लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
प्रतिक्रिया
8 May 2024 - 3:03 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
5 May 2024 - 9:38 pm | अमरेंद्र बाहुबली
OBC Reservation News : गुजरातमध्येही मुस्लिमांना आरक्षण; मोदींचा दोन वर्षांपुर्वीचा व्हिडिओ व्हायरल
http://dhunt.in/Ulaaf
By सरकारनामा via Dailyhunt
6 May 2024 - 8:42 pm | अमरेंद्र बाहुबली
ईशान्य मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती वाद? शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना घाटकोपरमध्ये प्रचार करण्यापासून गुजराती सोसायटीच्या लोकांनी थांबवले.
https://marathi.abplive.com/news/mumbai/marathi-vs-gujarati-controversy-...
मराठी माणूस कधी जागा होणार?? काल
एका गुजराती एच आर ने मराठी लोकांनी मुंबईतील नोकरीसाठी ऍपलाय करू नये म्हणून सांगितल. आज हे. मुंबई गिळायचा नी मराठी माणसापासून तोडायचा डाव दिसतोय. गी
6 May 2024 - 8:43 pm | अमरेंद्र बाहुबली
6 May 2024 - 8:54 pm | अमरेंद्र बाहुबली
मुंबईतील काही मराठी लोक कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झाल्यासारखे वाटताहेत.
8 May 2024 - 12:44 pm | अमरेंद्र बाहुबली
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र.
अस्त्रालयातील अंधभक्तानी ह्या पेपरचे ऑफिस फोडावे. :)
8 May 2024 - 1:14 pm | अमरेंद्र बाहुबली
ऑस्ट्रेलियातही मोदी एक्स्पोज होताहेत
8 May 2024 - 3:16 pm | आग्या१९९०
अंबानी आणि अडाणी हे गोण्या भरून आपला काळा पैसा काँग्रेसला देत आहे ह्याचा शोध अखेर वि. गुरूंना लागलाच. काळा पैसा नष्ट होत नाही आणि निर्माण व्हायचा थांबत नाही हे त्यांना उशिराने का होईना पण लक्षात आले. त्यांच्या समर्थकांना हे पचवणे कठीण जाईल.
8 May 2024 - 3:20 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
8 May 2024 - 3:23 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं अतिशय रटाळ होत आहेत.
8 May 2024 - 4:10 pm | आग्या१९९०
सतत खरे न बोलल्याने Alzheimer होतो का?
10 May 2024 - 9:39 am | सुबोध खरे
मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं अतिशय रटाळ होत आहेत.
तुम्ही कशाला पाहायला जाताय ?
उगाच बद्धकोष्ठ अधिक व्हायचं
वर जळजळ, वांत्या आणि चक्कर.
तुम्ही आपली पप्पूची मनोरंजक भाषणे ऐका
किंवा
झाझू यांच्या सुरस आणि चमत्कारिक रचलेल्या कहाण्या
किंवा
उबाठा यांची कोथळे, गद्दार, ढाल तलवार, माय भवानी, मावळे आणि कावळे याबद्दलची साहसआणि जोशपूर्ण भाषणे
मला गम्मत वाटते मोदी रुग्णच भक्तांपेक्षा मोदींची भाषणे जास्त ऐकत असतात
10 May 2024 - 11:30 am | अमरेंद्र बाहुबली
तुम्ही आपली पप्पूची मनोरंजक भाषणे ऐका तेच तर करतोय. ह्या दाढिवल्या पप्पू एवढा दुसरा पप्पू कुणी आहे का?
9 May 2024 - 12:49 pm | उग्रसेन
सद्य प. मोदीसरकारचा प्रचार गाय,गोबर, हिंदु-मुस्लीम
मटण,मंगळसुत्र काँग्रेसवरील टीका यापलिकडे गेला नाही.
विकासाचे मुद्दे चालले नाहीत असे लक्षात येताच.
पाकिस्तान, अरब, असे जगभर प्रवास करुनही
अब की बार देड दोसोच्या पुढे जातात की नाही,
अशी शंका आहे.
महाराष्ट्रात भाजपा आघाडीला यश मिळणे अवघड आहे.
सुप्त लाट महाविकास आघाडी अर्थात उबाठा आणि शरद
पवार यांची आहे, असे दिसते.
9 May 2024 - 1:06 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
आता तर काहीही बडबड करायला लागलेत.
9 May 2024 - 1:07 pm | अमरेंद्र बाहुबली
शरद पवारांना संपवण्याची भाषा, अजितदादांनी खरडपट्टी काढली, पण चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही
https://marathi.abplive.com/news/politics/bjp-leader-chandrakant-patil-r...
