सुंदर गीते ही स्मरणात येती

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
12 May 2024 - 9:34 pm

अवकाश आहे म्हणून बसता
जुन्या गोष्टी स्मरणात येती
कधी सत्याची,कधी असत्याची
सुंदर गीते ही स्मरणात येती

शताब्दी एकवीसावी अन् समय नवे
प्रकृतीने दान केलेली धनराशी स्मरते
कमजोर वासे घेऊन जूने घर वसवले
मनाशी जुळले ते सुंदर घर स्मरले

नदी नाल्यामधे होतो तरत दिनरात्र सारे
भोळे येती स्मरणी कागदी नाव चालविणारे
सणासुदीची मस्ती आता अंमळ जास्त होई
किंतू ईश्वराचे छप्पन छंद स्मरणात येई

आता लाखोंची घरे वीजदिपानी सजविती
रातकिड्यांच्या लुकलुकणी स्मरणात येती
आता लाख रुपयांना किंमत विशेष नाही
चवली अन् अठ्ठणीची किंमत स्मरणात येई

धर्म