गाभा:
काल (७ जानेवारी २०२५) रात्री ११ वाजता माझ्या एचडीएफसी फास्टॅग खात्यातून ₹७२/- टोल शुल्क वजा झाल्याचा एसएमएस् आला. मात्र, त्यावेळी माझी कार घरी उभी होती आणि ती वापरात नव्हती.
मी आज सकाळी तो एसएमएस् पाहिला आणि लगेच फास्टॅग खात्यावर तक्रार नोंदवली.
मला माझी वजा झालेली शुल्क रक्कम परत हवी आहे. कदाचित नोंदविलेल्या तक्रारीवर कारवाई झाल्यावर ती रक्कम परत मिळेल.
तथापि, याची पुरेश्या गांभीर्याने चौकशी होईल याची मला खात्री करून घ्यायची आहे. शक्य झाल्यास मला टोल गेट मधून गेलेल्या वाहनाचा फोटो किंवा पुरावा हवा आहे. मी उद्या पोलीसात जाऊन या घटनेची लेखी तक्रार नोंदविण्याचा विचार करत आहे.
- याशिवाय इतर काही करण्याची आवश्यकता आहे का?
- असा फोटो किंवा पुरावा मिळतो का?
- पोलिसात तक्रार नोंदविण्याची गरज आहे का?
- इतर कुणाला असा अनुभव आला आहे का?
माहिती / सल्ला याबद्धल मिपाखरांचे आधीच धन्यवाद.
- (तेलंगणातील वाहनमालक) द्येस्मुक् राव
प्रतिक्रिया
8 Jan 2025 - 4:05 pm | विजुभाऊ
पोलीसात तक्रार नोंदवण्याची गरज आहे.
कारण कोणीतरी तुमच्या नंबरप्लेटचा वापर करतो आहे.
मी चारचाकी गाडी विकताना टोल फास्टॅग स्टीकर काढून घेतले होते. मात्र ते अकाउंट इनॅक्टीव केले नव्हते.
ज्याने गाडी घेतली तो कर्नाटकला घेऊन गेला. मात्र जाताना प्रत्येक ठिकाणचा टोल त्या फास्टॅग अकाउन्ट मधून जात होता.
मी कार डीलर कडे तक्रार केली. त्याने स्वतः च्या खिशातुन ते पैसे मला दिले.
माझा दुसरा अनुभव आरटीओचा
त्याच चारचाकी गाडीचा गाडी विकल्यानंतर वर्षभराने मला गाडी विदाउट हेल्मेट चालवल्याचा गुन्हा यासाठी साठी दंड केल्याचा मेसेज आला.
गम्मत म्हणजे त्यानी फोटो दिला होता तो एका स्कूटरचा होता.
मी ग्रीव्हन्स पोर्टलवर तक्रार नोंदवली.
तीन दिवसात मला माझ्यावरचा गुन्हा मागे घेतल्याचा मेसेज आला आणि मुंबईपोलिसांच्या पोर्टलवरही ते अपडेट झालेले होते.
एक शंका आहे. माझ्या जुन्या गाडीचा नम्बर पोलीसांच्या लेखी अजूनही माझ्याच नावावर आहे.
ते कसे बदलून घ्यायचे. गाडी ज्याने विकत घेतली त्याची माहिती माझ्याकडे नाही.मात्र माझ्याकडे असलेला एकमेव पुरवा म्हणजे ट्रान्सफर ची पावती डिलरने दिलेली आहे.
( गाडी चोरीला गेल्याची तक्रार देऊ का असा एक द्वाड विचार येऊन गेला.)
पण या सगळ्यासाठी कुठे विचारणा करायची ते माहीत नाहिय्ये
8 Jan 2025 - 7:15 pm | चौथा कोनाडा
अश्या भानगडी ऐकण्यात आल्याने मी चारचाकी विकताना सर्व कागदपत्राबरोबर फास्टॅग रद्द करण्याच्या , आणि फास्टॅग मध्ये शिल्लक असलेले पैसे माझ्या खात्यात वळते करण्याचा ऑनलाईन अर्ज केला. ८-१० दिवसात ही प्रकिया पुर्ण होऊन माझ्या खात्यात शिल्लक पैसे जमा झाले.
