(पुनरागमनी अरे सुमारा...)

केशवटुकार's picture
केशवटुकार in जे न देखे रवी...
20 Jan 2009 - 8:28 am

काल प्रातःस्मरणीय नित्यवंदनीय विडंबन भास्कर गुरुवर्य केशवसुमारांचे (परिकथेतील राजकुमारा ...)विडंबन प्रसिद्ध झाले अन आम्हाला त्यांनी इतके दिवस जोमाने दिलेल्या दिक्षेचा गृहपाठ दाखवण्याची घाई झाली !!
:D

पुनरागमनी अरे सुमारा
स्थळे ती सारी बघशील का ?
काय चालले आंतरजाली
आग जरा विझवशील का ?

त्या नावांचे गूढ इशारे
बघ ते वाचून जाणून सारे
स्वयंप्रकाशित जरी म्हणोनी,
पुरी न भाजी देशील का?

भोग नशिबा कुणी लावले ?
सल्ला काकुस कुणीरे दिला ?
त्या चर्चाची साक्ष अम्हाला,
'कशा'तुनही देशील का ?

फसुन तुजला देतील टाळी
प्रतिसाद ही देतील खाली
इतिहासाची एक सुपारी,
हाता सरशी घेशील का?

लाजवाब ही तुझी लेखणी
स्थळे पाहुनी नवी देखणी
टुकाराची ही खाजच जुणी
कधीतरी भागवशील का ?

-
(अभिजात भारतीय केसुधर्माचा प्रचारक अन प्रसारक)

केशवटुकार

विडंबन

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

20 Jan 2009 - 8:38 am | मुक्तसुनीत

टुकार साहेब , तुमच्या काव्यातले संदर्भ न आकळल्यामुळे त्याच्या आशयाचा आस्वाद घेता आला नाही. मात्र वृत्त सुधारून हे विडंबन असे बसवता येईल.
तुमच्या काव्यात नाक खुपसल्याबद्दलमाफी करा.

पुनरागमनी अरे सुमारा
स्थळे सर्व ती बघशील का ?
आग लागली आंतरजाली
विझवाया तू येशिल का ?

त्या नावांचे गूढ इशारे
बघ ते वाचून जाणून सारे
स्वयंप्रकाशित जरी म्हणोनी,
पुरी नि भाजी देशील का?

भोग नशिबा कुणी लावले ?
सल्ले काकुस कुणी रे दिले ?
त्या चर्चाची साक्ष अम्हाला,
'कशा'तुनही देशील का ?

फसुन तुजला देतील टाळी
प्रतिसाद ही तो देतील खाली
इतिहासाची एक सुपारी,
हाता सरशी घेशील का?

लाजवाब ही तुझी लेखणी
स्थळे पाहुनी नवी देखणी
टुकाराची ही कंड पुराणी
कधीतरी भागवशील का ?