(झुलवा)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
18 Jan 2008 - 2:51 am

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल झुलवा

रात्रीला पोरांना निजवा
बेत जरा मग जंगी घडवा

तुमची गोची, त्यांची वळवळ
काय करावे लवकर ठरवा

कुणीच येईनासे झाले!
अहो जरा जोराने हलवा

नसे पाहण्या कोणी आता
जरा दमाने खिंडी लढवा

बाई, बाटली आणिक आम्ही
युगायुगाचा चालू झुलवा...

"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

पुलस्तिशेठनी मुळ गझलेत प्रकाशना नंतर बदल केले आहेत.. त्यामुळे आम्हाला अजून दोन शेर वाढवावे लागत आहेत

त्यांची गोची पाने पिकली
देठ तरी वळवळतो हिरवा

त्याच उड्या अन त्याच कसरती
दमलो, थोडे पडतो अडवा...

विडंबन

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

18 Jan 2008 - 3:14 am | इनोबा म्हणे

केशवा,कधी कोणी कविता लिहीली की तू गिधाडासारखा त्याच्यावर तुटून पडतोस रे!
बाकी तूझ्या कल्पनाशक्तीचीही दाद द्यायला हवी.द्वयर्थी मराठी म्हणजे काय हे (दादांनंतर)तूझ्या विडंबनानेच सांगीतले.

(झकास) -इनोबा

ऋषिकेश's picture

18 Jan 2008 - 8:26 am | ऋषिकेश

जबरदस्त!!! ह. ह. पु. वा!!!

विसोबा खेचर's picture

18 Jan 2008 - 9:12 am | विसोबा खेचर

लै भारी रे केशवा!

तुमची गोची, त्यांची वळवळ
काय करावे लवकर ठरवा

हा हा हा! :)))

नसे पाहण्या कोणी आता
जरा दमाने खिंडी लढवा

क्या बात है....!

"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

थांब केश्या, आता भारतात आलास की साल्या बडवतोच तुला लेका! :)

असो, उत्तम विडंबन रे केशवा. ईश्वर इतरांना अगदी भरपूर गझला द्यायची प्रतिभा प्रदान करो जेणेकरून तुला कच्च्या मालाचा तुटवडा भासणार नाही...:)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2008 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले विडंबन !!!

आणि कळस म्हणजे-
"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

हे तर सहीच आहे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ध्रुव's picture

18 Jan 2008 - 11:48 am | ध्रुव

मस्त आहे.
"केश्या" मेला, आहे टपलेला
(कुणीतरी साल्याला बडवा!)"

हे तर फारच भारी.

--
ध्रुव

केशवसुमार's picture

18 Jan 2008 - 9:02 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार

केशवसुमार

प्राजु's picture

18 Jan 2008 - 9:07 pm | प्राजु

पुन्हा एकदा.. तुझा महिमा अगाध..
तुझ्या कल्पनाशक्तीची कमाल आहे.
जरा जपून बरं.. नाहीतर खरंच एकेदिवशी हे सगळे गझलकार तुला बडवतील्. ह्.घ्य.

- प्राजु.

स्वाती महेश's picture

19 Jan 2008 - 8:09 am | स्वाती महेश

प्राजु तुझा ह्यावर एक मुलगी असुन प्रोत्साहनपर प्रतिसाद बघुन आश्चर्य वाटते.

चतुरंग's picture

18 Jan 2008 - 9:15 pm | चतुरंग

त्यांची गोची पाने पिकली
देठ तरी वळवळतो हिरवा

त्याच उड्या अन त्याच कसरती
दमलो, थोडे पडतो अडवा...

केवळ उच्च!!

चतुरंग

स्वाती महेश's picture

19 Jan 2008 - 8:08 am | स्वाती महेश

खुपच अश्लिल विडंबन आहे. इथे अनेक महिला सदस्यही येतात. त्यांना अप्रशस्त वाटेल असे लिखाण कृपया करू नये.

विसोबा खेचर's picture

19 Jan 2008 - 8:48 am | विसोबा खेचर

अश्लील या शब्दाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत/असू शकतात.

असो, विडंबनकार केशवाने स्वाती यांच्या म्हणण्याची भविष्यात सारासार नोंद घ्यावी...

मिसळपावला केशवासारख्या प्रतिभावंताचीही गरज आहे आणि स्वातीताईंसारख्या चोखंदळ व प्रसंगी परखड, वाचकाचीही गरज आहे!

आपला,
(तटस्थ) तात्या.

मला व्यक्तिश: सदर विडंबन वाचताना मजा वाटली...:)

आपला,
(वाचक) तात्या.

केशवसुमार's picture

20 Jan 2008 - 3:28 pm | केशवसुमार

स्वातीमहेशताई,
आपल्याला हे विडंबन अश्लिल वाटले हे वाचून आम्हाला वाईट वाटलं.. शील / अश्लिल हे व्यक्तीसापेक्ष आहे. हा ते इनोबाशेठ म्हणतात तसे द्वयर्थी म्हणू शकता..
इथे आमच्या डॉनच्या एका मुलाखतीतला संदर्भ देतो ..अता हे डॉन कोण (छोटा/मोठा/खरा/खोटा) विचारू नका... हम 'सबका डॉन एक'- 'दादा कोंडके'
'पाप हे वाचणार्‍याच्या मनात असतं मी लिहीताना सरळच लिहितो.. '
असो.. सपषट सांगितल्या बद्दल आभारी आहे इथून पुढे लक्षात ठेवतो..
केशवसुमार.

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Jan 2008 - 3:28 pm | ब्रिटिश टिंग्या

परंतु, आम्ही या वर्षी द्वैअर्थी न बोलण्याचा संकल्प 'सोड'लेला असल्याने यापेक्षा जास्त मोठा प्रतिसाद देउ शकत नाही. ;)

आपला,
(द्वैअर्थी न बोलणारा) छोटी टिंगी

धोंडोपंत's picture

20 Jan 2008 - 6:48 pm | धोंडोपंत

वा रे केशवा!

आज खूप दिवसांनी मिसळपावावर आलो. आणि तुझी झणझणीत तर्रि चापली. मजा आली.

आपला,
(हावरट) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com