कृष्ण कमळ

मीनल's picture
मीनल in कलादालन
5 Feb 2009 - 8:17 am

मिपावर `बकुळ फुले`, `मोगरा` वाचल. म्हटल आपण ही वहाव एक फूल..
कृष्ण कमळ.

ह्या फूलाला नाव कुणी दिल माहित नाही पण आहे मात्र अगदी योग्य. म्हणजे कृष्णासारख कमळ किंवा कमळातला कृष्ण.
कृष्णासारख कमळ…
कमळाची पाकळी पाहिलीत तर ती नैवेद्द घेण्यासाठी आपण जसा हाताचा द्रोण करू तशी असते. मधे फुगीर बाहेर गेलाला भाग आणि कडा जराश्या आत वळलेल्या. तश्याच पाकळया या फुलाच्या बाहेरील बाजूला असतात.
कृष्ण आणि कमळ यांचा एक संबंध म्हणजे कॄष्णाला `कमलनयन असलेला` असं ही म्हट्ल जात.कमळाच्या पाकळीच्या आकारासारखे ज्याचे डोळे लांबट आहेत तो कमलनयन.
पद्मनाभ ,पद्महस्त ही पण कृष्णचीच नाव आहेत.

कृष्ण काळा.पण आपला देव! मग त्याला `काळ` कस काय म्हणायच ? म्हणून तो निळा.
ह्या फुलाचा रंग ही निळा. कृष्णासारखा. कमळ, ते ही निळं!
हा निळा म्हणजे आकाशी निळा नाही तर गडद, काळपट निळा.जांभळाच म्हणा हव तर. कृष्णप्रिय मोरपिसामधे एक जांभळी छटा असते तशी छटा.
कमळातला कृष्ण …
मोरपिसाला जसे धागे,रेषा-रेषा असतात अगदी तश्याच या निळ्या कमळाच्या पाकळाच्या आत बारिक लांबर्‍ पाकळ्या दिसतात .मोजणी केल्यास साधारणपणे १०० असतात.ते कौरव.त्याच्या आतल्या बाजूला ५ पांडवही दिसतील.आणि मध्यावर तीन लोक (स्वर्ग, मृत्यू , नरक) माथ्यावर पेलणारा श्री कृष्ण.
कौरव,पांडचासहीत उभा असलेला कृष्ण या कमळात पहायला मिळतो .म्हणून हे कृष्ण कमळ.
अस ही म्हणतात की मधला कृष्ण आणि बाजूने गोल फेर धरलेल्या त्या शेकडो गोपिका.

एका मंदिरात दूर्मिळ अस चित्र मी पाहिल आहे-- ह्या कृष्णकमळाचा हार परीधान केलेले भगवान श्री कृष्ण. ते ही मोरावर बसलेले! निळ्या रंगांच्या सर्व छटा त्यात होत्या. तो निळी कांती असलेला निलकांत,निळी कमळं, निळा मोर.
सुरेख निळी निळाई! केवळ अवर्णनिय!

हिंदूंनी जसा या फूलाचा संबंध त्यांच्या देवाशी लावला तसाच ख्रिश्चनांनी ही या Passion Flower वर केलेल्या कथा आहेत.येशू ख्रिस्ताला सूळावर चढवले त्या वेळाचा अनुभव (Passion for suffering) कथन करण्यासाठी आणि तो अधिक श्रवणिय करण्यासाठी या फूलाच्या रचनेचा उल्लेख केला जातो. अधिक माहिती जलावर मिळते.

