इच्छिला उषःकाल अंधःकार मिळाला

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
26 Jan 2009 - 10:17 am

(अनुवादीत. कवी- गोरखपूरी)

यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई
स्मृतीच्या आयुधाने मन जखमी होई
मनिषा हृदयाची परमार्श घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

सज्जनता दुर्भाग्ये वैरी बनली
नटुनी थटुनही नववधू नाही बनली
हातावरची मेंदी एक ज्वाला बनली
सौभाग्याचे कुंकू एक कलंक होई
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

पापण्यातले स्वप्न पडून उध्वस्त होई
पावलांची साथ देऊनी मार्ग भिन्न होई
रात्रंदिनी अश्रूंची नदी वाहत जाई
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

इच्छिला उषःकाल अंधःकार मिळाला
मुसमुसत रडता अरुणोदय मिळाला
केली मी नाकाम लालसा उजाळाची
मेण बनुनी राहिले वितळत जीवनभरची
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

एकाकीपणात मिळाली स्मृतीची सावली
विनाश पाहूनी जमाना पण प्रसन्न होई
ढंग प्राक्तनाचे हयात बदलीत जाई
यात्रा अपुली चंद्रमा आवरती घेई
वितळी मेणवात अन रजनी व्यतीत होई

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

दशानन's picture

26 Jan 2009 - 2:33 pm | दशानन

इच्छिला उषःकाल अंधःकार मिळाला
मुसमुसत रडता अरुणोदय मिळाला

वाह वाह !

सुंदर ओळी !

* माफ करा हं... नजर चुकीने कविता न वाचताच राहू न गेली !
कारण तुम्ही कविता सुद्धा करता हे माहीतच नव्हते.

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सर्किट's picture

26 Jan 2009 - 2:39 pm | सर्किट (not verified)

सामंतकाका,

सुंदर अनुवाद !!

मलाही अनेकदा "उषःकाल होता होता काळरात्र झाली" असे मराठी संकेतस्थळांबाबत वाटते.

तुम्हाला काय वाटते ?

-- सर्किट