लग्न करुन तु सासरी गेली आहेस

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Jan 2009 - 10:57 am

तु मी अन ममा, आपला ग्रुप होता..
त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता.
आता आपला ग्रुप फुटला आहे,
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर
It is my Mess and i Love it
पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले,
बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे
कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु
ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड,
मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें"
तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे...
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वेळ..
मग, ति सकाळची मरण घाई..माझ्या नकळत अंघोळीला जाणे.
१५-२० मिनीटे बाथरुम अडवणे..माझी चिड्चीड..आता फक्त आठवणी
कामावरुन दमुन आलो की..Whatzzz up dad..How was the day विचारण...
रात्री जेवण झाले कि Long ride ला जाण....... मग त्या कॉलेजच्या गमती सांगण..
पी.जे..ऎकविण..ति बरीस्ता कॉफि पिणे...ह्या साऱ्या आठवणी..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तु म्हणजे घरातल आनंदाच कारंज होत..थुइथुइ उडणार..
आता तुझ्या मैत्रीणीचा थवा येत नाहि..चिवचिवाट नाहि..
तुझी रुम शांत आहे..पुस्तके कपाटात.कपडे पण घडी करुन.
ड्रॉईंग बोर्ड भिंतिला टेकुन उभा..कोपऱ्यात गणपती बाप्पा ध्यानस्थ
टेडी बिअर, आणी स्टफ टॉइज पलंगावर बसलेली, तुझी वाट बघत..
फ्रीज मधल्या दुधाच्या पिशव्या,अन बोर्न व्हिटाचा डबा तसाच..
कारण दुध पिणारी माऊ अमेरिकेला गेली आहे.
आम्हाला आठवण येते..पण आम्हि पण खुष आहोत..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

Avinash..................

मुक्तक

प्रतिक्रिया

रेझर रेमॉन's picture

4 Jan 2009 - 6:10 pm | रेझर रेमॉन

छान आणि नेमकी.
माझ्या कल्पना दहा-बारा वर्षं पुढे धावल्या.
घरो-घरी सेम स्टोरी.
शुभेच्छा

मीनल's picture

4 Jan 2009 - 6:46 pm | मीनल

जे काही गद्द /पद्द आहे ते खूप आवडलं
लेखनातल्या भावना कळल्या .
म्हणून आवडल.सोपी भाषा आहे.

मीनल.

पांथस्थ's picture

4 Jan 2009 - 10:09 pm | पांथस्थ

एकदम मस्त कविता आहे. सरळ आणि साध्या शब्दात भावना मांडणारी. मला मुली आहेत म्हणुन जरा जास्तच भावस्पर्शी वाटली.

अवांतर - हि कविता अनुभवातुन उतरली आहे की कल्पनाविलास?

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

लवंगी's picture

4 Jan 2009 - 10:21 pm | लवंगी

इथे अमेरिकेत येताना माझ्या बाबांचे पाणावलेले डोळे आठवले.

रेवती's picture

5 Jan 2009 - 3:44 am | रेवती

आपली कविता खूप आवडली.
एम्प्टी नेस्टमध्ये राहणे किती अवघड आहे त्याचा अंदाज आला.
डोळे पाणावले हे सांगायला नकोच.

रेवती

धनंजय's picture

5 Jan 2009 - 6:52 am | धनंजय

प्रकटीकरण आवडले.

प्राजु's picture

5 Jan 2009 - 9:13 am | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आकाशी नीळा's picture

5 Jan 2009 - 10:08 am | आकाशी नीळा

अप्रतीम ,आवदले.

मेथांबा's picture

5 Jan 2009 - 12:00 pm | मेथांबा

अगदी नेमकेपणाने शब्दबद्ध झाल्या आहेत अविनाशराव. अभिनंदन.

गाद्यांमध्ये रुपयांची बंडले शांतपणे भरून आनंदाने त्यावर झोपणारा,
मेथांबा

मृगनयनी's picture

5 Jan 2009 - 12:25 pm | मृगनयनी

अविनाश जी,

खूप "टची" आहे हे काव्य!....

आवडले!
:)

संदीप चित्रे's picture

5 Jan 2009 - 7:29 pm | संदीप चित्रे

ह्या सुरेख चित्रपटाची आठवण आली.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

भास्कर केन्डे's picture

6 Jan 2009 - 6:41 am | भास्कर केन्डे

अविनाशजी,

आपण साध्या-सरळ भाषेत चितारलेल्या सुंदर भावना हृदयाला भिडल्या, कदाचित मी सुद्धा मुलींचा बाप असल्याने. काही वर्षे फास्ट फॉरवर्ड का काय म्हणतात ते झालं.

असेच मन मोकळे करत जा.

आपला,
(वाचक) भास्कर

स्मिता श्रीपाद's picture

6 Jan 2009 - 11:50 am | स्मिता श्रीपाद

छान कवीता..... :-)
खुप आवडली...

-स्मिता श्रीपाद

मिना भास्कर's picture

7 Jan 2009 - 3:06 am | मिना भास्कर

खरोखरचं एक सुन्दर कविता! सारे काही आपल्या घरात घडते आहे, असे वाटले.

अनामिक's picture

7 Jan 2009 - 3:37 am | अनामिक

अशाच भावना माझ्याकडूनही प्रकट झाल्या होत्या माझ्या बहिणीसाठी... शोधून सापडली कविता तर इथे नक्कीच टिकवेन.
तुमची कविता छानच!

अनामिक