इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती गुरुवारी (14 नोव्हेंबर, 2024) रोजी असे म्हणाले की, https://timesofindia.indiatimes.com/india/invaders-colonisers-ruined-our...
"इतिहास असे सांगतो की वैदिक काळापासून अनेक आक्रमणे होईपर्यंत गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया यातील नवनवीन कल्पनां मांडणारे भारत एक आघाडीचे राष्ट्र होते. या सगळ्यात अध्ययन, अध्यापन व संशोधन यात भारत अग्रेसर होता. "
"पण 700 AD ते 1520 AD याकाळात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील नेते आणि त्यानंतर ब्रिटिश वसाहतींमुळे भारतीय तरुणांना त्यांच्या विज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी यासह इतर गोष्टींमधे अजिबात प्रगती करता आली नाही. सुमारे 1,000 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना बळजबरीने रोखून धरलेले होते. प्रगतीच्या वाटा रोखून धरलेल्या होत्या."
"इतिहास हे देखील सांगतो की अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राज्यकर्त्यांना विज्ञान, वैद्यक आणि गणिताची फारशी कदर नव्हती. ब्रिटिश विजेत्यांनी गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि शस्त्रक्रिया या विषयांत महत्त्वाकांक्षी आणि काल्पनिक कार्य करण्याच्या आमच्या इच्छेला तुरळकपणे प्रोत्साहन दिले, परंतु आमची प्रगती मंदावलेलीच राहीली."
"ते पुढे म्हणाले की, भारतीय तरुणांना विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र, निसर्गाचे निरीक्षण करण्याची शक्ती, कुतूहल, अनुमान काढणे, गंभीर आणि विश्लेषणात्मक विचार, शोध आणि नवकल्पना, आणि समस्या व्याख्या आणि समस्या सोडवणे या सर्व गोष्टींपासून १००० वर्षे लांब ठेवण्यामुळे, भारतीय तरूणांचे अतोनात नुकसान झालेले आहे."
श्री. नारायण मूर्ती हे समाजवादी विचारसरणीचे असल्याचे मानले जाते. पण लवकरच त्यांना मोदीभक्तांमधे सामील केले जाईल असे वाटायला लागले आहे. 🤣
मला तर आता भिती वाटायला लागली आहे की, असाच एखादा जेएनयुमधील कम्युनिस्ट विचारसरणीचा माणूस असेही म्हणेल की, भारतात नवविचार मांडणे, संशोधन करणे याची खूप मोठी परंपरा आहे. जर भारतावर आक्रमणे झाली नसती. इथली ज्ञानसंपदा नष्ट झाली नसती. इथल्या अभ्यासकांना कवट्यांचे मिनार बनून आपले जीव गमवायची पाळी आली नसती तर कदाचित औद्योगिक क्रांती युरोपमधे न होता ती भारतातच झाली असती व ती सुध्दा ६००-७०० वर्षे अगोदरच झाली असती.
😉
मला तर असेही वाटायला लागले आहे की, मोदींचे अंधभक्त आता वाढायला लागले आहेत. नारायण मूर्तींसारखी जीवनांत यशस्वी झालेली माणसे,आपली बुध्दी मोदींच्या चरणी गहाण टाकायला लागली आहेत हे पाहून त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटायला लागली आहे. राममंदीर तोडून बाबरी मशिद बांधणाऱ्या बाबराचा उदोउदो करायचे सोडून त्या बाबरालाच दोषी समजायला लागली आहेत. बुरसटलेले विचार पसरवणारी नालंदा, तक्षशीला येथील भव्य ग्रंथालये जाळून नष्ट करणाऱ्या लोकांना नतद्रष्ट म्हणायला लागली आहेत. मोठमोठे ग्रंथ तोंडपाठ असणारे माणसे म्हणजे तर चालती फिरती ग्रंथालये. त्यांची मुंडकी उडवण्याचे व त्या मुंडक्यांचे मनोरे रचण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व आक्रमकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे दु:साहस जर नारायण मूर्तींसारखे विद्वान करायला लागले तर भारताची किती वाट लागेल याची कल्पनाच करवत नाही. हिंदूंची मोठमोठी मंदीरे ही तर एकप्रकारची बुरसटलेली विचार मांडणारी छोटीछोटी ग्रंथालयेच होती. त्यातही चालती बोलती फिरती ग्रंथालये असायची. भारतवर्षाला या सगळ्यांतून मुक्ती मिळवून देण्याचे महान कार्याला आज कमी लेखले जायला लागले आहे.
तरीपण बाबर, औरंगजेब असे थेट उल्लेख न करता "उझबेकिस्तानमधील राज्यकर्ते" असे शब्द वापरून नारायण मूर्ती साहेबांनी अजून तरी १०० टक्के मोदीभक्त न झाल्याचे दाखवून दिले आहे. तरीपण योगी आदित्यनाथ यांना मदत होईल अशी व्यक्तव्ये ऐकली की मनाला खूप व्यथा झाल्याशिवाय राहात नाही. 🤣
हे वाचल्यावर असे वाटायला लागले की
१. योगी आदित्यनाथ "बटेंगे तो कटेंगे" याचा परिणाम खरोखरच होतो आहे काय ?
किंवा
२. त्यामुळेच मतदान वाढते आहे का?
तसेच
३. हे वाढते मतदान भाजपालाच लाभदायक ठरेल हे कशावरून ?
वाढत्या मतदानाच्या बाजूने फक्त भाजपाच बोलत असल्याने भाजपाच्या चष्म्यातून प्रथम सगळा विचार करायचे ठरवले तेंव्हां खालील मुद्दे जाणवले.
तर लोकहो मतदान वाढेल व ते हिंदूंचे असेल असे समजून मुद्दे शोधायचा प्रयत्न करू.
मतदान टक्केवारी वाढण्याची कारणे खालील असावीत असे वाटते आहे.
१. मोदी शहा आपल्याला गृहीत धरायला लागले आहेत अशी समजून भाजपाला मत देणाऱ्यांची व्हायला लागली होती. त्यांसाठी एक हलकासा धक्का मोदी शहांना बसावा अशी एक सुप्त इच्छा जाणवत होती. पण मोदींचे बहुमत जावं एवढा काही राग नव्हता. त्यामुळे भाजपा २४० पर्यंत आल्यावर त्या लोकांच्या लक्षात आलं की जरा जास्तच जोरात धक्का मोदी शहांना मारलाय. ती लोकं परत येतील.
२. ४००+ पर्यंत आरामात आपण जातोय या नादात काही लोकं फिरकलीच नाहीत. ४००+ नाऱ्यामुळे गाफीलपणा वाढला. पूर्वी शिवाजी महाराज शत्रूगोटात गाफीलपणा यावा यासाठी शरणागतीची हूल उठवत असत. इथे तर आपलीच लोकं गाफील राहण्यासाठी प्रयत्न केला गेलाय. ती चूक दुरूस्त होताना दिसते आहे.
३. यावेळेस आरएसएस सक्रीय झालीय असे वाटतंय. लोकसभेत जरा थंडपणा जाणवला होता. नेहमीची उत्साही मंडळी गायब झाल्याचे लक्षात आले होते. ती परत दिसायला लागली आहेत.
४. बांगला देश फॅक्टर खूप प्रभावी ठरेल असे वाटतंय. सैन्य व रेल्वेच्या खालोखाल वक्फ बोर्डाकडे जमीन आहे हे बऱ्याच जणांना प्रथमच कळतंय असं वाटतंय. वक्फ बोर्डावर सरकारचे काहीच नियंत्रण नाही याउलट हिंदूंच्या मंदिरांवर सरकारचे संपूर्ण नियंत्रण हा आपपर भाव प्रथमच हिंदू धार्मिक लोकांच्या लक्षात येतोय. त्यामुळे किर्तनकार, प्रवचनकार, वारकरी आपआपसात काही बोलत असतील तर तो अंडर करंट खूप मोठा असू शकतो.
५. नेमानी सारख्या लोकांनी आपल्या मागण्या ऊघडरित्या मांडायला सुरवात केल्याने मविआची पंचाईत होतीय तर लोकांमधे धृविकरण होतंय. बंद दाराआड करायच्या गोष्टी हा माणूस सर्व दारं खिडक्या सताड उघडून का करतोय हे उबाठामधल्या कित्येकांना कळेनासं झालं असेल.
६. भाजपाच्या धोरणांना आंतरराष्ट्रीय परिस्थिती खूप अनुकूल आहे. आहेरे वर्गातले, सुशिक्षीत, परदेशात राहणारे असे बरेच हिंदू आहेत की ते भाजपाच्या मुस्लीम धोरणांबाबत संपूर्णपणे तटस्थ आहेत. मुस्लीमांनी देवळे फोडली. लोकं मारली हे त्यांना माहीत आहे. पण त्याचे त्यांना सोयरसुतक फारसे नाही. तो इतिहास झाला. तो आता उगाळून आता काय फायदा हा त्यामागे व्यवहार्य विचार असतो. पण मुस्लीम राष्ट्रांत मंदिरे उभारायला मुस्लीमच मदत करताहेत हे पाहिल्यावर तेही प्रथमच विचार करायला लागले आहेत. स्पेन, इंग्लंड, जर्मनी मधे मुस्लीमांचे अतिरेकी वागणे व त्यावर त्या देशांनी केलेली कार्यवाही यामुळे यालोकांना प्रथमच असे वाटायला लागले आहे की भाजपा जे काही मुद्दे मांडतो आहे त्यात काहीतरी तथ्य असावे. बांगलादेशातील घटनांमुळे या सगळ्यावर फोकस पडून जणूकाही त्याकडे बहिर्गोल भिंगातून तपासणी सुरू झाली आहे.
७. कॅनडा प्रकरणातूनही भारताचे हित व अहीत या मुद्यांतून परकीय भारतीय विचार करायला लागले की काय असे वाटायला लागले आहे.
७. यातूनच ट्रंप हा भारताचा मित्र व ओबामा वगैरे भारताचे हितशत्रू असा काहीसा प्रकार अमेरिकेत प्रथमच होऊन डेमोक्रोटीक पक्षाकडील हिंदू मते रिपब्लिकनांकडे वळली असावीत असा संशय यायला लागला आहे. ट्रंप यांचा विजय ऐतिहासीकच मानावा लागेल. दोन्ही सभागृहे व इलोक्टरल मतांनामधील त्यांचा विजय हा काही निसटता विजय म्हणता येत नाहीये . त्याला निर्विवाद विजयच म्हणायला लागेल. या सर्व घडामोडींचे पडसाद त्यांच्या भारतातील नातेवाईक व परिचीतांमधे उमटणे साहजिक आहे. त्यामुळे परदेशीय भारतीयांचे भारतातील नातेवाईक व तत्सम श्रेणीतील आहेरे वर्गातली लोकं प्रथमच भाजपाचा मुस्लीम विरोधाकडे डोळसपणे पहावयास सुरवात करायला लागले असावेत असं वाटू लागलं आहे. याबाबत नारायण मूर्तींचे उदाहरण दिलेले आहेच.
या सगळ्यामुळे हिंदूंचे मतदान वाढेल अशी मी समजूत करून घेतलेली आहे.
त्याच बरोबर यातूनच मी काश्मिर व हरियाना निवडणूकांकडे पाहातो आहे. मला असे वाटते आहे की,
१. हिंदूं हितैषी मतदान वाढण्याचा गेल्या ४० वर्षांचा कल चालूच राहीलेला असून, प्रथमच हिंदूबहुल जम्मूमधून कॉंग्रेस संपूर्णपणे उखडली गेली आहे. पंडितांच्या पलायनाच्यावेळी व त्यानंतरही कॉंग्रेस १०-११ आमदार निवडून आणू शकत असे.
