महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीवर हा माझा शेवटचा लेख. विविध पक्षांची आजपर्यंतची कामगिरी, २०२४ लोकसभा निवडणुकीतील विविध पक्षांची कामगिरी, महाराष्ट्रातील मतदारांचा नेहमी दिसणारा कल यावर आधारीत काही आकडेमोड करून कोणत्या पक्षाला किती मते मिळण्याची शक्यता आहे व त्यानुसार किती जागा जिंकण्याची शक्यता आहे याचे अंदाज लिहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही वर्षात निर्माण झालेली खिचडी व गुंतागुंत पाहता जागांचा अंदाज व्यक्त करणे खूप धाडसाचे आहे. मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्याच प्रमाणात चुकू शकतो. तसे झाल्यास माझ्या प्रारूपाकडे नव्याने पहावे लागेल.
मत टक्केवारी
लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी यापेक्षा कमी असेल असे वाटते. कदाचित ६०% किंवा ५८% पेक्षाही कमी असल्यास नवल वाटणार नाही.
एप्रिल-मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.
महाराष्ट्रातील एकूण दिलेली मते - ५ कोटी ७० लाख (मत टक्केवारी ६१.२९%)
काँग्रेस - १७.९२% (लढविलेल्या जागा - १७ + १ = १८ सांगली धरून)
उबाठा - १६.५२% (लढविलेल्या जागा - २१)
शप गट - १०,२७% (लढविलेल्या जागा - १०)
भाजप - २६.१८% (लढविलेल्या जागा - २८)
शिंदे गट - १२.९५% (लढविलेल्या जागा - १५)
अप गट - ४.४२% (लढविलेल्या जागा - ४ + १ = ५ जानकर धरून)
मविआ आघाडीत सर्वाधिक जागा उबाठाने लढविल्या होत्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते उबाठाला मिळाली आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने लढविल्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते शिंदे गटाला मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकार व पंतप्रधान निवडायचा असल्याने महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेतृत्वाविरूद्ध काहिशी नाराजी असूनही महायुती व विशेषतः भाजपला काही प्रमाणात लाभ झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकार निवडायचे आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही. महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर साधारणपणे दोन्ही निवडणुका एक वर्षापेक्षा कमी कालावधीत पुढेमागे होतात. आधी लोकसभा निवडणूक होते व नंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होते (मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक व जवळपास १ वर्षानंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणू़क झाली होती. मार्च १९९५ मध्ये विधानसभा निवडणूक व मे १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या.). २००४ पासून मे महिन्यात लोकसभा निवडणूक व ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होते.
१९८०: लोकसभा - विरोधी पक्ष ९ आणि काँग्रेस ३९, विधानसभा - विरोधी पक्ष ८०, कॉंग्रेस १९२
१९८५: लोकसभा - विरोधी पक्ष ५ आणि काँग्रेस ४३, विधानसभा - विरोधी पक्ष १०४, कॉंग्रेस १६२
१९९०: लोकसभा - महायुती १४, जनता दल ५ आणि काँग्रेस २८, विधानसभा - महायुती ९४, जनता दल २५, कॉंग्रेस १४१
१९९५: विधानसभा - महायुती १३८ आणि काँग्रेस ८०, १९९६ लोकसभा - महायुती ३३, कॉंग्रेस १५
१९९९: लोकसभा - महायुती २७ आणि काँग्रेस २१, विधानसभा - महायुती १२५, कॉंग्रेस १३३
२००४: लोकसभा - महायुती २५ आणि काँग्रेस आघाडी २३, विधानसभा - महायुती ११६, कॉंग्रेस आघाडी १४०
२००९: लोकसभा - महायुती २० आणि काँग्रेस आघाडी २५, विधानसभा - महायुती ९०, कॉंग्रेस आघाडी १४४
२०१४: लोकसभा - महायुती ४२ आणि काँग्रेस आघाडी ६, विधानसभा - महायुती १८६, कॉंग्रेस आघाडी ८३
२०१९: लोकसभा - महायुती ४१ आणि काँग्रेस आघाडी ५, विधानसभा - महायुती १६१, कॉंग्रेस आघाडी ९८
साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्याच प्रमाणात तसाच राहतो.