8 Jan 2025 - 5:12 pm | कंजूस
गाडी विकल्यावर या मालकाचा या वाहनांनी आजपासून काहीही संबंध नाही अशा स्वरूपाची पावती आरटिओ खात्याकडून मिळायला हवी. इतर बाबतीत तत्पर असणारे खाते इकडे अपडेट्स कधी आणणार? संगणकीकरण झाले आहे ना?
8 Jan 2025 - 6:38 pm | अनिकेत वैद्य
8 Jan 2025 - 6:38 pm | अनिकेत वैद्य
8 Jan 2025 - 8:42 pm | अनिकेत वैद्य
https://www.youtube.com/post/Ugkxjl2VEa3nOvWVEjpZ40WBM-iPjCX0wfdP
8 Jan 2025 - 8:42 pm | अनिकेत वैद्य
https://www.youtube.com/post/Ugkx2EpVSGd59116umr_wEjWF2BKmFq2ozzy
8 Jan 2025 - 9:44 pm | श्रीगुरुजी
का
8 Jan 2025 - 9:45 pm | श्रीगुरुजी
https://www.lokmat.com/pune/car-is-outside-the-house-and-toll-is-being-d...
13 Jan 2025 - 5:07 am | वामन देशमुख
माझ्या ओळखीचे एक गृहस्थ, housekeeping, security, support वगैरे मनुष्यबळ पुरविण्याच्या व्यवसायात आहेत. त्यांची काल भेट झाली. ते अनेक ठिकाणी टोल नाक्यांवरही मनुष्यबळ पुरवितात.
माझ्या या फास्टॅग भुर्दंडाबद्धल त्यांच्याशी बोललो. ते हसून म्हणाले, "हा प्रकार अगदी सामान्य आहे. टोल नाक्यांवर जितके आर्थिक गैरप्रकार होतात तितके कदाचित इतर कुठेही होत नसतील! तुमचे गेलेले पैसे एचडीएफसी फास्टॅगकडून कदाचित परत मिळतील. पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला हरकत नाही पण त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त आपला वेळ वाया जाईल."
13 Jan 2025 - 5:10 am | वामन देशमुख
दरम्यान मी थोडी ऑनलाइन शोधाशोध केली. असे प्रकार बऱ्याच प्रमाणात होतात असे दिसते.
टीम बीएचपी चा हा धागा -
FASTag: Money deducted when the car was parked at home!
वर्षभरापूर्वीची ही एक बातमी -
Money deducted from FASTag accounts even when vehicles not on roads
अजून एक बातमी -
Toll deducted but car was at home
रेडिट वरचा हा धागा -
Fastag deduction happened while car is at home and I travelled in bike
14 Jan 2025 - 12:39 pm | चौथा कोनाडा
बरंच उत्खनन केलेलं दिसतंय आपण...
यांची एखादी युनियन नाही का ? असल्या आचरटपणाशी एकत्र येऊनच लढा द्यावा लागेल...
(असल्या फालतू कारणासाठी झगडावं लागतं ही खरंच लाजिरवाणी बाब आहे)
नाय तर तुमीच स्थापन करा " आखिल मराठी फॅस्टॅग पिडित संघटना" अन करा सुरू !
