अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 13 Feb 2025 - 10:52 am शब्दांचा दंश जिव्हारी- होता मी विमुक्त झालो माथ्यावर सूर्य तरीही काजव्यासवे झगमगलो शब्दांची अविरत गाज भवताल भारूनी उरली नादावर अनुनादाची हलकेच लहर शिरशिरली शब्दांचा अबलख वारू चौखूर उधळुनी गेला अर्थाचा लगाम लहरी हातून कधीचा सुटला मुक्तक