स्वराज्य

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in राजकारण
24 Mar 2024 - 9:05 am

केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला
एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही
तरी काही ठळक मुद्दे

- चित्रपटात २ विचार प्रवृत्तीतील संबंध दोन्ही बाजूने चांगले दाखवले आहेत ( -हिंसा ( जर जरुरी असेल तर )- अहिंसा / सावरकर - गांधी / जहाल - मवाळ या भारतीय इतिहासातील आणि विशेषतः ब्रिटीशांचच्या पासूनच्या स्वातात्र्य लढ्यातील काळातील याचे पैलू
- गांधींच्या व्यक्तिरेखेतून त्यांची बाजू समर्थ पने दाखवली आहे आणि त्याचाच बरोबर सावरकरांची बाजू पण आणि सावरकरांवर ज्या अनेक बाबीत टिळक होते त्यालाही सडेतोड तर्क पूर्ण उत्तर दिले आहे
- सावरकर यांचे : हिंदुत्व" म्हणजे राष्ट्रोययत्व आणि कोना एका धर्माचे संकुचित / कर्मठ विचार अजिबात नाहीत हे खूपच स्पष्ट पणे दाखवले आहे ( त्यांना सरळ प्रश्न विचारला जातो कि तुमच्या "हिंदू " च्या व्याख्येत कोण कोण बसत हिंदू / शीख, जैन बुद्ध ....आणि मुसलमान ? यावर त्यांचे उत्तर ऐकण्यासारखेच आहे
- गांधींच्या खिलाफत चलवली ला पाठिंबा देण्याचं धोरणावर आंबेडकरांचे विचारकाय होते ते हि ऐकण्यासारखेच आहेत
- १९४७ + काळातील सर्वच जाती कर्मठ असताना एका सावरकर नामक "बामनाने" हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेवर काय करावे यावरचे विचार आणि कृती आणि गांधींचे विचार हे बघितलेत तर आश्चर्य वाटेल
- काही क्रॉस रेफ: गांधींचे पहिले राजकीय गुरु नामदार गोखले होते हे अँटेनबरो यांचं गांधी चित्रपटात दाखवलेले तुम्हला आठवत असेल .. ते सूत्र येथे हि एक २ दृश्यात दिसते म्हणजे दिग्दर्शकाचा अभ्यास चांगला आहे
दिग्दर्शन , उत्तम,,, थोडा लांबला आहे काही ठिकाणी, आणि लेखन बहुतेक उत्तम १-२ प्रसंग क्लिष्ट ( सावरकर जेवहा चालाखीने स्वतः राजकीय कैदी असल्याचे पटवून देतात आणि कागद मागून प्रथम सरकारला पत्र लिहायला बस्तात तो प्रसंग )
आता तांत्रिक बाबी
चित्रोकरण प्रकाश / सेट अप्रतिम सढळ हाताने खर्च करून वातवरण निर्मिती केली आहे
वेशभूषा - रंगभूषा उत्तम पण कधी कधी विग वैगरे दिस्तात
पात्र : भारतीय आणि ब्रिटिश उत्तम कलाकारांची निवड ( उगाच कोणीतरी भारत एम्बसी किंवा मौल्टीनॅशनल मधील मिळेल तो गोरा आणला आहे असे नाही ( ब्रिटिश / आयरिश जसे व्यक्ती तसे उच्चारण )
अभिनय : रणदीप हुद्दा अप्रतिम , बाकी सर्व ठीक किंवा उत्तम

सर्वात शेवटी असे म्हणावेसे वाटते कि स्वराज मग ते मुघलांपासून असो कि ब्रिटिशांपासून मिळवनयसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलं त्यातील काही लोकांचे खच्चीकरण गेली काही दशके झाले ते आता बाहेर येत आहे .. त्याला तुम्ही संघाला प्रोपोगांडा म्हणा हवे तर पण सत्य लपून राहत नाही हे खरे

छत्रपती शिवाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
छत्रपती संभाजी महाराज ( अजून चांगला चित्रपट यायचाय )
बाजीराव पेशवे ( बाजीराव आणि पानिपत )
राणी लक्ष्मीबाई ( मनकर्णिका )
मराठा सरदार ( पानिपत आणि तान्हाजी )
टिळक
सावरकर

असो अर्थात हे सगळे कपोकल्पित आहे असे कोणाचे म्हणणे अ सेल तर त्यांनी त्या अफूचं नशेत जरूर राहावे
एक अजून प्रतिक्रिया
https://www.youtube.com/watch?v=wzEsq6R68R8

प्रतिक्रिया

बरं झालं सांगितले कारण मला माहितीच नव्हतं हे.विरोधक अजूनही सावरकरांना घाबरतात तर,त्यांना भारतरत्न दिल्याने भारत, परदेशातही त्यांना त्रास होणार आहे.

