मी बोचले म्हणालो

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
7 Feb 2009 - 3:12 pm

मी बोचले म्हणालो, ती कोणत्या ठिकाणी?
मी हे तुला कसे पण सांगू मिठीत राणी

ठरवून काल लुटले मॉलात बायकोने
आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी!

गुंगीत राहतो मी सुस्तीत वागणारा
असते सदैव पिउनी स्वारी घरी उताणी!

असतो खुशीत तेव्हा घेतो मजेत झुरके
जातो हवेत तेव्हा होते बधीर वाणी

होणार काय ह्याचे आहे जगास पत्ता
(हा ढोसतोय दारू समजून रोज पाणी )

खोड्या अशा कवींच्या का काढतोस "केश्या"?
लिहिती कधी तरी हे असली सुरेल गाणी

- केशवसुमार

(सुवर्णमयींच्या ''मी बोचलो म्हणाले' या गझलेवर आधारित)

विडंबन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

7 Feb 2009 - 3:27 pm | बेसनलाडू

ठरवून काल लुटले मॉलात बायकोने
आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी!
हाहाहाहाहा!!!! अगदी अगदी!!
(अविवाहित)बेसनलाडू

शाल्मली's picture

7 Feb 2009 - 4:19 pm | शाल्मली

वा! वा!
मस्त विडंबन.
--शाल्मली.

चतुरंग's picture

7 Feb 2009 - 5:40 pm | चतुरंग

मॉलात लुटलेले बघून जीव कळवळला!! ;)
एकदम झक्कास!

चतुरंग

बाळ्या पाल्हाळकर's picture

8 Feb 2009 - 2:02 pm | बाळ्या पाल्हाळकर (not verified)

होणार काय ह्याचे आहे जगास पत्ता
(हा ढोसतोय दारू समजून रोज पाणी
)

सुहास..

मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"

केशवसुमार's picture

9 Feb 2009 - 12:13 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी) केशवसुमार