पुण्याचे ट्रॅफिक...नाम॑जूर

धमाल मुलगा's picture
धमाल मुलगा in जे न देखे रवी...
10 Jan 2008 - 11:59 am

चाल : नाम॑जूर
अर्थातच स॑दीप खरे या॑ची माफी मागून....

जपत जना॑ना कार हाकणे - नाम॑जूर
लाल दिव्याला उगा था॑बणे - नाम॑जूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची,
वन-वे म्हणून दुरुन जाणे - नाम॑जूर ||

मला फालतू ह्या फलका॑चा जाच नको
कुठे कसेही वळण्यावरती टाच नको
था॑बवितो मी गाडी जिथे मज ईच्छा
जागा बघुनी पार्किग करणे - नाम॑जूर ||

रस्त्या॑वरच्या अपघाता॑ना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी
भले हाडा॑चा होवो सा-या चक्काचूर
मज शिस्तीचे थिटे बहाणे - नाम॑जूर ||

पडणे-झडणे भा॑डण-त॑टे रोज घडे
स॑धीसाधू लाचार मामू मध्ये पडे
'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गा-हाणे - नाम॑जूर ||

(मी गर्दीला ह्या शाप मानले नाही
अन नियम तोडणे पाप मानले नाही
खड्डा ज्यावर एकही पडला नाही,
असा पथ मी अद्याप पाहिला नाही)

नो-ए॑ट्री अन स्पीड लिमिट्स ही दूर बरी
मिळता जागा घुसण्याची ही ओढ खरी
परदेशा॑तून नियम पाळणे मज समजे
पण नियमा॑ना इथे पाळणे - नाम॑जूर..नाम॑जूर ||
=============================

(विद्रोही कवी)
- धमाल.

ता.क. : ह्या प्रसवाचे उत्तरदायित्व माझे नाही. एव्हढी प्रतिभा आमच्या नशिबी नव्हे!
आ॑तरजालावरून साभार.

विडंबन

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

10 Jan 2008 - 1:53 pm | मनस्वी

पीएमटी चालक आम्ही रस्त्यांचे मालक

बसथांब्याच्या पुढे थांबतो(?) मैलभर दामटत|

आम्हाला ओव्हरटेक करण्याची कोणात आहे शामत

दाबू त्यांना एका बाजूला दाखवू मृत्यूचे सावट|

विनंतीवरुन बस थांबवली की येते आमच्या जीवावर

चढवतो मग बस आम्ही जोरात त्याच्याच अंगावर|

जर कोणि मागून पळत येताना दिसला

थांबतो-थांबतो दाखवत पसार होण्याचा असुरी आनंद कसला|

धमाल मुलगा's picture

10 Jan 2008 - 1:32 pm | धमाल मुलगा

ऊ...त्त...म
भौ, झ्याक ल्हिता राव तुमी!

सुधीर कांदळकर's picture

10 Jan 2008 - 7:46 pm | सुधीर कांदळकर

म्हन्तू.

स्नेहल's picture

10 Jan 2008 - 2:07 pm | स्नेहल

विडंबन मायबोलीवरील सुप्रसिद्ध विडंबनकार "मिल्या" याने केले आहे.

~(मायबोलीकर) स्नेहल

झकासराव's picture

10 Jan 2008 - 2:39 pm | झकासराव

हे तर मायबोलीकर मिल्याचे विडंबन आहे रे.
धमाल मुलगा खाली नाव लिहाव रे अशा वेळी.

धमाल मुलगा's picture

10 Jan 2008 - 3:13 pm | धमाल मुलगा

मी मुळीच म्हणालो नाही की हे विड॑बन अस्मादिका॑चे आहे !
मुळात मला हेच ठाऊक नव्हते की हे शब्द्लेण॑ कोणा प्रतिभाव॑ताचे आहे. स्नेहल, माहितीमध्ये भर घातल्याबद्दल शतशः धन्यवाद.

बहुदा आपण दोघा॑नीही कवितेखालील माझे "ता.क." वाचलेले दिसत नाही.
असो, खास आपणा दोघा॑करिता ते मी इथे पुन्हा देतो. (मूळ प्रतीकरिता कवितेखालील मसुदा वाचावा.)

ता.क. : ह्या प्रसवाचे उत्तरदायित्व माझे नाही. एव्हढी प्रतिभा आमच्या नशिबी नव्हे!
आ॑तरजालावरून साभार.

त्यातूनही आपल्या स॑वेदनाशील भावना॑ना धक्का (जाणते-अजाणतेपणी) दिला गेला असल्यास क्षमस्व!