विदेशातील कागदोपत्री पुरावे कसे नष्ट करणार?

हे राम! जबरदस्त हसू आलं.ब्रिटीश चोरांना काय घाबरायच हा हा!

अहिरावण's picture

28 Mar 2024 - 10:15 am | अहिरावण

>>>भारतरत्न न देण्याचे एकच कारण आहे, विदेशातील कागदोपत्री पुरावे कसे नष्ट करणार? विरोधक वाटच बघत आहेत भारतरत्न द्यायची.

पण मी काय म्हणतो अण्णा... भारत रत्न देण्याची वाट तरी का पहायची? क्कागदपत्रे आणायची आणि टकल्यांसारख्यांना द्यायची पुरावे म्हणून.
होऊन जाऊ द्या काय व्हायचे ते ! काय !

की त्या कागदपत्रांनी लागणा-या आगडोंबीत विरोधकांना आपले सर्वस्व खाक होईल अशी खात्री आहे? नक्की काय आहे? की उगाच "माझ्याक्डे पुरावे आहेत" टाईप हाईप !!

एकदम अभ्यासपूर्ण बोलतोय हा जेएनयू सावरकर -आंबेडकर स्टडी सर्कलचा विद्यार्थी एकदा ऐकाच
https://youtu.be/EhadchlWGVY?si=gtIvyoHpg5yOGUBm

निनाद's picture

28 Mar 2024 - 3:09 pm | निनाद

रे! हा धागा पाहिलाच नाही त्यामुळे निराळा लेख लिहिला गेला.

अहिरावण's picture

29 Mar 2024 - 1:57 pm | अहिरावण

प्रतिसाद झाले शंभर

जगात एकच नंबर... सावरकर सावरकर सावरकर

स्वधर्म's picture

30 Mar 2024 - 8:01 pm | स्वधर्म

अगम्यजी,

मी आपली स्पष्टीकरणे नीट वाचली. त्यातून काही प्रश्न निर्माण होत गेले, ते विचारत गेलो, संदर्भ पहात गेलो. आपणही शांतपणे प्रतिसाद देत गेलात, त्याबद्दल आभार! समोर येते ते मान्य करत राहण्यापेक्षा प्रश्न विचारणे हे अधिक महत्वाचे आहे, असे मला वाटते; कारण त्यामुळेच मी थोडीफार प्रगती करू शकलो असा माझा अनुभव आहे. आताही जे आपण स्पष्टीकरण देत आहात, त्यावर प्रश्न विचारण्यासारखे आहे, पण आता विचारत नाही.

>> Scenario १: सावरकर सरकारविरोधी मोर्चात भाग घेतात. सरकार त्यांना पुन्हा ५० वर्षांसाठी तुरुंगात टाकते. त्यांना कैदेत टाकले की देश पेटून वगैरे उठेल असे नव्हते. देशात इकडची काडी तिकडे झाली नसती. 
गांधीजीना सरकारने कितीतरी वेळा तुरुंगात टाकले आणि त्यांनी जेंव्हा ‘चले जाव’ हा नारा दिला, तेंव्हा हजारो लोक आपण होऊन हसतमुखाने तुरुंगात गेले. दोन्ही नेत्यांमधला मोठाच फरक आपण हायलाईट केला आहे.

>> अ) सामाजिक कार्य - हिंदू संघटन, जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रचंड लेखन, मराठी भाषेची, साहित्याची सेवा.
याबद्दल सावरकर यांच्या विषयी आदर वाटतो. ही कामे निसंशय समाजोपयोगी आहेत.

>> ब ) देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न - स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यावर हिंदू महासभेच्या माध्यमातून राजकारण 
हा खूप मोठा विषय असून त्याबद्दल चर्चा करण्याएवढा वाव येथे नाही.

आपल्याशी चर्चा करून बरे वाटले.

माझी जन्मठेपमध्ये सावरकर यांनी माफीनामे लिहून दिले, त्याचा उल्लेख आहे का असे मी विचारले होते, पण त्यावर कोणाचे उत्तर आले नाही. ठीक आहे, मी स्वत:च ते पुस्तक मिळवून बघेन. तसा काही उल्लेख आढळावा, अशी इच्छा आहे, पण तो नसेल तर ते आत्मकथकन गैरसोयीचे सत्य लपवून ठेऊन आपल्याविषयी फक्त उदात्त भाव वाढावा अशा हेतूने लिहिले, असे मानावे लागेल. मी गांधीजींचे सत्याचे प्रयोग वाचले आहेत, आणि त्यांनी स्वत:च्या कामभावनेच्या आहारी जाण्याबद्दल ‘लोकांचा आपल्याबद्दलचा आदर कमी होईल’ अशी भीती न बाळगता लिहिले आहे. तसे धाडस सावरकर यांनी पण दाखवले असावे अशी आशा आहे. आधी म्हटले तसे मला केवळ त्यांचे लिखाण वाचून मत बनवणे योग्य वाटत नाही. इतर कुणी नवी माहिती पुरावे समोर आणले असतील तर मी ते डिसकाउंट करू शकणार नाही.

