गजल

mahesh jahagirdar's picture
mahesh jahagirdar in जे न देखे रवी...
31 Dec 2008 - 4:30 pm

हासताना याद आली
सोसताना याद आली

अगणी प्राजक्त हा मी
वेचताना याद आली

सूर माझ्या अतरीचे
छेदताना याद आली

चादण्याशी बोलताना
जागताना याद आली

घेतला कोणी उखाणा
ऐकताना याद आली

रोखलेली आसवे तू
या क्षणाना याद आली

महेश जहागीरदार

गझल

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

31 Dec 2008 - 8:54 pm | संदीप चित्रे

सोपी मांडणी आवडली... साधे शब्द लिहिणं अवघडच असतं :)
--------
>> छेदताना याद आली
ह्या ठिकाणी 'छेडताना' जास्त चांगलं वाटेल का?

पुढील लेखनासाठी महेश जहागिरदार यांना शुभेच्छा.

**गझलेची काटेकोर नियमावली थोडक्यात चुकली आहे असे वाटते - रदिफ काय आहे, हे पहिल्या दोन द्विपदींत स्पष्ट होत नाही. पण कवीने अमुक नियम पाहिजेत असा काही नियम नाही. कल्पक कविता म्हणून आवडलीच.**

श्रावण मोडक's picture

2 Jan 2009 - 8:47 pm | श्रावण मोडक

छान रचना. आवडली. साधे शब्द याविषयी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2009 - 8:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली !