त्यामुळं अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीला विरोध केला. अमेरिकेत त्यांनी कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवाला. राष्ट्रपती झाल्यानंतर १८६३ मध्ये त्यांनी गुलामगिरी अकायदेशीर घोषित केली. त्यामुळं गुलामगिरीची प्रथा सुरू ठेवू इच्छिणाऱ्यांना त्यांच्या निर्णयामुळं संताप आला व त्यातून देशात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, लिंकन त्यांच्या निर्णयावर ठाम होते. या निर्णयामुळे जॉन विल्क्स बूथला लिंकन यांचा राग आला होता. या रागातूनच त्यांने लिंकन यांची हत्या केली . . .
१७ मार्च १८६५ या दिवशी अध्यक्ष लिंकन एका सैनिकी औषधालयाला (Campbell General Hospital) भेट देणार होते. या प्रसंगी त्यांचे अपहरण करण्याची योजना बूथने योजली होती. परंतु काही कारणांमुळे ही भेट रद्द झाल्याने बूथची योजना प्रत्यक्षात येऊ शलली नाही.
फोर्ड नाट्यगृहाचा मालक जॉन फोर्ड याचा बूथ हा मित्र होता. बूथ हा प्रसिद्ध अभिनेता होता आणि या नाट्यगृहात त्याने अनेक वेळा नाटकात व कार्यक्रमात अभिनय केला होता. अध्यक्ष लिंकन उपस्थित असलेल्या मार्बल हर्ट या फोर्ड नाट्यगृहात सादर झालेल्या नाटकात त्याचे काम होते. याच नाट्यगृहात अध्यक्ष लिंकन १४ एप्रिलला सायंकाळी उपस्थित राहणार आहेत ते त्याला त्याच दिवशी सकाळी समजले होते.
बूथने आपल्याबरोबर एक पिस्तुल आणि एक मोठा सुरा सुद्धा ठेवला होता. अध्यक्षांवर गोळी झाडल्यानंतर त्याने पिस्तुल खाली टाकले (कारण त्यातून एका वेळी एकच गोळी झाडता येत असे) आणि सुरा काढून मेजर हेन्री रॅथबोनवर हल्ला केला. हल्ल्यातून वाचण्यासाठी त्यांनी डावा हात वर करून वार चुकविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या डाव्या दंडाला खोलवर जखम झाली व त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. लगेच बूथने हातातील सुर्यासहीत खालील प्रेक्षागृहात उडी मारली (सज्जा जमिनीपासून जेमतेम साडेदहा फूट उंचीवर होता) आणि घोषणा देत रंगमंचाच्या मागे पळाला. बाहेर बांधून ठेवलेल्या घोड्यावर बसण्यापूर्वी त्याने तो सुराही फेकून दिला आणि घोड्यावरून पसार झाला.
हत्येपूर्वी काही महिने लिंकन चिंतातुर व थकलेले दिसत होते. असे म्हणतात की मृत्युपूर्वी ३ दिवस आधी लिंकनना एक स्वप्न पडले होते. त्या स्वप्नात लिंकन व्हाईट हाऊसमध्ये काही शोकाकुल स्वर कोठून येताहेत याचा शोध घेत एका पूर्व बाजूकडील खोलीत पोहोचले. तेथे त्यांना दिसले की एका लाकडी चौकटीवर वस्त्रात गुंडाळलेला एक मृतदेह ठेवलेला आहे. त्याभोवती अनेक सैनिक शिस्तीत उभे आहेत. आजूबाजूला अनेक लोक जमून शोक करीत आहेत. शवाचा चेहरा कापडाने झाकलेला आहे. लिंकन एका सैनिकाला विचारतात व्हाईट हाऊस मध्ये कोणाचा मृत्यू झालाय? तेव्हा तो सांगतो "ते अध्यक्ष आहेत. त्यांची हत्या झालीये.".
