प्रभास पाटण अर्थात सोरटी सोमनाथ महत्व

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
9 Feb 2025 - 10:43 pm

आपल्याकडे 12 ज्योर्तीलिंगांचे महत्व आहे. आसेतूहिमाचल विस्तार असलेल्या ह्या प्रचंड देशात ही बाराही ज्योतिर्लिंगे विखूरलेली आहेत. काही पोचायला सोप्या अशा ठिकाणी, काही घोर जंगलात, केदारनाथ सारखे ठिकाण तर अत्यंत दुर्गम अशा हिमालयात तर सोमनाथ हे समुद्र किनारी!

त्यापैकी सोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरात जाण्याचा योग नुकताच आला. धार्मिक मान्यतेनुसार ह्या मंदिराचा क्रमांक पहिला येतो. बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा इथून सुरु करण्याची पद्धत आहे. माझा असा काही मानस नव्हता. पण त्यानिमित्ताने ह्या मंदिराविषयी थोडं वाचन केलं आणि लक्षात आलं की ह्या मंदिराचा इतिहास अत्यंत रोमांचक आहे. अनेक वेळेला संपूर्ण उध्वस्त होऊन सुद्धा आज हे मंदिर मोठ्या दिमाखात उभं आहे. कधी लूट म्हणून तर बरेचदा धार्मिक कारणांसाठी ह्या मंदिराला समूळ नष्ट करण्यात आले. तरी पण हे मंदिर प्रत्येक वेळी पुन्हा निर्माण करण्यात आले. असा इतिहास मला वाटत फक्त जेरुसलेमच्या मंदिराचा असावा.

फक्त इतिहासातच नव्हे तर पुराणात सुद्धा ह्या मंदिराविषयी फार रोचक कथा आहेत आणि त्यात सुद्धा हे मंदिर सध्या असलेल्या जागी चार वेळेस बांधण्यात आले आहे. त्यापैकी एक मंदिर खुद्द श्रीकृष्णाने बांधले आहे अशी कथा आहे.

इतिहासात पण ह्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. मुस्लिम आक्रमकांप्रमाणेच पोर्तुगीज लोकांनी सुद्धा इथे हल्ले केले होते. काही इंग्रज अधिकाऱ्यांनी इथून लुटून नेलेल्या काही गोष्टी परत मिळवण्याची भरपूर खटपट केली होती आणि ह्याविषयी चक्क इंग्लंडच्या संसदेत चर्चा झालेली आहे, असा सुद्धा एक संदर्भ आहे.

ह्या मंदिराच्या बाबतीत काही गोष्टी ह्या अद्भुत म्हणाव्या अशाच आहेत. हवेत तरंगणारे शिवलिंग असो किंवा मंदिराच्या आवारात असणारा बाणस्तंभ आणि त्यावर कोरलेला तो श्लोक ह्याबाबतीत आजदेखील प्रचंड कुतूहल आहे. उलट सुलट चर्चा होतच असते.

इतकं सगळं पाहता ह्याला फक्त मंदिर म्हणणं बरोबर नाही कारण ह्या एकाच जागेभोवती, धार्मिक, राजकीय, व्यापारी, ऐतिहासिक, कला, साहित्य अशा कित्येक गोष्टी थेट संबंधित आहेत.

ह्या सगळ्या गोष्टी आणि इतिहास एकत्र करून ह्या मंदिराविषयी थोडी माहिती लिहिण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. तो कसा वाटतोय नक्की सांगा. भेटू पुढच्या भागात! जय सोमनाथ!

इतिहास

प्रतिक्रिया

पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करा आणि तुम्ही काढलेल्या फोटोंबरोबरच त्यात भरपूर जुनी चित्रे/फोटो येऊ द्यात. उदाहरणार्थ भारतीय लघुचित्र शैलीतली चित्रे, इंग्रज प्रवासी चित्रकारांनी रंगवलेली आणि इंग्लंडात प्रकाशित केलेली छापाचित्रे, पुरातत्व विभागाने केलेले संशोधन आणि नकाशे, तत्संबंधी पोस्टाची तिकीटे आणि अन्य प्रकारची चित्रे.
.

.

हे आवडलं, छान कल्पना आहे! वरील फोटोसाठी धन्यवाद. मी नक्की टाकेन लेखामध्ये जे जे उपलब्ध होईल

उत्तम सुरुवात, येऊ द्या सगळं बयाजवार.

धन्यवाद! आधी पौराणिक मग ऐतिहासिक ते सुद्धा क्रमवार आणि मग सध्या जे मंदिर आहे त्याची निर्मिती असा काहीसा क्रम डोक्यात आहे.

पौराणिक आणि ऐतिहासिक घटना वाचण्याची आणि त्यावरील चित्रे बघण्याची उत्सुकता आहे.

विजुभाऊ's picture

11 Feb 2025 - 10:29 am | विजुभाऊ

कंदहार, गझनी पासून थेट सोमनाथ पर्यंत आक्रमक आले. त्याना येताना आणि परत जातानाही मधे कोणीच कसा विरोध केला नाही याचे नवल वाटते?
भारतीय समाज इतका कसा काय थिजलेला होता?
पृथ्वीराज चौहानाने महंमद घोरीला सोडून दिल्यानंतरही तो इतक्या वेळेस परत आक्रमण करू शकला हे कसे शक्य आहे?
तात्कालीन समाज आणि राज्ये अशी कशी होती की आक्रमकांना कुठेच रोखत नव्हती?

मुक्त विहारि's picture

11 Feb 2025 - 1:24 pm | मुक्त विहारि

संभल , हे त्याचे उत्तम उदाहरण....

एका तीर्थस्थानचे , पाकधार्जिण्या स्थानात, कसे रुपांतर झाले, हा इतिहास नाकारता येत नाही.

हिंदू कधीच एकत्र येत नाहीत.

मुळात असं नाहीय, गजनीच्या हल्ल्यावेळी आणि नंतर काय झाले ह्यावर एक भाग लिहिणार आहे. वाचायच्या आधी मलाही असंच वाटायचं.

मुक्त विहारि's picture

12 Feb 2025 - 6:36 am | मुक्त विहारि

नक्कीच लिहा...