नर्मदा ते तुंगभद्राच्या जलरेघेतील महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या अभ्यासास एकत्रित करण्यासाठी 'मध्ययुगीन मंदिरे' या संदर्भाने स्थळांची यादी करावयास घेतली आहे. याची सुरुवात राहत्या नाशिक जिल्ह्यापासुन करत आहे. या सर्व स्थळांना येत्या पाच वर्षात प्रत्यक्ष भेट देण्याचे व्यक्तिगत उद्दिष्ट ठेवले आहे. यातील वास्तुंचा विचार करताना मुख्यत्वेकरुन मराठापुर्व कालीन धार्मिक वास्तुंचाच विचार केला आहे. आंतरजालावरील उपलब्ध माहिती, गुगल लोकेशन व मॅपिंग करुन राज्यभरातील सर्व ठिकांणाचा एकत्रित नकाशा तयार होईल जो अभ्यासु व पर्यटकांसाठी उपयुक्त राहील. यादीत नसलेल्या किंवा मला अवगत नसलेल्या मंदिर/वास्तु/जागेविषयी माहिती मिळाली तर या यादीत भरच पडेल हे निश्चित. .
नाशिक जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे १ कृष्णनाथ मंदिर-धरणगाव खडक, निफाड कृष्णनाथाचे पुरातन मंदिर ग्रामस्थांची अनास्था व असंवेदनशीलता यामुळे आज शेवटच्या घटका मोजत आहे.
https://maps.app.goo.gl/sAFSd6JpL6sYQ3ra8
२ माणकेश्वर झोडगे मालेगाव, https://maps.app.goo.gl/qDKFoV98h7CWqhvVA
३ गोंदेश्वर- सिन्नर https://maps.app.goo.gl/8fLQFuvRYhWx6PX68
४ ऐश्वयेश्वर-सिन्नर https://maps.app.goo.gl/CbmwA17rBAk33qDt9
५ विठ्ठलेश्वर, मुक्तेश्वर मंदिर, चितळेश्वर महादेव- सिन्नर मंदिराचे घुमटदार शिखर मुधत-मराठा काळातील असून हे नंतरच्या काळात उभारले गेले आहे. वैजेश्वर मंदिराच्या रचनेपैकी गर्भगृह व अंतराळ एवढेच आज शिल्लक आहे. सभामंडपाचा मूळ भागात आज शिल्लक नाही https://maps.app.goo.gl/QLW2nYVfmagNXzRT8
६ वैजेश्वर महादेव मंदिर-वावी, सिन्नर मंदिराचे घुमटदार शिखर मुधत-मराठा काळातील , मंदिर हे शके १९३९ म्हणजे इसवी सन १२१७ या सुमारास उभारले गेले असे शिलालेख सांगत आहे. https://maps.app.goo.gl/NaxVQzTVT26Ky9fs5
७ भग्न मंदिर- वांजोले इगतपुरी, https://maps.app.goo.gl/S4u591FaYZFxuVG96
८ शिव मंदिर,-आंबेगण, दिंडोरी https://maps.app.goo.gl/dHLfHmuhQ3dePxEJ7
९ मंडपेश्वर महादेव मंदिर-मांडवड, ता. नांदगाव, https://maps.app.goo.gl/YLaYeZaGJPg6vuCC7
१० निलकंठेश्वर मंदिर- देवघर, दिंडोरी फासना शैली , उतरत्या पायर्यांचे शिखर
https://maps.app.goo.gl/MDBTw3NnjAop2ASL8
११ ध्वस्थ ऋषी /शिव मंदिर, - मार्कंड पिंप्री , कळवण https://maps.app.goo.gl/U6b889wrVcdnHtBPA
१२ पंचरथी महादेव मंदिर-देवळी कराड, कळवण, https://maps.app.goo.gl/jbSJ8oGrjUk4gmJy9
१३ राघवेश्वर मंदिर-चिचोंडी, येवला उंच टाचाच्या खडावा ल्यालेली नर्तिका शिल्प, यज्ञ वराह https://maps.app.goo.gl/BDgFm1DteV5ozrf7A
१४ प्राचीन शिवमंदीर-टंकइ, येवला https://maps.app.goo.gl/wmyPmdxzpxhN1Gc99
१५ मंदिर समूह- अंजनेरी १२ जैन मंदिरे, ४ हिंदू मंदिरे https://maps.app.goo.gl/qfpp3AQYsn7MiL2k9
१६ रामेश्वर व सोमेश्वर मंदिर, गणेश मंदिर- मुल्हेर, बागलाण १४८० साली महादेवशहा राठोड बागुल राजाने स्थापना केली. https://maps.app.goo.gl/XEqkWKjH3448jjQg6
१७ लखुलिश महादेव मंदिर-आलीयाबाद, बागलाण निर्मिती आठव्या शतकातील आहे. मंदीर अष्टकोनी असुन जैन तत्त्वज्ञानाची आहे . कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री शिवलिंगावर चंद्रांचा प्रकाश पडतो त्यामुळे मंदीर आणि शिवालिंग प्रकाशाने उजळून निघतो . https://maps.app.goo.gl/i2wXdtgX3yvVMT3h9
१८ जोगेश्वर, कामदेव- देवलाने, बागलाण https://maps.app.goo.gl/nbVoDEHmXL85BMSJ6
१९ भग्न जैन मंदिर- ठाणेपाडा, हरसूल https://maps.app.goo.gl/USoG5cYPS1NdmK1z8
२० काळाराम मंदिर,नारोशंकर मंदिर, सुंदर नारायण मंदिर- -नाशिक https://maps.app.goo.gl/6EmwcwwXFJKy65LP9
पेशवाई काळातील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. तज्ञ कारागिरांनी नैसर्गिक परिसराशी सुसंगत रचना वापरल्या. पेशवाई काळातील वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. तज्ञ कारागिरांनी नैसर्गिक परिसराशी सुसंगत रचना वापरल्या. मंदिराच्या आजूबाजूच्या भिंतीवर वर्तुळाकार अक्षय नागा किंवा नागाचे कोरीवकाम आहे. अशा प्रकारच्या प्रतीकात्मक कला कदाचित तांत्रिक पंथाशी संबंधित आहेत.