लिंकनचा मारेकरी जॉन विल्क्स बूथ"
१४ एप्रिल १९६५ या दिवशी सकाळी जॉन बूथला समजले की अध्यक्ष लिंकन त्या दिवशी सायंकाळी फोर्ड नाट्यगृहात एक कार्यक्रम पाहण्यासाठी जाणार आहेत. आपल्या सहकार्यांना बोलवून अध्यक्ष लिंकन, उपाध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन व मंत्री विल्यम सीवर्ड यांची हत्या करण्याची योजना आखली. त्याने सरकारी सैन्यातील लेविस पॉवेल व डेव्हिड हेरॉल्डला विल्यम सीवर्ड्ची हत्या करण्यासाठी योजले. जॉर्ज आट्झेरॉट या जर्मन स्थलांतरिताला उपाध्यक्ष जॉन्सन यांची हत्या करण्यासाठी योजले. बूथने स्वतः अध्यक्ष लिंकनची हत्या करण्याचे ठरविले. सर्वांनी सायंकाळी १० च्या सुमारास तिघांनीही आपापले काम पूर्ण करण्याचे ठरविल्र गेले.
परंतु जॉन्सन यांची हत्या करण्यात आट्झेरॉट् अपयशी ठरला. किंबहुना तो जॉन्सनपर्यंत पोहोचूच शकला नाही. पॉवेलने सीवर्डच्या घरात घुसून त्यांच्यावर सुरीने अनेक वार करून गंभीर जखमी केले. सीवर्ड त्यातून वाचले, परंतु जखमांमुळे त्यांचा चेहरा कायमस्वरूपी विद्रूप झाला.
नाट्यगृहातून पळताना पाय दुखावलेल्या बूथने मेरीलँडमध्ये जाऊन तेथील डॉ. सॅम्युअल मड यांच्याकडून उपचार करून घेतले. कालांतराने हे डॉक्टरही कटात सामील असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. आरोपींच्या शोधासाठी १ लक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. वॉशिंग्टन डी सी व आजूबाजूच्या परिसरात मोठी शोधमोहीम राबविण्यात आली. बूथ व हेरॉल्ड एका सहकार्याच्या मदतीने अनेक दिवस मेरीलँडमधील झेकिया स्वँप जवळील दाट अरण्यात अनेक दिवस लपून बसले होते. लपून असताना बूथने एक सारणी लिहित होता ज्यात त्याने जगभर आपल्यावर टीका होत आहे यावर अविश्वास दर्शविला होता. लिंकनना मारून टाकल्याने आपल्याला नायक समजावे अशी त्याची अपेक्षा होती. शेवटी २६ एप्रिलला व्हर्जिन्यातील एका शेतघरात तपास अधिकार्यांना बूथ व हेरॉल्ड सापडले.
ते एका गवताच्या गंजीत लपले असल्याचे लक्षात आल्यानंतर बाहेर येऊन पोलिसांच्या स्वाधीन व्हावे असे वारंवार सांगूनही ते बाहेर येण्यास तयार नव्हते. शेवटी गवताची गंजी पेटवून देण्याचा इशारा दिल्यानंतर हेरॉल्ड बाहेर येऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला. परंतु बूथ बाहेर येण्यास तयार नव्हता. नंतर बूथ गोळी लागून मेल्याचे दिसले. त्याने स्वतःला गोळी मारून घेतली की पोलिसांच्या गोळीने तो मेला हे समजले नाही. प्परंतु गोळीने मेलेला बूथ नसून कोणीतरी दुसराच होता अशी काही काळ अफवा पसरली होती.
(क्रमशः)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==============================================================================
_____________________________________________________________________________________________________
(दर्शकांना अचानक हातात पिस्तुल असलेला एक माणूस दिसला आणि त्याने अगदी जवळून ओस्वाल्डला गोळी मारल्याचेही दिसले. तो एका स्थानिक नाईटक्लबचा मालक जॅक रूबी होता. गोळी लागल्यानंतर २ तासांनी ओस्वाल्ड पार्कलँड रूग्णालयात मरण पावला . . . )
वॉरन समितीची स्थापना
२९ नोव्हेंबर १९६३ या दिवशी नवीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी या हत्येची चौकशी व तपास करण्यासाठी अमेरिकेचे सरन्यायाधीश अर्ल वॉरन यांच्या नेतृत्वाखाली वॉरन आयोगाची स्थापना केली. एका पूर्वनियोजित कटानुसार केनेडींच्या हत्या केली गेली असे बहुसंख्य अमेरिकन नागरिकांना वाटत होते. परंतु यामागे कोणताही पूवनियोजित कट नसून व्यक्तिगत संतापातून एका व्यक्तीने ही हत्या केली असा वॉरन आयोगाने अंतिम निष्कर्ष काढला होता.