भाजप्यांनी जास्त बोलू नये असा सुप्त संदेश दादानी दिलाय. बहुतेक हवा फिरलियर हे दादांच्या लक्षात आलंय. :)
9 May 2024 - 7:06 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदीनी आता पर्यंत १० वेल तरी प्रभू श्रीरामांच्या नावाने मते मागितली. पण निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई केळी नाही. स्वतंत्र भारतातील हा आजपर्यंतचा सर्वात निर्लज्ज निवडणूक आयोग आहे.
9 May 2024 - 7:20 pm | मुक्त विहारि
काही लिंक देता का?
9 May 2024 - 7:27 pm | अमरेंद्र बाहुबली
कसली?
9 May 2024 - 7:28 pm | अमरेंद्र बाहुबली
https://www.instagram.com/reel/C6rOBaZSD8F/?igsh=MWVocG9lODBweWVx
9 May 2024 - 9:25 pm | मुक्त विहारि
काँग्रेस हिंदू धर्माला फाट्यावर मारते, हेच सत्य आहे...
9 May 2024 - 8:14 pm | अमरेंद्र बाहुबली
आताच एक व्हिडीओ पाहिला त्यात मोदी म्हणताहेत की त्यांचं शिक्षण झाल नाहीये. मग एम ए बी ए ची डिग्री कुठून आली?? मोदींचं सगळच खोटं दिसतंय.
9 May 2024 - 9:17 pm | अमरेंद्र बाहुबली
*Policenama Insta Video*
*Chitra Wagh On Renuka Shahane | मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ यांची टीका; म्हणाल्या - “तुमचं टायमिंग…”*
*Video*
https://www.instagram.com/reel/C6vS4LdJfVX/?utm_source=ig_web_copy_link&...
भाजप पक्ष इतका मराठी नी महाराष्ट्रद्वेष्टा का आहे?
9 May 2024 - 9:49 pm | मुक्त विहारि
केम छो वरली?
10 May 2024 - 2:04 pm | अमरेंद्र बाहुबली
मुंबईत गुजराती बिल्डरने मराठी माणसास घर नाकारलं.
मोदींच्या राज्यात मराठी माणूस मुंबईत राहू शकतोय हे मराठी माणसाचे भाग्यच
https://saamtv.esakal.com/mumbai-pune/gujarati-builder-denied-house-to-m...
https://saamtv.esakal.com/mumbai-pune/gujarati-builder-denied-house-to-m...
10 May 2024 - 5:15 pm | मुक्त विहारि
मोदींच्या राज्यात मराठी माणूस मुंबईत राहू शकतोय हे मराठी माणसाचे भाग्यच
-----
मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत.. ही पहिली गोष्ट आणि केम छो वरली, ही दुसरी गोष्ट...
10 May 2024 - 5:28 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत.. मला वाटल गुजरातचे.
10 May 2024 - 10:28 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
10 May 2024 - 9:29 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदींच्या नाकावर टिच्चून केजरवालांनी जामीन मिळवला.
केजरीवाल भारतीय राजकारनाच भविष्य आहेत, अडाणी लोकांच्या हातून देश काढायला लोकणी त्या पाठिंबा द्यायला हवा.
10 May 2024 - 10:29 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
13 May 2024 - 10:20 pm | चौथा कोनाडा
निवडणुकीत रागा कोमट झाल्याने वतावरणात रंगत येत नव्हती मग केजरूवाल यांना पिंजऱ्या बाहेर सोडावे लागले !
12 May 2024 - 6:13 pm | अमरेंद्र बाहुबली
पुन्हा मोदी सरकारला निवडून दिले तर भारत 'महामूर्खांचा' देश म्हणून ओळखला जाईल -थोर विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी
https://marathi.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/if-the-modi-g...
12 May 2024 - 6:19 pm | अमरेंद्र बाहुबली
मी तरी भारतला महामूर्खांचा देश बनवण्यात आजीबात हातभार लावणार नाही.
13 May 2024 - 9:15 am | सुबोध खरे
थोर विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी
विश्वंभर चौधरी आणि थोर विचारवंत?
बाबौ
हसून हसून पुरेवाट
13 May 2024 - 10:54 am | कांदा लिंबू
ते घोर विचारजंत असं असेल, typo झाला असेल!
12 May 2024 - 10:46 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप पैसे वाटत असल्याचा पुण्यात आरोप, काँग्रेस उमेदवाराचे पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन.
13 May 2024 - 7:29 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदींच्या जिल्हयाच्या राजधानी वक्तव्यावरून त्यांची सोशल मीडियात खूप टर उडवली जात आहे.