_________________________________________________________________________
या पार्श्वभूमीवर २०२४ विधानसभा निवडणुकीत साधारणपणे खालीलप्रमाणे परिस्थिती असू शकते.
काँग्रेस
काँग्रेस १०१ जागा लढवित आहे. काँग्रेस अंदाजे १८% मते व ६०-७० जागा मिळवेल.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८७ जागा लढवून अंदाजे १५% मते व ५०-६० जागा मिळवेल.
ऊबाठा गट
शिवसेना १९८९ पासून (२०१४ चा अपवाद वगळता) विधानसभा निवडणूक युतीत लढत आहे. परंतु शिवसेनने जिंकलेल्या एकूण जागांचे लढवित असलेल्या एकूण जागांशी प्रमाण (म्हणजे स्ट्राईक रेट) खूप कमी आहे.
१९९० - लढविलेल्या एकूण जागा १८३, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २८.४१
१९९५ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ७३, विजयाचे प्रमाण = ४२.६९
१९९९ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ६९, विजयाचे प्रमाण = ४०.३५
२००४ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ६२, विजयाचे प्रमाण = ३६.६८
२००९ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २६.०३
२०१४ - लढविलेल्या एकूण जागा २८६, जिंकलेल्या जागा ६३, विजयाचे प्रमाण = २२.०२
२०१९ - लढविलेल्या एकूण जागा १२४, जिंकलेल्या जागा ५६, विजयाचे प्रमाण = ४५.१६
शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट २०१९ मघ्ये ४५.१६ होता जेव्हा शिवसेना युतीत निवडणू़क लढली होती व सर्वात कमी स्ट्राईक रेट २०१४ मध्ये २२.०२ होता जेव्हा शिवसेना स्वबळावर लढली होती.
आता शिवसेनेचे तुकडे पडले आहेत. २००९ मध्ये राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा स्ट्राईक रेट फक्त २६.०३ होता. उबाठा सेना पुन्हा एकदा युतीत आहे व फक्त ९६ जागांवर लढत आहे. अश्या परिस्थितीत उबाठा सेनेला ४० पेक्षा जास्त जागा मिळणे अवघड वाटते. प्रत्यक्षात शिंदे सेनाला मूळ सेनेची जाणार असलेली मते लक्षात घेतली तर उबाठा सेना अंदाजे १२% मते घेऊन २०-३० जागा मिळवेल.
म्हणजे मविआ एकत्रित ४५% मते व १३०--१६० जागा मिळवेल.
____________________________________________________________________
भाजप
भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर २५२ जागा लढवून २८.५०% मते मिळवून १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून भाजपने १६४ ( भाजप १४६ + मित्रपक्ष १८ कमळ चिन्हावर) जागा लढवून २५.७५% मते मिळवून १०३ जागा जिंकल्या आणि सत्ता गमावली. २०२४ मध्ये भाजप १४८ जागांवर लढत आहे. आता मोदींचा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्व हा मुद्दा अजिबात नाही (लव जिहाद, बटेंगे तो कटंगे, बांगलादेशातील हिंदूंना मारपीट, अयोध्येतील श्रीराम मंदीर अश्या मुद्द्यांचा मतदारांवर शून्य प्रभाव पडेल). इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपचा प्रचारही दिशाहीन व निष्प्रभ आहे.
भाजपला साधारणपणे २२-२३% मते मिळतील व ५०--६० च्या आसपास जागा मिळतील.
शिंदे गट
शिंदे गट ८५ जागा लढवित आहे. शिंदेंची प्रतिमा बरीच उजळली आहे. परंतु शिंदेंनी सुद्धा बरेच चिकीचे उमेदवार दिले आहेत. नेत्याची मान्यता पक्षाच्या मान्यतेपेक्षा कायमच जास्त असते. मोदींची लोकप्रियता बहुतेक वेळा ६०% किंवा अधिक असते, परंतु भाजप किंवा रालोआला ४४% हून जास्त मते मिळाली नाही.
शिंदे गटाला साधारणपणे १२% मते व २०-२५ जागा मिळतील.
अजित पवार गट
अप गट ५१ जागा लढवून साधारणपणे ७% मते व १०-१५ जागा मिळवेल.
म्हणजे महायुती एकत्रित ४१-४२% मते व ८०-१०० जागा मिळवेल.