13 Jan 2025 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्याछुट, देशातील एका हिंदू बांधवाला हिंदूचं सरकार असूनही अशा प्रकारे न वापरलेल्या रस्त्याचं टोलला सामोरं जावं लागलं, वाईट वाटलं. दु:ख झालं. महाराष्ट्र आणि केंद्रसरकारबद्दल सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतो. साल्यांनो अरे माणसाचा धर्म तरी बघत जा. बाय द वे, हे लोक धर्म बघून चलन कापत नाही, हेही या निमित्ताने सिद्ध झालं. अर्थात, आपल्या गोबरयुगात पैशांच्या कापाकापी आणि लुटमारीचं अजिबात आश्चर्य वाटत नाही. (हलकेच घ्या )
आता मुद्द्यावर येऊ. बाकी, न गेलेल्या रस्त्यावरुन टोल घेतला, कापला असा अनुभव आला नाही. काल विद्यापीठात मंत्री येणार होते, अभिजात मराठीच्या कौतुकाचा कार्यक्रम होता. विद्यापीठाच्या कार्यक्रमात डोकावून जाऊ आणि लवकर निघता येईल अशा बेताने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. मंत्र्याच्या स्वागतासाठीच्या प्रवेशद्वारावर मित्रमंडळीसोबत उभा राहिलो. मंत्री आले नाहीत कंटाळा आला. पण, मंत्री येणार म्हणून जो फौजफाटा येतो त्या फौजफाट्यात सर्वात पुढे ते ट्राफीकवालेही असतात त्या ट्राफीकवाल्याने आपल्या गाडीचा फोटो काढून पंधराशे रुपयाची पावती फोटोसहित पाठवली. पंधराशेचा मेसेज आल्याने मुड ऑफ झाला. शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं. थोडा त्रास झाला असता पण गाडी गर्दीत कुठेतरी कोंबली असती तरी चालले असते असे वाटले. कार्यक्रम सोडून तसाच निघालो. धन्यवाद.
आता आपल्या दुस-या मुद्द्याकडे येतो. प्रश्न बहात्तर रुपयांचा नाही, पण ज्या पद्धतीने हे झालं त्या अशा लहान-सहान गोष्टींचा राग येतो. ताण होतो. व्यवस्थेविरुद्ध पेटून उठावे वाटते, हे केलंच पाहिजे. जीवंतपणाचे लक्षण आहे. असं म्हणतात की, ''आदमी मरने के बाद कुछ नही सोचता, आदमी मरने के बाद कुछ नही बोलता, कुछ नही सोचने और कुछ नही बोलने पर आदमी मर जाता है'' आपण जीवंत आहोत तेव्हा बोलले पाहिजे आणि व्यवस्थेविरुद्ध भिडले पाहिजे.
मला असा ताण या पार्किंगवाल्यांचा येतो. आठेक दिवसापूर्वी रेल्वे स्टेशनला गाडी उभी केली. आजुबाजूला गाड्या उभ्या होत्या म्हणून लावून दिली. परत आलो तेव्हा एक मुलगा पावतीचं इलेक्ट्रीक मशीन घेऊन माझ्या स्वागतासाठी उभा होता. मला पाहून मशीन वर केलं म्हणाला पच्चीस रुपये. म्हटलं पार्किंग किधर है, त्याने पाचशे मिटरवर लावलेला बोर्ड दाखवला. म्हटलं, भाई पार्किंगकी जगह उधर है, तू पार्किंग के पैसे इधरसे ले रहा है, ये कुछ ठीक नही है. ( त्याचा आव नम्र होता, म्हणून माझा टोन मोठा केला. तो जर मोठ्या आवाजात बोलला असता तर, मी फार घासघीस केली नसती. हल्ली असे वाद परवडत नाही) दहा रुपये देव, म्हटला आणि विषय संपला.
आता आपल्या तिस-या मुद्द्याकडे येऊ. पोलिसात तक्रार द्यावी काय ? मला असे वाटते की, जर आपण टोल नाक्यावरुन गेलो नाही हे नक्की असेल आणि त्याचा दंड भरावा लागलाय असे वाटत असेल तर, पोलिसांकडे न जाता पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार नोंदवावी, तेच अशा तक्रारींचा त्यांच्या पद्धतीने फॉलोअप घेतील असे वाटते. अर्थात, यात वेळ फार जातो आणि काय लागेल ते माहिती नाही प्रयत्न करावे लागतील, यश अपयश हा नंतरचा भाग.
