर्षे आणि लग्न होउन ६ वर्षे झालीत तरी मला नवर्‍याने लेख किंवा कविता माझ्यासाठी लिहिलेली दिली तर प्रचंड आनंद होईल. खरंच. >>४. आपल्या प्रियतमेला कपडे घेऊ नका. आपल्या प्रियतमेला आवडतील असे कपडे घेणारा पुरूष अजून तरी जन्माला आलेला नाही. << माझ्या नवर्‍याचा कपड्यातला चॉईस हल्ली सुधारलाय आणि मी एखादा कपडा महाग म्हणून आवडला तरी ठेवून दिल्यावर तोच माझ्या मागे लागतो घे घे म्हणून तेव्हा अजिबातच हरकत नाही कपडा घेण्यात. >>५.अत्तरं, इसेन्शियल ऑईल्स, बाथसेंन्टस मुळीच घेऊ नका!! कारण ते जरी कितीही महाग आणि दुर्मिळ असले तरी, "मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते!!!! तुला दुसरं काही सुचतच नाही का रे?" हा प्रश्न येणार....<< हा प्रश्न अजिबात येणार नाही.. ही भेट आवडेल.. अगदी मनातल्या गोष्टीसकट... :) श्या पिडाकाका अगदीच चुकलात.. युजिए के नामपे बट्टा!!! :) असो.. मलातरी एकतर्फी भेटीची आयड्या आवडत नाही. तेव्हा मी पण नवर्‍यासाठी काहीतरी घेणार.. एनी सजेशन्स? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by गंधमादन on गुरुवार, 02/12/2009 - 12:25

In reply to असहमत हो! by नीधप

Permalink

एनी सजेशन्स?

>>एनी सजेशन्स? गोड बोला एक दिवस .. पुरे होईल बिचार्‍याला तेवढेच. (हि सजेशन सर्व बायकांना बरका .. व्यक्तिगत घेउ नका)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 02/12/2009 - 12:33

In reply to असहमत हो! by नीधप

Permalink

प्रेमाचे शब्द..

मलातरी एकतर्फी भेटीची आयड्या आवडत नाही. तेव्हा मी पण नवर्‍यासाठी काहीतरी घेणार.. काही विकत घेऊन देण्यापेक्षा, मनापासुनच्या प्रेमाचे चार शब्द जास्त मोलाचे होतात. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 02/12/2009 - 13:07

In reply to प्रेमाचे शब्द.. by प्रभाकर पेठकर

Permalink

समस्त

समस्त स्त्रीवर्ग कधीही प्रेमाने बोलत नाही वागत नाही असा तुमचा गैरसमज आहे की मी वागत नाही असा गैरसमज आहे? काही असला तरी तो गैरसमजच बरंका.. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 02/12/2009 - 13:10

In reply to समस्त by नीधप

Permalink

गैरसमज..

गैरसमज होतो आहे. मी फक्त 'प्रेमाच्या शब्दांची' महती विशद करून सांगितली आहे. व्यक्तिगत आरोप केलेला नाही. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

Submitted by एक on Fri, 02/13/2009 - 11:46

In reply to असहमत हो! by नीधप

Permalink

एनी सजेशन्स?..

"..हा प्रश्न अजिबात येणार नाही.. ही भेट आवडेल.. अगदी मनातल्या गोष्टीसकट".." अहो असं जर आमच्या बायकोने धाडसीपणे बोलून दाखवलं ना तर "ती भेट" सगळ्यात झकास वाटेल.. प्रत्येकवेळी "मनकवड्याचा रोल" करून आणि ड्रायव्हरसीट वर बसण्याचा आम्हालापण कंटाळा येतो. एखाद्या लाँग ड्राईव्ह वर बायकोने ड्रायव्हींग करण्याचापण उत्साह आणि उत्सुकता दाखवावी. आमच्यालेखी ती खरी मौल्यवान भेट, बाकिच्या मटेरियल गिफ्ट्स ईंमटेरियल ;) मी तर एक लाल रिबीन मलाच गुंडाळून प्रेझेंट करणार आहे. नाहीतरी प्रत्येक गिफ्ट "चीप गिफ्ट" म्हणून हिणवलं जातच यावेळी थोडे पैसेतरी वाचतील. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिप्रा on Fri, 02/13/2009 - 11:58