२. हुरियत कॉन्फरन्स किंवा तत्सम उमेदवार खूप मोठ्या प्रमाणावर उभे राहूनही त्यांना काश्मिर खोऱ्याने नाकारलेले आहे. यांच्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच राष्ट्रीय आहे असे माझे मत आहे. त्यांनी नक्कीच काश्मिरसाठी जास्त तुरूंगवास भोगला आहे. हाल सहन केले आहेत. स्वतंत्र उमेदवार जेवढे पाकिस्तान धार्जिणे असतील त्यापेक्षा नॅशनल कॉन्फरन्स नक्कीच कमी पाकिस्तान धार्जिणी असेल. ही गोष्टही भाजपाच्या धोरणाला अनुकूल आहे असे मला वाटते. कारण मुल्ला मौलवी धार्जिण्या मुस्लिमांकडून राष्ट्रीय मुसलमांनाकडे मतदान जाणे ही भारताच्या दृष्टीने खूपच भाग्याची गोष्ट मी समजतो.
३. हरियानामधे कॉंग्रेसची मते २७% वरून ३९% पर्यंत गेली तर भाजपाची ३६% वरून ३९% पर्यंत गेली. धृविकरण झाले लोकसभेचे तंतोतंत प्रतिबिंब विधानसभेत पडले यात वादच नाही. पण वाढलेले मतदान हे सर्वस्वी भाजपाकडेच गेले हे त्यातूनच लक्षात आले. त्यामुळेही माझ्या पहिल्या भागाला पुष्टी मिळाली असेच वाटले.
४. झारखंडातही पहिल्या फेरीचा तोच मतदान वाढीचा कल दिसून येतो आहे.
मोदींच्या बाबतीत काहीही लिहीले की, काही जणांकडून विरोध होतो. त्यामुळे वाचकवर्गातील मोदीविरोधकांना यांत काहीच तथ्य नाही असे वाटते. त्यातून काहीही ते शिकणे शक्यच नसते. त्यामुळे ते आहेत तिथेच राहतात. बऱ्याच जणांची वागणूक शेखर गुप्तांसारखी असते. त्यांना दिसत असूनही पहावयाचे नसते. ते तर मी मांडलेले मुद्दे फारच हिरीरीने खोडून काढतात. माझ्या पोस्टमुळे मोदी विरोधकांचा यत्किंचीतही फायदा होऊ नये याची अत्युच्च दर्जाची काळजी त्यांच्यामुळे घेतली जाते.
याउलट मोदी आवडणारे सगळं वाचतात. त्यांचे मोदीप्रेम वाढते. कुंपणावर बसलेला मोदींकडे सरकायची शक्यता वाढीस लागते. मुख्य म्हणजे ही लोकं माझ्या पोस्टला
अनुमोदन देत नाहीत. यामुळे होत काय की, माझ्या पोस्टचा फायदा युतीला किती झाला हे कधीच कळत नाही. त्यामुळे मोदी विरोधक कायमच निकाल येईपर्यंत जिंकलेल्या अवस्थेत राहतात.
तर आता आपण वाढलेले मतदानाचे आकडे जिल्ह्याप्रमाणे पाहू. (प्रतिसादामधे वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणे यादी दिलेली आहे.)