या आयोगाने दिलेल्या चौकशी अहवालावर अनेक आक्षेप घेण्यात आले, केंद्रीय तपास यंत्रणांनी वॉरन आयोगाला पुरेसे सहकार्य न दिल्याचा एक आक्षेप होता. त्यामुळे १९७६ मध्ये अमेरिकेतील लोकप्रतिनिधी सभागृहाने वॉरन आयोग अहवालाची पुनर्तपासणी करण्यासाठी हाऊस सिलेक्ट कमिटी या नावाने अजून एका चौकशी समितीची स्थापना केली.
या समितीने आपला अहवाल २९ मार्च १९७९ या दिवशी सादर केला. त्या अहवालानुसार बहुतेक केनेडींवर एकाने नव्हे तर एकूण दोन जणांनी गोळ्या मारल्या असण्याची शक्यता दर्शविण्यात आली होती. डॅलस पोलिसांच्या त्यावेळच्या ध्वनीमुद्रित रेडिओ संभाषणाच्या तपासावरून समितीने असा निष्कर्ष काढला होता की डीले प्लाझा येथे फक्त २ गोळ्या झाडल्या गेल्या नसून ४ किंवा अधिक गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. परंतु समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर ध्वनीतज्ज्ञांनी ते ध्वनीमुद्रण तपासून समितीचा निष्कर्ष खोडून काढला.
वॉरन आयोगाने १० महिने संपूर्ण प्रकरणाचा तपास केला, अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदरांशी बोलले, केनेडींच्या शवविच्छेदनाचा अहवाल तपासला, गोळी झाडतानाचे चित्रीकरण अनेक वेळा बघितले, सर्व उपलब्ध पुरावे तपासले आणि अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून शेवटी निष्कर्ष काढला की ओस्वाल्ड हा एकटाच या खुनात सामील होता व त्याने एकट्यानेच केनेडींच्या हत्येची पूर्ण योजना आखली होती. त्यांनी एकूण ८८८ पानांचा अहवाल तयार केला. या अहवालानुसार ओस्वाल्ड हा पूर्वी अमेरिकी सैन्यात होता व त्याने केनेडींवर एकूण ३ गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी मानेत घुसून गळ्यातून बाहेर येऊन मुख्यमंत्री कोनालींना लागली, दुसरी गोळी डोक्याच्या खाली पाठीत घुसली आणि तिसरी गोळी कोठेही न लागता कोठेतरी गेली.
अनेकांचा या आयोगाने काढलेल्या निष्कर्षांवर विश्वास बसला नाही. त्यांचा असा दावा होता की तेथे अजून एक जण या हत्येत सहभागी होता व त्या दुसर्याने सुद्धा एका वेगळ्या जागेवरून गोळ्या झाडल्या होत्या. परंतु आयोगाने अहवालात सांगितले की मारेकरी एकच होता.
(क्रमशः)
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
==============================================================================
_____________________________________________________________________________________________________
प्रतिक्रिया
22 Jan 2025 - 3:57 pm | चंद्रसूर्यकुमार
लिंकनच्या हत्येवर युट्यूबवर खूप काही आहे. तरीही मी बघितलेली एक डॉक्युमेन्टरी पुढे देत आहे--
The Last Night of Abraham Lincoln | Part 1: Assassination - https://www.youtube.com/watch?v=HEwy5k3nsT0
The Last Night of Abraham Lincoln | Part 2: Immortality- https://www.youtube.com/watch?v=GgATxed5C-4
केनेडींच्या हत्येवरही अशीच एक डॉ़क्युमेंटरी बघितली होती. ती मिळाल्यावर ती पण देतो.
22 Jan 2025 - 5:40 pm | मुक्त विहारि
वाखूसा
23 Jan 2025 - 9:27 pm | सौंदाळा
हा भाग पण आवडला
पदावर असताना किती भारतीय पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांची हत्या झाली असा किडा या धाग्याच्या निमित्ताने डोक्यात आला.
लाल बहादूर शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी हे तर माहिती आहेत पण अजून कोण आहेत?
वाय एस आर, माधवराव शिंदे यांचा अपघात झाला?