ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
26 Jan 2009 - 1:09 am

चेहरा सारे खरे ते सांगतो
याचसाठी आरसा मी टाळतो

वेगळे घडणार अंती जाणतो
मी तरी आंदाज माझे बाधतो

कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो

माळरानावर मनाच्या एकटा
मी कुणाची वाट आहे पाहतो

यायची असतेस तेव्हा का मला
काळ थोडा थांबल्यागत वाटतो

एवढा साधा नसावा प्रश्न तो!
उत्तराला वेळ आहे लागतो

ही तुझी माझीच आहे गोष्ट पण
नाव मी बदलून आता सांगतो

मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा
आठवांच्या या स्मशानी हिंडतो

-अनिरुद्ध अभ्यंकर

गझल

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Jan 2009 - 1:11 am | विसोबा खेचर

एवढा साधा नसावा प्रश्न तो!
उत्तराला वेळ आहे लागतो

क्या बात है..!

तात्या,

प्राजु's picture

26 Jan 2009 - 1:12 am | प्राजु

सुरेख गझल.
ही तुझी माझीच आहे गोष्ट पण
नाव मी बदलून आता सांगतो

मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा
आठवांच्या या स्मशानी हिंडतो

हे खूप आवडले.
खूप दिवसांनी अनिरूद्ध अभ्यंकरांची गझल वाचली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आचरट कार्टा's picture

26 Jan 2009 - 1:48 am | आचरट कार्टा

मतलाच इतका छान आहे... झकास...!

---------------------------------------
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !

धनंजय's picture

26 Jan 2009 - 1:48 am | धनंजय

अर्थपूर्ण कडवी.

खूपच दिवसांनी अनिरूद्ध अभ्यंकरांची गझल वाचली. :-)

बेसनलाडू's picture

26 Jan 2009 - 2:57 am | बेसनलाडू

गझल आवडली. गोष्ट, मतला विशेष आवडले.
(कथाकार)बेसनलाडू

लिखाळ's picture

26 Jan 2009 - 3:39 am | लिखाळ

फार मस्त !
माळरान, प्रश्न, गोष्ट फारच सुंदर.
-- लिखाळ.

चतुरंग's picture

26 Jan 2009 - 4:13 am | चतुरंग

कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो

सुभानल्ला!!

अत्यंत सोप्या शब्दातली सशक्त गजल, एकेक शेर आरपार!

चतुरंग

सुचेल तसं's picture

26 Jan 2009 - 7:00 pm | सुचेल तसं

बेष्ट गजल!!!!

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

संदीप चित्रे's picture

26 Jan 2009 - 6:21 am | संदीप चित्रे

>> यायची असतेस तेव्हा का मला
>> काळ थोडा थांबल्यागत वाटतो

क्या बात है.... एक से एक सुरेख शेर ...
गझल आवडली :)

अवलिया's picture

26 Jan 2009 - 9:30 am | अवलिया

फारच छान... मस्त

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

मनीषा's picture

26 Jan 2009 - 4:36 pm | मनीषा

कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो

माळरानावर मनाच्या एकटा
मी कुणाची वाट आहे पाहतो ... ...
..............मस्तच !!

मदनबाण's picture

26 Jan 2009 - 10:47 pm | मदनबाण

कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो

जबरदस्त...
(गोष्टीत रमणारा)
मदनबाण.....

Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood.
Swami Vivekananda.

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

27 Jan 2009 - 12:52 pm | अनिरुद्ध अभ्यंकर

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर

मनिष's picture

27 Jan 2009 - 2:58 pm | मनिष

ही तुझी माझीच आहे गोष्ट पण
नाव मी बदलून आता सांगतो

मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा
आठवांच्या या स्मशानी हिंडतो

या ओळी फार आवडल्या! :)