मला एक प्रसंग रंगवायचा आहे. त्यात मला एकाच वस्तूचा वापर करुन त्यातील पात्र त्या वस्तूचा कसा वापर करत आहे हे दाखवायचे आहे. काय योग्य आहे आणि काय नाही हे वाचकांनी ठरवावे.
१. नर्मदाबाईने बुट्टी घेतली व त्यात गोवर भरुन घेतली.
२. सख्याने टोकरी सायबाला दाखवली आणि साहेब काय समजायचे ते समजला.
३. माधवीने २ सफरचंद, ३ संत्री आणि ३ हापूस त्या वेताच्या नाजूक घडणीच्या सुंदरशा टोपलीत ठेवली
४. रीटाला तीची ती चायनीज बाउलची खरेदी फारच महागात गेली.
वरील वाक्यातील वस्तूंची आदलाबदल शक्य नाही कारण, त्या वस्तू जरी एकाच कामासाठी वापरल्या जात असतील तरी [काही घेउन, त्यात ठेवण्यासाठी], त्या शब्दांच्या निश्चित अशा काही छटा आहेत. त्या छटा प्रसंगाच्या प्रभावामुळे निर्माण झाल्या आहेत. तो प्रसंग घडवतांना त्याच शब्दांचा वापर अनिवार्य आहे. जे लिहिले आहे ते बोली भाषेत नाहीए, तरी काही शब्द “प्रचलित” समजल्याजाणाऱ्या भाषेत आणले नाही तर प्रचलित भाषा तोकडी पडेल हेच त्यातून दिसते आहे.
लिहितांना किंवा बोलतांना समाजाच्या कोणत्याही स्तरातील व्यक्तिने दुसऱ्या स्तरातील व्यक्तिशी संवाद [कोणत्याही माध्यमातून] साधलातर त्याला ज्या भाषेच्या पातळीवर जावे लागते त्याभाषेत येणाऱ्या शब्दांना त्याक्षणाचे प्रचलित शब्द असे मानता येईल.
प्रतिक्रिया
1 Feb 2009 - 7:57 pm | गीत
:/
1 Feb 2009 - 7:59 pm | सखाराम_गटणे™
बोलीभाषेतील शुदधलेखन
1 Feb 2009 - 8:05 pm | अरुण जाधव
आगदि बरोबर आहे.