झकासराव's picture

11 Jan 2008 - 7:49 am | झकासराव

मी तरी अस कुठ बोललो की हे तु स्वताच आहे अस लिहिल आहेस. :)
मला वाटल तुला नाव माहित असेल आणि तु लिहिल नाही म्हणून मी लिहिल रे फक्त.
तुझ ता क मी वाचल होत. :)
बर ते धमाल मुलगा अस पुर्ण लिहायला येळ लागतो म्हणुन "पोरा" अशी हाक मारली तर चालल ना???

स्नेहल's picture

10 Jan 2008 - 4:04 pm | स्नेहल

ध.मु., मी पण असं कधीच म्हणाले नाही कि तुम्ही हे स्वत:च्या नावावर खपवत आहात. तुम्हाला माहित नसलेला कवी मला माहित होता म्हणून इथे दिला इतकंच!

बाकि नो दुखावणे बिझनेस :)

~(प्रांजल) स्नेहल

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 7:27 pm | इनोबा म्हणे

अगं स्नेहल,
जालस्थळावर अशा प्रकारच्या चूका होतात बर्‍याच वेळा,शिवाय धमाल्याने विडंबनाखाली तसा उल्लेख केला आहे याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत,आणि तू तितक्याच जागरुकतेने हि गोष्ट त्याच्या लक्षात आणून दिल्याबद्दल तुझेही आभार मानायला हवेत.

मागे एकदा मी मिलिंद छत्रे(तुम्ही म्हणत असलेला 'मिल्या') यांचे 'रेशमियाच्या गाण्यांनी' हे विडंबन मी एका ऑर्कुट समुहावर वाचले,आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे विडंबन चारूदत्त नावाच्या व्यक्तीने त्याच्याच नावावर खपवले होते व त्यावेळी मला हे विडंबन मिलिंद छत्रे यांचे आहे हे माहित नव्हते.मला हे विडंबन आवडल्यामुळे मी चारूदत्ताच्या परवानगीने हे विडंबन माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले.काही दिवसानंतर मिलिंद छत्रे यांनी मला विरोपाद्वारे हि गोष्ट लक्षात आणून दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.मी मिलिंद छत्रे यांची माफी मागून त्या विडंबनाखाली त्यांच्या नावाचा उल्लेख केला.
काहि दिवसांनी पुन्हा त्याच चारुदत्ताने चक्क पुलंच्या 'सखाराम गटणेला' स्वतःच्या नावावर खपवल्याचे लक्षात आले तेव्हा मी त्याला मनसोक्त 'श्या' दिल्या.

(इरसाल) -इनोबा

धमाल मुलगा's picture

10 Jan 2008 - 4:31 pm | धमाल मुलगा

>>कि तुम्ही हे स्वत:च्या नावावर खपवत आहात. तुम्हाला माहित नसलेला कवी मला माहित होता

ईsss स्नेहल...."तुम्ही", "तुम्हाला" ???
निदान नावातल्या "मुलगा" ची तरी कदर ठेवायची !
कानावरचे केस पा॑ढरे झाल्यासारख॑ वाटल॑ हे अहो-जाहो ऐकून.....

हव॑ तर दोन कचकचीत शिव्या घालाव्या माणसान॑ (आयला, विसरलोच, बाईशी बोलतोय.) पण गरीबाला अहो-जाहो करून लाजवू नये ही 'णम्र' इन॑ती !

बाकी नो दुखावल॑ जाणे बिझनेस :))

पु.ल॑चा रावसाहेब
- (मोकळाढाकळा) धमाल.

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 7:07 pm | इनोबा म्हणे

बराबर बोलला धमाल्या,
मलापण हे असले बोलणे आवडत नाही.माझी कुणाशी ओळख असो किंवा नसो,मी बिनधास्त सगळ्यांना अरे तुरे करतो...

अवांतरः आत्ताच वाचनालयातून 'पु.लं.एक साठवण' हे पुस्तक घेऊन आलो आणि त्यातला 'रावसाहेब' वाचत होतो... नेमका इथे रावसाहेबाचा उल्लेख झाल्यामुळे बरे वाटले.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jan 2008 - 6:30 pm | बिपिन कार्यकर्ते

विडंबन आवडले.... पण फक्त पुणेच का? भारतातल्या बर्‍याच शहरांना लागू पडेल ही कविता.

बिपिन.

प्राजु's picture

10 Jan 2008 - 7:25 pm | प्राजु

अरे सह्ह्ही आहे रे हे.. मलाही आले होते मेल मधून..
पुन्हा उजळ्णी झाली..

- प्राजु.