माझ्या अल्प अनुभवानुसार माणसाची मते बरीचशी तो कोणत्या सामाजिक स्तरात, कोणत्या वातावरणात वाढला यावर ठरतात. ती बदलणे खूप अवघड असते. त्यामुळे बरेच लोक आपल्याला लहानपणापासून जे सांगितले गेले, ते बाजूला सारून नवीन सत्य समोर आले, तर स्विकारू शकत नाहीत. त्यामुळे सावरकरप्रेमींच्या मताचा आदर आहे, पण माझे मत मात्र सत्यावर आधारितच ठरवणार. चित्रपटनिर्मितीला अनेक हेतू असतात, त्यामुळे त्यावर तर मुळीच नाही.

माझ्यापुरते,
सावरकरा चित्रपटाच्या निमित्ताने येथे जी चर्चा झाली, त्यामुळे मला काही संदर्भ पाहून सावरकरांचे कोडे सोडवण्यासाठी नक्कीच मदत झाली. पण अजूनही ते पूर्ण झाले नाही, पण माझ्यापुरते सत्यशोधन करत राहीन. सर्वांना धन्यवाद.

बारीने केलेले अत्याचार आणि कोलू वाचता वाचता, झोप येईना....

त्यामुळे, पुस्तक अर्धवटच राहिले.

बारी आणि कोलु, कुण्याच्याशी वाट्यास न येवो...

आणि तीच गोष्ट... पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लीम लोकांच्या बाबतीत...

अहिरावण's picture

31 Mar 2024 - 10:35 am | अहिरावण

>>>माझ्या अल्प अनुभवानुसार माणसाची मते बरीचशी तो कोणत्या सामाजिक स्तरात, कोणत्या वातावरणात वाढला यावर ठरतात. ती बदलणे खूप अवघड असते.

विषय संपला. म्हणूनच अपवाद वगळता कुणीही तुमचे मत बदलावे यासाठी प्रयत्न केले नाहीत.

ते तुमचं तुम्हालाच ठरवावं लागेल. अगदी भारतीय अध्यात्मातील अनुभवाप्रमाणेच.

मनःपुर्वक शुभेच्छा !!

स्वधर्म's picture

1 Apr 2024 - 3:48 pm | स्वधर्म

पण मत बदलण्याची तयारी आहे हे मी आधीच लहिले होते. आपण स्वतः माहिती घेऊन जर आधी ऐकले त्यापेक्षा वेगळे तथ्य समोर आले तर स्वीकारले पाहिजे असे माझे मत आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2024 - 11:38 am | अमरेंद्र बाहुबली

मी वाचलं होतं माझी जन्मठेप, माफीनामा लिहील्याचा ऊल्लेख सावरकरांनी कुठेही केला नाहीये. ही माहीती त्यांनी लपवली असेच म्हणावे लागेल.

प्रचेतस's picture

31 Mar 2024 - 11:48 am | प्रचेतस

इंग्रजांना सुटकेसाठी आवेदनपत्र दिल्याचा स्पष्ट उल्लेख माझी जन्मठेपमध्ये आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2024 - 11:51 am | अमरेंद्र बाहुबली

अच्छा. मला वाचून बरीच वर्षे म्हणजे जवळपास दहा वर्षे झाली आहेत. माफीनाम्याला आवेदनपत्र असं नाव दिलं असेल त्यामूळे ते ठळक लक्षात राहीलं नसावं.

अंदमानात आलेल्या कमिशनपुढे साक्ष दिल्याचे वर्णन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुढील शब्दांत केले आहे.

माझ्याहून तुरुंग तोडून पळून जाण्यासारखे अपराध ज्यांनी केले ते देखील तुम्ही कारागारांत एक वर्षांहून अधिक काळ डांबून ठेवीत नाहीं. कारागाराचीच काय गोष्ट पण हिंदुस्थानांतहि मला जर मुक्तपणे सोडण्यांत आलें तर तिथेही मी ठरलेल्या अटी प्रामाणिकपणें पाळीन, राजकारण करूं देत नसाल तर अितर दिशेनें देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरें मी तें वचन मोडलें तर आपणांस पुन्हा जन्मठेपीवर धाडतां येील. आपला निर्बंध (कायदा) आणि शक्ति अितकी सूक्ष्म, प्रबळ आणि सर्वसाक्षी आहेच.

