आपण मि.पा.वर ज्याप्रमाणे मराठी टाइप करतो त्याच प्रकारे माक्रोसॉफ्ट वर्ड,पॉवर पॉइ॑ट्,फोटोशॉप मध्ये टाइप करु शकतो का? पा॑पारिक पध्दत खुपच क्लीस्ट वाट्ते.कोणी काही सुचवु शकतो का?
मिसळपाव वर मराठी लिहीण्याला दोन बाजू आहेत. त्यापैकी एक आहे की लिहीण्याची पध्दत सोपी आहे. या पध्दतीला फोनोटी़क असे म्हणतात. यात जसे एखाद्या शब्दाचे इंग्रजी स्पेल होईल तसे लिहील्यास मराठी उमटतं. यात काही मुळाक्षरांसाठी काही बदल जरा वेगळे आहेत. मात्र ते लक्षात यायला फार वेळ लागत नाही.
याची दुसरी बाजू अशी की मिसळपाव वर युनिकोड मानकात (स्टॅन्डर्ड) लिहील्या जाते. याचा फायदा असा की यात एका फॉन्ट मध्ये लिहीलेले असल्यास दुसर्या कुठल्याही युनिकोड फॉन्टमध्ये तुम्ही मराठी मजकूर वाचू शकता. मूळ फॉन्टच असने आवश्यक नाही. दुसरा मोठा फायदा असा की ह्या युनिकोड मध्ये लिहीलेली माहिती तुम्ही शोधू शकता. शोध यंत्राद्वारे तुम्ही मिसळपाववरचा एखादा लेख शोधू शकता.
आता आपण संगणकावरच्या मराठीकडे वळूया.
संगणकाच्या नवीन चालणाप्रणालींमध्ये युनिकोडला समर्थन आहेच. त्यामुळे युनिकोडमध्ये लिहीलेला मजकूर विन्डोज, लिनक्स, सोलराईज, किंवा फ्रिबिएसडी आदी आघाडीच्या चालणाप्रणालींमध्ये सहज वाचू शकता.
मात्र काही सॉफ्टवेअर अद्याप युनिकोडला समर्थन देण्यास अजून सक्षम झालेले नाहीत. जसे एडोब. एडोबच्या कुठल्याच पॅक मध्ये युनिकोडचं समर्थन नाहीये. फोटोशॉप, इलिस्ट्रेटर आदीं मध्ये युनिकोड चालत नाही.
विन्डोजच्या नोटपॅड आणि वर्डपॅडमध्ये युनिकोड लिहू शकतो मात्र अनेकदा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये युनिकोड लिहीतांना अडचणी येतात. मजकूर वाचू शकतो. मात्र लिहीतांना कधी कधी अडचण येते.
यावर उपाय म्हणजे एकतर युनिकोड समर्थीत सॉफ्टवेअरमध्ये लेखन करणे किंवा फोनोटीक सपोर्ट असलेले आधीच्या पध्दतीचे फॉन्ट वापरा. आता आघाडीचे मराठी फॉन्ट निर्माते युनिकोड आणि फोनोटीक या दोन्हींना समर्थन देत आहेत. त्यामुळे ते फॉन्ट वापरून तुम्ही हव्या त्या सॉफ्टवेअर मध्ये लेखन करू शकता. जे सॉफ्टवेअर युनिकोडला सपोर्ट करतात तेथे बराहाचा आयएमई वापरावा आणि जे करत नाही तेथे फोनोटीक प्रकारचे फॉन्ट वापरावे.
अनेक फोनोटीक फॉन्ट विकत घेऊ शकता. येथे एक मोफत आणि सुंदर फॉन्ट सुचवतो. हा फोनोटीक आहे आणि विन्डोजच्या सर्व सॉफ्टवेअर मध्ये तो चालतो.
या फॉन्टचे नाव आहे किरण फॉन्ट. सहज गुगल शोध घेतल्यास हा सापडेल. मी हा वापरायचो त्याकाळात आपल्या ईमेल या संकेतस्थळावर दिल्यास तुम्हाला तो फॉन्ट पाठवण्यात येई.
यात आरती, अमृता आणि किरण असे तीन फॉन्ट आहेत.
या विषयावर काही अडचण आल्यास कळवा किंवा किरण फॉन्ट न सापडल्यास सुध्दा सांगा.
ह्या विषयी श्रीलिपी वापरनारा कुणी मदत करेन.
ह्या प्रकारासाठी रुपांतर सॉफ्टवेअर येतात. आकृती सॉफ्टवेअर अशी सुविधा देते असं ऐकून आहे. श्रीलिपी वाल्यांना विचारा की अशी काही सोय त्यांच्याकडे आहे का?
प्रतिक्रिया
26 Dec 2008 - 7:16 pm | विनायक पाचलग
यासाठी आपण आक्रुती,गमभन किंवा बाराहा हे फाँट डाउन्लोड करुन इनस्टाल कर आणि येथे जसे लिहितोस तसे लीही,
शुभेच्चा
26 Dec 2008 - 8:42 pm | नीलकांत

नीलकांत
27 Dec 2008 - 4:30 pm | अन्वय
श्रीलिपीतील मजकूर युनीकोड फॉन्टमध्ये कसा रुपांतरीत करता येईल, याविषयी माहिती हवी आहे.
29 Dec 2008 - 10:02 am | दिपक
श्रीलिपीतील मजकूर युनीकोड फॉन्टमध्ये कसा रुपांतरीत करता येईल
त्यासाठी परिवर्तक हे सॉफ्टवेयर तुम्हाला इन्स्टॉल करावे लागेल. ते इथे मिळेल.
अधिक माहितीसाठी माधव शिरवळकरांचा हा ब्लॉग आपली नक्की मदत करेल.:)
----दिपक
27 Dec 2008 - 4:33 pm | नीलकांत
ह्या विषयी श्रीलिपी वापरनारा कुणी मदत करेन.
ह्या प्रकारासाठी रुपांतर सॉफ्टवेअर येतात. आकृती सॉफ्टवेअर अशी सुविधा देते असं ऐकून आहे. श्रीलिपी वाल्यांना विचारा की अशी काही सोय त्यांच्याकडे आहे का?
नीलकांत
27 Dec 2008 - 10:29 pm | बोका
फॉन्टसुविधा हे सॉफ्टवेअर बरेच फॉन्टस् रुपांतरीत करते.
http://www.fontsuvidha.com/
29 Dec 2008 - 9:51 am | दिपक
ही सेटींग केल्यावर तुम्ही वर्ड, एक्सेल कुठेही अगदी नोटपॅड मध्ये मराठीत लिहु शकता.
विंडोज एक्स्पी ची सीडी टाका.
कंट्रोल पॅनेल--->रिजनल आणि लॅंग्वेज ऑप्शन---->लॅंग्वेजस--->सप्लीमेंट लॅंग्वेज सपोर्ट---

खाली दिलेल्या दोन्ही ऑप्शन्स वर क्लिक करा.
पिसी रीस्टार्ट करा.
आता बरहा ७ हे सॉफ्टवेयर www.baraha.com ह्या साईट्वरुन डाउनलोड करुन इन्स्टॉल करा.
बस आता बरहा चालु करुन तुम्ही वर्ड, एक्सेल, नोटपॅड, वर्डपॅड मध्ये मराठीत टाइप करु शकता..:)