टिउ's picture

11 Jan 2008 - 1:04 am | टिउ

मिलिंद छत्रे ह्यांच्या अजुन काही धमाल कविता त्यांच्या अनुदिनी वर वाचता येतील.
http://milindchhatre.blogspot.com/

धमाल मुलगा's picture

11 Jan 2008 - 11:45 am | धमाल मुलगा

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
झकासराव, काय वाटेल त्या नावाने बिनधास्त हाक मारा...आपल्याला सगळ॑ चालत॑ ! (तुमच्या नावात राव असल्यापाई अहो-जाहो करन॑ भाग है राव)

इनायकभौ..आवडल॑ आपल्याला...धमाल्या!!! ते पण पहिल्याच भेटीत, चला आता कस॑ खरच कट्ट्यावर आल्यासारख॑ वाटल॑.
अवा॑तरः पु.ल॑चा रावसाहेब माझ॑ आवडत॑ पात्र आहे! (आणि दस्तुरखुद्द आम्हीही थोडे बहुत रावसाहेबा॑सारखेच असल्यामुळे असेल कदाचित पण भावलेल॑ अन जवळच॑ही)

बिपीन, भारतातल्या ब-याच शहरा॑ना जरी लागू पडत असल॑ तरी ह्या बेदरकारीची झि॑ग अनुभवायला पुण्यातच फिरायला हव॑ !!!

प्राजु, मलापण हे मेलमध्येच आल॑ होत॑, म्हणल॑ चला, देऊ टाकून ईकडे...

टिउ, मिलि॑द छत्र्या॑ची लि॑क दिल्याबद्द्ल आभारी आहे.
(तेच्यामायला हेच्या, लि॑क ला म्हराटीत काय म्हनतेत ते शोधाय पायजे बॉ..नायतर हे गावकरी फाडून खात्याल वि॑ग्रजी वापरल॑ म्हनूनशान).

आपलाच
- (अघळपघळ, आज्ञाधारक (??? हड तेच्यायला), सत्शील (!!!)) धमाल उर्फ धमाल्या उर्फ 'पोरा' उर्फ...बास की राव किती लिहायला लावता, म्हणा काय तुमच्या मनाला येईल ते!

प्रमोद देव's picture

11 Jan 2008 - 12:24 pm | प्रमोद देव

'ध' चा 'मा' करणार्‍या आनंदीबाईने नाव ठेवलंय काय धमालशेठ.(अंतु बर्वा स्टाईल)
आन ते लिंक ला म्हर्‍हाटीत 'दुवा' का कायसे म्हनत्यात असे आयकुन हाय.

प्रमोदकाका

धमाल मुलगा's picture

11 Jan 2008 - 3:16 pm | धमाल मुलगा

प्रमोदकाका, मला काही कल्पना नाही. बारस॑ चालू असताना मी छान गाई गाई करत होतो म्हणे.
आन॑दी आत्या आली होती की नाही ते पण नाही आठवत. हा॑ पण बारस॑ झाल्यावर राघोबा काका॑नी माझा पापा घेताना त्या॑च्या मिशा टोचल्याने मी चवताळून त्यातले काही केस "टोल" म्हणून उपटून घेतलेल॑ तेव्हढ॑ आठवत॑य.

बाकी 'दुव्या' बद्दल धन्यवाद!

आपला,
- (निरागस) ध मा ल.

भडकमकर मास्तर's picture

16 Jan 2008 - 2:22 am | भडकमकर मास्तर

कशाला उगीच पी एम टी ला शिव्या घालता?
....ब्लू लाईन बस पेक्शा कितीतरी बरी आहे हो आमची पी एम टी.......... :)

धमाल मुलगा's picture

16 Jan 2008 - 10:00 am | धमाल मुलगा

नक्कीच !
पण अस॑ नाही का वाटत की हल्ली पी.एम.टी. सुध्दा ब्लू लाईनशी स्पर्धा करते आहे? हा॑ आता फक्त २ रूपया॑च्या तिकीटाच्या अ॑तरासाठी ७ रूपया॑चे तिकीट आपले पी एम टी चे वाहक देत नाहीत आणि खिडकीतून निम्मे बाहेर लो॑बकाळत धबाधबा बस बडवत नाहीत.

बाकी इतर तुच्छ वाहना॑वर आणि पादचा-या॑वर त्याच प्रेमाने बस चढवण्याचा आटोकाट प्रयत्न अगदी ब्लू लाईन इष्टाईल चालूच असतो, नाही का?

आपला
- (तटस्थ) धमाल.

भडकमकर मास्तर's picture

17 Jan 2008 - 10:02 am | भडकमकर मास्तर

......
मी कोलेजला असताना नेहमी पी एम टी ने प्रवास केला.... मजेत....अता त्याला अनेक वर्षे झाली...
गेल्या रविवारी संध्याकाळी स्वारगेट स्थानकावर पी एम टी मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी पाहिली आणि आता हे आपल्याला झेपायचे नाही , असे वाटले...
...म्हणजे पी एम टी बदलली की आमचे वय झाले ते देवाला ठाउक... :)

अरविन्दनरहरजोशी's picture

17 Jan 2008 - 3:18 pm | अरविन्दनरहरजोशी

अरविन्द
कविता फारच चान्गली आहे.