साथ देण्याचा इरादा पाहिला स्वप्नात होता
प्राक्तनाचा वार तेव्हा हाय रे अज्ञात होता....१
मी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला
आठवांच्या वेदनांचा मारवा रंगात होता.... २
पाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना
तू मला वैर्यांत मोजावे ग हा आघात होता.... ३
बैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी
स्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता.... ४
रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी
कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५
सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या?
बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता.... ६
“मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे
सात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता.... ७
वृत्त: व्योमगंगा
वृत्त नियम: गालगागा * ४
मात्रा: १६
---------------------------
www.atakmatak.blogspot.com
---------------------------
प्रतिक्रिया
29 Dec 2008 - 9:31 am | प्राजु
रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी
कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५
सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या?
बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता.... ६
हे अतिशय अर्थपूर्ण. प्राक्तन नाव एकदम समर्पक. मस्त.. एकदम मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Dec 2008 - 2:38 pm | श्रावण मोडक
सु रे ख रचना. प्राजू यांच्याशी सहमत. त्या दोन द्विपदी तर कहर जमून आल्या आहेत.
पण संपूर्ण रचनांतील प्रतिमांचा विचार करता, नायटा खटकला.
(साला नायटाच तो. खटकणारच किंवा टोचणारच!!!)
30 Dec 2008 - 11:07 am | धनंजय
गावदासी द्विपदी (पहिली ओळ खासच) आवडली.
29 Dec 2008 - 9:40 am | अवलिया
आवडले.
मस्त
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
29 Dec 2008 - 9:42 am | बिपिन कार्यकर्ते
अरे काय लिहिलंयस!!!!!!! मस्तच. तुझी शब्दांवर हुकुमत आहे हे जाणवतंय.
बिपिन कार्यकर्ते
29 Dec 2008 - 9:50 am | आनंदयात्री
सुरेख लिहलय !!
29 Dec 2008 - 9:57 am | विसोबा खेचर
लै भारी गझल रे!
तात्या.
29 Dec 2008 - 10:22 am | संदीप चित्रे
प्राजु, अवलिया, बिपिन, आनंदयात्री, तात्या --
लगेच गझल वाचूल अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद :)
आता जरा झोप घेतो :)
29 Dec 2008 - 11:32 am | घाटावरचे भट
छान!!!
29 Dec 2008 - 11:53 am | धमाल मुलगा
हाऽऽय!!!
ओहोहो...मार डाला!!!!!
आपण साला खलास झालो ही गज़ल वाचूनच!
जियो मिर्झा संदीप जियो :)
29 Dec 2008 - 1:44 pm | स्मिता श्रीपाद
“मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे
सात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता.... ७
स्सहीच......कसलं मस्त जीवघेणं आहे ...
खुप खुप छान...
-स्मिता
29 Dec 2008 - 5:38 pm | लिखाळ
मस्त... फार छान.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
30 Dec 2008 - 4:27 am | चतुरंग
बैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी
स्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता.... ४
सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या?
बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता.... ६
हे एकदम मस्तच.
पाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना
तू मला वैर्यांत मोजावे ग हा आघात होता.... ३
रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी
कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५
वरील द्विपदींमधल्या अधोरेखित ओळींचा अर्थ लागला नाही.
चतुरंग
30 Dec 2008 - 8:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गझल मस्तच आहे ! पण-
रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी
कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५
मलाही याचा अर्थ डोक्याला तान देऊन लागेना !
30 Dec 2008 - 11:08 pm | संदीप चित्रे
नवरा-बायको हे नातं संपूर्ण होण्यासाठी भावनिक आणि शारीरिक ह्या दोन्हींचे महत्व आहे.
'गावदासी'ची ('वेश्या' ह्या शब्दाला समानार्थी असा सुचलेला शब्द !) खंत ही आहे की कुठल्याही शारीरिक जवळकीचे रूपांतर 'नवरा - बायको' ह्या समाजमान्य पवित्र नात्यामधे झालेच नाही !!
30 Dec 2008 - 10:55 pm | संदीप चित्रे
म्हणजे असं की माझं तुझ्यावर अव्यक्त प्रेम आहे ते तुला दिसत नाहीये हे ठीक आहे पण, कुठल्याही गैरसमजामुळे, निदान मला शत्रू तरी समजू नकोस !!
30 Dec 2008 - 11:19 am | झेल्या
भट्टी फारच छान जमून आलीये...
अप्रतिम कविता...!
वाहवा!
-झेल्या
30 Dec 2008 - 10:49 pm | संदीप चित्रे
भटानु, धमु, स्मिता, लिखाळ, बिरूटे सर, चतुरंग, झेल्या:
अभिप्रायासाठी सगळ्यांचे आभार.
31 Dec 2008 - 1:01 am | शितल
संदिप,
गझल छान केली आहेस .
मी पहिला वाचली होती, पण जरा झेपली जरा नाही.:(
आता प्रतिक्रीया वाचुन ती जास्त उमगली.
:)
31 Dec 2008 - 11:50 pm | प्राजु
मी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला
आठवांच्या वेदनांचा मारवा रंगात होता.... २
एकदम छान. आठवणींच्या वेदनेत, उदास मन:स्थितीत मारव्या सारखा रागच रंग घेऊ शकतो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Jan 2009 - 12:03 am | धनंजय
चांगले असावेत, आधी खटकणारे काहीतरी आता तितके जाणवत नाहीत. (मला पूर्वीची आवृत्ती आठवत नाही - त्यामुळे नेमके काय बदल केलेत ते सांगता येत नाहीत. "मारवा" - धन्यवाद प्राजु)
तू मला वैर्यांत मोजावे ग हा आघात होता
आणि
कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?
येथे "ग" लघु-अक्षर मानले आहे, ते मला तरी ऐकायला बरे वाटत नाही. "रे" "गं" वगैरे हाका मारायचे ध्वनी ह्रस्व म्हटलेले समाधानकारक वाटत नाहीत.
पुनश्च - छानच गझल आहे.
1 Jan 2009 - 12:45 am | संदीप चित्रे
आभारी आहे.
धनंजय -- 'ग'च्या जागी एखादे योग्य र्हस्व अक्षर वापरता आले तर नक्की पाहीन.