मित्रांनो..संक्रांतिला "तिळगुळ घ्या अन गोड बोला"असे म्हणत आपण आपल्या मित्र मैत्रीणिना तिळ्गुळ जरुर द्या पण वाचा आपल्या पुर्वजांच्या रण धुमाळिचि कहाणी...दोन अश्रु डोळ्यातुन बाहेर पडुन त्यांना आदरांजली देवु यात..व त्यांचे स्मरण करु यात....
आज संक्रांत.
संदर्भ - पानिपत -लेखक श्री. विश्वास पाटिल.
आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला. जंबुर्याच्या गोळ्याने जखमी होवून दत्ताजी शिंदे पडले.
दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उद्गारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता
प्रतिक्रिया
13 Jan 2009 - 9:45 pm | भास्कर केन्डे
किती जाज्वल्य इतिहास आहे आपल्याला! दत्ताजी शिद्यांसारख्या असंख्य पराक्रमी पुर्वजांच्या तसेच राम-कृष्णाच्या भूमीत देवाने जन्म दिला हे आपले भाग्यच नव्हे का?
अविनाशजी, आपला लेख वाचताना अंग शहारुन गेले. कृर मुसलमानी आक्रमकांचे कमालीचे क्रौर्य व त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी वीराने देलेले बाणेदार उत्तर हे सगळे काही सांगून जाते.
थोरल्या आबासाहेबांनी सुरतेवर छापा टाकला तेव्हा स्त्रीया व मुलांना इजा होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली होतीच. शिवाय शत्रूला मारताना सुद्धा कधी क्रौर्य दाखवले नव्हते. तो या भारतभूच्या लेकरांचा गूण नव्हेच मुळी. पण म्लेंच्छांनी मात्र जेव्हा जेव्हा कत्तली केल्या तेव्हा तेव्हा सैतानालाही लाजवले. मग ते घरातल्या बायका लेकरांसकट आपल्या पुण्याला जाळून गाढवाचा नांगर चालवणे असो, कृरकर्म्या औरंग्याने केलेली हिंदूंची कत्तल असो वा इतर मुसलमानी आक्रमणे. प्रत्येक वेळी या नराधमांनी (खरेतर हा खूप सौम्य शब्द झाला) सैतानाला सुद्धा लाजवले. पण त्या सगळ्या आक्रमाकांचे महाराष्ट्राच्या वाघाने कोथळे काढले व त्यांचे थडगे सुद्धा इथेच बांधले हा ही इतिहासच आहे.
अशा बोधपर गोष्टींमधून शिकून आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या शौर्याला साजेसे असे आपले पुढील भवितव्य ठरावे हीच या संक्रमण काळात ईश चरणी प्रार्थणा!
आपला,
(प्रभावित) भास्कर शिंदे
बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!
13 Jan 2009 - 9:51 pm | बट्टू
ह्रुदय द्रावक उतारा आणि प्रतिसाद वाचून डोळ्यात अश्रू आले.
अशा बोधपर गोष्टींमधून शिकून आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या शौर्याला साजेसे असे आपले पुढील भवितव्य ठरावे हीच या संक्रमण काळात ईश चरणी प्रार्थणा
माझीही.
13 Jan 2009 - 10:02 pm | सुनील
कृर मुसलमानी आक्रमकांचे कमालीचे क्रौर्य
भास्करराव, येथे धर्म आणण्याचे काहीही कारण नाही. जवळपास संपूर्ण उत्तर भारत, लढवय्या राजपुतांसहित, सगळे अब्दालीच्या बाजूने (मराठ्यांच्या विरुद्ध) ह्या लढ्यात होते. त्याची कारणे वेगळी, पण निश्चितपणे धार्मिक नव्हेत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
14 Jan 2009 - 3:18 am | सर्किट (not verified)
किती जाज्वल्य इतिहास आहे आपल्याला!
हा इतिहास नव्हे, तर ललित लेखन आहे.
-- सर्किट
14 Jan 2009 - 3:48 pm | मैत्र
ही दंतकथा आहे असं म्हणायचं आहे का आपल्याला?
15 Jan 2009 - 2:28 am | सर्किट (not verified)
ही दंतकथा आहे असं म्हणायचं आहे का आपल्याला?
नाही, पण विषय दत्ताजी असल्याने "दत्तकथा" आहे असे म्हणण्यास वाव आहे. (मला सर्दी झाली आहे सध्या.)
-- सर्किट
14 Jan 2009 - 1:53 pm | सुहास.
बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"
अगा॑वर काटा आला.....