तुझ्या रुपातुनी दर्शन घडते...

अंकुश चव्हाण's picture
अंकुश चव्हाण in जे न देखे रवी...
21 Jan 2009 - 1:55 pm

तुझ्या रुपातुनी दर्शन घडते
निर्मात्याच्या कलाकृतीचे.
दिपविणारे तेज पसरले,
जगी तुझ्या या मुखकमलाचे.

जुलफांच्या ह्या छायेखाली,
सुवर्णरूपी बहार आली.
अंधारमयी अवकाशात या,
पहा ही गोड चांदणी उगवली.

धनुष्यकारी भ्रकुटिखाली
नयन कमल ते दोन लाजरे.
भासती जसे ते दोन तारे
विशाल गगनी लुकलुकणारे.

आरक्त अधर अन् कपोल तुझे
तृशार्त मनाला सुखविणारे.
दन्तपंक्ती जणू भासती,
हंस नभी ते विहरणारे.

कविता