कंडोम

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
7 Jan 2009 - 12:25 pm

कंडोम
भांडवल शाही ख~या अर्थाने रुजवलीत तुम्हि, मालक
आता या देशावर तुमचेच राज्य चालु झाले आहे, मालक

भाकरीसाठी लढायचा अधिकार काढुन घेतलात मालक
नोटा चारुन संप फोडण्यात तरबेज झालात, तुम्ही मालक

मजुराचे रक्त खुप स्वस्त दरात मिळते या देशात, मालक
५-५०रु थोबाडावर फेकुन ८तास शॊषायला चटावलात, तुम्हि मालक

देशातल्या राज्यकर्त्यांचे खरे रंग उमगलेत आम्हा मालक
निळे, तिरंगी, भगवे, सा~यांचा एकच रंग उमगले, आम्हा मालक

भांडवल शाहित जाति व्यवस्था चांगलिच राबवलित मालक
कंत्राटि कामगार नांवाची नविन जात निर्माण केलित मालक

कंत्राटि कामगार, पण कच्चि बच्चि आहेत आम्हाला मालक
वापरा,काम झाले फेकुन द्या"अस करायला कंडोम नाहि
कामगार आहोत, आम्हि मालक
_____________________________________

अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन

कविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

7 Jan 2009 - 12:29 pm | अवलिया

कवितेतले आपल्याला काही कळत नाही हे जगजाहिर आहेच.
नाव वाचुन आलो तर आत वेगळाच विषय.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

कालिन्दि मुधोळ्कर's picture

7 Jan 2009 - 12:46 pm | कालिन्दि मुधोळ्कर

आवडली कविता खूप.

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 12:52 pm | विसोबा खेचर

शीर्षकासंदर्भात काही तक्रारी आल्या आहेत. या बाबतचा निर्णय मी संपादक मंडळाचर सोपवतो..

यूज एन्ड थ्रो संकल्पनेकरता कंडोमचे रुपक मलातरी ठीक वाटले.

असो,

आपला,
(चौपाटीवरचा फुगेवाला) तात्या.

आनंदयात्री's picture

7 Jan 2009 - 1:05 pm | आनंदयात्री

>>(चौपाटीवरचा फुगेवाला) तात्या.

ठ्ठो ... ठ्ठो ... ठ्ठो ..

=)) =)) =))

ब्रिटिश's picture

7 Jan 2009 - 3:18 pm | ब्रिटिश

यूज एन्ड थ्रो संकल्पनेचा निषेद

रीसायकल क कई तरी वाचल व्हत

कपडे धुऊन पून्ना पुन्ना वापरनारा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

अविनाशकुलकर्णी's picture

7 Jan 2009 - 1:07 pm | अविनाशकुलकर्णी

मला तरी यात गैर वाटत नाहि...जाहिरातित भारति आचरेकर कंडोम म्हणुन ओरडते ति जाहिरात आक्षेपार्ह वाटत नाहि?..एक सुखासिन सुरक्षित आयुष्य व एका कामगाराचे हातावरचे पोट मी पाहिले आहे..अभिव्यक्ति जर अशि मारणार असाल तर लिखाण करणे मुश्किल होइल..कवितेवर टिका करा..पण कविता रद्द करु नका.. कंडोम शब्द हा घराघरात लहान मुलांना जाहिरातितुन माहित आहे..

आनंदयात्री's picture

7 Jan 2009 - 1:08 pm | आनंदयात्री

>>अभिव्यक्ति जर अशि मारणार असाल तर लिखाण करणे मुश्किल होइल..

असेच म्हणतो, सहमत आहे. अभिव्यक्ती ला काय कोणत्याच व्यक्तीला मारु नका अन त्यातल्या त्यात अभिव्यक्ती फार सुंदर आहे !!

-
(चौपाटीवरचा टाचणीवाला)

आंद्या अवांतर

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 1:24 pm | विसोबा खेचर

अभिव्यक्ति जर अशि मारणार असाल तर लिखाण करणे मुश्किल होइल..कवितेवर टिका करा..पण कविता रद्द करु नका..

ना अभिव्यक्ति मारली आहे, ना कविता रद्द केली आहे.

कवितेवरती टीका करण्याचा प्रश्नच नाही. कविता उत्तमच आहे..

असो,

तात्या.

विनायक प्रभू's picture

7 Jan 2009 - 1:05 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो.

प्रभाकर पेठकर's picture

7 Jan 2009 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

शीर्षकात काहीच गैर नाही. उलट लोकसंख्येचा विचार करता आणि AIDS चा भयावह प्रसार बघता 'कंडोम' शब्दाचे महत्त्व आणि महात्म्य सर्वदूर पोहोचणे आवश्यक आहे.
कविता चांगली आहे. शेवट विशेष चांगला. अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!