आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची सुरेख गझल विश्राम आज, सर्दी फार झाली पण कुठे तो बाम आहेचोंदल्या नाकात माझ्या पार ट्रॅफिक जाम आहेपाहते ती वाट माझी, मी घरी जोषात जातोपण तिच्या बापास बघता, येत मजला घाम आहेखूपसे समदुःखी आणिक वानवा नाही बघ्यांचीआमचा हा बायकोशी चालला संग्राम आहेबायको पाहून दारी बांधतो अंदाज आम्हीस्वागताला आज अमुच्या काय जो इतमाम आहेपत्नीपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच नवरेघासतो भांडी कुणी, कोणी गडी घरकाम आहेचार खंबे ढोसण्यासाठीच जमले दोस्त माझेबोलले, " नाहीतरी मज काय दुसरे काम आहे? "पाडुनी गेलाच शेवट शब्दपाचोळ्यास "केश्या"तो तसा धर्मास अपुल्या राहिलेला ठाम आहे...
प्रतिक्रिया
5 Feb 2009 - 10:52 am | घाशीराम कोतवाल १.२
वापरा झंडुबाम
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
5 Feb 2009 - 10:52 am | सिद्धेश
आज सर्दी फार झाली ...............पार ट्रेफिक जाम आहे
बायकोला चुकवून मैत्रीणीबरोबर
पहिल्या पावसात भिजल्याचा
केशवसुमारान्ना पडलेला हा
दाम आहे
5 Feb 2009 - 11:08 am | मदनबाण
पत्नीपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच नवरे
घासतो भांडी कुणी, कोणी गडी घरकाम आहे
=))
चालुध्या...
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
5 Feb 2009 - 6:01 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापसून आभार!!
(आभारी) केशवसुमार
5 Feb 2009 - 6:08 pm | लिखाळ
टाळ्या टाळ्या..
पत्निपूजेचा गुन्हा आणि इतमाम मस्तच :)
लिखाळ.
5 Feb 2009 - 7:19 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)
कसल लिहीलय..