खरा पप्पू कोण ते आता लोकाना कळाले असेल :)
13 May 2024 - 7:46 pm | आग्या१९९०
राहुल गांधींनी विश्व गुरूंना समोरासमोर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधीनी स्वतः किंवा खरगेंचा पर्याय समोर ठेवला आहे. जबरदस्त करमणूक होईल, पाण्याचे ग्लासवर ग्लास संपवले जातील, नोटाबंदी, मनरेगा, शेतकरी आंदोलन, मणिपूर, हाथरस, ईलेक्टोरल बाँडसारखे प्रश्न विचारले जातील, गडी रिटायर हर्ट होऊन झोला सावरत , माईक काढून निघून जातील. एकाही प्रश्नाचे उत्तर देणार नाही ही " गॅरंटी "
13 May 2024 - 10:11 pm | रामचंद्र
असं होईल असं वाटत नाही. स्वतः तोंड देण्यापेक्षा रणछोडदासाच्या भूमिकेतून कोणीतरी (त्यातल्या त्यात) सक्षम प्रतिनिधी पाठवून मात करण्याचा प्रयत्न होईल असं वाटतं. तो प्रतिनिधीही बहुतेक रायबरेलीचा, जेएनयूचा माजी विद्यार्थी आहे. यातून दोन गोष्टी दाखवायच्या, एक म्हणजे आम्ही चर्चेला शेपूट घालत नाही आणि दोन म्हणजे रागा मोदींनी उत्तर द्यावे या तोलामोलाचे नाहीत.
13 May 2024 - 8:51 pm | अमरेंद्र बाहुबली
आमितशहा राममंदिराच्या नावाने मते मागत फिरत आहे. शिवसेनेच्या गाण्यातील भवानी शब्दाला आक्षेप घेणारा निवडणूक आयोग इथे मात्र मूग गिळून गप्प आहे. इतके निर्लज्ज भाजपचे लोक नी निर्लज्ज निवडणूक आयोग देशात हया आधी कधीच नव्हता. मतदानाची टक्केवारी का घटलीय हे इथे कळते. निवडणूक आयोग आणि भाजपवर सामान्य जनतेचा विश्वास राहिला नाहीये. दोघे मिळून लोकशाहीचा गळा घोटताहेत.
13 May 2024 - 9:03 pm | आग्या१९९०
उगी उगी. त्यांच्या जिभेला विश्रांती देण्यासाठी. बाकी काही नाही.
14 May 2024 - 6:50 am | मुक्त विहारि
ममता आंटी, कुणाच्या नावाने मते मागते?
14 May 2024 - 7:32 am | अमरेंद्र बाहुबली
मा, माटी, माणूष
14 May 2024 - 12:39 pm | मुक्त विहारि
अगदी बरोबर...
कधी नव्हे ते तुम्ही योग्य तेच सांगितले...
मा म्हणजे... भारत मातेचे तुकडे करणाऱ्या काँग्रेस बरोबर हात मिळवणे...
माटी म्हणजे, शेतजमीन नापीक करणे.. उदा. संदेशाखाली
माणूष म्हणजे, रोहींगे आणि बांगलादेशी यांना भारतात वसवणे...
14 May 2024 - 12:45 pm | अमरेंद्र बाहुबली
भारत मातेचे तुकडे करणाऱ्या काँग्रेस बरोबर हात मिळवणे... पण काँग्रेसने तर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. कुठल्या प्रात शाखेत तुम्हाला हे खोटं शिकवलं जातं? उद्या पहाटे त्या शाखा प्रमुखाच्या टाळक्यात दंडप्रहार करा. परत उठलाच नाही पाहिजे!
माटी म्हणजे, शेतजमीन नापीक करणे.. उदा. संदेशाखाली माटी म्हणजे शेतजमीन नापीक करणे??
ॲ?? प्रात शाखेत दंड प्रहार शिकताना स्वतःच्या डोक्यात दंड मारून घेतला होतात का? काय लिहिताय?
माणूष म्हणजे, रोहींगे आणि बांगलादेशी यांना भारतात वसवणे... माणूष म्हणजे रोहिंगे? बांगलादेशी?? उचल रे देवा लवकर. :(
14 May 2024 - 1:07 pm | आग्या१९९०
उद्या पहाटे त्या शाखा प्रमुखाच्या टाळक्यात दंडप्रहार करा. परत उठलाच नाही पाहिजे!
जबरदस्त तडाखा ! जाम हसलो.
14 May 2024 - 1:25 pm | अमरेंद्र बाहुबली
:)
14 May 2024 - 1:26 pm | मुक्त विहारि
काँग्रेसने तर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले.
आणि ते करताना, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती केली... थोडक्यात , तुकडेच तर केले...
-----
माटी म्हणजे शेतजमीन नापीक करणे??
संदेशखाली मध्ये, तेच तर केले....
------
माणूष म्हणजे रोहिंगे? बांगलादेशी??
हो, कारण, तिने नेहमीच, त्यांची बाजू घेतली आहे....
------
आपण, असेच मनोरंजक प्रतिसाद लिहीत जा....
14 May 2024 - 2:03 pm | अमरेंद्र बाहुबली
सावरा स्वतःला एवढच म्हणेन.
14 May 2024 - 4:06 pm | मुक्त विहारि
थोडं वाचन वाढवा....