सभासद : तसें म्हणतां येीलच असें नाहीं. कारण तुम्ही निर्बंधाच्या कक्षेत न आलेत म्हणजे निर्बंध मोडीत नव्हतेच असें नाहीं सिद्ध होत. राजद्रोहाचे खटल्यांत सांपडले गेलां नाहींत तरी तुम्ही राजद्रोह केला नसेल असेंच नाहीं म्हणतां येणार.

मी : आणि केलाच असेंहि नाहीं म्हणतां येणार. जोंपर्यंत कोणास चोरी करतांना धरलें नाहीं किंवा नैर्बधिक (Legal) संशय आलेला नाहीं तोंवर कोणासच चोर म्हणून म्हणण्याचा
आपणांस अधिकार नाहीं. तीच स्थिति राजद्रोहाची. मी माझीं मतें गव्हर्नर जनरलपर्यंत अनेक
वेळां कळविलीं आहेत. वैध (Constitutional) अपायांनीं ह्या मिळणाऱ्या सुधारणांत थोडें
बहुत सार्वजनिक राजकीय हित साध्य होईल. तें मी साधतें का हा प्रयत्न त्याच वैध मागनिं करूं अिच्छितो. जर सुधारणांचा तसा उपयोग होत गेला आणि त्यानें पुढील सुधारणांचा मार्ग मोकळा झाला तर कोणताहि राज्यक्रांतिकारक हा वैध आणि शांतीच्या मार्गानेच देशहित साधण्यास झटूं अिच्छील. जाणूनबुजून रक्तपातास आणि प्राणघातास मनुष्य प्रवृत्त होण्याअितका स्वतःचे जिवास कंटाळलेला नसतो. आम्हांस निरुपाय वाटला, तेव्हां तो भयंकर मार्ग चोखाळला. हौस होती म्हणून नव्हे. बरें राजकारणांत मी वैधमार्गानेच जाईन.
असा आपणांस माझ्या वचनावरून विश्वास वाटत नसेल तर मी राजकारणांत मुळींच - अका ठराविक अवधिपर्यंत पडणार नाहीं असेंहि मी लेखी वचन देण्यास सिद्ध आहें.' मीच काय, माझे अितर स्नेहीहि देतील. तेव्हां अशा अटींवर तरी ह्या आम्हां राजबंदिवानांची मुक्तता व्हावी. राजकारणाव्यतिरिक्त मार्गेहि आम्ही पुष्कळ लोकसेवा आणि साहित्यसेवा करू शकू. तीहि कां बंद करतां? हे अितके प्रामाणिक, शूर आणि स्वार्थत्यागी आत्मे आणि शक्ति ह्या दगडी भिंतीआड व्यर्थ कां राहूं देतां? आयर्लंडच्या बंडखोरांस दहादां सोडलेंत. त्यांनीं दहादां अटी मोडल्या तरी पुन्हां त्यांनीं वचन देतांच अकरावी संधि तुम्हीं दिलीत - मग आमच्यावर ओकदां तरी विश्वास टाकून कां पाहू नये एक संधि तरी आम्हांस कां देऊं नये !

सावरकर पुढेही या अटींबाबत स्पष्ट उल्लेख करताना म्हणतात-

ह्या राजबंदींकडून करारपत्रावर सही करून घेतली जाी कीं, "मी यावर पुन्हां कधीहि - किंवा अमुक वर्षे - राजकारणांत आणि राज्यक्रांतींत भाग घेणार नाहीं. पुन्हां मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची अरलेली जन्मठेपहि भरीन!"

राजक्षमा आल्याची तार जी मागें उल्लेखिलेली आहे ती - आल्यानंतर राजबंदींत कडाक्याचा वादविवाद चालला होता की, अशी अट आल्यास ती मानावी कीं नाहीं. मी तशी अट फार काय मागच्या गोष्टी सांगणाऱ्या राष्ट्रद्रोही विश्वासघातास सोडून - अितर वाटेल ती भविष्यकालीन आणि राष्ट्रीय हितानुकूल अट - मानावी म्हणून सगळ्यांस सांगत राहिलों. अशा प्रसंगांत तशी अट लिहून देणें हेंच राष्ट्रीय हितास ओकंदरीत अनुकूल होतें हैं मी शिवाजी-जयसिंग, शिवाजी-अफजुल, चमकोरनंतरच्या पलायनांतील श्रीगुरुगोविंद आणि स्वतः श्रीकृष्ण यांच्या आणि अन्यान्य अदाहरणांनीं सर्वांच्या मनावर ठसवीत होतों. जे मानधन हट्टी होते त्यांस अर्थातच सकृतदर्शनीं हें पटेना. अितके हाल सोसूनहि ज्यांचा बाणा तिळमात्र नरम झाला नव्हता असे ते वीर माझा विरोध करतांना पाहून मला आपल्या देशाच्या भविष्य कालाविषयीं अधिकच आशा वाटू लागे. परंतु अंतीं त्यांस तसेंच करणें योग्य आहे हें राजनीतीचें धोरण मी पटवू शकलों आणि राजबंदींच्या सुटकेचे वेळीं सर्वांनीं त्या करारपत्रांवर डोळे मिटून सह्या करून कारागाराचे कुलूप एकदाचे तोडले

