विसरुन सर्व गेले इतक्यात लोक मजला
ह्रदयी कधी जयांच्या मी वस्ती करुन होतो..
कोण राहीले निरंतर येथे हे मलाच का ऊमजेना
अस्तित्व पुसुनी जाण्याची का मी भिती धरुन होतो..
बांधती जीवा ह्या अजुनी चार धागे त्या विश्वासाचे
धावतात शरीरामधुनी वेग बनुनी ते श्वासांचे..
आहेस तु सन्निध स्वरसाज बनुनी ह्या गीताचा
जाणवे आधार अजुनी त्या समर्थ हातामधल्या हाताचा..
राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी
येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी..
प्रतिक्रिया
18 Jan 2008 - 11:24 pm | स्वाती राजेश
छान कविता संग्रह आहे तुमचा.
राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी
येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी..
या ओळी सुंदर..
कविता दोनदा वाचली कारण खूप नेहमीपेक्षा वेगळे शब्द आहेत प्रथम कळायला अवघड गेली.
पण कवितेचा अर्थ खूपच छान आहे.