तू

सचिन's picture
सचिन in जे न देखे रवी...
29 Jan 2009 - 12:41 am

तुझे येणे अन् ही सर
काही संबंध असावा
चोहीकडे सप्तरंग
पसरले--कधी ? कसे ?

तुझी पावले की भाग्य
काही संबंध असावा
सारे ऋतू माझे सदा
असे बहरले कसे ?

तुझा स्पर्श वा परीस
काही संबंध असावा
क्षण अन् कणही माझे
उजळले तरी कसे ?

तुझे हसणे की फुले
काही संबंध असावा
घरभर ताटवे हे
मग उमलले कसे ?

तुझे प्रेम नि सागर
काही संबंध असावा
या लाटा तो किनारा
दोन्ही लाभतात कसे ?

कविता

प्रतिक्रिया

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 4:35 am | शंकरराव

तूझी कविता हि अशी
काही संबंध असावा
मिपा वर केश्या रंगा
विडंबन करिल कसे ?