अहिरावण's picture

31 Mar 2024 - 7:04 pm | अहिरावण

कशाला एवढं टंकत बसलात.... माहित आहे ना तुम्हाला गीता कुणापुढे वाचावी ते.

प्रचेतस's picture

31 Mar 2024 - 8:53 pm | प्रचेतस

आपण आपले कर्म करावे, यावरून तरी प्रत्यक्ष सावरकरांनीच लिहून ठेवलेले तरी सर्वांच्या डोळ्यांसमोर येतेय.

बघुया काही सुधारण होते का ते ! शक्यता खुपच कमी आहे.

कर्नलतपस्वी's picture

31 Mar 2024 - 9:37 pm | कर्नलतपस्वी

+1

सुबोध खरे's picture

1 Apr 2024 - 10:20 am | सुबोध खरे

बाडीस

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

एकदा म्हणतात

मी वाचलं होतं माझी जन्मठेप, माफीनामा लिहील्याचा ऊल्लेख सावरकरांनी कुठेही केला नाहीये. ही माहीती त्यांनी लपवली असेच म्हणावे लागेल.

मग पुरावा दिल्यावर म्हणतात

अच्छा. मला वाचून बरीच वर्षे म्हणजे जवळपास दहा वर्षे झाली आहेत. माफीनाम्याला आवेदनपत्र असं नाव दिलं असेल त्यामूळे ते ठळक लक्षात राहीलं नसावं.

हातात कळफलक असल्यावर तो बडवलाच पाहिजे अशी काही लोकांची स्थिती असते.

त्याला उत्तर देणे हा निव्वळ कालापव्यय आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Apr 2024 - 10:26 am | अमरेंद्र बाहुबली

अच्छा, आता माफीनामा आवेदनपत्राच्या वेष्टनात गुंडाळून दिला असेल तर कसे लक्षात राहनार?? बादवे प्रचेतस सरांनी ऊत्तर देण्याआधी कुणी हिंमत केली का सांगायला?? नाही ना!? कारण सर्वांनाच शंका होती.

सुबोध खरे's picture

1 Apr 2024 - 10:37 am | सुबोध खरे

आपण खूप हुशार आहात

स्वधर्म's picture

1 Apr 2024 - 4:04 pm | स्वधर्म

आपण साक्ष दिलेला मजकूर इथे दिल्याबद्दल. प्रत्यक्ष आवेदन पत्रे (माफीनामे) माझी जन्मठेप मध्ये नाहीत का?
सावरकर हे उत्कृष्ट लेखक आणि वकिलही होते. अंदमान मधील बारीकसारीक गोष्टी त्यांनी माझी जन्मठेप मध्ये लिहिल्या आहेत. आपण ज्याला आवेदन पत्रे म्हणता व काही लोक ज्याला माफीनामे म्हणतात, त्याचा उल्लेख त्यांनी माझी जन्मठेप या किंवा नंतर लिहिलेल्या कोणत्या पुस्तकात केला आहे का, हे मी शोधत आहे. तो सापडला तर त्यांचे लिखाण विश्वासार्ह नक्की मानता येईल, जर ते नंतर शोधपत्रकारांनी शोधून काढल्यावरच लोकाना समजले असेल तर मात्र त्यांच्या लिखाणची विश्वासार्हता नककीच कमी होते,
इथे दोन माफीनामे सापडले .
https://counterviewfiles.wordpress.com/wp-content/uploads/2019/05/savark...
https://counterviewfiles.wordpress.com/wp-content/uploads/2019/05/savark...
I am ready to serve the Government in
any capacity they like, for as my conversion is conscientious
so I hope my future conduct would be. By keeping me in jail
nothing can be got in comparison to what would be
otherwise. The Mighty alone can afford to be merciful and
therefore where else can the prodigal son return but to the
parental doors of the Government? Hoping your Honour will
kindly take into notion these points." [Emphasis added]
Savarkar’s mercy petition presented to Craddock on November 14, 1913
personally at the cellular Jail was not the only one. He submitted in all five
mercy petitions in 1911, 1913, 1914, 1918 and 1920. We find mention of his
1911, 1914 and 1918 mercy petitions. Sadly, the texts of these are not
available in the archives.