===================================================
बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व सर्वेक्षण करणे टाळले आहे कारण सद्यस्थितीत प्रचंड खिचडी झालेल्या राजकीय वातावरणात कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज काढणे खूपच अवघड आहे आणि दुसरं कारण म्हणजे हरयाना निवडणुकीचे सर्व वाहिन्यांचे सर्व अंदाज पूर्ण चुकले होते. तरीसुद्धा अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी अंदाज व्यक्त केलेली मतांची टक्केवारी बरोबर असण्याची बरीच शक्यता वाटतेय, पण जागांचा अंदाज बर्यापैकी चुकू शकतो.
____________________________________________________________________________________
मनसे १५० जागा लढवित आहे. मनसे २-३% टक्के मते व ३-४ जागा जिंकू शकते.
________________________________________________________________
इतर काही अंदाज -
- मनसे, शेकाप, सप, एमआयएम, वंचित, बच्चू कडूचा पक्ष, जनसुराज्य असे चिल्लर पक्ष एकत्रित १५-२० जागा व अपक्ष १५-२० जागा जिंकतील.
- सर्व पक्षांमधील सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.
- कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप किंवा शप गट, त्याखालोखाल शिंदे गट, नंतर उबाठा आणि शेवटी सहाव्या क्रमांकावर अप गट असेल.
- कोणत्याही एका पक्षाला तीन अंकी जागा मिळणार नाहीत. कोणत्याही २ पक्षांना एकत्रित १४५ जागा मिळणार नाहीत. सरकार बनविण्यासाठी ३ किंवा अधिक पक्षांना एकत्र यावे लागेल, यातून एखादी नवीन खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
- मविआ सत्तेवर आल्यास वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा कदाचित यशोमती ठाकूर असतील.
- महायुती सत्तेवर आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार
- उद्धव ठाकरे व फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही
- महायुती सत्तेत न आल्यास महाराष्ट्र भाजपत नेतृत्वबदल होण्याची दाट शक्यता. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल.
- मविआ सत्तेवर येण्याची शक्यता
- कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालापश्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिंदे गट ही नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता. अश्या परिस्थितीत उबाठा पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता.
- विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार काकांकडे परत जाण्याची शक्यता
- जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राखीव जागा वाढविते, ते सरकार नंतर लगेचच्या निवडणुकीत सत्तेत परतत नाही हे १९९१ पासून अनेकदा दिसले आहे.
* १९९० - वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या अहवालानुसार २७% राखीव जागा इतर मागासवर्गीयांना दिल्या पण १९९१ लोकसभा निवडणूक हरले.
* १९९३ - जयललिताने तामिळ्लनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% पर्यंत वाढविले, पण १९९६ विधानसभा निवडणूक हरली.
* १९९३ - शरद पवारांनी अनेक नवीण जातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश केला, पण १९९५ विधानसभा निवडणूक हरले.
* २००३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी चक्क ब्राह्मणांना राखीव जागा दिल्या, पण २००३ विधानसभा निवडणूक हरले.
* २००८ - राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरां राजेंनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २००८ विधानसभा निवडणूक हरल्या.
* २०१३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २०१३ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१३ - मनमोहन सिंगांनी जाटांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला, पण २०१४ लोकसभा निवडणूक हरले.
*२०१४ - पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा दिल्या, पण २०१४ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१९ -- फडणवीसांनी मराठ्यांना १६% राखीव जागा दिल्या, पण २०१९ विधानसभा निवडणूकीत सत्तेत परतले नाहीत.
आता २०२४ मध्ये शिंदेंनी मराठ्यांना १०% राखीव जागा दिल्या आहेत. वरील कलानुसार विधानसभा निवडणूकीनंतर ते सत्तेत परततील का हे २३ नोव्हेंबरला समजेलच.
