एक वेडी आशा
एक वेडी आशा
कुठेतरी मनात जन्मत असते प्रत्येकाच्या
कधीतरी बदलेल हे सारे
कधी ना कधी होईल की
सारे गोडच गोड छान
सिनेमातल्या सारखं
रोज सकाळी नव्याने जन्मते
अन रोज रात्री मिटुन जाते
लाजळुच्या पानासारखी
प्रत्येकजण जपत असतो तिला
अगदी जीवापाड
स्वतःच्या लेकीप्रमाणे
जोवर तिला धक्का पोचत नाही
तोवर नि तोवरच तो उभा असतो
अगदी ठामपणे
एखाद्या वटवॄक्षासारखा
म्हणून त्यावर घाव घालू नका
तुमची कुर्हाड तुटेल
नाहीतर तो उन्मळून पडेल
एखाद्या छोट्याश्या फांदीसारखा
जपा अगदी मनापासून जपा तिला
कारण ती आहे वेडी आशा
तुमची, माझी, प्रत्येकाची
एक वेडी आशा
-- ज्ञानदा कुलकर्णी
प्रतिक्रिया
9 Feb 2009 - 8:32 am | स्वानन्द
>>सिनेमातल्या सारखं
रोज सकाळी नव्याने जन्मते
इथे सारखं च्या ऐवजी 'सारखे' वापरायला हवे असे वाटते.
उदा. 'इथे सारखं च्या ऐवजी 'सारखे' वापरायला हवे असे वाटते.' हे बरोबर आहे.
किंवा 'इथं सारखं च्या ऐवजी 'सारखे' वापरायला हवं असं वाटतं.' हेही बरोबर आहे
पण 'इथे सारखं च्या ऐवजी 'सारखे' वापरायला हवं असं वाटते.' हे बरोबर नाही.
--काव्यानन्द
9 Feb 2009 - 12:15 pm | सहज
ठीकठाक.
अजुन येउ द्या.
पु.ले.शु.