एक दिवस

ज्ञानदा कुलकर्णी's picture
ज्ञानदा कुलकर्णी in जे न देखे रवी...
7 Jan 2009 - 7:02 pm

एक दिवस
आयुष्यातील एक दिवस ...
जगु दया मला माझ्यासाठी ...

तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या यशाचा आनंद लुटन्यासाठी
तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या अपयशाला चुचकारण्यासाठी

मी असेन फक्त एकटी
फक्त एकाच दिवसासाठी
दुसरे कोणीही नसेल सोबत
'तो' दिवस उपभोगान्यासाठी

इच्छा नाही मला त्या दिवशी
काहीही करण्याची इतरांसाठी
इच्छा नाही मला share करण्याची
ते क्षण कोणाही सोबत
जे मी lock केले असतील माझ्यासाठी

पण
आता नाही वाट पहायची मला
त्या दिवसाची
आता प्रत्येक क्षण जगायचा आहे मला
फ़क्त अणि फ़क्त माझ्यासाठी

--ज्ञानदा कुलकर्णी

कविता

प्रतिक्रिया

रेझर रेमॉन's picture

11 Jan 2009 - 1:22 am | रेझर रेमॉन

मॅडम,
हे काय खरं नाय.
मी आयुष्यभर माझ्यासाठीच जगत आलोय.
- रेझर

ज्ञानदा कुलकर्णी's picture

11 Jan 2009 - 6:32 pm | ज्ञानदा कुलकर्णी

मी आयुष्यभर माझ्यासाठीच जगत आलोय.
---जे कधीही स्वतःसाठी जगत नाहीत अश्या व्य्क्तीने ही कविता लिहीली आहे . आयुष्यात एक क्षण असा येतो की तेव्हा वाटते की आपण आपल्यासाठी काहीच केलेले नाही आपल्या आयुष्यात तेव्हा कळेल तुम्हाला काय आहे ह्या कवितेमध्ये.

विनायक पाचलग's picture

11 Jan 2009 - 9:17 pm | विनायक पाचलग

ज्ञानदा चांगली आहे कविता
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

विसोबा खेचर's picture

12 Jan 2009 - 9:23 am | विसोबा खेचर

वा! छान काव्य..!