In reply to एनी सजेशन्स?.. by एक

Permalink

>>मी तर एक

>>मी तर एक लाल रिबीन मलाच गुंडाळून प्रेझेंट करणार आहे. नाहीतरी प्रत्येक गिफ्ट "चीप गिफ्ट" म्हणून हिणवलं जातच : D यावेळेस पण तेच एकायची तयारी ठेवा..
  • Log in or register to post comments

Submitted by एक on Fri, 02/13/2009 - 12:07

In reply to >>मी तर एक by शिप्रा

Permalink

ऐकायला तर लागणारच..

म्हणूनच लिहिलं ना..की यावेळी पैसेतरी वाचवतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on Mon, 02/16/2009 - 11:32

In reply to एनी सजेशन्स?.. by एक

Permalink

>>अहो असं जर

>>अहो असं जर आमच्या बायकोने धाडसीपणे बोलून दाखवलं ना तर "ती भेट" सगळ्यात झकास वाटेल..<< दोघांच्यात सुसंवाद असेल तर हे घडणं काही अवघड नाही. आणि सुसंवाद ही दोघांची जबाबदारी आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/12/2009 - 12:42

Permalink

चार

मोजुन चारच बर का? पुढच्या चार साठी एक वर्ष वाट बघायला लावायची. वाईट सवय लावायची नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 02/12/2009 - 12:45

In reply to चार by विनायक प्रभू

Permalink

क्षण एक..

क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा.....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 02/12/2009 - 13:01

Permalink

प्रेम महत्त्वाचे...

'व्यक्त' किंवा 'अव्यक्त'.... प्रेम असणे ही भावनाच सुखकर असते. 'अव्यक्त' प्रेमाला 'व्यक्त' करण्याच्या धडपडीत 'भेटवस्तू' च्या कुबड्या वापराव्या लागल्या तर व्यक्त प्रेमालाही 'गौणत्त्व' प्राप्त होते. 'भेटवस्तू' देऊच नये असे मी म्हणत नाही. पण 'व्हॅलेंटाइन डे' सारखा वर्षातला एखादा दिवस निवडून तो 'साजरा' करावयाच्या मानसिक बंधनातून आपण एखादी 'भेटवस्तू' खरेदी करतो तेंव्हा प्रेमभावनेपेक्षा त्या दिवसाला, भेटवस्तूला आपण अकारण जास्त महत्त्व देत आहोत असे मला वाटते. 'भेटवस्तू' कधीही द्या. 'ए हा बघ तुझ्या साठी शर्ट आणलाय.' 'तुझं अक्षर सुंदर आहे, हे घे पेन माझ्याकडून तुला भेट' 'हा बघ तुझ्या साठी गजरा आणलाय. मला माहिती आहे तू गजरा घालत नाहीस. पण घे, आवडला म्हणून घेतला, नुसता वास घेतलास तरी चालेल.' 'अरे, ही बघ तुला आवडतात म्हणून भजी आणली आहेत.' 'आज काही काम करू नकोस. आज मस्त पैकी नाटक पाहू आणि कुठेतरी झकासपैकी पावभाजी खाऊ.' ह्या सर्व 'भेटवस्तू' प्रेम व्यक्त करतात. त्यांना 'व्हेलेंटाइन डे' चा मुहूर्त लागत नाही. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/12/2009 - 13:08