- पुण्यातील सर्व ८ मतदारसंघ भाजपने स्वबळावर २०१४ विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर युती असूनही यतील हडपसर व वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजप हरला होता. आता हे २ मतदारसंघ भाजपने अजित पवार गटाला दिले आहेत. उर्वरीत सर्व ६ मतदारसंघांपैकी पर्वती, कसबा, खडकवासला, कँटोंमेंट व शिवाजीनगर मध्ये खूओ चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोथरूडही धोक्यात होता. परण्तु चंपाने धूर्तपणे कोथरूडमधील प्रतिस्पर्धी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांना वाटेतून दूर केले व बंडखोर अमोल बालवडकरांना बसविण्यात आले. त्यात भर म्हणून तिरंगी लढत निर्माण झाली (चंपा, उबाठाचे मोकाटे व मनसेचे किशोर शिंदे) ज्याचा लाभ भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बापटांना कोथरूडमध्ये १ लाख मतांची आघाडी होती. परंतु विधानसभा निवडणूकीत कोंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संयुक्त उमेदवार किशोर शिंदे यांनी चांगली लढत देऊन ८०,००० मते मिळविल्याने चंपा फक्त २५,००० मतांनी जिंकले. पण आता ३ उमेदवार असल्याने भाजपला काळजी नाही. २०१४ मध्ये ८ पैकी ८ व २०१९ मध्ये ८ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता भाजप ६ व अप गट २ जागा लढवित आहे. २०२४ मध्ये भाजप व अप गट एकत्रित ६ पेक्षा कमी जागा जिंकेल असा अंदाज आहे.
__________________________________________________________
इच्छा यादी
खालील निकाल लागावे अशी मनोमन इच्छा आहे. यातील किती इच्छा पूर्ण होतील ते २३ नोव्हेंबरला समजेलच.
- कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये.
- महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी.
- भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या.
- कोणीही ठाकरे, राणे व बारामतीकर विधानसभेत नसावा.
- आव्हाड, नबाब मलिक पिता-पुत्री, पटोले, भास्कर जाधव, सर्व मुस्लिम उमेदवार, कडू, संजय राठोड, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्वजण इ. पराभूत व्हावे.
प्रतिक्रिया
11 Dec 2024 - 7:43 am | मुक्त विहारि
मग तेच तर ते म्हणत आहेत.
अखंड भारताचे तुकडे करून, काँग्रेसने पाकिस्तानच्या निर्मितीला हातभार लावला.
11 Dec 2024 - 7:41 am | मुक्त विहारि
त्या काळात खुप गोष्ट जुळून आल्या.
फायदा मात्र, नेहरू आणि गांधी यांनी घेतला.
खरं तर,भारताचे तुकडे करून, काँग्रेसने पाकिस्तानच्या निर्मितीला हातभार लावला. आणि इतर अल्प संख्यांक धर्मियांना मुस्लीम जनतेच्या हवाली केले. पुढचे इतर धर्मियांचे नृशंस हत्याकांड कदाचित तुम्ही विसरला असाल.
बाय द वे,
अद्याप तरी तुम्ही, वक्फ बोर्डाच्या बाबतीत तुमची भूमिका स्पष्ट केली नाही.
11 Dec 2024 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त...! इतकं भारी सुचलं पाहिजे. =))
-दिलीप बिरुटे
11 Dec 2024 - 11:19 am | अमरेंद्र बाहुबली
मिपा अणि मायबोलीत हाच फरक आहे. मायबोलीवर आधी प्रतिसाद वाचून मग लिहिणाऱ्याचे नाव कळते, मिपावर आधी लिहिणाऱ्याचे मग प्रतिसाद दिसतो. मुक्तविहारी नाव दिसले की प्रतिसाद ढकलून लावायचा संकेत आहे. तूनही तो प्रतिसाद वाचला म्हणून तुम्हाला भेटल्यावर नक्कीच चरणस्पर्श करेन! :)
11 Dec 2024 - 12:05 pm | मुक्त विहारि
तुमच्या इतके मनोरंजक प्रतिसाद, कुणीच देत नाही. त्यामुळे तुमचे प्रतिसाद आले की लगेच तुम्हाला प्रतिसाद द्यायचा.
बाय द वे,
वक्फ बोर्डाच्या बाबतीत, तुमचे म्हणणे काय आहे? ते अद्याप स्पष्ट केले नाही...
11 Dec 2024 - 12:36 pm | धनावडे
तुमचे प्रतिसाद वाचतात त्यांचा तर मग जाहीर सत्कार करायला हवा.
11 Dec 2024 - 12:01 pm | मुक्त विहारि
सत्य स्वीकारले की शब्दांत उतरतेच...
पोळीचे तुकडे केले . चतकोर भाग एकाला आणि उर्वरित भाग दुसऱ्यास.
आणि तरीही म्हणायचे की उर्वरीत भागाचा जनक तिसराच कुणी तरी....
