उलटे काळिज...

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
10 Feb 2009 - 11:48 am

उलटे काळिज...
बहुतेक लोकांचे ह्रुदय हे त्यांच्या डाव्या बाजुला असते.पण माझ्या वाचनात अशी एक केस आलि कि त्या व्यक्तिचे ह्रुदय उजव्या बाजुला होते..हि केस नेमकि कुठे वाचलि ते मला स्मरत नाहि त्या मुळे मी रेफरंस देवु शकत नाहि या बद्दल मि.पा. सदस्यानि मला क्षमा करावि..

एका गुन्हेगाराला न्यायाधिशांनि फशिचि शिक्षा दिलि..फाशि देण्यापुर्वि जेंव्हा त्याचि वैद्यकिय तपासणी करण्यात आलि त्या वेळी डॉक्टरांना अजब गोष्ट आढळली कि त्याचे ह्रुदय उजव्या बाजुला होते..मग डॉक्टरांनि हि गोष्ट न्यायाधिशाना समजावुन सांगितली. कि ह्या व्यक्तिचे ह्रुदय उलट्या बाजुला [उजव्या बाजुला]असल्याने गुन्हेगारी व वाइट गोष्टी त्याच्या द्रूश्टीने नॉरमल आहेत..कोर्टाला ही बाजु पटल्याने त्यचि फाशिचि शिक्षा रद्द करण्यात आलि..
त्या मुळे कदाचित क्रुर कामे करणा~याला "उलट्या काळजाचा" असे म्हणतात

वाङ्मय

प्रतिक्रिया

ऍडीजोशी's picture

10 Feb 2009 - 12:17 pm | ऍडीजोशी (not verified)

काहिही :)

बबलु's picture

10 Feb 2009 - 12:33 pm | बबलु

माझं काळीज उलट्या (उजव्या) बाजूला आहे.... असं माझं लहानपणापासून मत आहे.
डॉक्टरांकडून फोटु काढून घ्यायला हवा. :P

....बबलु

आगाऊ कार्टा's picture

10 Feb 2009 - 1:48 pm | आगाऊ कार्टा

कायव...

भडकमकर मास्तर's picture

10 Feb 2009 - 2:13 pm | भडकमकर मास्तर

खूप छान...
मग डॉक्टरांनि हि गोष्ट न्यायाधिशाना समजावुन सांगितली. कि ह्या व्यक्तिचे ह्रुदय उलट्या बाजुला [उजव्या बाजुला]असल्याने गुन्हेगारी व वाइट गोष्टी त्याच्या द्रूश्टीने नॉरमल आहेत..

त्या न्यायाधीशाच्या स्मृतीमध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मैत्र's picture

10 Feb 2009 - 2:30 pm | मैत्र

मास्तर लै झकास प्रतिक्रिया! फक्त टाळ्या डॉक्टरसाठी झाल्या पाहिजेत...

धनंजय's picture

10 Feb 2009 - 11:16 pm | धनंजय

असेच म्हणतो.

माहितीसाठी इंग्रजी दुवे :
काळीज उजवीकडे
काळीज उजवीकडे, तसेच यकृत डावीकडे, आतड्यांचा वेढा उलट, वगैरे

(कोण्या मुलाचे पाय व्याधीमुळे उलट वळलेले असले तर हा न्यायाधीश त्याला स्मशानाचे मालकीपत्र देईल असे वाटते. कोणी अष्टवक्र जन्मले, तर त्याला धर्मशास्त्रातले गहन प्रश्न विचारेल.)