In reply to प्रेम महत्त्वाचे... by प्रभाकर पेठकर

Permalink

+१

"आज उशीर खरंच झाला कारण मी तुला कोणता केक आवडेल यावर विचार करत होते", असं म्हणता म्हणता गाजराचा केक त्याच्या हातात दिल्यावर त्याच्या चेहेर्‍यावरचा आनंद बघण्यासाठी मी (आणि तोपण) वर्षातल्या चार दिवसांची, दिवाळीची वाट बघत बसत नाही. (चार दिवस: व्हॅलंटाईन डे, लग्नाचा, त्याचा आणि माझा वाढदिवस) काका, तुमच्याशी १००% सहमत. आनंद साजरा करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मुहूर्ताची वाट बघायची कशाला? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 02/12/2009 - 13:10

In reply to प्रेम महत्त्वाचे... by प्रभाकर पेठकर

Permalink

पण हे तर

पण हे तर असतंच.. चालूच असतं असं. एखाद्या दिवशी खास अधोरेखित करून साजरं करायचं म्हणलं तर कुठे बिघडलं? तसं तर पाडव्यालाच का ओवाळायचं? रक्षाबंधनालाच का राखी बांधायची? गुरूपौर्णिमेलाच का गुरूंना स्मरायचं/ पुजायचं? असंही म्हणता येईल ना? पण त्या त्या भावनेचे प्रतिक म्हणून तो तो एक दिवस आहे. इतकंच - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 02/12/2009 - 13:31

In reply to पण हे तर by नीधप

Permalink

हेच म्हणतो...

पाडव्यालाच का ओवाळायचं? रक्षाबंधनालाच का राखी बांधायची? गुरूपौर्णिमेलाच का गुरूंना स्मरायचं/ पुजायचं? अगदी हेच माझे मत आहे. दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Fri, 02/13/2009 - 01:24

In reply to प्रेम महत्त्वाचे... by प्रभाकर पेठकर

Permalink

पेठकर काका

पेठकर काका , तुम्ही म्हणताय ते खर्‍या नात्यात वर्षभर चालूच असते. नीधप ने म्हटल्याप्रमणे मुद्दाम अधोरेखित करून एखादा दिवस साजरा केला तर काय बिघडलं ? तेवढीच मौज मजा , आनंद , प्रेम व्यक्त करण्याची अजून एक संधी मिळते. अव्यक्त प्रेम ही काही वेळेस व्यक्त करण्याची गरज असते. आणि ते भेटवस्तू देउन व्यक्त केले तर छानच वाटते. आणि भेटवस्तू म्हणजे नेहमी महागडीच वस्तू घेतली पाहिजे असे क।ही नसते. तुम्ही वर उल्लेख केलेले आहेतच...गजरा, आवडीची डिश वगैरे . आणि त्यातूनही वर्षाकाठी कधीतरी एखाद्या डे चे निमित्त साधून विश लिस्ट वरची घेतली महागडी भेटवस्तू तर काय बिघडते त्यात?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 02/13/2009 - 15:24

In reply to पेठकर काका by पक्या

Permalink

बिघडत काहीच नाही....

पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना....! दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on गुरुवार, 02/12/2009 - 13:27

Permalink

दादुस लय

दादुस लय ऊशीर जाला रं. मना आटवतय १४ फेबुरवारीला माज्या आयटमला मीनी रेशनच्या लायनीत प्रपोज केल्ता. आनी होकार आल्यावर पाच लीटर राकेल गिफ्ट मदी दिल्ला वता. मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 02/12/2009 - 13:31

In reply to दादुस लय by ब्रिटिश

Permalink

संपलो...!

संपलो...! आपला, (ब्रिटिशचा जबरदस्त फ्यॅन!) तात्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 02/12/2009 - 13:34

In reply to दादुस लय by ब्रिटिश

Permalink

धडा

च्यामारी. अख्खा धडा एका वाक्यात उडवतो हा बाल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by शंकरराव on गुरुवार, 02/12/2009 - 15:49

In reply to दादुस लय by ब्रिटिश

Permalink

जबरदस्त

जबरदस्त =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 02/12/2009 - 15:53

In reply to दादुस लय by ब्रिटिश

Permalink

आयला,

दादुस तु ग्रेट हाय!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com