" एकान्त "

पेशवे बाजीराव तिसरे's picture
पेशवे बाजीराव तिसरे in जे न देखे रवी...
18 Jan 2008 - 11:00 pm

बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा..
असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा..

अशा एकान्ताच्या क्षणी ती बसते समोर येऊनी..
मग तीच होते कविता माझी व्यक्त होते शब्दातुनी..

मनात वाजत राही आठवणीचा पावा..
वेदना सगळ्या जुन्याच परि चेहरा नवा..

नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी..
ओठावरती येते तरी का जुनीच विराणी..

असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा..
स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..

कविता

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

18 Jan 2008 - 11:32 pm | स्वाती राजेश

बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा..
असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा..

असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा..
स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..

या ओळी आवडल्या.
असा एकांत आजच्या फास्ट लाइफ मध्ये मिळाला तर?...