आमची प्रेरणा आनिरुद्ध अभ्यंकरांची कविता ही तुझी माझीच आहे गोष्ट पण... चेहरा सारेच खोटे सांगतोयाचसाठी आरसा तुज दावतोमज तडी पडणार अंती जाणतोमी तरी मेसेज 'तसले' धाडतोकोंबले मी पोट टीशर्टामध्येफुंकरीने फुगवल्यागत वाटतोयायची असतेस तेव्हा का मलाकाळ हा येणार आता वाटतोएवढी साधी नसावी भेळ ती!पचवण्याला वेळ आहे लागतोतो अता हल्ली खुळ्या गत सारखामी कसा भारी जगाला सांगतोहे तसे माझेच आहे काव्य पणमी विडंबन धर्म माझा पाळतोजालरानावर पुन्हा "केश्या" अतानव कवींची वाट आहे पाहतो-केशवसुमार
प्रतिक्रिया
26 Jan 2009 - 3:42 am | लिखाळ
जोरदार... केसु द ग्रेट ! :)
-- लिखाळ.
26 Jan 2009 - 1:03 pm | दशानन
छान !
* तुम्ही साचेबंध झालात असे वाटत नाही का ?
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
26 Jan 2009 - 3:50 pm | सर्किट (not verified)
तुम्ही साचेबंध झालात असे वाटत नाही का
सदर विधान "जैनाच कार्ट" ह्या सदस्याने केलेले आहे.
जस्ट सो द्याट यू नो, धिस इस अ स्टेटमेंट मेड बाय समवन कॉल्ड "जैनाचं कार्टं" टू समवन कॉल्ड "केशवसुमार".
व्हाट डू यू थिंक ?
-- सर्किट
27 Jan 2009 - 8:07 pm | केशवसुमार
प्रतिसाद न दिलेल्या आणि प्रतिसाद दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार.
27 Jan 2009 - 9:03 pm | प्राजु
हे तसे माझेच आहे काव्य पण
मी विडंबन धर्म माझा पाळतो
अगदी अगदी! मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Jan 2009 - 9:14 pm | चतुरंग
जालरानावर पुन्हा "केश्या" अता
नव कवींची वाट आहे पाहतो
हे बाकी खरंच. वाटमारीच ती! ;)
चतुरंग
27 Jan 2009 - 9:31 pm | मदनबाण
चेहरा सारेच खोटे सांगतो
याचसाठी आरसा तुज दावतो
सह्ही.. :)
मदनबाण.....
Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.