तुकाराम बीज सोहळा...
(375 वर्ष पूर्ण सोहळा )
तीर्थ देहू,
झाले सज्ज
बीज आज,
तुकाराम ।।
त्रिशतकोत्तर,
अमृतमहोत्सव,
हा सण उत्सव,
देहू क्षेत्री ।।
बीजसोहळा,
टाळ मृदंग,
भाविक दंग,
विठूनाम ।।
लाखो भाविक,
फुलांची सजावट,
दु:खाची वजावट,
नाचू रंगे ।।
सोळा कॅमेरे,
करती देखरेख,
रांगोळी रेख,
सुबकशी।।
चोख व्यवस्था,
स्वच्छता कर्मचारी,
व्यस्त ते आचारी,
वैकुंठस्थान ।।
तरले अभंग,
जुन्या आठवणी,
उचंबळे इंद्रायणी,
भेट घेण्या ।।
वरून तुका,
विमान गरुड
अभंग गारुड,
पाहतसे ।।
अभंग गाथा,
एकेक अक्षर,
आहे ते अक्षय,
अमृताचे ।।
अभंग फॉर्म,
शब्दप्रतिमा ध्यास,
जाणकार अभ्यास,
रात्रंदिस ।।
अमर अभंग,
नाही त्या मरण,
बाजीगर शरण,
तुक्या पायी ।।
प्रतिक्रिया
16 Mar 2025 - 5:10 pm | प्रसाद गोडबोले
पांडुरंग पांडुरंग !