माझा सायबर तक्रारीचा एक अनुभव सांगून थांबतो. फेसबूकवर माझा फोटो चिकट्वून कोणी तरी, नवे डू अकाउंट करुन कोणत्या तरी हॉस्पीटलमधील कोणत्या तरी मुलाचा आयसीयूमधील गंभीर मुलाचा फोटो डकवून माझ्या मित्रमंडळींना मेसेंजेसवर वीस हजार रुपयांची मागणी केली होती. ताण आलाच, मग मी प्रत्यक्ष सायबर विभागाकडे तक्रार केली. दोन चार वेळी प्रत्यक्ष कार्यालयात भेटी दिल्या. अशी हजारो प्रकरणे त्यांच्याकडे असतात. पण, जो पर्यंत कोणी पैसे दिलेले नसतात, कोणी फसत नाहीत. तो पर्यंत ते काही गांभीर्याने प्रकरण हातात घेत नाहीत, असे वाटले. रिपोर्ट करा वगैरे सांगून आता ते प्रकरण जवळजवळ मी विसरत चाललो आहे.
पण, तुम्ही पाठपुराव करीत राहा. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
13 Jan 2025 - 11:05 am | धर्मराजमुटके
सर,
जेवणात पाच पक्वान्न असावीत पण वाढप्याने आपणाला वाढायचा अगोदर शिंकून, खोकून हात साफ न करता त्याच हाताने वाढायला सुरुवात केल्यावर अन्नावरची वासना निघून जाते तसं हल्ली आपले प्रतिसाद वाचताना होते.
तुमच्या प्रतिसादातील पहिला परिच्छेद अगदीच अस्थानी आहे. पुढील प्रतिसाद वाचनिय असला तरी ते वाचण्याची इच्छा निघून गेली.
असो. आपल्या दु:खात सहभागी आहे.
13 Jan 2025 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचकांना आवडतं असं वाढायला जमेल की नाही माहिती नाही.
पण, हळुहळु निश्चित प्रयत्न करीन.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
( अस्वच्छ जालीय वाढपी )
13 Jan 2025 - 4:57 pm | वामन देशमुख
(त्यांच्या जेवणात पाच पक्वान्ने असतात हे वगळता) पूर्ण प्रतिसादाशी आणि आशयाशी पूर्णत: सहमत. प्रोफेश्वरांबद्धल सहानुभुती वाटते.
13 Jan 2025 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डुप्लीकेट आयडीने लिहायचं ना हे सगळं...=))
-दिलीप बिरुटे
13 Jan 2025 - 4:55 pm | वामन देशमुख
नाहीतरी तुम्हाला (आणि आता मिपावर नसलेल्या, शेणपट्ट्यात वळवळणाऱ्या एकाला) मिपाखरे काही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे हलकेच घ्या असं तुम्ही लिहिलं काय नाही लिहिलं काय, फरक पडत नाही!
असंच लिहीत रहा, काहीवेळा वाचायला मजा येते.
13 Jan 2025 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.=))
-दिलीप बिरुटे
14 Jan 2025 - 11:07 am | वेडा बेडूक
किमान शब्दांत कमाल अपमान!
14 Jan 2025 - 7:46 pm | सुबोध खरे
बिरुटे सर
प्रत्येक धाग्यावर आपला वैयक्तिक आकस आणण्याची आवश्यकता नाही.
त्यामुळे आपल्याला काय सांगायचं आहे ते अगदी उत्तम असलं तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.
त्यातून जर आपले १५०० रुपये गेल्याचा राग असा दुसरीकडेच निघाबणार असेल तर कठीण आहे. हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढल्यासारखे आहे
आपली राजकीय मते राजकीय धाग्यावर अगदी आवेशाने व्यक्त करा. परंतु वैयक्तिक आकस किंवा राग असा प्रत्येक धाग्यावर येणार असेल तर लोक तुम्हाला सुद्धा भुजबळांच्या* पंक्तीला बसवण्यास वेळ लागणार नाही.
* अमरेंद्र बाहुबली * उर्फ भुजबळ हे कोणत्याही धाग्याचा असाच विचका करत असतात
14 Jan 2025 - 8:09 pm | मुक्त विहारि
त्यांना पंख फुटले...
14 Jan 2025 - 1:39 pm | वामन देशमुख
कापले गेलेले पैसे आज सकाळी परत आले.
सविस्तर नंतर लिहितो.