भयस्वप्न

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
24 Jan 2009 - 8:13 pm

भयस्वप्न
*
स्वप्नातल्या रेल्वे प्रवासात
भेगाळ ओस माळरानावर
दिसले प्रचंड सबस्टेशन
विजेचे.......
.......अकस्मात त्यावर
अगदी स्लो मोशनमध्ये
पडतय् क्षेपणास्त्र........
................ म्हणेस्तोवर
"बघा बघा!" पडलेही........
................... धुकट
धुराळ्यातून मनोर्‍यांवर
विजेची चकचक.........
...............क्षणभर थबकत
उठले नी लोट लोटांवर.
"खिडकी बंद!" पण कपटे
सिग्रेटपत्रीसारखे तोवर
डबाभर...........
............ कट्!
.................... आता गाडी
व्हीटीमध्ये... प्लॅटफॉर्मांवर
हाहाकार, सैरभैर लोकांचा
कल्लोळ नि:शब्द........
.................. दृश्यावर
"म्यूट" दाबलाय. टीव्हीसारखा.
*

कविता

प्रतिक्रिया

सहज's picture

24 Jan 2009 - 11:13 pm | सहज

कुठला हॉलीवुड चित्रपट पाहुन झोपलास रे ? :-)

सबस्टेशन
विजेचे.......????

"खिडकी बंद!" ????

काहीतरी भयंकर होणार आहे व घडते व मग ब्रेकिंग न्युजचा खेळ चालू, आधी दुर्घटना मग त्याचा इव्हेंट???

हाती काही नाही????

कधी कधी स्वप्नात सगळे संदर्भ व्यवस्थीत लागतात व जाग आल्यावर कळते की सगळेच अर्थहीन...

कोणीतरी लवकर रसग्रहण करा, समजलेला अर्थ सांगा लवकर.

अवलिया's picture

24 Jan 2009 - 11:03 pm | अवलिया

माफी.
नाही कळले.
थोडेसे समजावुन सांगणे.
नाहि समजल्यास परत सांगणे.
समजणारच नाही असे असेल तर तसे सांगावे,
परत विचारणार नाही.

तसदी देत आहे. आता मी म्युट

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

लिखाळ's picture

24 Jan 2009 - 11:11 pm | लिखाळ

कवितेतील पॉजेस मजेदार.. पॉजेसची कल्पना आवडली.

भूल दिल्यावर मधला थोडाकाळ आसपासच्या हालचाली जश्या जाणवतात अश्याच त्या स्वप्नात सुद्धा दिसतात.. त्यातल्या हालचाली आणि आवाज यांचे वेग आणि तीव्रता अनोळखी भासते..तसे काही दाखवण्याचा प्रयत्न आहे असे वाटले...
-- लिखाळ.

पण अशा प्रकारचे स्वप्न मला पडले, आणि जागेपणी ते बर्‍यापैकी तपशिलांसकट आठवले.

पण ते जितके भयावह असायला हवे, त्यापेक्षा (स्वप्नाच्या वेळी) मी खूपच तटस्थ दृष्टीने अनुभवले. या तटस्थ नजरेबद्दल जागेपणी भय वाटले.

श्रावण मोडक's picture

25 Jan 2009 - 3:16 pm | श्रावण मोडक

एक स्वप्न, रेल्वेचा प्रवास, त्यात वीजकेंद्रावरचा हल्ला आणि पुढे व्हीटीमध्ये सगळा हलकल्लोळ...
खिडकी बंद होते म्हणजे त्याक्षणी स्वप्नातल्या प्रवासातील एक स्वप्न तुटते आणि त्या स्वप्नात तो वीजकेंद्रावरचा हल्ला. त्या हल्ल्याचा खरा अर्थ व्हीटीमध्ये डोळ्यांसमोर येतो, अशी एक शक्यता मला दिसली.
हे तर त्या नॉस्ट्रॅडेमससारखे झाले. त्या नॉस्ट्रॅडेमसलाही असेच काही दिसायचे म्हणतात. त्यातून तो लिहून ठेवायचा. गंमत नाही; पण धनंजय, मला नॉस्ट्रॅडेमसचा आठवला - (अ)विश्वसनीय असल्याने!!!
अशी इतर स्वप्ने (ती पडू नयेत, पण) पहायला (वाचायला) आवडतील. कारण या स्वप्नाची कविता म्हणून मांडणी (किंचित पोस्ट मॉडर्न शैलीने जाणारी) भारी केलीस हे मात्र खरे. तिथं दाद द्यावीच लागेल.

विसोबा खेचर's picture

26 Jan 2009 - 12:57 am | विसोबा खेचर

आयला धन्या, लै भारी कविता रे!

जियो..!

तात्या.