जिल्हा - केंद्राचे नाव : वाढ अथवा घट
Ahmednagar-Shrigonda : 6.12
Ahmednagar-Shrirampur : 6.07
Ahmednagar-Rahuri : 5.8
Ahmednagar-Ahmednagar City : 5.1
Ahmednagar-Shirdi : 4.83
Ahmednagar-Akole : 3.57
Ahmednagar-Sangamner : 3.2
Ahmednagar-Shevgaon : 3.18
Ahmednagar-Karjat jamkhed : 0.68
Ahmednagar-Parner : -0.25
Ahmednagar-Nevasa : -0.56
Ahmednagar-Kopargaon : -5.07
Akola-Murtizapur : 12.07
Akola-Akola West : 6.96
Akola-Akola East : 5.53
Akola-Balapur : 4.55
Akola-Akot : 4.2
Amravati-Teosa : 9.25
Amravati-Melghat : 7.58
Amravati-Amravati : 6.55
Amravati-Morshi : 5.38
Amravati-Badnera : 5.22
Amravati-Achalpur : 4.8
Amravati-Dhamamgaon railway : 3.08
Amravati-Daryapur : 2.89
Aurangabad-Vaijapur : 12.76
Aurangabad-Gangapur : 8.87
Aurangabad-Paithan : 5
Aurangabad-Sillod : 4.85
Aurangabad-Phulambri : 2.34
Aurangabad-Aurangabad West : 1.2
Aurangabad-Kannad : 0.75
Aurangabad-Aurangabad central : -0.35
Aurangabad-Aurangabad East : -0.57
Beed-Ashti : 8.36
Beed-Parli : 2.15
Beed-Kaij : 0.11
Beed-Georai : -1.51
Beed-Majalgaon : -1.62
Beed-Beed : -3.69
Bhandara -Bhandara : 5.11
Bhandara -Tumsar : 3.35
Bhandara -Sakoli : -0.92
Buldhana-Mehkar : 9.42
Buldhana-Chikhli : 6.25
Buldhana-Sindkhed Raja : 5.81
Buldhana-Khamgaon : 5.39
Buldhana-Buldhana : 3.88
Buldhana-Jalgaon (Jamod) : 3.22
Buldhana-Malkapur : 1.86
Chandrapur -Brahmapuri : 9.04
Chandrapur -Ballarpur : 7.36
Chandrapur -Chimur : 7.11
Chandrapur -Warora : 7.04
Chandrapur -Chandrapur : 6.74
Chandrapur -Rajura : 1.56
Dhule-Dhule City : 9.6
Dhule-Sakri : 4.95
Dhule-Shindkheda : 4.49
Dhule-Dhule Rural : 4.18
Dhule-Shirpur : -0.36
Gadchiroli -Gadchiroli : 6.3
Gadchiroli -Armori : 5.42
Gadchiroli -Aheri : 3.54
Gondiya-Gondiya : 6.09
Gondiya-Amgaon : 3.78
Gondiya-Arjuni-morgaon : 0.3
Gondiya-Tirora : -0.44
Hingoli-Kalamnuri : 4.45
Hingoli-Hingoli : 4.04
Hingoli-Basmath : 0.56
Jalgaon-Jalgaon City : 9.57
Jalgaon-Bhusawal : 8.8
Jalgaon-Jalgaon Rural : 6.49
Jalgaon-Erandol : 5.15
Jalgaon-Pachora : 4.85
Jalgaon-Raver : 4.51
Jalgaon-Muktainagar : 3.09
"Jalgaon-Jamner : 2.98"
Jalgaon-Amalner : 2.64
Jalgaon-Chopda : 1.93
Jalgaon-Chalisgaon : -1.38
Jalna-Jalna : 8.51
Jalna-Bhokardan : 6.63
Jalna-Badnapur : 6.02
Jalna-Ghansawangi : 3.95
Jalna-Partur : 1.39
Kolhapur-Chandgad : 6.34
Kolhapur-Kolhapur North : 4.31
Kolhapur-Shirol : 3.37
Kolhapur-Hatkanangle : 3.07
Kolhapur-Radhanagari : 2.7
Kolhapur-Kagal : 1.3
Kolhapur-Ichalkaranji : 1.09
Kolhapur-Kolhapur South : 0.63
Kolhapur-Karvir : 0.63
Kolhapur-Shahuwadi : -1.12
Latur-Latur Rural : 8
Latur-Udgir : 7.05
Latur-Latur City : 5.88
Latur-Nilanga : 3.44
Latur-Ausa : 2.91
Latur-Ahmadpur : 1.81