प्रत्यक्ष आवेदनपत्रं (हा शब्द मी नव्हे तर सावरकरांनी वापरलेला आहे) नाहीत पण त्यांचा उल्लेख मात्र जो त्यांनीच स्वतः 'माझी जन्मठेप' मध्ये केला आहे जो मी वर दिलाच आहे. आता प्रत्यक्ष त्यांच्याच शब्दातले लिखाण कुणास विश्वासार्ह वाटत नसल्यास त्यावर माझा काहीच इलाज नाही. जिज्ञासूंनी स्वत: शोध घेऊन काय तो निष्कर्ष काढावा.

त्यांनी जी 'आवेदनपत्रे' लिहिली होती, त्याचा उल्लेख शोधत आहे.

खूप तपशिलात उल्लेख आहेत. माझी जन्मठेप पुस्तक कॉपीराईट फ्री आहे आणि जालावर अनेक ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. ऑडियो रुपात पण आहे. नेमके एक एक पृष्ठ क्रमांक सांगणे अवघड पण वाचल्यास सहज सापडतील. त्यांनी तिथे पोचल्यावर एक किमान कालावधी उलटताच अर्ज करण्यास सुरुवात केली होती.

मी माफीनामा लिहून दिला अशीच शब्दरचना तात्यारावांनी त्या वेळी करायला हवी होती हे तर्कदृष्ट्या योग्य वाटत नाही. अर्ज हा शब्द आणि त्यात आपण काय काय लिहिले आणि कोणत्या अटी मान्य केल्या. बाहेर पडणे, सुटणे हे कसे अधिक व्यवहार्य होते हे सर्व स्वतःच पूर्वीच लिहून ठेवले असल्याने त्यात नवीन शोध काहीच नाही.

हे विवेचन फक्त त्यांनी खुद्द उल्लेख केले होते, इतक्या पुरते आहेत. तात्याराव सावरकर यांच्या अंदमानात जाण्याआधीच्या आणि नंतरच्या स्ट्राटेजीज अगदी वेगवेगळ्या होत्या आणि पूर्वीचे जहाल सशस्त्र संघर्ष करण्याची वाट सोडून देऊन त्यांनी नंतर खूपच सौम्य आणि सामाजिक कार्य टाईपचा वेगळा मार्ग घेतला हे तर उघडच आहे. पण त्यात काही चूक आहे असे मात्र म्हणण्याला काही आधार नाही. बोटीवरून उडी टाकून पळून जाऊन भूमिगत होणे या प्रकारचे धाडस आता करणे साध्य होणार नाही याची त्यांना कल्पना आली असावी. शरीराची हानी, मनाची हानी आणि अत्यंत सावध झालेले ब्रिटिश अशा नवीन पार्श्वभूमीवर त्यांनी जे शक्य आणि उपयुक्त वाटले ते केले. ते उपयुक्तता वादी आणि अत्यंत वस्तुनिष्ठ होतेच. आपल्याला नंतर कोण काय म्हणतो वीर की भगोडा याने फरक पडणारे, आणि त्यानुसार आपले प्लॅन बदलणारे व्यक्तिमत्त्व असे ते वाटत नाहीत.

कोणत्याही एका विचार पद्धतीने लढा देऊन इंग्रज देश सोडून जाणे अवघड होते असेच वाटते. त्या त्या वेळी जे पटले ते करत राहून अनेकांनी प्रयत्न चालू ठेवले.

अहिरावण's picture

2 Apr 2024 - 10:46 am | अहिरावण

माफीनामा असा फारसी शब्द ते वापरतील अशी शक्यता कमीच म्हणा.

सर्वात महत्वाचे म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळातील अनन्वित अत्याचार आणि छळाच्या अमानुष कहाण्या पुढे आल्यानंतर युद्धकैदी, राजकैदी यांच्यासोबतच्या वर्तणुकीमधे सर्व राष्ट्रांनी सर्वानुमते बदल करण्याचा घेतलेला निर्णय. अंमलीपदार्थविरोधी मोहीमही त्याच काळातील. सर्व कैद्यांना एकसमान वागणूक न देणे हा त्याचा भाग ज्यामुळे माणसांची मने आणि मते बदलू लागली.

पण लक्षात कोण घेतो !! आमचं टुमणं एकच..... सावरकर तुच्छ !! चालू द्या..