4 Dec 2024 - 1:00 pm | श्रीगुरुजी
तुमचा का निवडणूक आयोगाच्या विरौधात आटापिटा चाललाय? :)
4 Dec 2024 - 1:04 pm | अमरेंद्र बाहुबली
कारण आम्हाला संशय की निवडणूक योग्य पद्धतीने झालेली
नाहीये, इव्हीएम मध्ये दोष आहेत. तसेच निवडणूक आयोग स्वायत्त नाहीये.
4 Dec 2024 - 1:34 pm | श्रीगुरुजी
संशयाला शष्प किंमत नाही. पुरावे आणा.
4 Dec 2024 - 4:27 pm | धनावडे
जसा २०१४च्या अगोदर महाराष्ट्राला श्रीराम आणि रामनवमी माहित नव्हते आणि ज्या शेकडो गावात फार पूर्वीपासून ती साजरी केली जाते, पण ती गावे म्हणजे महाराष्ट्र नाही असं जसं तुमचं म्हणणं आहे. तसंच तुम्हा थोड्या लोकांना शंका आहे निवडणुकीवर म्हणजे तुम्ही ते थोडे म्हणजे महाराष्ट्र नाही.
4 Dec 2024 - 5:09 pm | अमरेंद्र बाहुबली
गोलपोस्ट बदलण्याचा क्षीण प्रयत्न!
4 Dec 2024 - 6:17 pm | धनावडे
तुम्हाला गोलपोस्ट आहे, उगाच बरळणे हा तुमचा एकमेव गोल, त्यामुळे तुम्हाला नाही कळणार, तरी तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही एवढ लक्षात असुद्या.
4 Dec 2024 - 6:24 pm | अमरेंद्र बाहुबली
बरळन्याबद्दल तुम्ही बोलणे म्हणजे लादेन ने आतंकवादावर बोलणे. :)
11 Dec 2024 - 7:49 am | मुक्त विहारि
काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आणि त्यांचे अनुयायी म्हणजे, महाराष्ट्र नाही.
महाराष्ट्र राज्यातील सकल जनता म्हणजे महाराष्ट्र. अर्थात् साडे तीन जिल्हे म्हणजे महाराष्ट्र, असे तुमचे म्हणणे असेल तर गोष्ट वेगळी.
बाय द वे,
आपले, वक्फ बोर्डाच्या बाबतीतले मत काय आहे?
11 Dec 2024 - 7:44 am | मुक्त विहारि
लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेंव्हा मात्र तुमचा ह्या दोन्ही गोष्टींवर विश्वास होता.
4 Dec 2024 - 6:11 pm | वेडा बेडूक
महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा; उद्या होणार शपथविधी
शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते आज राजभवनावर दाखल झाले आहे. यावेळी ह्या तीन नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
तसेच भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.
राज्यपालांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सत्ता स्थापनेविषयी माहिती दिली. ''आम्ही आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला उद्या सायंकाळी साडेपाचची वेळ शपथविधीसाठी दिली आहे. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे.'' असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
4 Dec 2024 - 8:13 pm | सुबोध खरे
मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस परत आले सुद्धा.
शिवाय शरद पवार उद्धव ठाकरे याना निवृत्त करून सुद्धा.
आता फुरोगाम्यांना टनावारी बर्नोल लागेल.
भुजबळ बुवा मोठी ऑर्डर देऊन ठेवा.
4 Dec 2024 - 8:31 pm | अमरेंद्र बाहुबली
लोकशाही मार्गाने जिंका मग बोला.
4 Dec 2024 - 8:56 pm | अमरेंद्र बाहुबली
मुंबई विद्यापीठात होणारी सिनेट निवडणूक ही बॅलेट पेपरवर होते आणि त्याचे सगळे मतदार सुशिक्षित असतात.आणि विशेष बाब म्हणजे ह्या निवडणुका भाजप जिंकण सोडा साधं डिपॉझिट ही वाचवू शकत नाही.आहे की नाही गंमत..
#वास्तव
4 Dec 2024 - 10:40 pm | अनन्त अवधुत
किती मतदार असतात सिनेट निवडणुकीत?
4 Dec 2024 - 11:21 pm | श्रीगुरुजी
४ थी च्या वर्गातील मॉनिटरची निवडणूक उबाठाच्या नगरसेवकाच्या मुलाने जिंकली. मग महाराष्ट्रात उबाठाला इतक्या कमी जागा कश्या?
