(वगैरे...)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
15 Jan 2009 - 1:06 am

आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल वगैरे...

पुरे जाहले ते फरारी वगैरे
पुन्हा सज्ज झालो शिकारी वगैरे

खरे सांगतो टाकलेलीच नाही
तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे

विचारा खरोखर निघालास कोठे?
तुम्हा वाटले ना शिवारी वगैरे

कशाचीच आता नशा येत नाही
जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे

जराशी सुगंधी असावी सुरा ही
पिण्या येत जाते उभारी वगैरे

तिथे एकटा मीच होतो विवाहित
सुखी सर्व जे ब्रम्हचारी वगैरे

चला दूर जाऊ, नवे बार शोधू
इथे फार झाली उधारी वगैरे

कवींना म्हाणे रोज येतात धमक्या
दिली "केशवा"ला सुपारी वगैरे

पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला..
बरे बंद होती "सुमारी" वगैरे..

विडंबन

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Jan 2009 - 1:43 am | llपुण्याचे पेशवेll

उत्तम विडंबन सुमारराव. वाहवा!
पुण्याचे पेशवे
Since 1984

प्राजु's picture

15 Jan 2009 - 1:50 am | प्राजु

एकदम जबरा...

खरे सांगतो टाकलेलीच नाही
तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे

हाहाहाहा....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

15 Jan 2009 - 1:51 am | घाटावरचे भट

आधी नुसता स्टान्स घेतला होता. आणि हा पहिल्या चेंडूवरचा षटकार....जियो!

श्रावण मोडक's picture

15 Jan 2009 - 11:35 am | श्रावण मोडक

घाटावरच्या भटांशी सहमत. जोरदार षटकार आहे हा.

सहज's picture

15 Jan 2009 - 12:28 pm | सहज

मस्त!!!

केसु अजुन येउ दे!!

टुकुल's picture

15 Jan 2009 - 2:42 am | टुकुल

लै भारी

कशाचीच आता नशा येत नाही
जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे
=)) =))

चतुरंग's picture

15 Jan 2009 - 2:50 am | चतुरंग

कवींना म्हाणे रोज येतात धमक्या
दिली "केशवा"ला सुपारी वगैरे

पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला..
बरे बंद होती "सुमारी" वगैरे..

दुसर्‍या डावात पहिल्याच चेंडूवर षटकार गुर्जी! ज ह ब ह र्‍या हा !!

चतुरंग

मदनबाण's picture

15 Jan 2009 - 4:47 am | मदनबाण

कवींना म्हाणे रोज येतात धमक्या
दिली "केशवा"ला सुपारी वगैरे

पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला..
बरे बंद होती "सुमारी" वगैरे..

झकास.... :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

चेतन's picture

15 Jan 2009 - 10:56 am | चेतन

+++१

गुरुजी एकदम फार्मात.

पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला..
बरे बंद होती "सुमारी" वगैरे..

माझ्यासारख्यांना मात्र खुप आनंद झाला.

अशिच मजा वर्षभर येत रहावी

(आनंदित) चेतन

विसोबा खेचर's picture

15 Jan 2009 - 12:49 pm | विसोबा खेचर

क्लास रे! :)

चला दूर जाऊ, नवे बार शोधू
इथे फार झाली उधारी वगैरे

हे सर्वात मस्त! :)

आपला,
(रोख-रोकडा!) तात्या.

आनंदयात्री's picture

15 Jan 2009 - 3:58 pm | आनंदयात्री

खत्तरनाक !!

मूखदूर्बळ's picture

17 Jan 2009 - 1:00 pm | मूखदूर्बळ

जबराट :)
.
चला दूर जाऊ नवा पक्ष शोधू
इथे फार झाले 'प्रभा'री वगैरे
.

मराठ्या खरोखर निघालास कोठे?
इथे मातले ते बिहारी वगैरे
.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jan 2009 - 6:02 pm | परिकथेतील राजकुमार

खरे सांगतो टाकलेलीच नाही
तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे

जराशी सुगंधी असावी सुरा ही
पिण्या येत जाते उभारी वगैरे

लै भारी !
परिकथेतील सुराजकुमार

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

झेल्या's picture

16 Jan 2009 - 6:35 pm | झेल्या

कविता 'वगैरे' भारीच लिहिता राव..!

-झेल्या वगैरे...!
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

जीएस's picture

16 Jan 2009 - 6:45 pm | जीएस

वा केशवा,

मस्तच, आता थांबू नका...

शंकरराव's picture

16 Jan 2009 - 6:54 pm | शंकरराव

कशाचीच आता नशा येत नाही
जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे

क्या बात है व्वा ! मजा आली .. केशवराव लगे रहो..

सुनील's picture

16 Jan 2009 - 7:39 pm | सुनील

पुनरागमन दणक्यात झालं आहे!!

चला दूर जाऊ, नवे बार शोधू
इथे फार झाली उधारी वगैरे

मस्तच!!

अवांतर - शेवटचे कडवे नंतर टाकले काय? काही तासांपूर्वी नव्हते (असे वाटते!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धाकली's picture

16 Jan 2009 - 7:46 pm | धाकली

वाह!! क्या बात है!!!

चला दूर जाऊ, नवे बार शोधू
इथे फार झाली उधारी वगैरे

आणि हे तर उच्च्चच्!!

तिथे एकटा मीच होतो विवाहित
सुखी सर्व जे ब्रम्हचारी वगैरे

फारच छान...
मजा आली!!

जयवी's picture

17 Jan 2009 - 12:18 pm | जयवी

विडंबन...ते ही इतक्या कठीण रदीफ चे...... मानलं बाबा तुम्हाला...... !!
जबरदस्त !!

केशवसुमार's picture

18 Jan 2009 - 12:21 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार

सुप्रिया's picture

23 Jan 2009 - 4:51 pm | सुप्रिया

कवींना म्हाणे रोज येतात धमक्या
दिली "केशवा"ला सुपारी वगैरे

पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला..
बरे बंद होती "सुमारी" वगैरे..

मस्तच !!!

निखिलराव's picture

23 Jan 2009 - 5:12 pm | निखिलराव

च्यामारी धरुन फट्याक..................
एक नंबर ,
टांगा पल्टी घोडे फरार........

आताच चेपु वर ह्याची मुळ वर्जन ऐकली.

अन तिथे केसुंची ही लिंक सापडली.

खतरनाक विडंबन.

..../\....

अभिज्ञ.

राजेश घासकडवी's picture

29 Mar 2011 - 5:39 am | राजेश घासकडवी

वा. खूप दिवसांनी छान विडंबन वाचून बरं वाटलं. वेलकम ब्याक...

मिसळीत पडली पुन्हा तीच तर्री
पुन्हा आज आली खुमारी वगैरे

ते वरच ठेवा (कीप इट अप)