स्वधर्म's picture

2 Apr 2024 - 4:33 pm | स्वधर्म

अत्यंत संयमित प्रतिसाद

दिल्याबद्दल आभारी आहे. ध्रवीकरण न करता या प्रकाराकडे पाहण्याचा माझा प्रयत्न आहे. पुस्तक मिळवून वाचणार आहे.
खूप लोक अंदमानात होते, व ते पिचून गेले. त्यांनी अशी आवेदनपत्रे दिली नाहीत, याकडेही दोन्ही दृष्टीने पाहता येईल. एक ते मूर्ख होते व दोने त्यांनी कोणत्याही प्रकारे सरकारकडे याचना करायला नकार दिला.
इतर अनेक आक्षेप सावरकर यांच्यावर घेतले गेले होते. उदा. गांधी हत्त्येतील त्यांचा सहभाग. पण हे सर्व खूप म्हणजे खूपच गुंतागुंतीचे आहे. अशा प्रकारे इतर क्रांतीकारकांविषयी फारसे ध्रुवीकरण झालेले आढळत नाही, हेही तितकेच खरे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Apr 2024 - 5:22 pm | अमरेंद्र बाहुबली

अंदंमानातल्या एका शूर कैद्याने सरल वाईसरोयला भोसकून ठार केले होते. धन्य ते देशप्रेम.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

----
https://www.loksatta.com/maharashtra/devendra-fadnavis-special-offer-for...

-----

माझं एक साधे स्वप्न आहे की, काही परमपूज्य लोकांनी, किमान एक दिवस तरी, कोलू वर काम करावे....

---

अहिरावण's picture

31 Mar 2024 - 10:33 am | अहिरावण

गेला बाजार एक तास...

जाऊ द्या... एक मिनिट..

तेही सोडा... निदान प्रामाणीकपणे स्वतःशी कल्पना तरी करुन पहा.... नाही जमणार त्यांना.. लायकी लागते त्यासाठी.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2024 - 11:37 am | अमरेंद्र बाहुबली

माझ्या आजी प्रमाणे छातीत होळ्या झेलून दाखवाव्या असं आवाहन राहुल गांधींनी केलं तर पळता भूई थोडी होईल.

बाहुबली तुमच्या आणि आमच्यात फरक हा आहे कि

आम्ही गांधी आणि नेहरूंच्या कितीही चुका दाखवत असलो / असहमत असलो तरी आम्ही हे मानतो कि
१) गांधींनी स्वातंर्त्य चळवली साठी सावरकरांन पेक्षा जास्त परिणामकारक पद्धतीने जनतेला एकत्र आणले आणि
२) नेहरूंनी सुरवातीला देश उभारणी करताना पंतप्रधान म्हणून खूप कष्ट घेतले
३) इंदिरा गांधींनी बांगलादेश मुक्ती आणि ब्लु स्टार हे देशहिताचच्या दृष्टीने घेतलेले उत्तम निर्णय असेही मानतो ...
एवढेच काय सोनियाजींचे आश्चर्य आणि कौतुक वाटते की सासू आणि नवर्याचा खून होऊन पण आणि भरपूर पैसे असताना हि बाई भारतात राहिली , सहज यूरोपात किंवा अमेरिकेत स्थायिक होऊ शकली असती .

याउलट तुमची विचारसरणी सावरकरांना सरसकट गटारात फेकते

आज एवढया वर्षांनी सुद्धा सावरकरांचे "देश आधी कि धर्म" आणि त्याचे व्यापक परिणाम हे विचार आजही लागू होतात या बद्दल तुमचं अर्थात मौन

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2024 - 4:33 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा! जरा सावरकरांवर टीका झाली की नेहरू, गांधी ह्यांचं महत्व पटू लागतं! व्वा! प्रगती आहे.
बाकी सावरकरांना आम्ही कधी गटारात फेकले?? सावरकरांचे गोहत्य् बद्दलचे विचार मला पटतात, तयेच तियांनी सनातनी, मनूवादी ब्राम्हणांसोबत दिलेला लढाही आम्हाला आवडतो. बाकी काही सावरकरभक्त/संघी लोक जेव्हा जेव्हा नेहरू गांधी कुटूंबाबद्दल खालची भाषा वापरू लागतात तेव्हाच सावरकरांबद्दलचे निगेटीव बाहेर येते.

सावरकरांवर टीका झाली की नेहरू, गांधी ह्यांचं महत्व पटू लागतं! व्वा! प्रगती आहे.
अजिबात नाही नेहरू आणि गांधींचे योगदान जे आहे ते आहे त एकही आज नाही समजले
इंदिराजींचे २ भावलेले निर्णय काय आज दिसायला लागले

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2024 - 6:37 pm | अमरेंद्र बाहुबली

अजिबात नाही नेहरू आणि गांधींचे योगदान जे आहे ते आहे त एकही आज नाही समजले
इंदिराजींचे २ भावलेले निर्णय काय आज दिसायला लागले
हे नकली डिग्रीवाल्याला कळेल तो सुदीन. खरोखर काॅलेजला जाऊन डिग्री मिळवली असती तर नेहरूंविरूध्द गरळ ओकला नसता.