4 Dec 2024 - 9:27 pm | श्रीगुरुजी
Two things are infinite, the universe and human stupidity, and I am not yet completely sure about the universe.
- अल्बर्ट आईनस्टाईन
5 Dec 2024 - 12:47 am | अमरेंद्र बाहुबली
Arvind Kejriwal: भाजपनं महाराष्ट्र कसा जिंकला? २ दिवसांत पर्दाफाश करणार! केजरीवालांचा खळबळजनक दावा
https://marathi.indiatimes.com/india-news/will-reveal-how-bjp-won-haryan...
अंधभक्तानो तयार रहा, उत्तरे द्यायला केजरीवाल येताहेत.:)
5 Dec 2024 - 8:29 am | अनन्त अवधुत
मी प्रश्न विचारणार, आणि पळून जाणार. त्याला उत्तर दिले वा प्रतिप्रश्न केले तर तुम्ही मूर्ख, कावेबाज, कपटी,इ.इ. विशेषणे लावायला तो मोकळा. उत्तर नाही दिले तरीहि तो तुम्ही मूर्ख, कावेबाज, कपटी,इ.इ. विशेषणे लावायला तो मोकळा.
5 Dec 2024 - 9:04 am | वामन देशमुख
माफीवीर येत आहेत!
मग ठीक आहे.
5 Dec 2024 - 9:27 am | चंद्रसूर्यकुमार
ते दिल्लीच्या विधानसभेत बोलत होते.....
यातच सगळे काही आले. सभागृहात काहीही बेताल बडबड केली, दुसर्याविरोधात काहीही बरळले, कसलाही पुरावा दिला नाही तरी त्यावर खटला भरला जाऊ शकत नाही या पळवाटेचा ते फायदा घेणार. बाहेर कुठे बोलल्यास समजा अब्रूनुकसानीचा दावा भाजपच्या कोणी ठोकला तर यावेळेस नुसत्या माफीवर सुटता येणार नाही ही भिती असावी. नितीन गडकरी, अरूण जेटली, पंजाबमधील तो मजेठीया आणि अन्य काहींवर केजरीवालांनी असेच आरोप केले होते आणि प्रत्येकवेळेस माफी मागून त्यांना सगळ्यांनी स्वस्तात सोडून दिले. नितीन गडकरींनी त्यांना स्वस्तात सोडले यात आश्चर्य वाटले नाही कारण मराठी माणूस भांडण शेवटापर्यंत नेईलच असे नाही. पण अरूण जेटली या पंजाब्यांनी पण त्यांना असेच सोडले याचे आश्चर्य वाटले होते. कधीनाकधी केजरीवाल असल्या बेताल बडबडीबद्दल अब्रूनुकसानीचा खटला हरतील आणि निदान काही दिवस तरी तुरूंगात जातील हे माझे अगदी आवडते स्वप्न आहे. बघू पूर्ण होते का. झाल्यास माझ्या ओळखीच्यांमध्ये नक्कीच पेढे वाटेन. आता गुजरात युनिव्हर्सिटीकडून अपेक्षा आहे. बघू काय होते ते.
(केजरीवाल या प्राण्याविषयी कधीही काडीचीही सहानुभूती न वाटलेला कट्टर केजरीवाल द्वेष्टा आणि त्याचा अभिमान असलेला) चंसूकु
5 Dec 2024 - 12:33 pm | विवेकपटाईत
आरोप लावून माफी मागायची केजरीवाला जुनी सवय आहे. आज काल ते आरोप फक्त विधानसभेत लावतात. बाकी दिल्ली 6६ टक्के मतदान झालं तर ते विधानसभा जिंकणार नाही.
10 Dec 2024 - 11:19 am | वेडा बेडूक
केजरिवाल आले का?
5 Dec 2024 - 4:33 pm | अमरेंद्र बाहुबली
5 Dec 2024 - 5:09 pm | चंद्रसूर्यकुमार
कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क, सीपीयु वगैरे बदलले तर सगळेच काही बदलून जाईल हे थिऑरेटिकली ठीक आहे हो. पण तसे झाले होते आणि ईव्हीएम मधील प्रोसेसर किंवा दुसरे जे काही असेल ते बदलले हे सिध्द करता यायला नको का? ते सिध्द केले आहे का?