२२ श्री विष्णू मंदिर / वटेश्वर महादेव मंदिर-धोडंबे , चांदवड महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन हेमाडपंती मंदिरे असून हे घोडंबेचे वेगळेपण म्हणता येईल. https://maps.app.goo.gl/HMbJDCYwKQzZCMFx9
२३ प्राचीन शिवमंदिर - मुरलीधर खैरनार यांची सुपरहिट कादंबरी "शोध" चा क्लायमॅक्स ज्या प्रदेशात साकारलाय, तो कळवण तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील अभोण्याच्या पश्चिमेला सुमारे ३० कि.मी वर बिलवाडी हे आदिवासी बहुल गाव असून या गावाची लोकसंख्या दोन हजारच्या आसपास आहे. या गावाच्या शिवारात सुमारे १२ हेमाडपंथी मंदिरे होती. त्यात काही शिवमंदिरे, काही भगवान महावीर तर काही विष्णूची मंदिरे होती. त्यापैकी ११ मंदिरे पूर्णपणे ढासळून मातीत गाडली गेली आहेत. तरीही त्याजागी आजही मंदिराच्या दगडांचे बरेचसे अवशेष पहायला मिळतात. गावात देखील बऱ्याच बांधकामात शिल्पांकित खांब/ कमानी/ जोते दडपलेले आढळतात. शिवारातील विविध मंदिरात अर्धवट भग्न मूर्ती व विरगळ रचून ठेवलेल्या आहेत. मंदिरांचे अवशेष, चिरे, कलाकुसर असलेले दगड, शिल्प, शिवलिंग या परिसरात ठिकठिकाणी झाडीत, गवतात, शेतांच्या बांधावर आपल्याला पाहायला मिळतात.
एका ओढ्याच्या किनारी शेतात कसेबसे तग धरून असलेले यादवकालीन मंदिर आहे. मंदिर अंदाजे बाराव्या शतकाच्या सुमारासच बांधले असावे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर फार कलाकुसर दिसत नाही पण मंदिराचा अंतर्भाग निव्वळ अप्रतिम आहे. मंडपाचे छत करोटक पद्धतीचे वितान आहे. वितानाच्या आतले नक्षीकाम अतिशय सुंदर आणि प्रमाणबद्ध आहे. शिल्प मोजकीच पण देखणी आहेत. मंदिराच्या गर्भगृह मुख्य मंडपाहून अधिक खोल असून शिवलिंग अथवा कोणत्याही मूर्ती विरहित आहे. येथील लोकांच्या माहीती नुसार मंदिरात शिवलिंग नाही तरी देखील मंदिराची पूजा केली जाते. मंदिराचा निम्मा भाग हा जमिनीखाली असल्यामुळे पावसाळ्यात मंदिरात कमरेपर्यंत पाणी भरलेले राहते.
कोणत्याही प्रकारच्या देखभाल अथवा संरक्षणा अभावी ही प्राचीन देखणी वास्तुरचना आणखी किती काळ टिकाव धरेल याची शाश्वती नसल्यानं शक्य होईल तसे येथे भेट देऊन या वारसा स्थळाची अनुभूती घ्यावी ही सर्वांस आग्रहाची विनंती https://maps.app.goo.gl/tErSFm37paUjbMzu9
डॉ वैभव कीर्ती चंद्रकांत दातरंगे, नाशिक
प्रतिक्रिया
19 Mar 2025 - 6:14 am | कंजूस
धन्यवाद माहितीसाठी.
20 Mar 2025 - 10:01 pm | चौथा कोनाडा
सुंदर संकलन ...
धन्यवाद !
रोजगार निर्मितीसाठी या जागांचे संवर्धन करुन पर्यटनाधारीत उद्योग-नोकर्या सुरु केल्यास खुप छान होईल ...
गल्लोगल्ली पायलीला पन्नास इंजोनियर्स हवेत कशाला ... ?
21 Mar 2025 - 11:15 am | राजेंद्र मेहेंदळे
कॉलिंग प्रचेतस
दातरंगे साहेब- नर्मदा ते तुंगभद्रा हा फार मोठा पल्ला आहे, त्यामुळॅ खच्चुन माहीती जमा होणार हे नक्की. अभ्यासकांना चांगलीच उपयोगी पडेल. पुढे याचे काही पुस्तक वगैरे काढणार आहात का?
24 Mar 2025 - 12:17 pm | प्रचेतस
चांगले संकलन.
यातली बरीचशी मंदिरे पाहिली आहेत, काहींवर लेखही लिहिले आहेत.
गोंदेश्वराच्या शिवपंचायतनात
आयेश्वराच्या अंगणी
अंजनेरीची भग्न मंदिरे
दिंडोरीच्या शिवमंदिरात समुद्रमंथनाचा देखणा पट आहे.