एकदा असच रेल्वे स्टेशनच्या बाहेर फूटपाथवरच्या गजरेवालीला सांगितल की “मिळाल तर आण कधी तरी ”.
मग दोन तीन दिवस पुन्हा पुन्हा चौकशी केली.
"बाये , त्येच काय माळरान आस्त व्हय गुलाबावानी? लई नाजूक आस्त त्ये. येल अस्ती बग त्येची.तोडून आनायच म्हन्जी जिव नसल्यागत होईल बग"गजरे वाली उत्तरली.
माझ्या आग्रहाखारत आणली ही ५-६ फूल. आणि म्हणाली ," पैश्ये नको ग.मी नाय मोजले या कमळाला पैश्ये. आशीच आनली इचारून बाजूवालीला. घे तूले कमळं"
खरोखरच माना टाकल्या होत्या त्या नाजूक फूलाने. मला अपराधी वाटल जरा.

खरतर कमळाच देठ कस जाड असतं. या कमळाच हिरव देठ फूलासारखच नाजूकस. आणि हे फूल `कमळ `असल तरी पाण्यातल नाही तर वेलीवरचं!
रंग जितका आकर्षक तितकच याचा वास ही मोहक असतो. काहीसा मंद.अगदी जवळ जाऊन घेतला तर तरच येणारा. पण मनाला धुंद करणारा.पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा.
म्हणूचच या फूलाचे आयुर्वेदातही महत्व आहे. थकवा,अस्वस्थता घालवण्यासाठी आणि रक्त दाबावर उपाय म्हणून या फूलाचा वापर केला जातो.मानसिक ताणावरच्या औषधात ही या सुगंधी फूलाचा वापर होतो.
अस असल तरीही गुलाबाचे गालिचे, शेवंती ताटवे, झेंडूचे रान, मोग-याच्या बागा, सूर्यफूलाची शेती पहिली आहे पण कृष्ण कमळाचे असे घाऊक उत्पादन नाही पाहिले.
आणि जस गणपतीला जास्वंद, हनुमानाला रूई, देवीला वासाची फूले किंवा शिवाला बेल आणि दत्ताला तुळस वाहिली जाते,तस वनमाळी कृष्णाला अमूक हेच फूल आवडत अस काही वाचण्यात आल नाही.
तरीही हे कमळ श्रीकृष्णाचच!

वरील सर्व चित्र आंतरजलावरून घेतली आहेत.

कृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

चकली's picture

5 Feb 2009 - 8:21 am | चकली

लेख खूप आवडला. फोटो पण छानच!
चकली
http://chakali.blogspot.com

मदनबाण's picture

5 Feb 2009 - 8:29 am | मदनबाण

मस्त लेख.

कृष्ण हा तुलसी पत्र प्रेमी आहे.
सत्यभामेचे गर्व हरण करण्यासाठी 'तुला'करताना तुळशीच्याच पानाचा उपयोग झाला होता.
(देवकी नंदन भक्त)
मदनबाण.....

:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

प्राजु's picture

5 Feb 2009 - 8:30 am | प्राजु

मीनल,
खूप बरं वाटलं हे तुझं लेखन वाचून.
विडंबनांमुळे मरगळ आलेल्या मनाला.. या तुझ्या ताटव्याने प्रफुल्लित केलं.
धन्यवाद.
सगळी चित्रे एकदम खास. श्रीकृष्णाचे तर खूपच मोहक आहे चित्र.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

5 Feb 2009 - 8:31 am | अनिल हटेला

=D>

शॉल्लीड !!!

फोटो आणी माहीती दोन्हीही !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

स्वाती दिनेश's picture

5 Feb 2009 - 8:47 am | स्वाती दिनेश

मीनल ,लेख आवडला. आमच्याकडे पूर्वी कृष्णकमळाचे वेल होते, एका वेळी १०,१०/ १२,१२ फुलं यायची आणि घमघमाट सुटायचा. त्याची आठवण तुझ्या लेखाने झाली.
स्वाती

सहज's picture

5 Feb 2009 - 9:43 am | सहज

फुल आणी लेखही

विसोबा खेचर's picture

5 Feb 2009 - 11:03 am | विसोबा खेचर

मीनलकाकू,

सुरेख लेख आणि चित्रे..प्रसन्न वाटले.