चौकस२१२'s picture

1 Apr 2024 - 7:14 am | चौकस२१२

काॅलेजला जाऊन डिग्री बाहुबली .... झाली सुरु मोदींवर टीका दुसरं तत्वाचा/ तर्काचा काही मुद्दा नाही तुमच्याकडे .. त्यांचा काय संबंध हा धागा आहे स्वरकार चित्रपट / त्यांचे जीवन / विचारसरणी त्याचा आजचा संदर्भ इत्यादी वॉर आहे उदाहरण "देश आधी कि धर्म" यावर चिडीचूप कारण टूल किट मध्ये बसत नाही ना!

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Apr 2024 - 9:02 am | अमरेंद्र बाहुबली

माझा वरील प्रतिसाद सावरकर टार्गेट का झाले ह्यावर होता. काही लोक नेहरूंविरूध्द गरळ ओकतात त्यामुळे सावरकर टार्गेट झाले. मी नकली डिग्री वाला बोललो, कुणाचेही नाव घेतले नाही तरी तुम्ही मोदींवर टीका झाली हे ताडले. म्हणजे मोदींची डिग्री नकली आहे हे बहुतेक भाजपच्या लोकांनाही कळाले आहे असे दिसतेय.

अहिरावण's picture

1 Apr 2024 - 9:39 am | अहिरावण

लै भारी !!

सुबोध खरे's picture

1 Apr 2024 - 10:21 am | सुबोध खरे

बाडीस

सुबोध खरे's picture

1 Apr 2024 - 10:22 am | सुबोध खरे

बाडीस

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?

एकदा म्हणतात

मी वाचलं होतं माझी जन्मठेप, माफीनामा लिहील्याचा ऊल्लेख सावरकरांनी कुठेही केला नाहीये. ही माहीती त्यांनी लपवली असेच म्हणावे लागेल.

मग पुरावा दिल्यावर म्हणतात

अच्छा. मला वाचून बरीच वर्षे म्हणजे जवळपास दहा वर्षे झाली आहेत. माफीनाम्याला आवेदनपत्र असं नाव दिलं असेल त्यामूळे ते ठळक लक्षात राहीलं नसावं.

हातात कळफलक असल्यावर तो बडवलाच पाहिजे अशी काही लोकांची स्थिती असते.

त्याला उत्तर देणे हा निव्वळ कालापव्यय आहे.

अहिरावण's picture

31 Mar 2024 - 7:12 pm | अहिरावण

माझ्या आजीप्रमाणे आणीबाणी लावून दाखवावी असं आवाहन राहुल गांधींनी केलं तर कुणाची पळता भूई थोडी होईल? ऑ !!

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2024 - 7:32 pm | अमरेंद्र बाहुबली

मी डूआयड्यांच्या/ खर्या आयडीने यायची हिंमत नसलेल्यांच्या तोंडी लागत नाही.

अहिरावण's picture

31 Mar 2024 - 7:35 pm | अहिरावण

मी लागतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2024 - 11:39 am | अमरेंद्र बाहुबली

ह्यावर ठाकरेंनी मनिपूर ला फडणवीसांनी जाऊन यावे असे आवाहन केलेय, ठाकरे खर्च ऊचलायलाही तयार आहेत. पाहू फडणवीस आवाहन स्विकारताय का.

मुक्त विहारि's picture

31 Mar 2024 - 1:25 pm | मुक्त विहारि

ही म्हण आठवली....

राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

----

हा हा...काय योगायोग आहे! आमच्या समोरच्या काकू पण परवा हेच म्हणत होत्या.राहूल गांधींना कोणी तरी हा सिनेमा दाखवा ;)

त्या पेक्षा...

त्यांनी, मशीन आणले तर उत्तम...

अमरेंद्र बाहुबली's picture

31 Mar 2024 - 1:42 pm | अमरेंद्र बाहुबली

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

----
ह्या पेक्षा फडणवीसांनी हा सिनेमा स्वपक्षातील नितेश राणेंना दाखवावा .त्यांनी सावरकरांचा अपमान केला होता. आधी स्वतच घर पहा म्हणावं.

कर्नलतपस्वी's picture

31 Mar 2024 - 9:13 pm | कर्नलतपस्वी

आजच चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघीतला. सर्वांनी बघावा असा चित्रपट आहे. सावरकरांचे विचार पटतात. लहानपणापासून वाचले आहेत.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा सख्खा शेजारी.