Mumbai City-Mahim : 6.34
Mumbai City-Shivadi : 6.19
Mumbai City-Worli : 5.55
Mumbai City-Malabar hill : 5.54
Mumbai City-Mumbadevi : 4.75
Mumbai City-Colaba : 4.44
Mumbai City-Wadala : 4.38
Mumbai City-Sion koliwada : 3.09
Mumbai City-Dharavi : 2.45
Mumbai City-Byculla : 2.3
Mumbai Suburb-Andheri West : 10.15
Mumbai Suburb-Goregaon : 9.17
Mumbai Suburb-Versova : 9.06
Mumbai Suburb-Kurla(SC) : 8.23
Mumbai Suburb-Mulund : 7.61
Mumbai Suburb-Vandre West : 7.36
Mumbai Suburb-Borivali : 7.26
Mumbai Suburb-Bhandup West : 6.65
Mumbai Suburb-Jogeshwari East : 6.33
Mumbai Suburb-Ghatkopar East : 5.62
Mumbai Suburb-Dahisar : 5.43
Mumbai Suburb-Mankhurd shivaji Nagar : 5.05
Mumbai Suburb-Charkop : 5.03
Mumbai Suburb-Ghatkopar West : 4.91
Mumbai Suburb-Kandivali East : 4.8
Mumbai Suburb-Andheri East : 4.73
Mumbai Suburb-Vandre East : 4.29
Mumbai Suburb-Magathane : 4.13
Mumbai Suburb-Vile parle : 3.88
Mumbai Suburb-Kalina : 2.78
Mumbai Suburb-Chembur : 2.72
Mumbai Suburb-Dindoshi : 2.29
Mumbai Suburb-Vikhroli : 2.24
Mumbai Suburb-Malad West : 2.17
Mumbai Suburb-Chandivali : 1.16
Mumbai Suburb-Anushakti Nagar : -1.23
Nagpur-Nagpur North : 7.17
Nagpur-Nagpur central : 6.82
Nagpur-Nagpur West : 6.55
Nagpur-Nagpur South : 6.44
Nagpur-Nagpur East : 6.02
Nagpur-Ramtek : 5.58
Nagpur-Kamthi : 5.15
Nagpur-Nagpur South West : 4.61
Nagpur-Umred : 1.71
Nagpur-Savner : 0.77
Nagpur-Katol : 0.15
Nagpur-Hingna : -0.3
Nanded-Loha : 4.96
Nanded-Mukhed : 4.45
Nanded-Deglur : 2.19
Nanded-Bhokar : 2
Nanded-Hadgaon : 1.69
Nanded-Kinwat : 0.85
Nanded-Nanded North : 0.16
Nanded-Naigaon : -0.07
Nanded-Nanded South : -0.13
Nandurbar -Nandurbar : 11.61
Nandurbar -Nawapur : 5.57
Nandurbar -Shahada : 3.38
Nandurbar -Akkalkuwa : -0.29
Nashik-Igatpuri : 11.94
Nashik-Nandgaon : 10.85
Nashik-Nashik central : 9.08
Nashik-Sinnar : 8.98
Nashik-Yevla : 8.61
Nashik-Devlali : 8.58
Nashik-Dindori : 8.39
Nashik-Malegaon outer : 8.19
Nashik-Baglan : 8.1
Nashik-Chandvad : 7.9
Nashik-Nashik East : 7.71
Nashik-Kalwan : 5.88
Nashik-Malegaon central : 2.37
Nashik-Nashik West : 2.22
Nashik-Niphad : -1.03
Osmanabad-Umarga : 4.96
Osmanabad-Osmanabad : 2.53
Osmanabad-Tuljapur : 2.11
Osmanabad-Paranda : 1.52
Palghar -Palghar : 24.36
Palghar -Dahanu : 12.34
Palghar -Vikramgad : 9.36
Palghar -Nalasopara : 5.54
Palghar -Boisar : 0.02
Palghar -Vasai : -0.87
Parbhani -Pathri : 4.19
Parbhani -Gangakhed : 3.73
Parbhani -Parbhani : 2.99
Parbhani -Jintur : 2.08
Pune-Pune cantonment : 9.5
Pune-VADGAON SHERI : 9.24
Pune-Shivajinagar : 7.88
Pune-Kasbapeth : 7.64
Pune-Parvati : 7.11
Pune-Khadakwasala : 5.12
Pune-Chinchwad : 4.73
