आग व संशयाचा धुर

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
22 Mar 2025 - 9:00 am

दिल्ली न्यायाधीशाच्या
घरी लागली आग,
अग्निशमन कर्मचाऱ्यांना,
घरात दिसली नोटांची थप्पी,
काढता आगीचा माग ।।

होते म्हणे 15 कोटी घबाड,
तरीही नाही धरला लबाड ।।

वर्मावर बोट आल्यावर,
केली त्यांनी रदबदली,
राजीनामा न घेता,
त्यांची फक्त
केली बदली ।।

दिल्ली न्यायाधीशाच्या
घरी लागली आग,
पैशाचा पूर,
संशयाचा धुर
तरीही न्यायाला
आली नाही जाग ।।

कविता