https://www.esakal.com/global/swedish-national-in-nagpur-in-search-of-bi...
घ्या कविता...
कुणी आई देता का आई
पेट्रीसिया विचारत जाई.
स्विडन ते नागपूर
घेऊन डोळ्यात पूर
तपासल्या सर्व सरकारी नोंदी
तरी सुटेना कोडे, तिची कोंडी.
मला काहीच नको,
नाही काही तक्रार,
फक्त मला झोपू दे
शांत मांडीवर एकवार
तू टाकलेस आश्रमाबाहेर
सोडले वा-यावर
स्विडिश फरीश्त्यां नी
झेलले वरवरच्या वर
आंगणवाड्या,पोलीसस्टेशन,
शांतीनगर जुन्या भागाला भेट,
कुठलाच दुवा मिळाला नाही
पुन्हा पाहून आले आश्रम-गेट.
तुझी नकोशी,
त्यांची पेट्रीसिया
अशीच का सापडली
जनका स सिया (?!)
आता शोधल्या शिवाय,
जाणार नाही...
कुणी आई देता का आई ?
प्रतिक्रिया
18 May 2024 - 1:33 am | चित्रगुप्त
ही कविता सत्य घटनेवर आधारित असल्याने या बाबतीत पुढे काय झाले? पॅट्रीशियाला तिची आई सापडली का? हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
18 May 2024 - 8:53 am | गवि
बातमी वाचली. करुण वाटते कथा.
पण बरेच प्रश्न मनात येतात. जिने आश्रमात सोडले तिची मजबुरी आता या मुलीला समजते आहे हे लक्षात आलं. तिची काही तक्रारदेखील नाहीये आईबद्दल. पण ज्या आईने असे बाळ असताना कायमचे सोडले ती केवळ जैविक आई आहे म्हणून तिचा इतका वेदनादायी शोध घ्यावा का? तिची मांडी ही शांतता देणारी असेल हे गृहीतक खरे ठरेल का? आईने पुढे कधी शोध घेण्याचा प्रयत्न केला का? हे कळणे कठीण आहे.
स्वीडिश पालक, त्यांना नेमके काय वाटत असेल. त्यांचे आभार वगैरे मानले आहेत, पण त्यांना नक्कीच वाईट वाटत असेल हे सर्व बघून.
लहापणापासूनच जर मूळ आईला भेटण्याची इच्छा होती तर चाळीस वर्षे वय होईपर्यंत म्हणजे शोध प्रक्रिया सुरू करायला फारच जास्त उशीर केला असे वाटत नाही का? आता ती व्यक्ती सापडणे दुर्मिळच. हयात तरी असेल का तेही सांगता येत नाही. ती हयात असो आणि भेटो ही इच्छा.