Pune-Bhor : 4.69
Pune-Daund : 4.51
Pune-Kothrud : 4.48
Pune-Ambegaon : 3.62
Pune-Hadapsar : 3.38
Pune-Baramati : 2.9
Pune-Bhosari : 1.83
Pune-Shirur : 1.61
Pune-Pimpri : 1.57
Pune-Junnar : 1.42
Pune-Maval : 1.38
Pune-Khed alandi : 1.18
Pune-Indapur : 0.57
Pune-Purandar : -4.72
Raigad-Mahad : 4.51
Raigad-Panvel : 4.37
Raigad-Karjat : 4.37
Raigad-Alibag : 4.27
Raigad-Uran : 2.38
Raigad-Pen : 1.53
Raigad-Shrivardhan : 0.33
Ratnagiri -Rajapur : 8.52
Ratnagiri -Ratnagiri : 5.9
Ratnagiri -Chiplun : 3.23
Ratnagiri -Guhagar : 2.42
Ratnagiri -Dapoli : 0.65
Sangli-Miraj : 10.97
Sangli-Tasgaon-Kavathe Mahankal : 6.78
Sangli-Palus-Kadegaon : 4.9
Sangli-Sangli : 4.58
Sangli-Khanapur : 4.16
Sangli-Islampur : 0.98
Sangli-Shirala : 0.31
Satara-Koregaon : 9.93
Satara-Karad North : 7
Satara-Phaltan : 6.25
Satara-Patan : 6.09
Satara-Man : 5.37
Satara-Karad South : 4.45
Satara-Satara : 4.37
Satara-Wai : -0.97
Sindudurg-Kudal : 9.53
Sindudurg-Sawantwadi : 7.72
Sindudurg-Kankavli : 4.13
Solapur-Madha : 6.35
Solapur-Solapur South : 6.07
Solapur-Solapur City North : 5.67
Solapur-Sangola : 5.2
Solapur-Akkalkot : 4.89
Solapur-Mohol : 3.68
Solapur-Solapur City central : 2.1
Solapur-Malshiras : 1.78
Solapur-Barshi : -0.08
Solapur-Karmala : -1.3
Solapur-Pandharpur : -2.19
Thane-Dombivali : 15.38
Thane-Kalyan East : 14.88
Thane-Kalyan West : 13.25
Thane-Bhiwandi Rural (S.T.) : 11.49
Thane-Airoli : 11.45
Thane-Kalyan Rural : 11.22
Thane-Kopri-Pachpakhadi : 10.65
Thane-Belapur : 10.03
Thane-Ovala - Majiwada : 9.37
Thane-Murbad : 8.87
Thane-Thane : 8.25
Thane-Ulhasnagar : 7.55
Thane-Ambernath : 6.55
Thane-shahapur : 5.61
Thane-Bhiwandi West : 4.05
Thane-Mira Bhayandar : 3.34
Thane-Bhiwandi East : 3.25
Thane-Mumbra-Kalwa : 2.08
Wardha-Wardha : 12.19
Wardha-Hinganghat : 5.89
Wardha-Deoli : 5.42
Wardha-Arvi : 4.48
Washim -Washim : 6.44
Washim -Risod : 3.86
Washim -Karanja : 3.66
Yavatmal-Yavatmal : 7.56
Yavatmal-Digras : 5.81
Yavatmal-Arni : 5.01
Yavatmal-Ralegaon : 4.34
Yavatmal-Wani : 3.47
Yavatmal-Umarkhed : 1.92
Yavatmal-Pusad : 1.34
प्रतिक्रिया
30 Nov 2024 - 8:11 pm | अमरेंद्र बाहुबली
वक्फ ला दहा कोटी देऊन दौलतजादा करणाऱ्या भाजपचे? बाबो.
30 Nov 2024 - 9:42 pm | Vichar Manus
अमरेंद्र बाहुबली सातत्याने खोट्या बातम्या टाकत आहेत, त्यांच्या विरुद्ध काही कारवाई करता येणार नाही का
30 Nov 2024 - 9:54 pm | अमरेंद्र बाहुबली
बातम्या खोट्या?? हे कोणी ठरवलं? विचार माणूस नावाच्या अविचारी आयडीने?
30 Nov 2024 - 10:15 pm | अमरेंद्र बाहुबली
नाशिक पश्चिममधील व्हीव्हीपॅट मोजणीस नकार, ईव्हीएम घोटाळा दडपण्यासाठी मॉक ड्रिलचा उतारा - https://www.saamana.com/rejection-of-vvpat-counting-in-nashik-west-trans...