तात्या.

शंकरराव's picture

5 Feb 2009 - 2:50 pm | शंकरराव

चित्रलेख आवडला :-)

जयवी's picture

5 Feb 2009 - 3:17 pm | जयवी

मीनल किती सुरेख फोटो !!
लेखन पण मस्तच..... !

जयवी's picture

5 Feb 2009 - 3:18 pm | जयवी

मीनल किती सुरेख फोटो !!
लेखन पण मस्तच..... !

शितल's picture

5 Feb 2009 - 8:37 pm | शितल

मीनलताई,
कृष्णकमलाचे फुल मी लहान असताना पाहिले होते, म्हणजे कोकणात गावी गेलो असताना आम्ही भावंडे असेच पाटाकडे गेलो होतो तेव्हा मला कोणीतरी ते दिले होते. खुप खुप सुंदर असते, प्रत्यक्ष पाहिले की नजर हलत नाही त्या फुलावरून सुंगधाचे आता काही आठवत नाही की त्याचा सुगंध कसा असतो पण तुझ्या ह्या लेखाने आणि फोटो ने मला त्या आठवणी मात्र जाग्या झाल्या. :)

भास्कर केन्डे's picture

5 Feb 2009 - 8:49 pm | भास्कर केन्डे

११वी १२वीत बॉटनीच्या गुरुजींनी कृष्णकमळाची ओळख करुन दिली होती. त्यानंतर या फुलाचे कायम आकर्षण वाटत आले आहे. कुठे दिसले की डोळे भरभरुन पाहून त्याची ती सुंदर छबी मनात साठवून ठेवत असतो.

आज आपण करुन दिलेली ओळख मात्र खासच. आता त्या फुलांच्या आठवणींना अर्थ प्रप्त झाला असे म्हणता येईल. आपण तो करुन दिल्याबद्दल आभार!

जीवनाच्या आंतरंगात असे कितीतरी सुंदर कप्पे असतात नै? त्यातल्या एका कप्प्याला अजून सुंदर केल्याबद्दल खरोखरच कृतज्ञ आहे.

आपला,
(कृतज्ञ) भास्कर

भाग्यश्री's picture

5 Feb 2009 - 11:20 pm | भाग्यश्री

सहमत! तुम्ही जो अर्थ सांगितलाय तो फार आवडला!!
फोटोज पण मस्त आहेत..
कृष्णाचाही गोड आहे! हेहे.. :)

http://bhagyashreee.blogspot.com/

मनीषा's picture

5 Feb 2009 - 11:19 pm | मनीषा

सुंदर फोटो ..आणि लेख

मीनल's picture

6 Feb 2009 - 6:26 am | मीनल

सर्वांना धन्यवाद.
हं !! फूलाचे फोटो लगेच मिळाले.
कृष्णाचा आणि निळ्या फूलांचा काही मिळेना. खूप खूप शोधलं.
म्हणून म्हटल फक्त चेहरा पाहू मिळतो आहे का?
आणि हा फोटो मिळाला. पण क्लिक केल्यावर ऍनिमेटेड डोळे दिसले.
वाटलं ,बाळकृष्ण म्ह्टतो आहे ,"हो ,हो. ते फूल माझंच !"
तिथून उचलला आणि लावला इथे फोटो.
आवडला ना? मग झाला तर शोध सार्थकी.
मीनल.

कृष्णकमळाबद्दल ऐकून होतो पण इतके सुंदर फोटो बघितले नव्हते. अत्यंत नयनमनोहर आणि स्वर्गीय फूल दिसते आहे.
तुम्ही वर्णनही अतिशय सुंदर शब्दात केले आहेत.
मला प्रत्यक्ष कधी पहायला मिळेल अशी उत्सुकता लागली आहे. ह्या फुलांचा काही विशिष्ठ सीझन असतो का?

चतुरंग