सुनील's picture

10 Feb 2009 - 2:36 pm | सुनील

तुमचे म्हणणे पूर्णपणे पटतयं. शारीरिक अवयव जर जागच्या जागी नसतील तर मानसिक अवस्था कशी व्यवस्थित असेल? उलट्या काळजाचे उदाहरण तुम्ही दिलेलेच आहे. तसेच, जर का मेंदू डोक्याच्या कवटीच्या ऐवजी गुढघ्याच्या वाटीत असेल तर त्या व्यक्तीची मानसिक अवस्था वेगळीच असणार नाही का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रदीप's picture

10 Feb 2009 - 3:23 pm | प्रदीप

मला आठवतो आहे, तो किस्सा असा होता:

फाशीच्या पूर्वी डॉक्टराला हे उजवे-डावे कळल्यानंतर शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली. पण सरकारने असल्या गोच्या होऊ शकतात हे ध्यानात घेऊन एक कमिटी बसवली. त्यात दिल्लीतील डॉक्टर्स, अनेक न्यायाधीश, इतर कायदेतज्ञ असे बरेच लोक होते. त्या समितीचे कामकाज ८ वर्षे ७ महिने व १७.५ दिवसानंतर संपले. तिने केलील्या शिफारसी संबंधित खात्यांच्याकडून मंजूर करून घ्यायला अजून ३ वर्षे, २ महिने व २७ ३/४ दिवस लागले.

त्या समितीने जगभर प्रवास करून अनेकविध हृदयांच्या ठेवणींची सर्वंकष माहिती जमा केली होती व त्या विद्याचा अभ्यास केला होता. त्यानुसार असे आढळून आले की हृदय नुसते डाव्या- उजव्याच काय, पण पुढील बाजू- मागे, मागील पूढे, अथवा वरील बाजू खाली व खालील वर, अथवा अगदी डायनॅमिक हृदय (आज 'असे', तर उद्या 'तसे'--- अश्याही केसेस त्यांना सापडल्या, म्हणे , ऐकावे ते नवलाचेच!) असे काहीही असले, तरी 'वाईट' गोष्टींची सर्वसाधारण व्याख्या काही बदलत नाही.

शेवटी ही बाब राष्ट्रपतिंकडे गेली. त्यांनी त्यानंतर सात वर्षे, १३ १/२ महिने व २७.७८१०९१ दिवसांच्या गहन विचारानंतर ह्या शिफारसी स्वीकारल्या.

हे एव्हढे होता होता, त्या माणसाचेच काय, पण त्याची देखभाल करणार्‍या सर्वाचीच हृदये जवळजवळ (पण संपूर्ण नव्हे) नाहीशी होत आलेली होती. तेव्हा घाईघाईने (कारण आता हृदयच नाही, म्हटल्यावर अशा माणसाला फाशी द्यावी का, असा नवा पेच नको) त्याल फाशी देण्यात आली.

धमाल मुलगा's picture

10 Feb 2009 - 3:37 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

एकदम धूमधडाका!!!!!!!!!!!

चालुद्या!

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

मराठी_माणूस's picture

10 Feb 2009 - 4:24 pm | मराठी_माणूस

त्या समितीने जगभर प्रवास करून अनेकविध हृदयांच्या ठेवणींची सर्वंकष माहिती जमा केली होती

काही बायकानी त्यांच्या नवर्‍यांची हृदये ही दगडाची आहेत असे सांगितले, काही तरुण / तरूणी नी ती चोरीला गेलि आहेत असे सांगितले. काही कर्मचार्‍यांचे मते त्यांच्या वरिष्ठांना हृदये नाहीत :)

दशानन's picture

10 Feb 2009 - 3:38 pm | दशानन

ओ तेरी !

मला पण डॉक्टर ला माझं हार्ट दाखवायला पाहीजे.....

मागे ती म्हणाली होती कि मी उलट्या काळजाचा आहे :(

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

सालोमालो's picture

10 Feb 2009 - 4:01 pm | सालोमालो

तुका झालासे कळस!

सालो

बाकरवडी's picture

10 Feb 2009 - 4:18 pm | बाकरवडी

अरे फेक्या आहे हा !

लक्ष नका देउ त्याच्याकडे

अविनाशकुलकर्णी's picture

10 Feb 2009 - 5:49 pm | अविनाशकुलकर्णी

.