भंगलेल्या शब्दास माझ्या सप्तस्वराची साथ तू . .
वेदनेच्या वादळातही सावरणारा तो समर्थ हात तू . .
दिवस उजळून टाकणारी प्रसन्न ती पहाट तू . .
संपूच नये प्रवास जिचा ती रम्य वाट तू . .
सुख तू दुःख तू सकाळ तू दुपार तू . .
मन पुलकित करणारी तीच श्रावणधार तू . .
काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . .
गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . .
सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . .
दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..
प्रतिक्रिया
18 Jan 2008 - 6:32 pm | विसोबा खेचर
सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . .
दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..
क्या बात है! केवळ अप्रतिम कविता...
बर्याच दिवसांनी अतिशय उच्च साहित्यिक दर्जा असलेली कविता वाचायला मिळाली आणि खूप बरं वाटलं! या कवितेमुळे मिसळपावची श्रीमंती निश्चितच वाढली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे...
आपला,
(मातृभक्त) तात्या.
18 Jan 2008 - 6:40 pm | वरदा
खूपच छान!
18 Jan 2008 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अप्रतिम कविता.
18 Jan 2008 - 6:57 pm | प्राजु
वा वा....
अप्रतिम कविता..
काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . .
गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . .
सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . .
दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..
या ओळी सुंदर आहेत.
- प्राजु.
18 Jan 2008 - 9:38 pm | ऋषिकेश
आवडली