5 Dec 2024 - 5:59 pm | श्रीगुरुजी
टॉयलेट पेपरमध्ये आलंय का?
5 Dec 2024 - 6:01 pm | अमरेंद्र बाहुबली
म्हणजे तरुण भारत किंवा पांचजन्य मध्ये का?
5 Dec 2024 - 6:22 pm | श्रीगुरुजी
मिपावर किंवा जनतेत जाऊन विचारा टॉयलेट पेपर कोणता. सर्वमुखाने एकच नाव येईल.
5 Dec 2024 - 6:24 pm | अमरेंद्र बाहुबली
मी सांगतोय की मिपावरच! तरुण भारत नी पांचजन्य ते.
5 Dec 2024 - 6:38 pm | श्रीगुरुजी
Two things are infinite, the universe and human stupidity, and I am not yet completely sure about the universe.
- अल्बर्ट आईनस्टाईन
5 Dec 2024 - 9:16 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसाशी वाद घालणे हे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे.
5 Dec 2024 - 9:27 pm | श्रीगुरुजी
मान्य आहे, परंतु कधी कधी वस्तुस्थिती सांगावी लागते
5 Dec 2024 - 9:28 pm | अमरेंद्र बाहुबली
५६ इंची ढेरपोट्याच्या समर्थनात भ्रष्टाचाराचे समर्थन करणारे कुठून बळकट असतात?
5 Dec 2024 - 9:32 pm | वामन देशमुख
>>> ५६ इंची ढेरपोट्या
कोण हे?
5 Dec 2024 - 9:41 pm | श्रीगुरुजी
आधुनिक औरंग्या
7 Dec 2024 - 8:56 am | श्रीगुरुजी
अपेक्षेप्रमाणे धुलाईयंत्र सुरू झाले आहे.
बहुमत नसल्याने टेकूवर उभे असलेले सरकार असू दे किंवा प्रचंड बहुमताचे सरकार असू दे . . . सर्व गुन्हेगार, भ्रष्ट, खुनी, बलात्कारी, गुंड, जातीयवादी अश्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांचे सदैव संरक्षण कलणारी मूळ प्रवृत्ती कायम आहे व या समाजोपयोगी निर्णयांसाठी गृहमंत्रीपद मलाच पाहिजे.
असल्या प्रकारावर आक्षेप घेऊन विरोध करू नका. बटेंगे तो कटेंगे हे कायम ध्यानी राहू दे.
7 Dec 2024 - 9:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. आनंदाची बातमी. आता ते सिंचन घोटाळ्यातील निकृष्ट कामं, अनियमितता आणि भ्रष्टाचार केल्या प्रकरणाच्या सर्व फाइल्स बंद झाल्या की विषय संपला.
-दिलीप बिरुटे
7 Dec 2024 - 9:22 am | श्रीगुरुजी
ते होणारच आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय गुन्हेगार, भ्रष्ट, गुंड नेते आता निर्धास्त झालेत.
7 Dec 2024 - 10:28 am | श्रीगुरुजी
या विषयावर सविस्तर माहिती
7 Dec 2024 - 10:19 am | अमरेंद्र बाहुबली
+१
गुंडगिरी, भ्रष्टाचार आणी क्लिनचिट ह्याची परंपरा मागच्या पानावरुन पुढे सुरू झालीय.
7 Dec 2024 - 8:26 pm | अमरेंद्र बाहुबली
४ महिन्यात डायरेक्ट ४६ लाख मतदार वाढले. व्वा! इव्हीएम सरकार.
8 Dec 2024 - 1:15 am | श्री गावसेना प्रमुख
तुम्ही विश्वम्भर चौधरी ह्यांच्या सारखे लिहीतात अगदी सैरभर झाल्यासारखे….तुम्हाला काही पॅकेज आहे का?
8 Dec 2024 - 9:43 am | अमरेंद्र बाहुबली
वर काही लिहिलेले आहे का? फोटो आहे ना तो? कुठल्या गावाचे प्रमुख आहात? कुणी बनवले? कीव येते अश्या लोकांची.
10 Dec 2024 - 6:40 am | श्री गावसेना प्रमुख
कीव तुमची येते बिनपगारी किती काम करावे लागते तुम्हाला…रोजच भागत का ह्याच्यात?